✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आयटीच्या गोष्टी - नमन

ध
धन्या यांनी
Sat, 02/16/2013 - 16:35  ·  लेख
लेख
नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते. आयटी म्हटलं की सगळ्यात आधी दोनच गोष्टी नजरेसमोर येतात, एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं. दोन्ही गोष्टी आयटीमधील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या प्रमुख अंगाबद्दल शब्दशः खर्‍या असल्या तरी आयटी म्हणजे केवळ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नाही. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्येही बक्कळ पैसा आणि एसीमधील काम यांच्या जोडीनेच इतरही असंख्य भानगडी असतात. काही चांगल्या तर काही वाईट. आपण भारतीय स्वतःला आयटीतील बाप समजतो. पण ते खरं नाही. या क्षेत्रात काम करणारे (आणि वास्तवाचे भान असलेले) चांगलेच ओळखून आहेत की आपण या क्षेत्रातले पाटया टाकणारे हमाल आहोत. आपल्याला मिळणारा बक्कळ पैसा हा केवळ चलनातील फरकाचा प्रताप आहे. तसेच अमेरिका आणि युरोप खंडांमध्ये वाढलेले संगणकीकरण परंतू स्वस्त आणि कुशल संगणक कामगारांची अनुपलब्धता हीसुद्धा आपल्याला सो कॉल्ड आयटीमधले बाप बनवण्यास कारणीभूत आहे. पुढे हे सारं आपण विस्ताराने पाहूच. बरेच दिवसांपासून मनात होतं की उगाचच प्रतिसादाच्या पिंका टाकण्यापेक्षा काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करावा. पण टंकायचा कंटाळा येत होता. त्याचबरोबर विषय कुठला निवडावा हे ही कळत नव्हतं. माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या प्रकाशात उलगडून दाखवावा की मानसशास्त्राचं बोट धरुन मनोविकारांबद्दल सहज सोप्या भाषेत लिहावं हे कळत नव्हतं. संगणक सुरक्षा या विषयावर काही खरडावं असंही कधी कधी वाटायचं. नुकतीच चालू झालेली प्रथम फडणीसांची मोबाईल उत्क्रांतीवरील सुंदर मालिका, त्याहीआधीची सोकाजीनानांची अत्याधुनिक तंत्रज्ञान सहज सोप्या भाषेत सांगणारी लेखमाला वाचून वाटलं की आपण आयटीवर का लिहू नये. आणि ठरवलं की आपण आयटीवरच लिहायचं. कमी अधिक अशा साडे सात आठ वर्षांच्या माझ्या आयटी करीयरमध्ये खुप काही गोष्टी पाहील्या, अनुभवल्या. काही आनंद देणार्‍या, काही आपल्या क्षमतेचा कस पाहणार्‍या, काही मनस्वी चीड आणणार्‍या, तर काही नैराश्येच्या खोल गर्तेत फेकून देणार्‍या. या सार्‍याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न असेल. मिपावर आयटीमधील रथी महारथी आहेत. ते माझ्या लेखनात काही चुका झाल्या तर दाखवून देतीलच. तसेच ते प्रतिसादांमधून आपले अनुभवही सांगतील, वाचकांच्या प्रश्नांना उत्तरेही देतील याची मला खात्री आहे. नमनाला घडाभर तेल वाहून झालं आहे. मुद्दयाचं असं काही लिहिलंच नाही. ते सारं आपण पुढच्या भागापासून पाहू. तोपर्यंत, स्टे टयुन्ड* !!! *स्टे टयुन्ड - हा आयटी मॅनेजर्सचा आवडता शब्दप्रयोग. शब्दशः अर्थ "तुमचा रेडीओ अमुक अमुक फ्रीक्वेंसीला टयून करा" एव्हढाच असला तरी आयटीमध्ये त्याला खुप मोठा अर्थ आहे. तुम्हीच पाहा: प्रसंग १ : अबक आयटी कंपनी आपली कर्मचारी संख्या वाढवण्याच्या विचारात आहे. दे हॅव एक्स्पान्शन प्लान. या संदर्भात एका नामांकीत सरकारी संगणक शिक्षणसंस्थेच्या नोटीस बोर्डवर नोटीस लावली जाते. पोरं पोरी भराभर आपापले रिझुमे, सीव्ही जे काही असेल ते मॅनेजरच्या ईमेल आयडीवर पाठवतात. (कंपनी सध्यातरी छोटी असल्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजरच रीक्रुटमेंट, रीसोर्स मॅनेजमेंट पाहत असतात.) पोरांचा भरभरुन प्रतिसाद पाहून मॅनेजर हरखून जातो. रीप्लाय म्हणून केलेल्या ईमेलमध्ये पोरांना तो खुप मोठी मोठी स्वप्नं दाखवतो. शेवटी थोडंसं रीक्रुटमेंट प्रोसेसबद्दल, इंटरव्ह्यू शेडयुलबद्दल लिहितो लिहितो. अगदी शेवटची ओळ असते, स्टे टयुन्ड !!! प्रसंग २ : कंपनीत अ‍ॅट्रीशन रेट वाढू लागला आहे. मॅनेजमेंटच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. याच गतीने पोरं पोरी जरी कंपनी सोडून जाऊ लागली तर एक दिवस कंपनीला टाळं ठोकावं लागेल याची त्यांना खात्री पटू लागली आहे. काहीतरी करणं भाग आहे. मग एचारमधील चार डोकी/मॅनेजमेंटमधील चार डोकी मिळून काहीतरी प्लान बनवतात. याच कंपनीत पोरांना कसं उज्ज्वल भवितव्य आहे याच्या लंब्याचौडया बाता केल्या जातात. हा प्लान एक खुपच वरचा मॅनेजर एक दिवस टाऊन हॉल नामक मीटींगमध्ये सार्‍या कर्मचार्‍यांना समजावून सांगतो. त्याचं ते गाजरदर्षक भाषण संपवता संपवता तो म्हणतो, स्टे टयुन्ड !!! प्रसंग ३ : अबक नावाच्या भारतीय आयटी कंपनीचा कखग नामक अमेरिकन तेल आणि वायू कंपनीशी आयटी सेवा पुरवण्यासाठीचा करार आहे. कधीतरी या अमेरिकन कंपनीचा एक उच्चपदस्थ अधिकारी अबक च्या भारतातील डेव्हलपमेंट सेंटरला भेट दयायला येतो. त्याच्यासाठी पायघडया घातल्या जातात, त्याला टोपी घातली जाते (सॉरी, पगडी घातली जाते), त्याची आरती केली जाते. या सार्‍या पाहूणचाराने तो भारावून जातो. शेवटी तो टाऊन हॉल नामक मीटींगमध्ये भाषणाला उभा राहतो. आमच्या कंपनीला या वर्षी इतके इतकी मिलियन की बिलियन डॉलर नफा होणार आहे. पण हा नफा कमावण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून उत्तम अशा आयटी सेवेची अपेक्षा आहे अशा टाईपचं ते भाषण असतं. भारतीय कंपनीच्या मॅनेजरच्या डोळ्यांसमोर ऑनसाईट अपॉर्च्युनिटीज दिसायला लागतात. तो "क्लायंट" आपलं भाषण एकदाचं संपवतो. त्याचं शेवटचं वाक्य असतं, स्टे टयुन्ड !!!
  • आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच
  • आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)

Book traversal links for आयटीच्या गोष्टी - नमन

  • आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
30839 वाचन

💬 प्रतिसाद (115)

प्रतिक्रिया

धन्याजीराव, स्टेईंग ट्यून्ड!

आदूबाळ
Sat, 02/16/2013 - 16:41 नवीन
धन्याजीराव, स्टेईंग ट्यून्ड! कीप द लेखस फ्लोईंग हां मात्र...:)
  • Log in or register to post comments

1 टू आदूबाळ.

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/16/2013 - 16:53 नवीन
1 टू आदूबाळ. आणी आमच्या सारख्या या कुठल्याच क्षेत्राची काहिही माहिती नसलेल्यांसाठी या लेखमालेबद्दल धण्यवाद्स! :-) @माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या प्रकाशात उलगडूनदाखवावा की मानसशास्त्राचं बोट धरुन मनोविकारांबद्दल सहज सोप्या भाषेत लिहावं >>>आणी याच्याही प्रतिक्षेत :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सुरुवात

मन१
Sat, 02/16/2013 - 16:49 नवीन
सउरुवात तर चांगलिये. पण जालावर बहुशः आयतीवाले अध्कांशाने वावरत असल्याने आधीच त्यांचं ओव्हर रिप्रेझेंटेशन झालय. ह्यापेक्षा मानसशास्त्रातील उलगडलेल्या लिहिल्या असत्यात तर अधिक आवडलं असतं.
  • Log in or register to post comments

पण जालावर बहुशः आयतीवाले

धन्या
Sat, 02/16/2013 - 16:56 नवीन
पण जालावर बहुशः आयतीवाले अध्कांशाने वावरत असल्याने आधीच त्यांचं ओव्हर रिप्रेझेंटेशन झालय.
डू यू हॅव डेटा? सेंड मी पीपीटी ईओडी टुडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

वेल...

मोदक
Sat, 02/16/2013 - 17:20 नवीन
वेल... मि. धनाजीराव, आय थिंक देअर इस बेंचमार्कींग इश्यू विथ मनोबा. ओव्हररिप्रेझेंटेशन ऑन व्हॉट स्केल..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

=))

सोत्रि
Sat, 02/16/2013 - 17:21 नवीन
सेंड मी पीपीटी ईओडी टुडे.
ज ह ब र्‍या! - ('ईओडी टुडे'च्या जिवावर जगणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आयटीवाले नाना

अभ्या..
Sat, 02/16/2013 - 17:27 नवीन
असं सुरुवातीलाच आयटीभाषेत नाय बाबा बोलायचं. ;) एकतर आत्ता कुठे धनाजी रावांनी समजावून द्यायला सुरुवात केलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

पिपिटी इझ नॉट रेड्डी येट .

जेनी...
Sat, 02/16/2013 - 21:59 नवीन
=)) पिपिटी इझ नॉट रेड्डी येट .:P dhanyaakaakaa paTTAapaTtAa liwa .. mee waachatey he lakshaat THiwaa =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

ईओडी बरोबर सीओडब्ल्यू असा पण

आदूबाळ
Sat, 02/16/2013 - 17:56 नवीन
ईओडी बरोबर सीओडब्ल्यू असा पण प्रकार असायचा कचेरीत. क्लोजर ऑफ वर्क. सीओडब्ल्यू म्हणजे संध्याकाळी सहापर्यंत पाठवा आणि ईओडी म्हणजे उशीरापर्यंत कचेरीत राबून रातोरात पाठवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आता आता ह्या ईओडीबरोबर ते

किसन शिंदे
Sat, 02/16/2013 - 18:52 नवीन
=)) आता आता ह्या ईओडीबरोबर ते एएस्एपी पण लै डोकं खातंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

"एएस्एपी"चा कुणी "असॅप" असा

आदूबाळ
Sat, 02/16/2013 - 19:15 नवीन
"एएस्एपी"चा कुणी "असॅप" असा उच्चार केला की माझ्या डोळ्यांत खून चढतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

आमच्याकडे सी ओबी = क्लोजर ऑफ

शुचि
Sat, 02/16/2013 - 18:56 नवीन
आमच्याकडे सी ओबी = क्लोजर ऑफ बिझनेस म्हणायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मस्तच रे धन्या.

किसन शिंदे
Sat, 02/16/2013 - 16:55 नवीन
मस्तच रे धन्या. सकाळी ११ ला हापिसात पोहचल्यानंतर दुपारी १२ वाजता मिटिंग रुमच्या एका कोपर्यात दोन चेअर्सवर तंगड्या पसरून झोप कशी घ्यायची असते हे ही टाक या अनुभवांमध्ये, अर्थात असा अनुभव तुला असेल तर. ;)
  • Log in or register to post comments

चला आयटीत गेलो नाही तेच कसं

५० फक्त
Sat, 02/16/2013 - 17:02 नवीन
चला आयटीत गेलो नाही तेच कसं बरं झालं, हे बायकोला समजावुन सांगायला काहीतरी मिळेल यातुन अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments

छे छे !

परिकथेतील राजकुमार
Sat, 02/16/2013 - 17:07 नवीन
अपेक्षाभंग झाला. दोन पेग झाल्यावरती अनेक मित्रांच्या तोंडून हे ऐकतच असतो. ;) धनाजीराव काहीतरी 'आतल्या गोटातले' येऊ द्या बॉ.
  • Log in or register to post comments

मालक जरा दमानं घ्या. ज्या

धन्या
Sat, 02/16/2013 - 17:11 नवीन
मालक जरा दमानं घ्या. ज्या गोष्टी बाहेर माहिती आहेत त्या लिहिण्याचा उद्देश नाहीच. ही फक्त "इंट्रो" आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ऑक्के सायर !

परिकथेतील राजकुमार
Sat, 02/16/2013 - 17:13 नवीन
वाट बघींग...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

धाग्याच्या लेखकांनी जर

५० फक्त
Sat, 02/16/2013 - 17:26 नवीन
धाग्याच्या लेखकांनी जर वाचकाला पहिल्या भागापासुन आयटीच्या आतल्या जगाची ओळख करुन दिली तर एकदम समोर आलेल्या त्या अनोख्या सत्याने तो असा भांबावला असता. वेगळ्या परिस्थीतीत वाढवल्याचा वेगळा परिणाम म्हणजे नॉन आयटि पब्लिक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

अभ्या..
Sat, 02/16/2013 - 17:29 नवीन
_________/\_________ गाववाले दंडवत तुम्हाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

येऊ द्या

अभ्या..
Sat, 02/16/2013 - 17:17 नवीन
५० दादा आणि पराशी सहमत. जरा काहीतरी डार्क साईड वगैरे पण सांगा धनाजीराव. च्यायला ते आयटी वाल्याचे बघून इथली पोरं पण एसी आन नेट मागतेत पीसीवर. नेट घेऊन काय करणार तर दिवसभर लाईक्स वाटत बसणार. काम गेले बोंबलत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

वा, मस्त लिहिलेय!!! आमचे

बॅटमॅन
Sat, 02/16/2013 - 17:10 नवीन
वा, मस्त लिहिलेय!!! आमचे करिअर छोटे असले तरी मित्रांकडून यातल्या गोष्टी ऐकल्या आहेत. पुढील भागांच्या आतुरतेने प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

छान सुरुवात.

सस्नेह
Sat, 02/16/2013 - 17:15 नवीन
आणखी हायटी किस्से येउद्या..
  • Log in or register to post comments

बघिंग्ड द वाट!

प्यारे१
Sat, 02/16/2013 - 17:22 नवीन
बघिंग्ड द वाट! - आयटीगावकुसाबाहेरचा प्यारे
  • Log in or register to post comments

गुड वन!

दादा कोंडके
Sat, 02/16/2013 - 17:34 नवीन
मलाही खुप दिवसांपासून (वर्षांपासून!) उत्सुकता आहे. च्यामारी आयटीमध्ये लोकं करतात काय? गळ्यात बॅज अडकवून, स्मार्टफोनवर खेळत बसची वाट बघत असलेले लोक चकचकीत निळ्या काचेच्या बिल्डींगात जाउन नेमकं करतात काय? पण नक्की कशाबद्द्ल लेख असणार आहे ते अजून कळलं नाही. थोडा विस्कळीत वाटला. "बट आय विल स्टे ट्युन्ड!"
  • Log in or register to post comments

श्टेयिंग ट्युन्ड

पैसा
Sat, 02/16/2013 - 17:36 नवीन
आणखी येऊ द्या. डार्विनवादी आध्यात्म, सोपे मानसशास्त्र आणि सोपे आयटी अशा सर्व लेखामालांची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/16/2013 - 18:33 नवीन
धनाजीराव लेखन काळजीपूर्वक वाचतोय. >>> आयटी म्हटलं की सगळ्यात आधी दोनच गोष्टी नजरेसमोर येतात, एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं. पुढील लेखन वाचून माझं मत बदलेल असं वाटतं. :) >>> बरेच दिवसांपासून मनात होतं की उगाचच प्रतिसादाच्या पिंका टाकण्यापेक्षा काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करावा. मस्त निर्णय. आवडत्या विषयावर भरपूर येऊ दे. कंपनी, बॉस, कायम स्वरुपाची नोकरी, नोकरीतील धोके, बक्कळ बँक बॅलेन्स, टीम लिडर, बग्स, बॉस, सॅलरी, सॅलरी वाढत जाईल-थापा, इंक्रिमेंट, मनस्ताप, चहाड्या, थकवा. निराशा, कुटुंब, मानसिकता असे विषय पुढे येतीलच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

येस सर...

धन्या
Sun, 02/17/2013 - 00:47 नवीन
कंपनी, बॉस, कायम स्वरुपाची नोकरी, नोकरीतील धोके, बक्कळ बँक बॅलेन्स, टीम लिडर, बग्स, बॉस, सॅलरी, सॅलरी वाढत जाईल-थापा, इंक्रिमेंट, मनस्ताप, चहाड्या, थकवा. निराशा, कुटुंब, मानसिकता असे विषय पुढे येतीलच.
अगदी याच वाटेने आपण जाणार आहोत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणखी एक

आनंद घारे
Mon, 02/18/2013 - 10:14 नवीन
मध्यरात्र उलटून गेल्यानंतर ऑफिसातून घराकडे जाण्याचा विचार करणे. हे भारतात राहून युरोप अमेरिकेतील क्लायंट्सना सेवा पुरवणार्‍या कंपन्यांमध्ये काम करणार्‍यांना लागू होते. अलीकडे घरी बसून लॅपटॉपवर काम करण्याची सोय ज्यांना मिळाली आहे त्यांना कदाचित मध्यरात्रीपूर्वी परतणे शक्य होत असले तरी ते फक्त शरीराने घरी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पहिला भाग नुसताच, 'लिहिणार

राजेश घासकडवी
Sat, 02/16/2013 - 19:36 नवीन
पहिला भाग नुसताच, 'लिहिणार आहे, स्टे ट्यून्ड' असं लिहून, आम्हा नॉन आयटी लोकांना आयटी जगाचं विश्वरूपदर्शन घडेल अशा अपेक्षा वाढवलेल्या आहेत. तेव्हा स्टेइंग ट्यून्ड
माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या प्रकाशात उलगडून दाखवावा
हे वाचायला निश्चितच आवडेल.
  • Log in or register to post comments

प्यार का पंचनामा

कपिलमुनी
Sat, 02/16/2013 - 19:51 नवीन
चित्रपटामधील लिक्वीडचे डायलॉग ऐका ...आय टी चे भारी चित्रण आहे
  • Log in or register to post comments

सहमत आहे...

धन्या
Sun, 02/17/2013 - 00:51 नवीन
ज्या कुणाला आयटीमधील पोरापोरींची ईंटर्नल म्हणजे हापिसातील प्रेमप्रकरणं कशी असतात हे माहिती करुन घ्यायचे असेल त्याने प्यार का पंचनामा सिनेमामधील लिक्वीडची प्रेमकहाणी समोर आणावी. रीयलमध्येही तसंच्या तसंच घडत असतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सहमत आहे

टवाळ कार्टा
Sun, 02/17/2013 - 19:46 नवीन
सहमत आहे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

धनाजीराव, फक्त तिरप्या अक्षरात लिहू नका, ते वाचायला त्रास आहे

संजय क्षीरसागर
Sat, 02/16/2013 - 20:07 नवीन
विषय मस्त निवडलाय. आता सविस्तर भाग टाका.
  • Log in or register to post comments

आय

तिमा
Sat, 02/16/2013 - 20:21 नवीन
आय या अक्षरापासून सुरु होणार्‍या अनेक शब्दांची मला भीति वाटते. उदा.- आयटी, आयक्यू,आयआयटी,आयझेड आणि तत्सम. पण नवे काही कळणार असेल तर वाचायची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

............... आरेरे आय टी

माझीही शॅम्पेन
Sat, 02/16/2013 - 21:11 नवीन
............... आरेरे आय टी मध्ये लोक काय करतात ही यक्ष प्रश्न सगळ्याना पडलेला असतो , त्यावर जास्तीत जास्त प्रकाश टाकून उघड सर्वाना पाडण्याचे पालथे धंदे ताबडोतोब बंद करा , कृ. प्र. ह. घ्या :) (अपरैझल च्या कर्व वर घरणगाळणारी माझीही शॅम्पेन)
  • Log in or register to post comments

चांगली सुरुवात

श्रीरंग_जोशी
Sat, 02/16/2013 - 21:49 नवीन
याच व्यवसायातून माझ्या दोन वेळच्या भाकरीची सोय होत असल्याने जीवाभावाचा विषय. आगामी लेखांमध्ये प्रतिसादांद्वारे भर घालण्याचा प्रयत्न करीन... अन या विषयासाठी मराठी आंतरजालावर घासून घासून गुळगुळीत झालेल्या अध्यात्माच्या विषयाला बाजूला ठेवल्याबद्दल तर विशेष धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

>> स्टे टयुन्ड

मराठे
Sat, 02/16/2013 - 21:54 नवीन
>> स्टे टयुन्ड या शब्दांचा अर्थ नीट समजून घ्यायचा असेल तर अशीही बनवाबनवी मधला धनंजय मानेचा हा प्रसंग आठवा: घरमालक: 'अहो पण ते औषधाचं लक्षात ठेवा हं' धनंजय माने: 'नक्की आणतो तो औषध. "वाट बघा"'
  • Log in or register to post comments

हाहाहा...

धन्या
Sun, 02/17/2013 - 00:53 नवीन
आयटीमध्येही स्टे टयुन्डचा अर्थ हाच आहे. धनंजय मानेंना अभिप्रेत असलेला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

बाकी नमनाला घडाभर तेल असं जरी

मराठे
Sat, 02/16/2013 - 21:57 नवीन
बाकी नमनाला घडाभर तेल असं जरी वाटत असलं तरी ती सुद्धा आयटीची खासियतच.. 'आयडी-अँड-असेस' नावाचा एक महत्वाचा प्रकार सोफ्टवेअर डेवलपमेंट मधे असतोच.. म्हणजे जे आपण बनवायला घ्यायचं म्हणतोय त्याची खरच गरज आहे का आणि त्याने किती फायदा होईल किंवा बचत होईल वगैरेची चाचपणी करणे.
  • Log in or register to post comments

3 signs that the person is working in IT .....

तुमचा अभिषेक
Sat, 02/16/2013 - 22:29 नवीन
3 signs that the person is working in IT ..... 1. Stressed 2. Depressed 3. Still Well Dressed .. ; या लेखमालिकेनंतर हा नुसता विनोद होता की काळा विनोद हे उलगडेल अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments

मानसशास्त्राबद्दल लिहलं असतं तर लिखाण वेगळ्या उंचिवर पोचलं असतं

अग्निकोल्हा
Sat, 02/16/2013 - 23:43 नवीन
अध्यात्म समृध्द अडगळ तर आयटी फारच कॉमन टॉपिक आहे, की यावर विवीध ठिकाणी ऑलरेडी जंक/टाइअमपास्/खट्याळ मटेरिअल इतकं बदाबदा उपलब्ध आहे की यात खरच काही नाविन्य नाहीये. अर्थात तुम्हि साक्षात भाषानारायण असल्याने केवळ "तुमचे शब्द" हेच काय ते लेखनाला भव्य उंची मात्र नक्कि देणार यात तिळमात्र शंका नाही म्हणूनच आतुरतेने वाट बघतोय पुढच्या भागाची. लेखनाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

छान झालाय लेख... पुढचा भाग हि

Mrunalini
Sun, 02/17/2013 - 00:38 नवीन
छान झालाय लेख... पुढचा भाग हि लवकर टाका.
  • Log in or register to post comments

वाचत आहे

प्रसाद गोडबोले
Sun, 02/17/2013 - 01:13 नवीन
:)
  • Log in or register to post comments

ट्युन्ड..

उपास
Sun, 02/17/2013 - 01:48 नवीन
उत्सुक..
  • Log in or register to post comments

धनेवाद

चौकटराजा
Sun, 02/17/2013 - 03:58 नवीन
म्या बी येकेकाळी आयटी वाला हमाल होतो. बारीक बारीक कोबॉल चे प्रोगाम यायचे मला. पण मला देखील हा प्रश्न पडला होता की एवढे पंचवीस पंचवीस हजार जण करतात काय तिथे? आज देखील मला भिती वाटते ही हा आय टी चा फुगा फटकन फुटला तर एवढी बॅंकानी वीस वीस वर्षाची लोन दिल्येत त्या बॅकेत आपले म्हातारपणाचा आधार असलेली ठेव हा फुटलेला फुगा बुडवील काय ? धना साहेब, ष्टेइंग ट्युन्ड !
  • Log in or register to post comments

नाही फुटणार हो फुगा. सर्वत्र

शुचि
Sun, 02/17/2013 - 04:24 नवीन
नाही फुटणार हो फुगा. सर्वत्र काँप्युटर अ‍ॅप्लीकेशन्स वापरली जातात. त्यांच्या मेंटेनन्स, एन्हॅन्स्मेंटकरता हमाल लागणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हे सगळे विन्टेल/ एस्सॅप वाले

सुहास..
Sun, 02/17/2013 - 10:02 नवीन
हे सगळे विन्टेल/ एस्सॅप वाले असाच डेटा चढवत बसतात आणि ताप आम्हा स्टोरेज वाल्यांना ;) धन्या, लेका तेव्हढे येक्ष्चेंज च्या विन्डोज ची डिस्क आयडीई ची करून घे, स्साल परफॉरमन्स नाही म्हणून आमच्या नावाने बोंबलत बसता ;)
  • Log in or register to post comments

भारतीय आय टी

बाळकराम
Sun, 02/17/2013 - 17:43 नवीन
नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते. ज्योक ऑफ द डे! तो जमाना १५ वर्षापूर्वीच संपला, आता आयटीतली लोक काय हमाल आहेत, ते सगळ्याना कळून चुकलंय. आपण भारतीय स्वतःला आयटीतील बाप समजतो. तुम्ही पुढे याचं स्पष्टीकरण दिलं आहेच, आणि या प्रांजळपणाबद्दल तुमचे नक्कीच कौतुक आहे. पण वस्तुस्थिती तेव्ह्ढयापुरतीच मर्यादित नाही. मुळात भारतीय "आयटी" ही नुसती आयटी "सर्विसेस प्रोवायडर" आहे. खर्‍या व्यवस्थापनशास्त्रात ("स्टे ट्युन्ड"- वगैरे खुळचट प्रकार नव्हे) जी व्हॅल्यू चेन सांगतात त्यानुसार आयटी सर्विसेस ची व्हॅल्यू चेनच्या एका एन्ड ला ओरॅकल, एसएपी इ कंपन्या येतील दुसर्‍या एन्ड ला इन्फी, विप्रो इ भारतीय कंपन्या येतील- थोडक्यात ज्या फक्त लेबर काँट्रॅक्टर आहेत असं म्हणता येइल अशा. भारतातल्या आयटी क्षेत्राचा (भारतात) कितीही गवगवा झालेला असला तरी दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे की २०-२५ वर्षापूर्वी भारतीय कंपन्या "बॉडी शॉपींग" करायच्या आणि आजही सामान्यपणे त्या तेच करत आहेत. या २०-२५ वर्षात रोजगाराच्या वाढलेल्या अमाप संधी, एक ब्रँड म्हणून भारतात वाढलेले महत्त्व या जमेच्या आणि उल्लेखनीय बाजू असल्या तरी एक इंडस्ट्री म्हणून त्यात गुणात्मक वृद्धी फारशी झाली नाही हे ही तितकंच खरं आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर- भारत आयटी तला "बाप" तेव्हाच होइल- जेव्हा: - बाजारात एक तरी भारतीय ऑपरेटिंग सिस्टिम असेल- विंडोज वा ओएस एक्स सारखी. - ओरॅकल, एसेपी इ सारखे एक तरी भारतीय प्रॉडक्ट बाजारात असेल ज्याच्यावर जगभरातले संगणकतज्ज्ञ काम करताहेत - अँड्रॉईड, ओएस ५ सारखे एक तरी मोबाईल ओएस वा इंटरनेट ब्राऊसर भारतीय कंपन्यानी बनवलेला आहे - सॅमसंग, अ‍ॅपल एवढा तर जाऊ द्याच, जागतिक मोबाईल फोन मार्केटमधे किमान ५% हिस्सा असणारी भारतीय कंपनी असेल - तेच भारतीय बनावटीच्या संगणकाबद्दल चायनाने अमेरिकन/युरोपियन संगणकांचे सुटे भाग बनविण्यापासून सुरुवात करुन ते आज लेनोव्हो विकत घेऊन जागतिक संगणक मार्केटमधला एक महत्त्वपूर्ण हिस्सा बनण्यापर्यंत प्रगती केली. अशी अनेक उदाहरणे चायनाने अलाँग द व्हॅल्यू चेन केल्याची दिसतील. भारतातही, नॉन आय टी क्षेत्रात ही उदाहरणे दिसतील ( टाटा मोटर्स, भारत फोर्ज, सझलन, बजाज इ. अनेक). २५ वर्षापूर्वी जो भारत ओबड्धोबड अँबेसिडर्/पद्मिनी गाड्या बनवायचा तो आज जॅग्वार्/लँड रोव्हर सारख्या आलिशान गाड्यांपासून ते नॅनो पर्यंतच्या गाड्या बनवतो. अशी नेत्रदीपक प्रगती (गुणवत्तेच्या दृष्टीने) भारतीय आय टी ने केलीय असं मला तरी वाटत नाही. (किंबहुना, हे संकेतस्थळ ज्याच्यावर चालतेय ते ड्रुपल (? चूभूद्याघ्या) सुद्धा भारतीय नाहिये)
  • Log in or register to post comments

हम्म...

दादा कोंडके
Sun, 02/17/2013 - 18:44 नवीन
एकंदर प्रतिसाद आवडला. आयटीबद्द्ल माहिती कळली. पण,
२५ वर्षापूर्वी जो भारत ओबड्धोबड अँबेसिडर्/पद्मिनी गाड्या बनवायचा तो आज जॅग्वार्/लँड रोव्हर सारख्या आलिशान गाड्यांपासून ते नॅनो पर्यंतच्या गाड्या बनवतो.
आयटी पेक्षा ऑटोमोबील कंपन्यांनी चांगली प्रगती केली याच्याशी सहमत पण जेव्हडं प्रोजेक्ट केलं जातं तेव्हडं खरं नाही हे म्हणू इच्छितो. आपल्याकडे गाड्या बनवतात त्यापेक्षा अ‍ॅसेंबल होतात असं म्हणावं लागेल. उदा. टाटा नॅनो ची पार्ट लीस्ट आणि सप्लायर्स बघितले तर ९०% पेक्षा जास्त परकीय आहेत. त्यातही ईसीयु, इंस्ट्रूमेंट क्लस्टर्स, ब्रेक सिस्टीम, इंटेरीअर्स हे सगळे महत्वाचे घटक आयात केलेली आहेत. आणि बेअरींग, व्हील बॅक प्लेट वगैरे किरकोळ घटक स्वदेशी आहेत. हेच बाकीच्या हायएंड वहिकल्सबाबत पण खरं आहे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

हे जग आयटीयन्स आणि

खटासि खट
Mon, 02/18/2013 - 09:45 नवीन
हे जग आयटीयन्स आणि नॉनआयटीयन्स यांच्यात विभागले गेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा