ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा.
हाताच्या बोटांत एक मोठे पेर आणि दोन लहान पेरे जशी असतात, तद्वतच या डॅक्टिल गणात सुरुवातीला एक गुरु अक्षर आणि नंतर दोन लघु अक्षरे येतात. म्हणजे हा तर झाला आपला भ गण!! -UU अशी त्याची रचना आहे. होमरच्या काव्याची साधारण रचना इलियडच्या पहिल्या ओळीचा वापर करून अशी दाखवता येईलः
μῆνιν ἄειδε, θεά, Πηληϊάδεω Ἀχιλῆος
या ओळीचे वृत्ताच्या सोयीसाठी भाग केले.
μῆνιν ἄ | ειδε, θε | ά, Πη | ληϊά | δεω Ἀχι | λῆος
मेऽनिन् आ | इऽदे थे | आ,ऽ पे | लेइआ | दे आखि | लीऽऑस्.
| -UU | -UU | -U | -UU | -UU | -U |
| भ | भ | लग | भ | भ | ल ग |
इथे लघुगुरू म्हंजे र्हस्वदीर्घाच्या आधारे नसून बोलताना कसे आघात होतात त्यावर आहे. पहिला, दुसरा, चौथा, अन पाचवा हेच गण डॅक्टिल ऊर्फ भगण आहेत. पण डॅक्टिलिक हेक्सामीटरची रचना ही साधारण अशीच असते खरी. प्रत्येक गण हाही ३ अक्षरांचाच असतो असे नाही. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. हे वृत्त पाश्चिमात्य कवितेत लैच प्रतिष्ठेचे वगैरे मानले जाते. या वृत्ताला एक छान लय आहे, त्यामुळे मोठमोठी काव्ये, वर्णने वगैरे या वृत्तात झोकात करायला अन वाचायला मजा येते.
इलियडच्या बहिरंगपरीक्षणानंतर आता त्याच्या कथाभागाकडे वळू. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचे २४ भाग आहेत. त्याच्या सुरुवातीच्या ओळी खूप बोलक्या आहेत.
संदर्भः पर्स्यूस प्रोजेक्ट.
μῆνιν ἄειδε θεὰ Πηληϊάδεω Ἀχιλῆος, मेऽनिन् आइदे थेआ पेलेइआदेऑ आखिलीऑस,
οὐλομένην, ἣ μυρί᾽ Ἀχαιοῖς ἄλγε᾽ ἔθηκε, ऊलॉमेनिन, ई मिरिऽ आखेईस आल्गे एऽथिके,
πολλὰς δ᾽ ἰφθίμους ψυχὰς Ἄϊδι προΐαψεν, पॉल्लास द इफ्थिमूस प्सिखास आइदि प्रिआफेन,
ἡρώων, αὐτοὺς δὲ ἑλώρια τεῦχε κύνεσσιν, ईरॉऑन, आव्तूस दे एलेऑरिआ तेव्खे कीनेस्सिन,
οἰωνοῖσί τε πᾶσι, Διὸς δ᾽ ἐτελείετο βουλή, ईऑनीसी ते पाऽसि, दिऑस द एऽतेलिएतॉ वुली.
ἐξ οὗ δὴ τὰ πρῶτα διαστήτην ἐρίσαντε, एक्स ऊ दी ता प्रॉऽता दिआस्तीतिन एऽरिसान्दे,
Ἀτρεΐδης τε ἄναξ ἀνδρῶν καὶ δῖος Ἀχιλλεύς. आत्रिदीस ते आनास आन्द्रॉन के दिऽऑस आखिलेउस,
τίς τ᾽ ἄρ σφωε θεῶν ἔριδι ξυνέηκε μάχεσθαι; तिस त आऽर स्फॉए थेऑन एऽरिदि क्सिनेऽइके माहेस्थे,
Λητοῦς καὶ Διὸς υἱός: ὃ γὰρ βασιλῆϊ χολωθεὶς लितूस के दिऑस निऑस, ऑ गार वासिऽलि हॉलॉथीस,
νοῦσον ἀνὰ στρατὸν ὄρσε κακήν, ὀλέκοντο δὲ λαοί, नूसॉन आना स्त्रातॉन ऑर्से काकीन, ऑलेकॉन्दॉ दे लाइ,
याचे इंग्रजीत ट्रान्सलेशन रफलि असे: (संदर्भः क्लासिक्स आर्काईव्ह)
"Sing, O goddess, the anger of Achilles son of Peleus, that brought countless ills upon the Achaeans. Many a brave soul did it send hurrying down to Hades, and many a hero did it yield a prey to dogs and vultures, for so were the counsels of Jove fulfilled from the day on which the son of Atreus, king of men, and great Achilles, first fell out with one another."
होमर हा देवीला आवाहन करतोय अकीलिसच्या रागाची कवने गाण्याचे. अॅगॅमेम्नॉनवर रागावून बसल्यामुळे अकीलिसने युद्धात भाग घेतला नाही. आणि अकीलिस नाही म्हणजे त्याची ती मुंग्यांसारखी खूंखार मॉर्मिदॉन सेनादेखील नाही. त्यामुळे हेक्टरादि ट्रोजन योद्ध्यांनी ग्रीक सेनेची चटणी-सांबार उडवणे यथास्थित सुरू केले. त्यातच कर्मधर्मसंयोगाने अकीलिसचा प्रिय मित्र पॅट्रोक्लीस हा हेक्टरकडून मेला. त्यामुळे चिडून अकीलिसने महायुद्ध सुरू केले आणि शेवटी हेक्टरला मारले. हेक्टर मरतो तिथे इलियडदेखील संपते. एकूणच , इलियड वाचताना जाणवत राहतो तो म्हणजे अकीलिसचा "नखरा". तुलनेने शौर्य इतके कुठे दिसून येत नाही.
ही झाली एकपरिच्छेदी इलियडकथा. आता या कथेतले विस्तृत पदर बघू.
यवनव्यास होमर आपल्या इलियडची सुरुवात करतो ती अकीलिस आणि अॅगॅमेम्नॉन यांमधील भांडणाने. ग्रीक सैन्यात प्लेग आलेला होता आणि टिपिकल मायसीनियन ग्रीक समजुतीप्रमाणे देवाला बळी अर्पण केल्याशिवाय त्याचे निवारण होणे अशक्य होते, कारण प्लेगचा प्रादुर्भावसुद्धा देवाच्या क्रोधामुळेच झाला होता. इथे देव आहे अपॉलो द फार डार्टर ऊर्फ भटक्या. ९०% ग्रीक देव हे झ्यूसची संततीच असतात तसाच हाही. हा तेव्हाचा धन्वंतरी म्हटला तरी चालेल. पण मग या धन्वंतरीसाहेबांना रागवायला काय झाले होते बरे असे?
तर ग्रीकांच्या लुटीत ट्रॉयजवळचे ईतिऑन नामक एक शहर लुटले गेले, बायाही पळवून आणल्या गेल्या. त्यात अपोलोचा भटजी "क्रिसेस" याची देखणी कन्याही यवनांनी पळवली.क्रिसेसभट्ट मग यवनराज अॅगॅमेम्नॉनकडे गेले, आपल्या पोरीच्या सुटकेसाठी खूप याचना केली. पण तो कुठला ऐकतोय? दिले हाकलून. मग त्याने अपॉलोची प्रार्थना केली. आपल्या भक्तावरचा हा प्रसंग ऐकून अपॉलो आपले धनुष्यबाण घेऊन ऑलिंपस पर्वत दरदर उतरून आला आणि सपासप ग्रीकांना मारू लागला-म्हणजेच प्लेग आला. दिवसभर लोकांच्या चिता जळत होत्या.
आता ग्रीकांचा धीर खचला. ताबडतोब सभा भरली. ग्रीकांचा मुख्य राजपुरोहित काल्खस याला कारण माहिती होते, पण सत्तेपुढे शहाणपण चालते थोडीच? त्यामुळे त्याने अकीलिसकडून अभय मागून घेतले. अकीलिसने "अगदी अॅगॅमेम्नॉन जरी तुझ्या जिवावर उठला तरी मी तुझ्या पाठीशी आहे" अशी ग्वाही दिल्यावर मग काल्खस सरळ मुद्द्यावर आला, आणि अॅगॅमेम्नॉनने क्रिसेसची मुलगी क्रिसीस हिला समारंभपूर्वक सोडून देऊन अपॉलोला बळी म्हणून बैल-बोकड अर्पण करावेत, असे तो बोलता झाला.
यावर सर्व ग्रीकांनी आपली संमती दर्शवली, पण अॅगॅमेम्नॉन मात्र खवळला. बाकीच्या राजांनी आपले जनानखाने बाळगावेत आणि सर्वांच्या बॉसने मात्र तस्सेच बसून राहावे हे त्याला बिल्कूल पसंत नव्हते. जर अपॉलो देव चिडला असेल तर क्रिसीसला परत देऊ, पण मला रिप्लेसमेंट पाहिजे, असा त्याने धोशा लावला. त्यावर अकीलिसने त्याला लै शिव्या घातल्या. सर्व ग्रीसमध्ये पॉवरफुल असलेल्या अॅगॅमेम्नॉनला अशा तोंडावर शिव्या घालणे लैच डेअरिंगचे काम. ते ऐकून अॅगॅमेम्नॉनही चिडला, आणि क्रिसीस नाही तर अकीलिसची "ब्रिसीस" नामक रखेलच सही, असे म्हणून तिला अकीलिसपासून हिरावून घेण्याची धमकी दिली, वर "चड्डीत रहा, तुझी पायरी ओळख," असा दमही दिला.
आता मात्र अकीलिसची सटकली. हावरट, भित्रा, ठरकी, इ. शिव्यांनी अॅगॅमेम्नॉनला सर्वांसमोर लाखोली वाहून त्याने शेवटी "युद्धातून आम्ही ढिस" ही निर्णायक धमकी दिली."ढीस तर ढीस", असे अॅगॅमेम्नॉन म्हणाला. यवनभीष्मच जणू असा वयोवृद्ध पायलॉसचा राजा नेस्टॉर शिष्टाई करू लागला होता, पण तीही फुकट गेली. अॅगॅमेम्नॉनचे दोघे रक्षक येऊन ब्रिसीसला घेऊन गेले आणि अकीलिस आपल्या २,५०० सेनेसह स्वस्थ बसला, पण रणवाद्यांची गर्जना ऐकून स्फुरण चढणे तर सुरूच होते. शेवटी आपली अप्सरा आई थेटिसला त्याने अॅगॅमेम्नॉनबद्दल सांगितले. आईनेही आपल्या पोरासाठी ऑलिंपसमध्ये झ्यूसकडे वशिला लावेन असे सांगितल्यावर तो जरा स्वस्थ झाला. झ्यूसनेही थेटिसचे ऐकून हेक्टरकडून ग्रीकांना चांगली अद्दल घडेल पण बायको हेरा न रागावेल, अशी तजवीज करायला सुरुवात केली.
अखेरीस ग्रीकांचा बेत ठरला. एक निर्णायक हल्ला होऊनच जाऊदे म्हणून. त्यातच अॅगॅमेम्नॉनला स्वप्न पडले आणि त्याचा विजय निश्चित होईल अशी आकाशवाणी त्यात झाली. मग त्याने एक मोठी सभा बोलावली, पण वेगळेच कैतरी बोलू लागला, "आपल्याला ट्रॉय घ्यायला जमणार नाही", वगैरे. बहुतेक लोकांचा रिस्पॉन्स पहायचा असावा. मग ग्रीक लोक परतीच्या मार्गावर जाऊ लागले तसे यवनकृष्ण ओडीसिअसने त्यांना गोष्टी युक्तीच्या चार सांगून परत फिरविले. थर्सितेससारखा एक किरकिरा शिपाईही त्याने गप्प बसविला आणि सर्वजण उत्साहाने युद्धावर निघाले. मागे सांगितल्याप्रमाणे कॅटॅलॉग ऑफ शिप्समध्ये कोणत्या योद्ध्याचे किती सैनिक, किती जहाजे ही सर्व आकडेवारी त्यात आलेली आहे. ट्रोजन वीरांमध्ये एनिअस, टेक्टॉन, ग्लॉकस, मेम्नॉन, सार्पेडन आणि हेक्तर हे मुख्य लोक होते. ग्रीकांच्या तयारीचा वास येताच ट्रोजनांनीही तयारी सुरू केली.
दुसर्या दिवशी, दोन्ही सैन्ये एकमेकांसमोर उभी ठाकली. होमरच्या म्हणण्यानुसार, जवळपास सगळे मिळून लाख-दीड लाखाचे तरी ग्रीक सैन्य असेल. ट्रोजन सेनेचा आकार तितका अचूक दिलेला नाही, पण यापेक्षा लै काही लहान असेल असेही वाटत नाही. सगळे एकत्र जमल्यावर हेक्टरने घोषणा केली, की उगा बाकीच्यांनी लढण्याऐवजी हेलेनच्या दोन दादल्यांनी आपसात काय ते भांडून भुस्काट पाडावे, त्यांच्या वैयक्तिक लढाईत जो विजेता होईल, त्यालाच हेलन मिळेल.
हेलेनचा नवरा मेनेलॉसला तेच तर पाहिजे होते. इकडे पॅरिसची मात्र वाईट फाटली होती. मग हेक्टरने त्याला चार शिव्या घातल्या, मर्दानगीची आठवण करून दिली, आणि लढायला पाठवले. पण हा पॅरिस जरा लढाईत कच्चाच असावा, मेनेलॉसच्या तलवार-भाल्याचे वार चुकवता चुकवता त्याच्या नाकी नऊ आले आणि अखेरीस कुठूनतरी खोपचीतून तो सटकला. होमरबाबांनी इथेही मिनर्व्हा देवीला मध्ये आणले आहे. मिनर्व्हाची कृपा असल्यामुळेच पॅरिस सुटला, नैतर त्याचे काही खरे नव्हते.
इकडे हेक्टर-पॅरिसचा बाप, ट्रॉयचा राजा प्रिआम हा ट्रॉयच्या भुईकोटाच्या तटावरून युद्ध बघत होता. हेलेनसाठी चाललेले युद्ध बघण्यासाठी मुद्दाम त्याने तिला पाचारण केले. तिलापण कळूदे काय ते, अशी भावनाही असेल त्यामागे, कुणी सांगावे? इकडे हेलनची मनःस्थिती द्विधा झाली होती. कधी पॅरिस हवाहवासा वाटे, तर कधी मेनेलॉस.पॅरिस तिथून पळून आल्यावर हेलनने त्याला पळपुट्या वगैरे शिव्या घातल्या, पण ती इतकी भारी दिसत होती की पॅरिसला अनंगशराने विद्ध करायचे ते केलेच ;)
हा झाला इलियडमधील सुरुवातीचा काही भाग. पुढील कथाभाग येईल लवकरच :)
(क्रमशः)
त्यातच अॅगॅमेम्नॉनला स्वप्न पडले आणि त्याचा विजय निश्चित होईल अशी आकाशवाणी त्यात झाली. मग त्याने एक मोठी सभा बोलावली, पण वेगळेच कैतरी बोलू लागला, "आपल्याला ट्रॉय घ्यायला जमणार नाही", वगैरे. बहुतेक लोकांचा रिस्पॉन्स पहायचा असावा. मग ग्रीक लोक परतीच्या मार्गावर जाऊ लागलेसमजलं नाही. आता विजय निश्चीत आहे म्हटल्यावर हा भाउ कशाला उलटला ?
In reply to मस्त आहे, by अग्निकोल्हा
"ढीस तर ढीस", असे अॅगॅमेम्नॉन म्हणाला.एकदम जिलबी चौकातल्या कट्ट्यावर बसून नुकताच शिवशंकरला पाहून आलेल्या पिच्चरच्या स्टोरीगत सांगितलास. छान. येऊ दे पुढील भाग.
In reply to मस्त by अभ्या..
In reply to _/\_ by पैसा
In reply to _/\_ by पैसा
In reply to हेलेन जर स्पार्टाची होती तर by प्रसाद१९७१
In reply to हेलेन मूळची स्पार्टाची, पण by बॅटमॅन
In reply to हीच नंतर बॉलीवुडात आली काय ? by ५० फक्त
In reply to छान. आवडत्या विषयावरचं लिखाण by चावटमेला
In reply to 'चांदोबातली मालिका' म्हणजे 'हिंमती हैबती' का? by चित्रगुप्त

In reply to लय भारी लेख रे ! by मालोजीराव
In reply to +१ by अग्निकोल्हा
In reply to +१. by बॅटमॅन
ट्रोजन हॉर्समधील वीरांना हेलनने स्वतः गाईड केले होते एकदा ट्रॉयमध्ये आल्यावर-ते कुठे दिसत नाहीआत्ताच्या आत्ता हेलनची सगळी गाणी डिलीट मारतो, चायला पिसीत ट्रोजन आल्यावर आपलेच दात अन आपलेच ओठ व्हायच ;)
In reply to ट्रोजन हॉर्समधील वीरांना by अग्निकोल्हा
In reply to घोड्याबाहेर तिने ग्रीकांच्या by बॅटमॅन
In reply to हिंदी हेलेन by अभ्या..
In reply to +१. by बॅटमॅन
In reply to ९. डायोमीड नामक तरुण पराक्रमी by ५० फक्त
In reply to +१. by बॅटमॅन
In reply to अकिलीस कडे कवच कुंडले नव्हती by मृत्युन्जय
महाभारत आणि ट्रॉय दोन्ही युद्धे वरकारणी पाहता एका स्त्रीसाठी लढली गेली पण नीट लक्षात घेता ती सत्ता आणि भूमीसाठीच लढली गेली.शेवटी हेच खरं!! स्त्रीचा सन्मान वगैरे गोष्टी लोकांना सांगायला बर्या असता म्हणून सांगितल्या जातात, इतकेच.
In reply to +१. by बॅटमॅन
तो कथाभाग सगळा येईलच पुढे लौकरमाझं लक्ष आहे बर्का..
In reply to +१ by अग्निकोल्हा
In reply to ट्रॉय वरून ओडीसीयसचा घरी by मालोजीराव
उगा बाकीच्यांनी लढण्याऐवजी हेलेनच्या दोन दादल्यांनी आपसात काय ते भांडून भुस्काट पाडावेलई भारी .... नाद खुळा .... तेव्हड पुढच्या भागाचे लवकर बागा कि भाऊ............
In reply to भन्नाट सुरुये धागा... by मन१
In reply to भन्नाट सुरुये धागा... by मन१
खरेतर कुणीतरी मोठ्ठा माणूस रामायण हे काव्य आहे, महाभारत हे वास्त्व/इतिहास आहे असे म्हणून गेला म्हणून आपण सारेच तसे म्हणतो. मला महाभारतही काव्यच वाटतं.हा जय नावाचा इतिहास आहे असे स्वतः व्यासांनीच म्हटलंय, तसेही समजा हा इतिहास नसून हे जर काव्यच असेल तर महाभारताचे श्रेष्ठत्व सहस्त्रपटीने वाढते. कारण इतकी पात्रे, इतक्या जागा, इतके प्रसंग त्याच्या असंख्य गुणवैशिष्ट्यांसह दाखवणे हे आत्यंतिक महान प्रतिभेशिवाय शक्यच नाही.
भेंडी त्यातले क्यारेक्टर मला धेडगुजरी वाटतात. ती "अस्सल" माणसे वाटत नाहित. तसा इतिहास असणे अशक्य आहे.(धेडगुजरी शब्द वाचून जरा हसूच आले. रामायण तसे आहे आदर्शवत. राम आदर्श, त्यांचे बंधू आदर्श, पत्नी आदर्श, प्रजा आदर्श आणि खलपुरुषही आदर्शच. पण महाभारताचे तसे नाही. दुर्योधन, दु:शासन, कर्णादिकांचे जसे येथे गुण दाखवले आहेत तसेच कृष्ण, भीष्म, धर्मादिकांचे येथे दोषही दाखवलेले आहेत. येथे कुणीही कचकड्याच्या बाहुल्याप्रमाणे नाही. महाभारतातील पात्रे उलट अगदी अस्सल वाटतात. सामान्य माणसांना जे गुणदोष, रागलोभ आदी असतात ते महाभारतात अगदी यथास्थित दाखवलेले आहेत. आणि महाभारताचा शेवटही सुखांत नाहीच. एकदा संपूर्ण महाभारत वाचून बघाच मनोबा.
In reply to उत्तरार्धाशी असहमत by प्रचेतस
In reply to उत्तरार्धाशी असहमत by प्रचेतस
In reply to खरडवहीत अधिकच्या शंका विचारीन म्हणतो by मन१
In reply to उत्तरार्धाशी असहमत by प्रचेतस
In reply to एकदा संपूर्ण महाभारत वाचणे by चित्रगुप्त
त्यावर अकीलिसने त्याला लै शिव्या घातल्या. सर्व ग्रीसमध्ये पॉवरफुल असलेल्या अॅगॅमेम्नॉनला अशा तोंडावर शिव्या घालणे लैच डेअरिंगचे काम.क्या बात है, एक नंबरी खुसखुशीत वर्णनशैली. ट्रॉय (हिंदी डब) चे काही संवाद आठवले. अकेलिस अॅगमेन्नॉनला - 'शहेनशाहो के शहेनशहा, पहले जंग तो जित लिजिए...' द्वंद्वयुद्धात पळून जायचा प्रयत्न करणार्या पॅरिसकडे इशारा करून मेनॉलॉस हेलनकडे बघून म्हणतो, 'इसके लिए तुमने हमे छोडा?' पु.भा. प्र.
ट्रॉय (हिंदी डब) चे काही संवाद आठवले.अॅगमेन्नॉन मेनॉलॉस ला "हुकुमते बनती हे जंगो से, अमन और चैन औरतो,बुज्दिलो के लिये है" अकिलिस अॅगमेन्नॉन ला "कैसा रहेगा अगर राजा अपनी जंग खुद लढे तो" अकिलिस हेक्टर ला "शेर और इंसानो के बीच समझोता नाही होता" अकिलिस हेक्टर ला "तुम्हारा भाई इसमे माहीर है ,दुसरो कि औरतो को संभालना उसे अच्छी तरह आता है "
In reply to ट्रॉय (हिंदी डब) चे काही by मालोजीराव
अकिलिस अॅगमेन्नॉन ला "कैसा रहेगा अगर राजा अपनी जंग खुद लढे तो"या वाक्याअगोदर अनुत्साहानेच का होईना पण द्वंद्वयुद्धाला निघालेल्या अकेलिसला अॅगमेन्नॉन म्हणतो, 'आराम में कोई कसर रह गयीं हो तो ये जंग कल रख ले?' ;-).
In reply to ट्रॉय (हिंदी डब) चे काही by मालोजीराव
In reply to आपला फेव्हरीट by अग्निकोल्हा
In reply to आपला फेव्हरीट by अग्निकोल्हा
In reply to वा वा. by चित्रगुप्त
In reply to वा वा. by चित्रगुप्त
In reply to सर्व प्रतिसादकांचे मनापासून by बॅटमॅन
In reply to अरेच्च्या ! by सस्नेह

In reply to हेलन आणि पॅरिसः चित्र by चित्रगुप्त
मस्त आहे,