मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही जुन्या लेखनांचे धागे

प्रसाद गोडबोले · · काथ्याकूट
नमस्कार मी मिपावर नवीनच आहे . इथे काही सुंदर (/ "प्रसिध्द") जुन्या लेखांच्या कवितांच्या इतर लेखनाच्या लिन्क्स देणार का ? माझ्या बरोबर इतर नवीन सभासदांना फार मदत होईल . (तसेच जुन्या सभासदांना जुन्या लेखनाचा पुनःप्रत्यय घेता येइल ) प्रतिसादा मधे लेखनाचे नाव , थोडक्यात वर्णन , आणि लिन्क असे अपेक्षित आहे . (अवांतर : १) चांगले लेखन शोधण्याचा स्वतः प्रतत्न केला पण साहित्य ४२४ पाने , चर्चा १८६ पाने , काव्य २४६ पाने , पाककृती ७४ पाने ... इतकं सगं लेखन सर्फ करणे जरा अवघड आहे ... त्यापेक्षा जाणकार रसिक वाचकांचे आवडते लेखन आधी वाचावे असा विचार आला म्हणुन हा धागा ! २) हा धागा काथ्याकुट मधे टाकणयाचे एकमेव कारण म्हणजे काथ्याकुट हा मिपावरील सचिन तेन्डुलकर आहे असे आमचे गेल्या काही दिवसात ठाम मत झाले आहे . अति-अवांतर : ३) संविधानात "असे धागे काढु नयेत " अशी तरतुद न सापडल्या मुळे धागा काढण्याचे धाडस करीत आहे ...राग नसावा :) ) --- आपली कृपाभिलाषि राष्ट्रकाकु गिरीजा

वाचने 55831 वाचनखूण प्रतिक्रिया 92

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

विजुभाऊ Tue, 10/01/2013 - 21:02
आपली कृपाभिलाषि राष्ट्रकाकु गिरीजा
अरेरे... गिरीजा भाऊ तुम्ही चक्क स्वतःला काकू म्हणवून घेताय. हा केवळ वस्त्रप्रावरणे वापरून वरवरची रंगरंगोटी की आणखी काही?

बॅटमॅन Wed, 02/06/2013 - 16:20
कवी सुरेश्चन्द्रा जोशि यांची "मोकलाया दाही दिश्या" ह्या अजरामर कवितेपासून सुरुवात करू. http://www.misalpav.com/node/6332 आणि ते शेवटी राष्ट्रकाकू ऐवजी राष्ट्रकाकूबाई लिहिल्यास अजून बरें ;) =))

मन१ Wed, 02/06/2013 - 17:02
माझ्या वाचनखुणा पहा. पाकृ, कविता सोडून २००७ पासूनचं सारं सापडेल. कित्येक धागे, त्यांचे मथळे, दिसायला थिल्लर वाटतील पण त्यातही चांगले, माहितीपर प्रतिसाद सापदल्याकारणाने त्याम्नाही वाचनखुणेत साठवलय. . भावनिक, रंजक, उद्बोधक, खुसखुशीत, धो धो हसायला लावणारं असं सारं काही मिपावर नक्कीच सापडेल. . अजून एक गोष्ट म्हणजे, एकाच लेखकाचे पाच्-सात धागे अत्यंत आवडल्ले, तर मी ते सारे धागे वाखू मध्ये टाकत नाही. वाचनखुणेत लेखक दिसतोय ना, मग जौअन सरळ त्याचे सर्व लेखन वाचतो. . थोडक्यात, माझ्या वाचनखुणा पहा एवढच सांगणं आहे. . गविचे अपघारंजथरारक धागे, रामदास ह्यांच्या काही न बोलता बरच काही सांगून जाणार्‍या कथा, तात्यांची जुनी व्यक्तिचित्र, राजेश घासकडवी ह्यांचे खुसखुशीत लेख, चाफा ह्यांच्या काही गुदगुल्या करणार्‍या गोष्टी तर काही भयकथा, पेशव्याच्या प्रासंगिक का असेना पण भन्नाट बुधवारच्या कविता, टार्‍यानं केलेली सह्यांची विडंबनं आणि काढलेले कोथळे, इंडिआना जोन्स वल्लीचं ऑथेंटिक माहितीनं ठासून भरलेलं प्रामुख्यानं ऐतिहासि वगैरेसंदर्भातील सारच गद्य लिखाण(प्रतिसाद्+धागे) सुहास डॉट डॉट ह्यांच्या (अति)वास्तववादी आणि आणी त्रास देत रहाणार्‍या कथा/वर्णने; थत्ते,विकास, पंगा, आजानुकर्ण ह्यांचे सविस्तर प्रतिसाद . धमु,डान्या, आंद्या ह्यांचे जुने धागे(आंद्यानं केलेली साधय घटनांची जिवंत, सुंदर वर्णनं, डान्रावांनी खेळाबद्दल लिहिलेलं खूप काही, धमुच्या ढाकची बहिरीच्या उचापती). . परा ह्यांची चित्रपट नवनवीन चित्रपटाअंची ओळख करुन देणारी परिक्षणं, फार एन्ड रावांनी भिकार चित्रपटाअंची केलेली धमाल परिक्षणं, जे पी मॉर्गन वगैरेंचे खेळाविषयीचे धागे. . सध्या सुरु असलेली टीम गोवा ह्यांची मालिका .श्रामोंचे आपल्या आसपास चादरीखाली काय जळतय ह्याचा उल्लेख करणारे थेट, स्पष्ट पण संयत धागे, बिका ह्यांचे अरबस्थानातील अनुभवाअंचे रोचक वर्णन "माझं खोबार". विनायक प्रभू ह्यांचे सुरुवातीच्या काळातील क्रिप्टिक पण धमाल्/रंजक(आनि कधी अक्धी दाहक) धागे. . (न थकता वाचण्याचा दम असेल तर)५०फक्त ह्यांच्या कथा मालिका हे सर्व तर "लै भारी" आहेच; पण ह्याशिवायही खूप खूप काही चांगलं आहे मिपावर*(पाकृ आणी कवितांकडे तर वळलोही नाही). त्यामुळच मी मिपाचा प्रामुख्यानं वाचकच आहे. प्रतिसाद देणं ,हिरिरिनं सहभागी होणं येत नसलं तरी जमेल तसं हे सगळं वाचत होतोच. त्यावेळी कित्येक आवडलेल्या गोष्टींना दाद द्यायची राहून गेली. प्रतिसाद देणं झालं नाही, म्हणून फारसा कुणाशी वैयक्तिक परिचयही झाला नाही. . *प्रचंड कचराही आहे; पण तो दुर्लक्षून पुढं जावं हेच उत्तम.

In reply to by आदूबाळ

इनिगोय Wed, 02/06/2013 - 18:11
इतिहासकार म्हणायचं तर खव-खफ वरचं 'लोकसाहित्य'पण घ्यावं लागेल. अधिकृत प्रवक्ता म्हणून चालेल काय हो भाषाभक्षक?

शुचि गुरुवार, 02/07/2013 - 20:17
http://www.misalpav.com/node/9917 http://www.misalpav.com/node/9970 http://www.misalpav.com/node/10435 http://www.misalpav.com/node/10194 - http://www.misalpav.com/node/14847 http://www.misalpav.com/node/10921

बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 02/07/2013 - 21:59
सध्या हे बघा.... पुरून उरलात तर पुढचे देईन.... रामदास http://www.misalpav.com/user/185/authored चतुरंग http://www.misalpav.com/user/344/authored नंदन http://www.misalpav.com/user/17/authored श्रावण मोडक http://www.misalpav.com/user/640/authored आळश्यांचा राजा http://www.misalpav.com/user/4013/authored विनयक प्रभू http://www.misalpav.com/user/1235/authored भडकमकर मास्तर http://www.misalpav.com/user/418/authored मस्त कलंदर http://www.misalpav.com/user/3586/authored चित्रगुप्त http://www.misalpav.com/user/9160/authored चिंतातुर जंतू http://www.misalpav.com/user/7338/authored मेघना भुस्कुटे http://www.misalpav.com/user/37/authored पिवळा डांबिस http://www.misalpav.com/user/401/authored नितिन थत्ते http://www.misalpav.com/user/3083/authored विकास http://www.misalpav.com/user/48/authored ३_१४ विक्षिप्त अदिती http://www.misalpav.com/user/305/authored संजोप राव http://www.misalpav.com/user/26/authored

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पिवळा डांबिस Fri, 02/08/2013 - 01:45
अवो बिकाशेठ, ते तात्या राहिले की वो!!! त्यांच्यामुळेच तर मिसळपाव हे मिसळपाव झालं!! त्यांची लिंक द्या ना...

पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 02/07/2013 - 22:09
हारापरी हौताम्य हे ज्यांच्या गळा साजे या धाग्यात टग्यांनी लिहिलेला http://www.misalpav.com/comment/75942#comment-75942 हा प्रतिसाद म्हणजे अगदीच अफलातून.याच्यासारखा दुसरा प्रतिसाद बघितला नाही.

पैसा गुरुवार, 02/07/2013 - 22:35
गवि http://www.misalpav.com/user/12865/authored नगरीनिरंजन http://www.misalpav.com/user/9157/authored क्रान्ति http://www.misalpav.com/user/3804/authored बिपिन कार्यकर्ते http://www.misalpav.com/user/322/authored मेघवेडा http://www.misalpav.com/user/6468/authored ब्रिटिश http://www.misalpav.com/user/1509/authored धनंजय http://www.misalpav.com/user/12/authored आणि जे आयडी आता नाहीत पण त्यांनी उत्कृष्ट लेखन पूर्वी केलेलं आहे, http://www.misalpav.com/user/0/authored जयंत कुलकर्णी http://www.misalpav.com/user/9199/authored रणजित चितळे http://www.misalpav.com/user/11520/authored मितान http://www.misalpav.com/user/10137/authored इन्द्र्राज पवार http://www.misalpav.com/user/9279/authored aparna akshay http://www.misalpav.com/user/9349/authored अवलिया (नाना चेंगट) कधी कधी अगदी घायाळ करणारं लिहितात. विकास, क्लिंटन यांचा अभ्यासू वावर, ५० फक्त याच्या दीर्घकथा, स्पा च्या भयकथा. वाचाल तितकं थोडं.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पैसा Sat, 02/09/2013 - 09:44
त्याच्या "ते" मालिकेचे भाग आले रे आले की मिपा बंद पडायचं म्हणून सध्या त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. :P

जानकी गुरुवार, 02/07/2013 - 23:04
या धाग्याबद्दल धन्यवाद! वाचनखूण साठवली आहे. बहुगुणी यांचंही बरंचसं लिखाण वाचनीय असतं, मला आवडलेल्यापैकी काहींचे निवडक दुवे: वन फिश अ‍ॅट अ टाईम (मिपा दिवाळी अंक) ही दीर्घकथा एअरपोर्ट ही दीर्घकथा शब्द शब्द जपून फेक अटरली बटरली बाप माणूस मुक्त मी देस परदेस निदान नमस्कार तरी कराल? निरोप नाही, फक्त आभार उन्मन क्षण उन्नत क्षण यूं तो हैं हमदर्द भी ही दीर्घकथा

मला स्वतःला फारसे चांगले लिहिता येत नाही पण मिसळपाववरील अगदी प्रत्येक लेख आणि प्रतिसाद गेल्या दोन वर्षाच्या सदस्यकाळात मी वाचले आहेत.त्यावरून सांगतो की काही क्षेत्रांवरील पुढील सदस्यांचे लेख आणि प्रतिसाद खूप आवडतात (जरी सगळी किंवा अजिबात मते पटली नाहीत तरी) चित्रपट परिक्षणः परिकथेतील राजकुमार क्रांतिकारकः सर्वसाक्षी व्यक्तिचित्रे: विसोबा खेचर भारतीय संस्कृती: नाना पेठकर, योगप्रभू राजकारणः नितीन थत्ते, श्रीगुरूजी, विकास, क्लिंटन स्त्रीयांचे प्रश्नः ३_१४ विक्षिप्त अदिती संख्याशास्त्रः राजेश घासकडवी अर्थशास्त्रः क्लिंटन, प्रदीप पाककृती: प्रभाकर पेठकर, सानिका स्वप्नील, रेवती, खादाड अमिता, अपर्णा अक्षय

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

नाडी: शशिकांत ओक विडंबनः परिकथेतील राजकुमार धर्म-देवपूजा: शुचि स्त्रीविरोधः युयुत्सु (पाशवी धागा आठवतोय ना?) ज्योतिष: युयुत्सु भूतकथा: प्रियाली भारतीय राज्यघटना: ऋषिकेश, कॉमन मॅन शेतकर्‍यांचे प्रश्नः गंगाधर मुटे तसेच विश्वनाथ मेहंप्रतिसाद, पंगा यांचे प्रतिसाद एकापेक्षा एक असतात. (स्वतःचा प्रतिसाद एडिट करता येत असता तर नवा प्रतिसाद लिहावा लागला नसता :( )

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आणखी काही: काश्मीर/ पाकिस्तान/ अणुबॉम्बः सुधीर काळे बुध्दीबळः चतुरंग क्रिकेटः सुधीर काळे डावे विचारः रमताराम विमाने/ विमान अपघात/ मृत्यू: गवि तसेच पर्नल नेने मराठे यांची भाषा आणि टारझनदादांची 'न' ला 'ण' म्हणण्याची अदा अगदीच जबरदस्त.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

रमताराम Wed, 02/13/2013 - 12:40
डावे विचारः रमताराम>> मेलो. काका मला वाचवा... कोणतेही का चालतील, अगदी बिकाकाका किंवा श्रावणकाकासुद्धा चालतील.

छोटा डॉन Fri, 02/08/2013 - 10:14
वर अनेकांनी दिलेल्या सर्व लिंक्स उपयुक्त आहेत. वैयक्तिक आम्हाला आवडणारे लेखक म्हणजे तात्या, जेपी मॉर्गन, बिका, रामदासकाका, प्रभुमास्तर, हलकट नान्या (हा त्यांचा आयडी नाही, ते 'विशेषण' आहे), केसुगुर्जींची काही जुनी विडंबने, आता लेटेस्ट आलेली चीनी प्रवासवर्णने, विलासरावांची ब्राझिल सफर वगैरे वगैरे ... लेख वगैरे ठिक आहे, पण इथे खरी मज्जा आहे ती प्रतिसादात. हे सर्व असले तरीही मिपावर ... नव्हे आख्ख्या आंतरजालावर माझ्यापेक्षा महान, मोठ्ठा, समंजस, लोकप्रिय, मातब्बर लेखक असेल असे वाटत नाही. माझे लिखाण म्हणजे उदाहरणार्थ माईल स्टोन म्हणावे असे आहे. आजकाल ते इतके महान होत आहे की पब्लिकला समजत नाही म्हणुन मी लिहणेच बंद केले आहे. आजकाल मी स्वतःपुरतेच लिहीत असतो, असो, अवांतरास इथे पुर्णविराम ;) - छोटा डॉन

एका जुन्या मित्राची आठवण झाली. तो ही उत्तम राजकीय, सामाजिक प्रकारचं लेखन करत असे. त्याच्या स्वाक्षर्‍याही रोचक असत. मला सगळ्यात आवडायची ती: तुम्ही पत्रकार आहात? ... कोणत्या पक्षाचे? हे त्याचं लेखन: http://www.misalpav.com/user/680/authored

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मन१ Fri, 02/08/2013 - 14:40
इंदौरी मराठीवरची त्यांची कमेंट्री मस्तच. "बाबा चिल्लाउ नकोस" हे वाक्य डोक्यात फिट्त बसलय. . ती वर दिलेली सहीसुद्ध भन्नाट. RIP

दादा कोंडके Fri, 02/08/2013 - 14:45
मला भुरळ पडली होती ती वस्तुनिष्ठ, कर्क पासून ते आत्ता आत्ता पर्यंत पंगा यांच्या प्रतिसादाची. फक्त प्रमाणिकपणे व्यक्त होण्यासाठी मिसळपावचा खूप कमी जण वापर करतात त्यापैकी ही मंडळी होती. स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद येण्यासाठी दुसर्‍यांच्या लाळघोटेपणा-खुषामती करणं, प्रतिक्रिया देताना वैयक्तीक ओळख, फायदा याचा विचार करणारे खूप आहेत. अर्थात हे चुकीचं नाही पण कसल्याश्या फुटकळ व्यक्तीचित्रणावर पुलं नंतर तुम्हीच वगैरे म्हणणं म्हणजे कहर झाला. :)

In reply to by दादा कोंडके

मन१ Fri, 02/08/2013 - 17:53
म्हणूनच कचरासुद्धा प्रचंड आहे असं मी वरती म्हटलं. पब्लिक बहुतांश वेळेस इथले धागे म्हणजे ग्रुप चॅटिंग सुरु असल्यासारखं वापरते. पाच सात महिन्यांपूर्वी कुणीतरी कुठलातरी जोक कुणा दुसर्या आयडीच्या नावानं सांगितलेला असतो. त्याचे एकमेकाम्ना टाळ्या देत कोड लँग्वेज मध्ये बोलल्यासारखं सुरु असतं. त्यातले रेफेरन्सेस काहिच समजत नसल्यामुळे मलाही त्या भंकसगिरीचा वैताग येतो. . शिवाय हल्ली अधिकच जाणवू लागलेली गोष्ट म्हणजे पुरेसे वाचक/प्रतिसाद काउंट हवे असतील तर अधिकाधिक थिल्लर, उथळ,बाष्कळ लिहिता आलं पाहिजे.

In reply to by मन१

शिवाय हल्ली अधिकच जाणवू लागलेली गोष्ट म्हणजे पुरेसे वाचक/प्रतिसाद काउंट हवे असतील तर अधिकाधिक थिल्लर, उथळ,बाष्कळ लिहिता आलं पाहिजे. >> हे माझ्या लिखाणात व्हायला लागलं म्हणुन तर हा धागा काढला मी. ....उगाच काहीच्या काही फालतु थिल्लर काथ्याकुटत , बाष्कळ्पणा करण्यापेक्षा .....चांगले वाचन केलेलें बरें :)

In reply to by मन१

दादा कोंडके Tue, 02/12/2013 - 20:29
खरं आहे. आणखी फक्त प्रतिसाद देणार्‍यांचं म्हणाल तर मिपावर (किंवा कुठल्याही संकेतस्थळावर) तेच युनिक आहेत. बाकी अगदी पाकृपासून ते कलाकुत्रींपर्यंत सगळीकडे तेच ते आणि तेच ते. वेगळेपण असेल तर ते प्रतिसादात. अशोक पाटील आणि इंद्रराज पवार यांच्या प्रतिक्रिया सुद्धा अभ्यासपुर्ण असायच्या.

शुचि Sat, 02/09/2013 - 03:30
http://www.misalpav.com/user/21434/authored "आज फिर जीनेकी तमन्न है" या गाण्याचे रसग्रहण वाचून तर पार वेडावून गेले होते.

शुचि Tue, 02/12/2013 - 01:34
ओ काकू किती जणांनी तुमच्या विनंतीवरून, प्रयत्नपूर्वक खोदकाम करुन जुने जुने धागे दिले. जरा त्या धाग्यांबद्दल फीडबॅक द्या की. की तुम्ही वाचलेच नाहीत ते?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गावसेना प्रमुख , प्रत्येक काथ्याकुट वर वाद / राडा केलाच पाहिजे असा काही नियम आहे का ? स्वतःची ओळख काय करुन देणार मी ? इथे भले भले लिहिणारे आहेत ...त्यांच्या पुढे मी फारच लहान आहे . ( संकलक म्हणुन ओळख होणार असेल तर मला हरकत नाही त्याची ) आता तुम्हाला कळत असेल तर हे पहा Appreciation and critisism are works of second rate mind - G.H. Hardy .( अ म्यॅथेम्यॅटीशियन्स अपोलोजी ) सो मी सध्या फक्त वाचत आहे ...जिथे अ‍ॅप्रिसियेशनची उर्मी टाळता येत नाही तिथे प्रतिसाद देत आहे . आता ह्याही उपर , तुम्हाला हा धागा टोचत असेल तर मी संध्याकाळी बॅकअप घेवुन धागा डीलीट करेन . ओके ? आपली स्पष्टवक्ती गिरीजा तांबे

In reply to by प्रसाद गोडबोले

ते जाउ द्या ह्या बद्दल तुमच काय म्हणन आहे ते सांगा ,मनावर घेतल्याशिवाय तुम्हाला चैन नाही पडत वाटते. बिचारे खोदकाम करुन दमले,आणी तुम्हाला ह्याच काहीच नाही होय.

In reply to by शुचि

शुचिमामीने सदर लेखीक काकू म्हणले आहे, म्हणजे सदर लेखीका ह्या वयाने देवा पेक्षा दोन दिवसांनी लहान असाव्यात. आता ह्या वयोमानाच विचार करता 'फिडबॅक'ला वेळ लागणारच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आता ह्या वयोमानाच विचार करता 'फिडबॅक'ला वेळ लागणारच
अवांतर : एनी वन इन्टरेस्टेड इन ब्लाइन्ड डेट ?

In reply to by शुचि

धन्यवाद शुचि ! मी क्हरच सर्वांचीच आभारी आहे मदती बद्दल ! वाचत आहे हळु हळु रामदास ह्यांचे लेखन चाळत आहे सध्या .( श्रामों चा बंदा आणि खुर्दा : समर्थ हाही लेख वाचनात आला आहेच ) शिवाय http://www.misalpav.com/comment/457936 हे फारच भारी वाटले . मागे एकदा "निल्या म्हणे " एका विडंबन कवितेत(हे रोज कविता करणारे ) म्हणाला होता " मायबोली अन मिसळपावचे मैत्रीण होतय रे " पण इथे तर लोक लईच भारी सीरीयसली लेखन करीत आहेत असे दिसते वाचायला वेळ लागणारच . पुनश्च एकवार सर्वांचे आभार !!

सुहास.. Tue, 02/12/2013 - 20:49
सुबक च नाव नसल्याने महाप्रचंड त्रास झाल्याने हा प्रतिसाद लिहायला प्रेरित झालो आहे ....... सुबक चा " चवीने खाणार त्याला " ब्रिटिश ची " आत्महत्येवरील कविता " त्या ट्वाळ पर्‍याची " मनस्वी " मनोबा चा स्साला, आईने बनविलेल्या पाकृ वरचा लेख , धम्या ने लिहीलेला " बारमध्ये भेटलेला एक माणुस " दुष्मने-जान अदिती ने लिहीलेले " नाशिक-पुणे " प्रवास वर्णन . रंगाशेठ ला भेटलेली " नेक्स्ट डोअर गर्ल " नंद्याच्या तर... साल्याला ( धरून झोडला पाहिजे ) त्यो मदन्या नुसता फोटो काढत फिरतो आजकाल ! जागु ताईं ची आख्खी सिरीज ( काय मस्करी आहे का भाज्यांचे चाळीस प्रकार म्हणजे ) बिकांचा टिंब आणि मग नंतर स्साला रडवणार " भिकारी मातेच सत्य " केसूगुर्जींच चापट पारून ही न समजणारी चापट, क्रान्तीताई आणि मिक्का च्या गझल , ररां च आर्थिक-ए-सामाजिक-ए-भंडावुन सोडणार लिखाण ! गणपा आणि पेठकर काकांच्या पाकृ !! अरे , काय वाचलंस मिपा तु.... नसल वाचलसं तर ...एकदा श्रामोंच्या " अश्या तश्या नोंदी " वाच, आणि त्या नंतर पम्याची डायरी पण वाचायला घे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सुहास.. Wed, 02/13/2013 - 09:55
:) काही नवोदित आणि काही जुने राहिलेच . फट्टु म्हणजेच धन्या ने गाण्यांची काढलेली ईभ्रत ( गान समीक्षण/ परीक्षण या माणसाने आंजावर आणला असे म्हणावे लागेल.) फारएन्ड या आयडी ने लिहीलेले चित्रपट परीक्षण ( हाफिसातून अजिबात याचे धागे ऊघडु नयेत हि विनम्र सुचना ) स्पावड्या हा धारपांची शैली उचलुन भयकथा लिहितो हे मान्य , पण त्याची फोटो, ३डी, अ‍ॅनिमेशन लिहिण्याची स्वता शैली ( आपल्याला आवडते ब्वा ) सोक्या ( सोत्रि) च्या चावडी वरच्या गप्पा आणि तांत्रिक विषय सोप्पे करून लिहीलेले सर्वकाही ईंडियाना वल्ली जोन्स ने लिहिलेल्या भटकंती तात्याने केलेली व्यक्तीचित्रे सगळेच सांगतील, पण हाच तात्या कधे मधे प्रतिसाद, कौल, चर्चा आणि चपलांमधुन ही छाप सोडुन जातो. ( मायकल जॅक्सन च्या धाग्याची लिंक डकवा रे कोणीतरी :) )

In reply to by सुहास..

श्रावण मोडक Wed, 02/13/2013 - 11:06
हे लिहिणाऱ्या सुहासचेही काही लेखन आवर्जून वाचावे असेच आहे. त्याने दोन भिन्न आयडीने लेखन केले आहे. कुणी तरी काढा रे तेही बाहेर... :-)

In reply to by श्रावण मोडक

पैसा Wed, 02/13/2013 - 11:12
अगदी सुरुवातीलाच मनोबाने केली आहे. एकाने लिहिलेले सहसा दुसर्‍या कोणी रिपीट केले नाही तर त्यात भर आणखी टाकली आहे.

In reply to by श्रावण मोडक

स्पा Wed, 02/13/2013 - 11:20
श्रा. मो वाशाचे काही विनोदी लेख वाचून मी हापिसात गडबडा लोळलेलो आहे =)) http://www.misalpav.com/node/19918 हा कहर आहे

गौरव जमदाडे Wed, 02/13/2013 - 11:12
धन्यवाद गिरीजा ! सर्वांचे आभार ! मिपावर नवीन असाल्यामुळे ह्या धाग्याची फार मदत झाली. आणि लेखनाबरोबर त्यावरील प्रतिसादही वाचण्यासारखे आहेत.

मृत्युन्जय Wed, 02/13/2013 - 11:22
प्रसिद्ध आणि आवडत्या लेखकांच्या यादीत माझा साधा नामोल्लेखसुद्धा करावासा तुम्हाला वाटला नाही ना? अरे हाच दिवस बघायचा होता तर आम्ही स्वातंत्र्य चळवळीत कशासाठी लढलो मग? तसा मी प्रसिद्धीसाठी कधीच हपापलेला नव्हतो. माझ्या 'विचारांचा उकीरडा' या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार देण्याचे ठरले होते. मी विनयाने पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. आता वाटते, की ती चूकच झाली. असो, जेव्हा मला साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळेल तेव्हा तुम्हाला माझी किंमत कळेल. पण नकोच. कुणाच्या नजरेत भरण्यासाठी पुरस्कार हवाच कशाला? आज लोक मला विसरलेत, पण एकेकाळी 'राया माझा धोतरातच' या नाटकाला लोकांनी केवढे डोक्यावर घेतले होते, याची तुम्हा मुलांना कल्पना नाही. काही कुचाळांनी 'शीर्षक अपुरे आहे. काही शब्द राहिलाय का?' असेही खवचटपणे विचारले, पण मी सांगितले, की 'जग जरी प्यांट वापरायला लागले असले तरी माझ्या रायाने अद्याप धोतर सोडलेले (वापरायचे) नाही. म्हणून नाटकाचे नाव 'राया माझा धोतरातच' असे आहे. शीर्षक तिथेच संपले आहे.' त्यानंतर या नाटकाने मागे वळून पाहिले नाही. 'वाचा आणि नाचा' (बालसाहित्य), 'एक तरी शिवी अनुभवावी' (गहन आध्यात्मिक साहित्य), 'भुंकले कोण..थुंकले कोण' (समीक्षा), 'रेझर इरेझर' (विज्ञानकथा), 'कारल्याच्या मांडवात' (काव्यसंग्रह), 'रस्त्यातले रहस्य' (रहस्यकथा), या माझ्या काही उल्लेखनीय साहित्यकृती. बाकी नावे यादीत बघून सांगेन. असो. देवा त्यांना माफ कर. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून हे लोक माझी सही घ्यायला येतील तेव्हा माझ्या मनात काही पूर्वग्रह राहू नको दे... ****************************************************************************** योगप्रभूंचा वरील प्रतिसाद अशक्य आहे. हा प्रतिसाद ज्या धाग्यावर आहे तो धागाच इथे महत्वाचा ठरावा: http://www.misalpav.com/node/19057

In reply to by मृत्युन्जय

पैसा Wed, 02/13/2013 - 11:38
योगप्रभू अशक्य माणूस आहे! त्याचेही लेखनच नव्हे तर प्रतिसाद लै भारी असतात. या धाग्यावर आणखी एक लिंक मिळाली. http://www.misalpav.com/node/14173

In reply to by मृत्युन्जय

रेवती Mon, 03/04/2013 - 22:01
ही ही ही ही ही. ह्या ह्या ह्या. हा धागा बघायचा रहिला म्हणून इतके दिवस तुमचा प्रतिसाद वाचनात आला नव्हता.

विजुभाऊ Fri, 09/26/2014 - 12:24
हे बघा http://misalpav.com/node/25166 आणि हे http://misalpav.com/node/26437 तसेच हेही http://misalpav.com/node/26361 झालंच तर ही आख्खी सिरीज http://misalpav.com/node/6675 आनि जेनीबै बरोबर मिळून लिहीलेली http://misalpav.com/node/25357