✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

थोडे डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर... प्रतिसाद आणि माझे मत

श
श्रावण मोडक यांनी
Sun, 11/30/2008 - 15:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5045 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sun, 11/30/2008 - 17:52 नवीन

हम्म! सर्व

हम्म! सर्व लेखन पुन्हा एकवार वाचून पाहतो.. तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/30/2008 - 21:34 नवीन

असेच म्हणतो

हम्म! सर्व लेखन पुन्हा एकवार वाचून पाहतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विजय राणे Sun, 11/30/2008 - 18:28 नवीन

उगाच काहीतरी

आपल्या लिखाणातून आपला लष्कराशी संबंधित नाही आणि या विषयातला अभ्यासही हे सिद्ध होते. उगाच काहीतरी लिहित जाऊ नका. हा विषय अगदी गहन आहे. आपल्याला त्याची माहिती नसताना त्यात आपण हात घालण्याची हिम्मत केलीय. आपल्या हिम्मतीला खरे तर "दाद' द्यायला हवी.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Mon, 12/01/2008 - 12:41 नवीन

दुर्दैव

अशासाठी की आपल्या लेखातील सर्व मुद्द्यांशी सहमत व्हायला आवडले असते. इतर अनेक बाबतीत आपली मते बर्‍यापैकी एकसारखी असतात. पण येथे तसे घडले नाही. :( विचार करत आहे.
  • Log in or register to post comments
भ
भोचक Mon, 12/01/2008 - 18:00 नवीन

तुमच्या

तुमच्या बहुतांश मतांशी सहमत. दहशतवाद्यांच्या राजकीय उद्दिष्टांआड इस्लामी दहशतवादाचा मुखवटा आहे हे पटते. पण मुंबई वा गेल्या काही महिन्यात देशांत झालेल्या बॉम्बस्फोटांसंदर्भात या दहशतवाद्यांचे राजकीय उद्दिष्ट काय असावे? हे कुठेही स्पष्ट झालेले नाही. दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेणे यातून त्यांचे राजकीय उद्दिष्टही अनेकदा स्पष्ट होत असते. (उदा. कोणती संघटना ती जबाबदारी स्वीकारते त्यावरून त्यांचे उद्दिष्ट काय ते कळते) तसे या हल्ल्यांत झालेले नाही. अद्याप तरी त्याची जबाबदारी कोणी स्वीकारलेली नाही. डेक्कन मुजाहिदीन या नावाला फारशी ओळख नाही. त्यातून त्यांचे हेतूही स्पष्ट होत नाही. पाकिस्तानातील एखाद्या गटाने हे हल्ले केले असे म्हटले तरी त्यामागचे उद्दिष्ट काय असावे? काश्मीरचे स्वातंत्र्य हा मुद्दा असेल तर या हल्ल्याचे नेतृत्व करणार्‍या मंडळीत काश्मीरी असणे आवश्यक आहे. तसे अद्याप तरी दिसून आलेले नाही. कारण तो धर्माच्या नावावर अतिरेकी जमवेल. पण त्याचे राजकीय उद्दिष्ट हे त्याच्या डोक्यात पक्के असेल आणि त्याचे सहकारी इस्लाम म्हणून लढतील. त्याचवेळी पाकिस्तानात होणार्‍या अंतर्गत हल्ल्यांचा हेतूही काय असावा? बेनझीर भुट्टोंची झालेली हत्या, नवाज शरीफ व खुद्द मुशर्रफ यांच्यावर अनेकदा झालेले हल्ले हे का झाले असावेत? माझ्या मते कडव्या दहशतवादी गटांना त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जे नेते अडथळे ठरतील त्यांची ते हत्या करणार हे उघड आहे. याही कडव्या गटांत काश्मिरी मुस्लिमांचा सहभाग असणे आवश्यक असेल. कारण त्यांना आपल्याला बाहुले ठरणारा नेता हवा आहे. कारण काश्मिर प्रकरणात एकूणातच भारताविरोधी भूमिका घेणार्‍या राजकीय नेत्यालाच त्यांचा पाठिंबा असेल. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
  • Log in or register to post comments
न
नाना चेंगट Sat, 02/16/2013 - 12:31 नवीन

मूल्यमापन

४ वर्षांनंतर तुम्हाला या लेखमालेतील विचारांबद्दल काय वाटते? समर्पक आहेत की काही त्रुटी जाणवते? सध्या तुम्ही तुमच्या विचारांकडे तटस्थपणे पाहिले तर तुम्ही काय म्हणाल?
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 02/16/2013 - 13:11 नवीन

त्रुटी

चार वर्षांनंतर वास्तव बदललेले असेल तर माझे विचार बदलले असले पाहिजेत. वास्तव तेच असेल तर विचार बदलता कामा नयेत - हे एवढे तुम्हालाही मान्य व्हावे. माझ्या दृष्टीने विचार बदलावेत, असा वास्तविक बदल झालेला नाही. अर्थात, वास्तवात झालेला तसा बदल तुम्ही दाखवून दिलात तर मला त्यांचा विचार करून आधीच्या संदर्भात माझे विचार कसे बदलले आहेत हे पाहावे लागेल आणि ते मांडावे लागेल. वास्तव बदलले नाही, असे मी म्हणतोय, कारण हे सारे विचार ज्या भूमिकेतून आले आहेत ती भूमिका तशीच आहे. माझ्या मते आजही "इस्लामी दहशतवाद" यामागे राजकीय उद्दिष्ट्ये आहेत, आणि त्यांचा सामना राजकीय स्तरावर करावाच लागेल. दहशतवादाला केवळ बळाचा आविष्कार मानून (एकमेव) बळानेच त्याचा सामना करण्यातून शाश्वत उपाय होणार नाही. तसा शाश्वत उपाय (एकमेव) राजकीय आघाडीवरही मिळणार नाही. या दोहोंची सांगड घालावीच लागेल आणि त्यात राजकीय आघाडी किंवा मुत्सद्देगिरीलाच अधिक वाव असला पाहिजे. चार वर्षांनंतर माझ्या या मांडणीविषयी तुमचे मत मांडलेत तर चर्चा अधिक पुढे जाईल. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट
न
नाना चेंगट Sat, 02/16/2013 - 13:42 नवीन

सहमत आहे. वास्तव बदललेलं नाही

सहमत आहे. वास्तव बदललेलं नाही हे मान्य. बळ आणि मुत्सद्देगिरीचा वापर करायला हवा हे सुद्धा मान्य. बळापेक्षा मुत्सद्देगिरीला वाव जास्त असायला हवा हे सुद्धा तत्वतः मान्य. तत्वतः का तर समोरील पक्ष सुद्धा मुत्सद्देगिरिला प्राधान्य देत चर्चेला तयार असेल तर चर्चा करायलाच हवी. परंतु चर्चेआड दिशाभुल करुन बळाचा वापर करुन नामोहरम करायचा प्रयत्न करायचा हे धोरण समोरील पक्ष स्विकारत असेल तर चर्चेचे गुर्‍हाळ विफल होण्याची शक्यता वाढते. अशा वेळेस काय पर्याय शोधता येतात त्याचा विचार करायला हवा. काश्मिर समस्येचा विचार केल्यास साम दाम दंड भेद या पैकी साम आणि दंड हे वापरुन झाले आहेत. दाम (केवळ पर्यटनामुळे नव्हे तर उद्योगाच्या सहाय्याने जनतेला कामधंदा, रोजगार यामधे गुंतवून ठेवणे) तसेच भेदाचा वापर करुन तेथील संघटन खीळखिळे करणे व जमल्यास संपवणे असे प्रकार करुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहे असे आपण मानू शकतो का? (इथे काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे या घोषणेनुसार भारत सरकारची जबाबदारी काय असू शकते त्या अनुषंगाने विचार केला आहे. काश्मिर स्वतंत्र आहे असा विचार केला तरी कधी न कधी तेथील निवासी जनतेला, ज्यांना आपण फुटीरतावादी नेते म्हणतो त्यांच्या प्रभावळीतून मुक्त होणे आवश्यक वाटेलच, तेव्हा हा प्रश्न त्यांना भेडसावणार आहेच. कारण बंडखोरी यशस्वी झाली की क्रांती होते आणि क्रांतीतच पुढील बंडखोरीची बीजे असतातच.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Sat, 02/16/2013 - 13:51 नवीन

मुत्सद्देगिरी

समोरचा पक्ष चर्चेला तयार नाही, असे आपण मानू. (सरसकट तसे नाही. रादर, साम, दाम, दंड, भेद यातील 'भेद' काही ठिकाणी चालू आहेच...) मुत्सद्देगिरी तिथेच असते, असे मला वाटते. चर्चेला तयार नसणाऱ्यांना चर्चेला आणणे, त्यातच गुंतवणे आणि त्यातूनच मार्ग काढणे यालाच मुत्सद्देगिरी म्हणतात, असे मला वाटते. काश्मिरात काही गोष्टी होताहेत. स्वतंत्र बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट
व
विसुनाना Sat, 02/16/2013 - 15:07 नवीन

तोंड खुपसतो, माफ करा

पण चार वर्षांत समोरचा पक्ष एकसंध राहिलेला नाही. राष्ट्र या संकल्पनेवर पाकिस्तानातल्या कट्टर इस्लामवाद्यांनी मोठाच आघात केलेला आहे. आता बोलणी करायची तर कुणाशी? पाकिस्तान सरकारशी? पाकिस्तानी लष्कर आणि आय एस आयशी की तिथल्या कट्टरपंथीय संघटनांशी? भारताने पाकिस्तान-काश्मिरबाबत मुत्सद्देगिरी करण्याला फारसा वावच राहिलेला नाही. मध्ये मुंडकी उडवण्यावरून तर प्रकरण फारच पुढे गेलेले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Sat, 02/16/2013 - 15:21 नवीन

पाकिस्तान

मी जे लिहिलं ते एकंदर इस्लामी दहशतवाद म्हणून. त्यात पाकिस्तानविशिष्ट असे मी काही म्हणत नाहीये. पाकिस्तानविशिष्ट बोलायचे तर मी आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे "काश्मिरात काही गोष्टी होताहेत". अधिक तपशिलात सांगू शकत नाही, पण इतके नक्की की तिथे, काही प्रमाणात तरी, मुत्सद्देगिरी आणि बळ अशा दोन्ही गोष्टी होताहेत. त्यात अडथळे आहेतच. एक अडथळा पाकिस्तान (किंवा जे खंडीत राष्ट्र आहे ते). तिथेच मुत्सद्देगिरीची कसोटी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
र
राही Mon, 02/18/2013 - 20:35 नवीन

सहमत

कश्मीरमध्ये बर्‍याच गोष्टी होताहेत. खरे आहे. दाम आणि भेद हे देखील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ह
हुप्प्या Tue, 02/19/2013 - 00:08 नवीन

काही मुद्दे

सौदी अरेबिया हे अत्यंत श्रीमंत राज्य आहे ह्याबद्दल संदेह नसावा. १९८० पासून त्या देशाने आपल्या वहाबी विचारांच्या रानटी, ताठर इस्लामचा प्रचार करण्याकरता मोठ्या प्रमाणात पैसा वापरायला सुरवात केली. (१९७९ साली मक्का मशिदीवर काही धर्मपिसाटांनी ताबा मिळवायचा प्रयत्न केला त्याला प्रत्युत्तर म्हणून) सौदी अरेबियातील कट्टर इस्लामी लोकांना खूश करायला आणि सौदी सरकारची डोकेदुखी कमी व्हावी म्हणून हा उपाय केला गेला. पण ह्याचे घातक परिणाम अन्य देशात दिसू लागले आहेत. इंडोनिशिया, मलेशिया हे देश पूर्वी फार मवाळ समजले जायचे. तिथले मुस्लिम लोक स्थानिक संस्कृतीशी एकरुप झाले होते. तिथले उत्सव, भाषा, रीतीरिवाज पाळत होते. पण आता ते बदलत आहे. आखाती देशाचा पैसा आणि तिथला विखारी प्रचार यामुळे तिथेही कडवा इस्लाम उदयास येत आहे. स्थानिक रीतिरिवाज त्यागून मूळ इस्लामच कसा चांगला असे लोकांच्या मनावर बिंबवले जाते आहे. हाच प्रकार अफ्रिकेत, भारत, पाकिस्तान आणि बांगला देशातही होत आहे. भारतात सुफी परंपरा, अफ्रिकेतील तिथला जादूटोणा वगैरेसारखे प्रकार इस्लाममधे मिसळून थोडा सौम्य इस्लाम बनू घातला होता त्यावर ह्या अरबी इस्लामी दहशतवादाचा मोठा प्रभाव पडतो आहे. झाकिर नाईकासारख्या वरवर अभ्यासू वाटणार्‍या धर्मपिसाटाचे विचार ऐकलेत तर हे लगेचच कळेल. बुरख्याचे महत्त्व, पीरदर्ग्यापुढे नतमस्तक होणे कसे गैरइस्लामी आहे हे समजावणे वगैरे. त्यामुळे इस्लामी दहशतवाद हा अगदी खरा आहे. तो निव्वळ एक राजकीय लढ्याचा मुखवटा आहे असे मानणे भोळसटपणाचे आहे. मुळात इस्लाम हा अरबी संस्कृतीचे वर्चस्व गाजवणारा आहे. तथाकथित इस्लामी नेते कुराण हे केवळ अरबीतून वाचावे असे ठणकावून सांगतात. अनुवाद वगैरे त्यांना मंजूर नसतो. नमाज पढताना जे काही म्हटले जाते ते केवळ अरबी आणि निव्वळ अरबीतच असावे असा नियम आहे. नमाज पढणार्या गटात एकही जण अरबी जाणत नसला तरीही ह्यात बदल संभवत नाही. आणि अफाट पैशाचे पाठबळ. ह्या जोरावर हा घातक प्रकारचा इस्लाम जगभर पसरावा म्हणून एक मोठी मोहिम राबवली जात आहे. साम, दाम, भेद, दंड सगळे उपाय वापरुन त्याचे अनुयायी काम करत आहेत. आणि हे अन्य धर्मियांकरता धोक्याचे आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा