कर्करोग स्तनांचा
मध्य वयातील वादळ
मध्यवयातील वादळ- पुढे
------------------------
हा एक महत्त्वाचा वाटणारा विषय मी मांडीत आहे.एक डॉक्टर म्हणून मला जे जे सांगायचे आहे ते.खालील लेख हा harrison's text book of medicine याचा संदर्भ घेऊन लिहिला आहे.हा लेख केवळ स्त्रियांसाठी नसून पुरुषांना सुद्धा आपल्या आई, बहिण बायको व मुलगी यांच्या स्वास्थ्यासाठी आणि आरोग्य शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल असे वाटल्याने लिहित आहे. मी लष्कराच्या कर्करोग केंद्रात ७ वर्षे काम केल्याने आलेल्या अनुभवातून आणि केलेल्या अभ्यासातून लिहित आहे. त्यातील काही वर सध्या उलटसुलट चर्चा चालू आहेत यासाठी वरील संदर्भ देत आहे
स्त्रियांच्या कर्करोगा पैकी ३३% कर्करोग हा स्तनांचा असतो.स्तनात येणाऱ्यागाठी पैकी फक्त १०% कर्करोगाच्या असतात.दुर्दैवाने कर्करोग हा न दुखणारा असल्याने स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय संकोच भीती आणि काळजी यामुळे रोग तपासणी करण्याऐवजी तो दडवून ठेवण्याकडे काळ असतो. परंतु वाळवी दडवून ठेवल्यावर जसे घर पोखरते तसेच कर्करोग आत वाढत जातो आणि शेवटी रुग्णाचा बळी जातो. प्रत्येक ३५ वर्षा पेक्षा जास्त वयाच्या स्त्रीने स्वतःच्या स्तनाची तपासणी दर महिन्याला करणे हे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीच्या स्तनाची ठेवण (consistency )हि वेगळी असल्याने डॉक्टर ला त्याबद्दल माहिती असणे कठीण आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतः च्या शरीराची माहिती ठेवणे स्वतःच्या प्रकृतीच्या दृष्टीने आवश्यक आहे. वेळ नाही किंवा जमले नाही हि कारणे देऊन कोणाचा फायदा होईल? मासिक पाळीच्या ५-६ दिवसानंतर आंघोळीच्या वेळेस प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या स्तनाची तपासणी करावी आणि आपल्या घराच्या कैंलेन्डेर वर ओम किंवा बाण किंवा श्री अशी दुसर्याला लक्षात येणार नाही अशी खूण करावी म्हणजे प्रत्येक महिन्यात तपासणी झाली आहे कि नाही हे कळेल. जर आपण तपासणी करण्यास विसरला तर जेंव्हा लक्षात येईल तेंव्हा ती करावी.मासिक पाळी च्या ५-६ दिवसांनी करण्याचे कारण असे कि पाळी च्या अगोदर किंवा पाळीच्या दरम्यान स्तन सुजलेले किंवा दुखरे असतात त्यामुळे हि तपासणी व्यवस्थित होत नाही. रजोसमप्ति नंतर महिन्याच्या कोणत्याही दिवशी ठरवून आपण तपासणी करावी. Breast self examination
www.slideshare.net/nashua_08/breast-self-examinationhttp://www.metacafe.com/watch/1310242/how_to_do_a_breast_self_examinati…
स्तनाच्या कर्क रोगा बद्दल ची काही उपयुक्त माहिती --
१) बाळाला स्तनपान केल्याने कर्करोग होण्याची शक्यता बरीच कमी होते.
२) गर्भ निरोधक गोळ्या (ORAL CONTRACEPTIVE PILLS) घेतल्याने स्तनाच्या कर्करोगाच्या शक्यतेत कोणतीही वाढ होत नाही. तसेच त्या गोळ्यांनी बीजांड कोश आणी गर्भाशय यांच्या कर्करोगाची शक्यता बरीच कमी होते.या गोळ्यांचे फायदे त्यांच्या तोट्यांपेक्षा नक्कीच खूप जास्त आहेत हे आता सिद्ध झाले आहे.
३) गर्भारपणात स्तनाच्या कर्करोगाची शक्यता १:३००० इतकी असते त्यामुळे त्याकाळात तयार झालेल्या स्तनाच्या गाठीकडे दुर्लक्ष करू नये.
MAMMOGRAPHY हि चाचणी ४० वर्षे वयापासून दर वर्षी केल्यास कर्करोगापासून मृत्यूचे प्रमाण ३०टक्क्यांनी कमी होते. वयाच्या पन्नाशीनंतर तर नक्कीच करावी.
यात स्तनाचे वरून खाली आणि डावीकडून उजवीकडे असे दोन एक्स रे काढले जातात आणि त्यानंतर सतांची सोनोग्राफी केली जाते या दोन्ही चाचण्या एकमेकांना पूरक अश्या आहेत या चा मुंबईतील खर्च २००० रुपये आहे इतर शहरात तो कमी असावा.या दोन्ही चाचण्यांनी कर्करोग सापडण्याची शक्यता ९०% पर्यंत असते एक महत्त्वाची गोष्ठ हि आहे कि कोणतीच चाचणी १००% नाही म्हणूनच स्वतपासणी काराने आवश्यक आहे.
कर्क रोग लक्षात येण्याअगोदर आपल्या शरीरात साधारण ७ वर्षे असतो आणि mammogrphy केल्याने कर्करोग हा साधारण एक ते दीड वर्ष अगोदर लक्षात येतो आणि या वेळेस केवळ गाठ काढून टाकल्यावर रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. जितका आपण उशीर लावू तितका तो रोग पसरण्याची शक्यता असते यासाठी गाठ लक्षात आल्यास ताबडतोब आपल्या कौटुंबिक डॉक्टर किंवा कर्करोग तज्ञाकडे जावे.
अनुवांशिकता --कर्करोग हा बर्यापैकी अनुवांशिक आहे त्यामुळे ज्या स्त्रीयांची जवळच्या(first degree) नातेवाईक स्त्रीला (आई किंवा सख्खी बहिण) स्तनाचा कर्करोग झाला आहे तिला कर्करोग होण्याची शक्यता १० पटींनी वाढते आणि जिच्या जवळच्या दोन नातेवाईक स्त्रिया (आई आणि बहिण किंवा दोन्ही बहिणी )न कर्करोग झाला आहे त्यांना कर्क रोग होण्याची शक्यता १०० पटींनी वाढते. म्हणून जर आपल्या नातेवाईक ला (आई व बहिण)ज्या वयात कर्करोग होतो त्याच्या ५ वर्षे अगोदरपासून mammography करण्यास सुरुवात करावी.उदा. आई ला जर ४० वयाला कर्करोग निदान झाले तर त्या स्त्री ने ३५ व्या वर्षी हि तपासणी सुरु करावी.
हे ज्ञान आपण आपल्या सर्व नातेवाईक मैत्रिणी मित्र यात वाटावे आणि कर्करोगावर विजय मिळवण्यात आपले सह्कार्य करावे हि विनंती.
आपल्यास काही शंका असतील तर मी त्या यथा शक्ती त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
कृपा करून (second opinion )विचारू नये.अपुर्या माहितीवर उत्तर देणे अशक्य आहे.
आपला कृपाभिलाषी
सुबोध खरे
वाचने
48525
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
नियमीत वापरानं सगळं ठीक राहतं
महत्त्वाचा विषय.
जागतिक आकडेवारी
In reply to महत्त्वाचा विषय. by कवितानागेश
माहिती पुर्ण आणि महत्वाचा विषय..
use it or loose it
मला वाटतं की यूज इट ऑर लूज इट
In reply to use it or loose it by सुबोध खरे
कमी शक्यता
In reply to मला वाटतं की यूज इट ऑर लूज इट by गवि
अहो आश्चर्यम ! माझा प्रतिसाद पुन्हा प्रकशित केला?
In reply to कमी शक्यता by सुबोध खरे
बहूदा
In reply to अहो आश्चर्यम ! माझा प्रतिसाद पुन्हा प्रकशित केला? by संजय क्षीरसागर
माझ्या प्रतिसादाची mammography करून काय मिळणारे?
In reply to बहूदा by परिकथेतील राजकुमार
एकदा "रेग्युलर" चेक-अप म्हणून
mammography चा निकाल त्याच
In reply to एकदा "रेग्युलर" चेक-अप म्हणून by शुचि
अमेरीकेत
In reply to mammography चा निकाल त्याच by सुबोध खरे
वरचेवर तपासणीबाबत अत्यंत सहमत
In reply to एकदा "रेग्युलर" चेक-अप म्हणून by शुचि
गविंशी बाडिस
In reply to वरचेवर तपासणीबाबत अत्यंत सहमत by गवि
धन्यवाद डॉक्टर!
follow up
In reply to धन्यवाद डॉक्टर! by पैसा
धन्यवाद!
In reply to follow up by सुबोध खरे
या आणि इतर सामान्यपणे होणार्
पहिला अचूक प्रतिसाद!
In reply to या आणि इतर सामान्यपणे होणार् by नगरीनिरंजन
तपासणी अवेअरनेस ?
राजांना त्रिवार मुजरा
In reply to तपासणी अवेअरनेस ? by चौकटराजा
सुधारणा
In reply to तपासणी अवेअरनेस ? by चौकटराजा
१००%
In reply to सुधारणा by सुबोध खरे
विचारप्रवर्तक व महितीपूर्ण लेख.
मानसिक धक्का
In reply to विचारप्रवर्तक व महितीपूर्ण लेख. by तर्री
एक प्रश्न
रोचक. हीच शंका कधीकाळी
In reply to एक प्रश्न by तिमा
होय होतो
In reply to रोचक. हीच शंका कधीकाळी by बॅटमॅन
ईंटरेस्टिंग! आणि तितकेच
In reply to होय होतो by शुचि
पुरुषांना स्तनाचा कर्करोग
In reply to एक प्रश्न by तिमा
धन्यवाद
In reply to पुरुषांना स्तनाचा कर्करोग by सुबोध खरे
एका महत्वाच्या पण दुर्लक्षित
माहितीपुर्ण लेख!
तहान लागल्यावर विहीर
In reply to माहितीपुर्ण लेख! by दादा कोंडके
धन्यवाद!
माहितीबद्दल धन्यवाद
नवीन MBI चाचणी
MBI चाचणी
In reply to नवीन MBI चाचणी by अमित दळवे
MBI
In reply to नवीन MBI चाचणी by अमित दळवे
चांगला विषय आणि माहिती
प्रदूषण
In reply to चांगला विषय आणि माहिती by विकास
हा हा! अशा पदार्थांनी कॅन्सर
In reply to प्रदूषण by सुबोध खरे
+१
In reply to हा हा! अशा पदार्थांनी कॅन्सर by नगरीनिरंजन
हा प्रतिसाद जो पर्यंत अनुत्तरित आहे
In reply to +१ by स्पंदना
Aneuploidyगुणसूत्रात संख्यात्मक बदल आणि उत्परिवर्तनmutation
In reply to हा प्रतिसाद जो पर्यंत अनुत्तरित आहे by संजय क्षीरसागर
डॉक्टरसाहेंबांनी
In reply to हा प्रतिसाद जो पर्यंत अनुत्तरित आहे by संजय क्षीरसागर
आहो, तुम्ही `साहेब' वगैरे म्हंटलं की ऑकवर्ड होतं
In reply to डॉक्टरसाहेंबांनी by शैलेन्द्र
एक साधा मुद्दा आहे. ज्यांना
In reply to आहो, तुम्ही `साहेब' वगैरे म्हंटलं की ऑकवर्ड होतं by संजय क्षीरसागर
वैद्यकीय संशोधन
In reply to आहो, तुम्ही `साहेब' वगैरे म्हंटलं की ऑकवर्ड होतं by संजय क्षीरसागर
अजुन एक ईटरेस्टींग गोष्ट,
In reply to वैद्यकीय संशोधन by सुबोध खरे
एक मेथडॉलॉजी म्हणून पाहा
In reply to वैद्यकीय संशोधन by सुबोध खरे
आता माझी पहिली कमेंट वाचा.
In reply to एक मेथडॉलॉजी म्हणून पाहा by संजय क्षीरसागर
दीर्घ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
In reply to आता माझी पहिली कमेंट वाचा. by गवि
धन्यवाद साहेब!
In reply to डॉक्टरसाहेंबांनी by शैलेन्द्र
प्रश्न असा आहे की आपण या
In reply to धन्यवाद साहेब! by नगरीनिरंजन
मृत्यु ही अनिवार्यता आहे
In reply to प्रश्न असा आहे की आपण या by शैलेन्द्र
.. मृत्युपासुन तात्पुरती
In reply to मृत्यु ही अनिवार्यता आहे by नगरीनिरंजन
मृत्यू पासून सुटका
In reply to .. मृत्युपासुन तात्पुरती by शैलेन्द्र
डॉक्टरसाहेब, माझे उत्तर
In reply to मृत्यू पासून सुटका by सुबोध खरे
पेशंट स्त्रीयांना अशा चाचण्या
In reply to चांगला विषय आणि माहिती by विकास
चाचण्या
In reply to पेशंट स्त्रीयांना अशा चाचण्या by रेवती
थोडी माहिती.
In reply to चाचण्या by सुबोध खरे
स्वयंसंपादन नसल्याने नवा पुरवणी प्रतिसाद :
In reply to थोडी माहिती. by आनंदी गोपाळ
नोंदणीकरण
In reply to थोडी माहिती. by आनंदी गोपाळ
+१
In reply to नोंदणीकरण by सुबोध खरे
हम्म
In reply to थोडी माहिती. by आनंदी गोपाळ
This site is now discontinued
:(कर्क रोग
अतिशय स्पष्ट शब्दात अन
खुप छान माहीती !!!!
अतिशय उत्त्तम लेख व तितकाच
breastlight
In reply to अतिशय उत्त्तम लेख व तितकाच by शैलेन्द्र
मान्य.. ऐवजी या शब्दापेक्षा
In reply to breastlight by सुबोध खरे
खुप छान लेख..
सुंदर धागा ... एकदम बॅलन्स्ड
उपयुक्त धागा..
माहीतीपूर्ण धागा
उत्तम चर्चाविषय सुरू केल्याबद्दल डॉ. खर्यांचे अभिनंदन
.
सुबोधजी उत्तम विषयावर लेखन केले आहे.
@ शैलेंद्र
स्तनांच्या कर्करोगावर आपण
In reply to @ शैलेंद्र by सुबोध खरे
एक शंका
In reply to स्तनांच्या कर्करोगावर आपण by शैलेन्द्र
जीन थेरपीवर माझा अगदी हाच
In reply to एक शंका by नगरीनिरंजन
कृत्रिम उपाय
In reply to एक शंका by नगरीनिरंजन
अतिशय महत्वाचा लेख !
डॉक्टर खरे, नमस्कार ! आपण कदाचित व्यनी पाहीला नाही
क्षमस्व
धन्यवाद !
In reply to क्षमस्व by सुबोध खरे
कर्करोगापासून बचाव आणि लोकजागृती