Skip to main content

काही जुन्या लेखनांचे धागे

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 06/02/2013 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी मिपावर नवीनच आहे . इथे काही सुंदर (/ "प्रसिध्द") जुन्या लेखांच्या कवितांच्या इतर लेखनाच्या लिन्क्स देणार का ? माझ्या बरोबर इतर नवीन सभासदांना फार मदत होईल . (तसेच जुन्या सभासदांना जुन्या लेखनाचा पुनःप्रत्यय घेता येइल ) प्रतिसादा मधे लेखनाचे नाव , थोडक्यात वर्णन , आणि लिन्क असे अपेक्षित आहे . (अवांतर : १) चांगले लेखन शोधण्याचा स्वतः प्रतत्न केला पण साहित्य ४२४ पाने , चर्चा १८६ पाने , काव्य २४६ पाने , पाककृती ७४ पाने ... इतकं सगं लेखन सर्फ करणे जरा अवघड आहे ... त्यापेक्षा जाणकार रसिक वाचकांचे आवडते लेखन आधी वाचावे असा विचार आला म्हणुन हा धागा ! २) हा धागा काथ्याकुट मधे टाकणयाचे एकमेव कारण म्हणजे काथ्याकुट हा मिपावरील सचिन तेन्डुलकर आहे असे आमचे गेल्या काही दिवसात ठाम मत झाले आहे . अति-अवांतर : ३) संविधानात "असे धागे काढु नयेत " अशी तरतुद न सापडल्या मुळे धागा काढण्याचे धाडस करीत आहे ...राग नसावा :) ) --- आपली कृपाभिलाषि राष्ट्रकाकु गिरीजा

वाचने 55860
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

In reply to by सुहास..

हे लिहिणाऱ्या सुहासचेही काही लेखन आवर्जून वाचावे असेच आहे. त्याने दोन भिन्न आयडीने लेखन केले आहे. कुणी तरी काढा रे तेही बाहेर... :-)

In reply to by श्रावण मोडक

अगदी सुरुवातीलाच मनोबाने केली आहे. एकाने लिहिलेले सहसा दुसर्‍या कोणी रिपीट केले नाही तर त्यात भर आणखी टाकली आहे.

In reply to by श्रावण मोडक

श्रा. मो वाशाचे काही विनोदी लेख वाचून मी हापिसात गडबडा लोळलेलो आहे =)) http://www.misalpav.com/node/19918 हा कहर आहे

धन्यवाद गिरीजा ! सर्वांचे आभार ! मिपावर नवीन असाल्यामुळे ह्या धाग्याची फार मदत झाली. आणि लेखनाबरोबर त्यावरील प्रतिसादही वाचण्यासारखे आहेत.

प्रसिद्ध आणि आवडत्या लेखकांच्या यादीत माझा साधा नामोल्लेखसुद्धा करावासा तुम्हाला वाटला नाही ना? अरे हाच दिवस बघायचा होता तर आम्ही स्वातंत्र्य चळवळीत कशासाठी लढलो मग? तसा मी प्रसिद्धीसाठी कधीच हपापलेला नव्हतो. माझ्या 'विचारांचा उकीरडा' या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार देण्याचे ठरले होते. मी विनयाने पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. आता वाटते, की ती चूकच झाली. असो, जेव्हा मला साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळेल तेव्हा तुम्हाला माझी किंमत कळेल. पण नकोच. कुणाच्या नजरेत भरण्यासाठी पुरस्कार हवाच कशाला? आज लोक मला विसरलेत, पण एकेकाळी 'राया माझा धोतरातच' या नाटकाला लोकांनी केवढे डोक्यावर घेतले होते, याची तुम्हा मुलांना कल्पना नाही. काही कुचाळांनी 'शीर्षक अपुरे आहे. काही शब्द राहिलाय का?' असेही खवचटपणे विचारले, पण मी सांगितले, की 'जग जरी प्यांट वापरायला लागले असले तरी माझ्या रायाने अद्याप धोतर सोडलेले (वापरायचे) नाही. म्हणून नाटकाचे नाव 'राया माझा धोतरातच' असे आहे. शीर्षक तिथेच संपले आहे.' त्यानंतर या नाटकाने मागे वळून पाहिले नाही. 'वाचा आणि नाचा' (बालसाहित्य), 'एक तरी शिवी अनुभवावी' (गहन आध्यात्मिक साहित्य), 'भुंकले कोण..थुंकले कोण' (समीक्षा), 'रेझर इरेझर' (विज्ञानकथा), 'कारल्याच्या मांडवात' (काव्यसंग्रह), 'रस्त्यातले रहस्य' (रहस्यकथा), या माझ्या काही उल्लेखनीय साहित्यकृती. बाकी नावे यादीत बघून सांगेन. असो. देवा त्यांना माफ कर. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून हे लोक माझी सही घ्यायला येतील तेव्हा माझ्या मनात काही पूर्वग्रह राहू नको दे... ****************************************************************************** योगप्रभूंचा वरील प्रतिसाद अशक्य आहे. हा प्रतिसाद ज्या धाग्यावर आहे तो धागाच इथे महत्वाचा ठरावा: http://www.misalpav.com/node/19057

In reply to by मृत्युन्जय

योगप्रभू अशक्य माणूस आहे! त्याचेही लेखनच नव्हे तर प्रतिसाद लै भारी असतात. या धाग्यावर आणखी एक लिंक मिळाली. http://www.misalpav.com/node/14173

In reply to by मृत्युन्जय

ही ही ही ही ही. ह्या ह्या ह्या. हा धागा बघायचा रहिला म्हणून इतके दिवस तुमचा प्रतिसाद वाचनात आला नव्हता.

ज्याक ड्यानियल्स्(?) यांच्या सर्प लेखमालेचा दुवा आहे का कुणाकडे..??

हे बघा http://misalpav.com/node/25166 आणि हे http://misalpav.com/node/26437 तसेच हेही http://misalpav.com/node/26361 झालंच तर ही आख्खी सिरीज http://misalpav.com/node/6675 आनि जेनीबै बरोबर मिळून लिहीलेली http://misalpav.com/node/25357

हेच तर हव होत. लगेच वाखु सठवाली.