घाई...
बोलायला मनातले
एस.एम.एस. ची सोय नव्हती
रुपया टाकून फोन करु तर
गर्दी होती अवती भवती
नाक्यावरला वाणी होता
दोघांमधला दूत
त्याच्या करवी जमवत होतो
तुझ्याशी मी सूत
वारंवार पावलं तेव्हा
दुकानाकडे वळायची
मी तेथे आल्याची वार्ता
तुला कशी कळायची
काहीतरी निमित्त काढून
तू ही तिथे यायचीस
समोरून येता जाता
वळून गोड हसायचीस
पुढे एकदा चोरुन चोरुन
तयार एक पत्र केले
खात्री होती, ओळखशील तू
म्हणून नांव नाही लिहिले
पत्र द्यायचे धाडस मात्र
नाही करता आले मला
हळून तो लखोटा मग
मी वाण्याच्या हाती दिला
वाण्याने ते पत्र दिले
गुपचुप तुझ्या हाती नंतर
तेव्हापासून वाढत गेले
आपल्या दोघांमधले अंतर
आता आहेस तू वाण्याच्या
दोन मुलांची आई
पत्र देण्या उगीच केली
त्या वेळी मी घाई
लबाड वाणी! तुमच्या पत्रावर
अवघड
वाण्याला दिली चिठ्ठी......
शेवटच्या कडव्यात जरा गल्लत
वाण्याच्या पोरांची आई एवढं
ती वाण्याचीच लाईन असेल,
छान रचली आहे हि पण कविता.
ही मामा करणारी
ओह आय सी! म्हणजे स्वत:च्या
नाही हो, ही तिसरी :
म्हणजे इथल्याच एका कविच्या
येस पण त्यांची मैफल नाहीये