बोलायला मनातले
एस.एम.एस. ची सोय नव्हती
रुपया टाकून फोन करु तर
गर्दी होती अवती भवती
नाक्यावरला वाणी होता
दोघांमधला दूत
त्याच्या करवी जमवत होतो
तुझ्याशी मी सूत
वारंवार पावलं तेव्हा
दुकानाकडे वळायची
मी तेथे आल्याची वार्ता
तुला कशी कळायची
काहीतरी निमित्त काढून
तू ही तिथे यायचीस
समोरून येता जाता
वळून गोड हसायचीस
पुढे एकदा चोरुन चोरुन
तयार एक पत्र केले
खात्री होती, ओळखशील तू
म्हणून नांव नाही लिहिले
पत्र द्यायचे धाडस मात्र
नाही करता आले मला
हळून तो लखोटा मग
मी वाण्याच्या हाती दिला
वाण्याने ते पत्र दिले
गुपचुप तुझ्या हाती नंतर
तेव्हापासून वाढत गेले
आपल्या दोघांमधले अंतर
आता आहेस तू वाण्याच्या
दोन मुलांची आई
पत्र देण्या उगीच केली
त्या वेळी मी घाई
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1856
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
लबाड वाणी! तुमच्या पत्रावर
लबाड वाणी! तुमच्या पत्रावर नफा कमवलान! तुम्ही काय केलत? निदान दुकान तरी बदललत की नाही?
अवघड
अवघड आहे. :(
वाण्याला दिली चिठ्ठी......
वाण्याला दिली चिठ्ठी.......वाण्या आपुल्याच गर्लफ्रेंड ला मारतो मिठी
शेवटच्या कडव्यात जरा गल्लत
शेवटच्या कडव्यात जरा गल्लत झाली, असो इथं प्रश्न विचारले तर फार गोंधळ होईल, त्यात तुम्ही नविन उगा शिव्या खाव्या लागतील.
वाण्याच्या पोरांची आई एवढं
In reply to शेवटच्या कडव्यात जरा गल्लत by ५० फक्त
वाण्याच्या पोरांची आई एवढं समजलं.. पण शेवटी लग्न कुणाशी झालं?
असं विचारायचंय का तुम्हाला? :D
ती वाण्याचीच लाईन असेल,
दोघांनी मिळून तुमचा मामा केला असेल
छान रचली आहे हि पण कविता.
छान रचली आहे हि पण कविता.
एक प्रश्न आहे, त्या झुरळाला घाबरणार्या वेगळ्या का?
ही मामा करणारी
In reply to छान रचली आहे हि पण कविता. by श्रिया
झुरळाला घाबरणारी घरात फवारा घेऊन बसली आहे
ओह आय सी! म्हणजे स्वत:च्या
In reply to ही मामा करणारी by संजय क्षीरसागर
ओह आय सी! म्हणजे स्वत:च्या मुलाला यांची मामा म्हणून ओळख करुन देणारी ती हिच होय, मला वाटलं ती तिसरी.
नाही हो, ही तिसरी :
In reply to ओह आय सी! म्हणजे स्वत:च्या by श्रिया
...अजून बाकीच्या यायच्या आहेत
म्हणजे इथल्याच एका कविच्या
In reply to नाही हो, ही तिसरी : by संजय क्षीरसागर
म्हणजे इथल्याच एका कविच्या शब्दांत सांगायचे झाले तर हे कवी "इश्कबाज" होते असे वाटते. (क्रु.ह.घे.)
येस पण त्यांची मैफल नाहीये
In reply to म्हणजे इथल्याच एका कविच्या by श्रिया
सोलो साँग आहे