Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by NiluMP on Sun, 02/10/2013 - 15:53
लेखनविषय (Tags)
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
नमस्कार मित्रांनो, Valentine Day येउ घातला आहे. काही संस्कृती रक्षक आता पासून आपल्या बाहया सरसावून बसले असतील तर काहींना शहाणपण आल आहे एवढी मोठी युवासशक्तीची व्होटबॅंक आपल्या हातून जाणार म्हटल्यावर शहाणपण येणारच हो अर्थात व्होटबॅंक हे राजकारण्याच पहिल प्रेम असत नाही का. असो प्रेम व्यक्त करण्यास बहुतेकजण घाबरत असतात यात मार पडेल, अपमान होइल ही भावना कमी तर नकार मिळाला तर ही अपराधाची भावनाच जास्त असते. प्रत्येकाच्या मनात ही सुप्त ईच्छा असते की आपल्यावरही कोणीतरी प्रेम करणार असाव कारण छोटयाश्या चोरीनंतरही बरीच आरडाओरड होत असते पण आपल हदय कोणीतरी चोरावं अस प्रत्येकालाच वाटत असते प्रेम हया भावनेतून गेलेला माणूष्यप्राणी हा भूतलावर सापडणे कठीण. पहिल प्रेम हे नादान असत अस मी ऐकल आहे पण तेच तर खरं प्रेम असत अस कोणीतरी म्हटल आहे कारण पहिली नोकरी, पहिला पगार, पहिले प्रेम, पहिली किस, पहिला गेम कोणच विसरत नाही. बरोबर ना. आम्हाला तर प्रेम म्हणजे काय रसायन असत हे तर काॅलेज मध्ये गेल्यावर ते पण रोझ डे च्या निमित्ताने कळले तस शालेय जीवनात आकर्र्षण होतच आणि आजकाल पाचवीच्या विदयार्थीचे ही गर्लफ्रेंड बाॅयफ्रेंड असतात (प्रेम किती रसातळाला गेले पहा शब्दांशा अर्थ घेउ नये) आणि हो तुम्हाला गर्लफ्रेंड बाॅयफ्रेंड नसल्यास तुम्ही मागासलेले (विचारांने) ठरविलेले जातात. तर काही महाभाग असतात ज्यांना दोन तीन प्रकरणातून तोलूनसोकाउ गेल्याशिवाय प्रेम म्हणेज काय हे कळतच नाही. प्रेम आयुष्यात एकदाच होत आणि जेव्हा ते वारंवार होत तेव्हा ते प्रेम प्रेम राहतच नाही ते तर लफड होउन जात त्यात भरीस भर मोबइल, इटरनेट, केबल टिव्हीने प्रेमाला भलत्याच उंचीवर नेवून ठेवले. जगतिकरणाचे वारे आता प्रेमातही वाहू लागले आहेत काल परवापर्यत चोरुन चोरुन भेटणारे ती आणि तो आजकल बिनदक्क्तपणे डेटिगला जाउ लागले आहेत मोबइल, इटरनेट, केबल टिव्हीमुळे घरबसल्या आपल्याला दुनियेशी ओळख झाली पण या दुनियादारीतून आपण चांगल्या गोष्टी फार कमी आणि वाईट गोष्टी लवकर शिकलो. पाश्चात्य संस्कृतीचे स्तोम आपल्यावर एवढ वाढू लागले आहे की प्रेमा सारख्या नाजुक नात्यालाही लोक आता लफड म्हणू लागले आहे शेवटी एढवचं म्हणेन प्रेमाच्या व्याख्या ज्याने त्याने आपल्या सोयीप्रमाणे बनविल्या आहेत कोणी त्याला पुजा म्हणतो तर कोणासाठी प्रेम म्हणजे त्याग आहे अर्थात हया व्याख्या म्हणजे त्यांना आलेल्या अनुभवांच्याच एक भाग आहे. Happy Valentine Day!!!
  • Log in or register to post comments
  • 12416 views

प्रतिक्रिया

Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 02/10/2013 - 15:58

Permalink

खूप छान

वा वा, सुंदर, अप्रतिम, काय लिहिलय तुम्ही. एकदम पटले बघा. तसे पाहता मला प्रेमाच्या सगळ्या व्याख्या आवडतात. :) धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sun, 02/10/2013 - 16:00

Permalink

छान !

चारोळ्या आवडल्या. बाकी, हा 'Valentine Day' काय असतो हे कोणी समजावून सांगेल काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/10/2013 - 18:56

In reply to छान ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

अहो!!!!!

आपला एक ऋतुभर चालणारा "वसंतोत्सव" एका दिवसात साजरा करायचा.
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Mon, 02/11/2013 - 11:59

In reply to छान ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

पराजी

माझ्याशी मयतरी करनार का? प्लीज बी माय व्हेलेटिंन :-)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Sun, 02/10/2013 - 17:09

Permalink

प्रेम हया भावनेतून गेलेला

प्रेम हया भावनेतून गेलेला माणूष्यप्राणी हा भूतलावर सापडणे कठीण.
"प्रेम हया भावनेतून न गेलेला माणूष्यप्राणी हा भूतलावर सापडणे कठीण." असं तुम्हाला म्हणायचं आहे असं वाटतं. बाकी हल्ली आजकाल काय बोलावं.. चोरुन भेटण्याची चांगली पौर्वात्य संस्कृती मागे सोडून उठसूट पाश्चिमात्य संस्कृतीच्या मागे लागून थेट बिनदिक्कत डेटिंगला जातात कार्टी.
पाश्चात्य संस्कृतीचे स्तोम आपल्यावर एवढ वाढू लागले आहे की प्रेमा सारख्या नाजुक नात्यालाही लोक आता लफड म्हणू लागले आहे
या ओळी तर एकदम भिडल्या. तीसेक वर्षांपूर्वी आमच्या चाळीत अनिता आणि मन्याचं चालू होतं तेव्हा त्याच्यावर सगळे चाळकरी "नाजूक प्रेम" म्हणून कौतुकाचा वर्षाव करत होते.. तांदूळ निवडता निवडता बायकांतही त्या प्रेमाच्या नाजुकतेची चर्चा असायची. हल्लीच्या काळात मात्र त्यांची नक्कीच पाश्चात्यपणे "लफडं" म्हणून संभावना झाली असती.. आजकाल कलियुग आहे हेच पटतं.. सगळंच बिघडतं आहे.. अधःपतन..अधःपतन.. जगदंब.. जगदंब..
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Sun, 02/10/2013 - 19:04

In reply to प्रेम हया भावनेतून गेलेला by गवि

Permalink

लय भारी....

लय भारी
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Mon, 02/11/2013 - 12:24

In reply to प्रेम हया भावनेतून गेलेला by गवि

Permalink

प्रेम हया भावनेतून न गेलेला

"प्रेम हया भावनेतून न गेलेला माणूष्यप्राणी हा भूतलावर सापडणे कठीण." हो मला हेच म्हणायचं होते. चुक सुधाल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sun, 02/10/2013 - 19:11

Permalink

तुम्ही माज्यासी मयत्री कराल काय???

व्हलेताइनच्या तुम्हाल पन सुभेच्चा.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 02/10/2013 - 22:57

In reply to तुम्ही माज्यासी मयत्री कराल काय??? by वेताळ

Permalink

ओ वेताळ

नेमकं कोणाला विचारताय?
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 02/11/2013 - 02:32

In reply to ओ वेताळ by पैसा

Permalink

विक्रमराजाला!

विक्रमराजाला! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 02/11/2013 - 19:51

In reply to ओ वेताळ by पैसा

Permalink

अपे़क्षाभंग झाला

असो....
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 02/11/2013 - 19:51

In reply to ओ वेताळ by पैसा

Permalink

अपे़क्षाभंग झाला

असो....
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Mon, 02/11/2013 - 13:01

In reply to तुम्ही माज्यासी मयत्री कराल काय??? by वेताळ

Permalink

मयत्री

माझया लेखाची सुरूवातच तुम्हा सर्वाना मित्रांनो अशी साद घालून दिलीय आणि तुम्ही मला मुलगी समजून माझयाशी मैत्री करवयाची असेल तर तुमचा अपेक्षाभंग झालाय मी मुलगा आहे आणि आपण सम विचारी असाल तर.... अहो म्हणूनच मी MP चा सभासद झालोय.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Mon, 02/11/2013 - 03:01

Permalink

पहिला गेम कोणच विसरत नाही

पहिला गेम कोणच विसरत नाही
हा प्रकार काय आहे ते जरा सष्ट कराल काय? कारण आपण खेळाबद्दल बोलत असाल तर मी पहिला खेळ कुठला खेळला होता ते काही आठवत नाही. बहुधा सिगारेटच्या पाकिटांच्या चौकोनी चकत्या (किंवा कोल्ड्ड्रिंक च्या चापट केलेल्या बुचां) 'व्हट्टर' ने नेम धरून उडवणे, टायर 'चालवणे', लगोरी, गोट्या, चिंचोके, गुलेल, सूरपारंबी किंवा गल्लीमधल्या डुकरांच्यावर धनुष्यबाणांचा प्रयोग करणे असा काही तरी असावा. आपण जर 'घोडा' वापरून करणार्‍या 'गेम' बद्दल बोलत असाल, तर हे खरे असू शकेल, पण असे करणारे लोक मिसळ्पाव सारख्या संकेत स्थळाला भेटी देत असतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 02/11/2013 - 10:17

In reply to पहिला गेम कोणच विसरत नाही by काळा पहाड

Permalink

हम्म

कदाचीत ते वेगळा घोडा वापरुन करायच्या वेगळ्या गेमबद्दल बोलत असावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/11/2013 - 12:09

In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

पहिली किस, पहिला गेम कोणच विसरत नाही

असं म्हटल्यामुळे प्रेम का गेम? असा प्रश्न पडला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 02/11/2013 - 12:12

In reply to पहिली किस, पहिला गेम कोणच विसरत नाही by संजय क्षीरसागर

Permalink

हम्म्म

काका, तुम्हाला एक आजकाल फारच प्रश्न पडायला लागलेत बॉ. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/11/2013 - 12:15

In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

आता तू घोड्याची गेम म्हटल्यावर

प्रश्न पडणार नाय तर काय?
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Mon, 02/11/2013 - 12:18

In reply to पहिला गेम कोणच विसरत नाही by काळा पहाड

Permalink

गेम

अहो गेम म्ह्णजे ढिचॅक-ढिचॅक.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Mon, 02/11/2013 - 15:13

In reply to गेम by NiluMP

Permalink

आनी ते 'गेमाडपंथी' म्हंजे??

आनी ते 'गेमाडपंथी' म्हंजे?? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Mon, 02/11/2013 - 12:19

In reply to पहिला गेम कोणच विसरत नाही by काळा पहाड

Permalink

गेम

अहो गेम म्ह्णजे ढिचॅक-ढिचॅक.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/11/2013 - 12:26

In reply to गेम by NiluMP

Permalink

हा काय नवा शब्द बुवा?

कशानं, कुठे आणि कसा खेळतात हा गेम प्रेमवीर? आणि गेममधे केंव्हा म्हणायच असतं हे?
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Mon, 02/11/2013 - 13:03

In reply to हा काय नवा शब्द बुवा? by संजय क्षीरसागर

Permalink

बालक पालक

बालक पालक चित्रपट पाहा तुम्हाला त्याचा अर्थ कळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/11/2013 - 13:10

In reply to बालक पालक by NiluMP

Permalink

गेले हो ते दिवस

आता पालक-पालक चालू आहे
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 02/11/2013 - 12:30

In reply to गेम by NiluMP

Permalink

अच्छा !

अहो गेम म्ह्णजे ढिचॅक-ढिचॅक.
आम्हाला वाटले खचाक-खचाक.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/11/2013 - 12:37

In reply to अच्छा ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

असं होतं बघ!

घोड्यानं भाई लोक ढिचक्यांव-ढिचक्यांव खेळतात. त्यांच्याकडे घोडा अ‍ॅवलेबल नसेल तर खचाक-खचाक खेळतात. आणि प्रेमवीर ढिचॅक-ढिचॅक खेळतात (असं लेखक म्हणतो)
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Mon, 02/11/2013 - 15:20

In reply to असं होतं बघ! by संजय क्षीरसागर

Permalink

आपल्याला तर बुवा खळ्ळ खट्याक

आपल्याला तर बुवा खळ्ळ खट्याक फार आवडतं. आता निवडणुका पुर्वी सुरु होईल पुन्हा.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 02/11/2013 - 12:56

In reply to गेम by NiluMP

Permalink

बीपी फारच मनावर घेतलात ब्वॉ

बीपी फारच मनावर घेतलात ब्वॉ तुम्ही ;)
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Tue, 02/12/2013 - 15:17

In reply to बीपी फारच मनावर घेतलात ब्वॉ by बॅटमॅन

Permalink

हो. आताच्या काळाची (लैगिंक

हो. आताच्या काळाची (लैगिंक शिक्षण) गरज आहे. नाहीतर लवकरच माहिती वाचायला मिळेल अल्पवयीन कुमारी मातेची. अर्थात आता पिढी हुशार आहे Production च्या बाबतीत म्हणा.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 02/12/2013 - 15:31

In reply to हो. आताच्या काळाची (लैगिंक by NiluMP

Permalink

??

अर्थात आता पिढी हुशार आहे Production च्या बाबतीत म्हणा.
हा स्वानुभव आहे, अंदाज आहे, का खात्री आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Mon, 02/11/2013 - 10:41

Permalink

व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन डे (मला आलेल्या एका फॉर्वर्डेड ई-मेल मधील मजकूर) Subject: व्हॅलेन्टाईन नावाचं भूतव्हॅलेन्टाईन नावाचं भूत "प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये ऊगवून सुद्दा मेघापर्यंत पोचलेलं" शिरवाडकरांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. प्रेम या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे. जगाला माहित असलेलं पहिलं प्रेमपत्र या हिंदुभूमीवर लिहिलं गेलं आणि ते प्रेमपत्र रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना लिहिलं होतं. जगाला प्रेम अर्पण करण्याचा संदेश हा सुद्दा या हिंदुभूमीचाच. प्रेमाचा इतका उदात्त हेतू आपल्या हिंदु संस्कृतीत आहे. आपली हिंदुभूमी म्हणजे साक्षात मुर्तीमंत प्रेमलता आहे. या हिंदुभूमीला कोटी कोटी प्रणाम. सध्या व्हॅलेन्टाईन डे च्या नावाने प्रेमवीरांच्या प्रेमाला प्रचंड महापूर आला आहे. प. पु. संत व्हॅलेन्टाईन हे ह्या प्रेमवीरांचे प्रेमगुरु. १४ फ़ेबृवारी हा त्यांचा प्रेमदिवस. म्हणजेच संत व्हॅलेन्टाईन ह्यांची पुण्यतिथी. आता हा व्हॅलेन्टाईन कोण होता हे ह्या प्रेमवीरांच्या बापाच्या बापालाही माहित नसेल. पण आम्हाला पाश्चात्यांची नक्कल करायची सवय लागली आहे आणि आम्ही ती प्रामाणिकपणे करीत आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगीतलं होतं की "इंग्रजांना आधि मनातून काढा, मग भावनेतून आणि नंतर भारतातून काढा". आपण इंग्रजांना भारतातून काढलं पण मनातून मात्र काढू शकलो नाही. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर कॉंन्व्हेंट शाळांना ऊत आला. कॉंन्व्हेंट या शब्दाचा अर्थ ( a residence of community of fathers and nuns) असा होतो. अर्थातच कॉंन्व्हेंट स्कूल या शब्दाचा अर्थ ( a school run by fathers and nuns) असा होतो. आपण आपल्या मुलांना कॉंन्व्हेंट शाळेत (इंग्लिश मिडियम) घालतो, ह्याचा आपल्याला अभिमान वाटतो. पण आपण आपल्याच हातांनी आपल्या मुलांचं भवितव्य बिघडवत आहोत. ही जाणिव आपल्याला होत नाही. आणि कधि होईल अशी आशा सुद्दा नाही. कॉंन्व्हेंट शाळांच्या पडद्दा-आडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार होत आहे. त्यातूनच हे "डे" साजरे करण्याचे दळभद्री प्रकार सुरु झाले. आणि व्हॅलेन्टाईन नावाचं भूत आमच्या मानगुटीवर बसलं. हा व्हॅलेन्टाईन कोण होता ह्याची माहितीप्रवचन भास्कर डॉ. सच्चिदा नंद शेवडे लिखित "राष्ट्रजागर"मध्ये वाचली. ती येथे देत आहे. "ख्रिस्ती धर्म वाढण्याचा तो काळ. त्या काळात ’हीदन’ व ’पेगन’ लोकांना हाल हाल करुन मारले आणि बाटवले. हे लोक मुर्तीपुजक व निसर्गपुजक होते. इसवी सनाच्या तिस‍र्‍या शतकात रोमन सम्राज्या त ख्रिस्ती वर्चस्व वाढू लागले. या काळात ’क्लॉडियस दुसरा’ हा राजा होता. रोमन साम्राज्यात गृहयुद्दे व बाहेरील आक्रमणे चालू होती. म्हणून त्या देशाला तरूणांची सैन्यात भरती करण्याची आवश्यकता वाटू लागली. पण तरूणांचे सैन्य भरतीचे प्रमाण खुपच कमी होते. हे सर्व प्रेम अथवा लग्न ह्यामुळे होत असावे, ज्या वेळी राष्ट्राला सैन्याची गरज होती त्यावेळी सगळेजण भौतिक सुखात लोळत होते. म्हणून राजाने लग्नावर बंदी घातली(!)_ राष्ट्रभिमानी राजाविरुद्द जनमत एकवटावे यासाठी व्हॅलेन्टाईन आणि मेरियस यांनी बंदी झुगारुन तरुणांची लग्ने लावली. हा उघडपणे राष्ट्रद्रोह होता. यामुळे राजाने त्यांना पकडले आणि शिरच्छेदाची शिक्षा सुनावली. या राष्ट्रद्रोही व्हॅलेन्टाईनने तुरुंगाधिकाराच्या मुलीला सुद्दा नादी लावले. मरण्यापूर्वी लिहिलेल्या पत्राखाली त्याने love from your valantine असे लिहिले होते म्हणे. १४ फ़ेबृवारी २७० मद्दे त्याचा शिरच्छेद केला. पुढे ब‍र्‍याच काळानंतर व्हॅटिकनने त्याला संतपद दिले. १४ फ़ेबृवारी हा "ज्युनो" नामक रोमन देव-देवतांच्या राणिचा गौरव दिवस होता. तोच ह्या ख्रिस्ती आक्रमकांनी ’व्हॅलेन्टाईन डे’ ठरवून रोमन मुर्तींचा विध्वंस केला, मुर्तिपुजक व निसर्गपुजकांना ठार मारले, बाटवले, स्त्रीयांवर बलात्कार केले, त्यांची नग्न धिंड काढली." तर हे होते व्हॅलेन्टाईनचे चरित्र. अहो अशा लोकांमद्दे प्रेमभावना कशी असू शकते? आणि हा असला व्हॅलेन्टाईन प्रेमाचा प्रतिक कसा असू शकतो? व्हॅलेन्टाईन प्रेमसंत आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे प्रेम विक्षिप्त आहे. अशुद्द बीजापोटी फ़ळे कडवट रानटी. जर बीज अशुद्द असेल तर फ़ळे कडवट आणि रानटीच असणार. मॅकोलेने सांगितले होते की "Give them your education and see within the period of thirty years they will forget themselves". आज खरच आपण स्वताला विसरलो आहोत. आपल्याला जे शिक्षणाचं बीज पेरलं गेलं तेच मुळात अशुद्द होतं. अहो, आज इंग्लंडमधील तीन युनिवर्सिटींनी व्यवस्थापन शास्त्रातील आदर्श ग्रंथ म्हणून रामदास स्वामींच्या दासबोधाला आपल्या आभ्यासक्रमात लावला आहे. आणि आपण मात्र आपला वेळ "रोज डे" "व्हॅलेन्टाईन डे" असल्या फ़ालतु गोष्टींवर घालवत आहोत. वाईट तितुके इथे पोसले भलेपणाचे भाग्य नासले, अशी आपली स्थिती झाली आहे. एकदा वाराणसीच्या कुंभ मेळ्यात काही विदेशी आले होते. त्यांनी हिंदुंना विचारले "तुम्ही चपला का नाही घातल्या?" त्यावर हिंदु म्हणाले "देवळात जाताना चपला घालायच्या नसतात". त्या विदेशींनीही चपला घातल्या नव्हत्या. तेव्हा हिंदुंनी विदेशींना तोच प्रश्न विचारला. यावर विदेशी म्हणाले "आम्ही भारत देशालाच देवळा समान मानतो. म्हणून आम्ही आमच्या चपला आमच्या देशातच काढून आलो अहोत." अहो जर विदेशी लोक आपल्या देशाला देवालय मानतात, तर मग आपण आपल्या देशाचं मद्दालय का केलं आहे? नुकतंच ख्रिस्ती नवीन वर्ष साजरं झालं. ३१ डिसेंबरच्या रात्री किती दारुच्या बाटल्या फ़ुटल्या? सरकारनेच परवानगी दिल्यावर म्हणायलाच नको. पण दारु लागतेच कशाला? आपण जर सुखात आणि दुःखात स्वताच्या पायावर ऊभे राहू शकलो नाही तर कसले पुरुष आपण? षंढच नव्हे का? असो, तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. प्रभू रामचंद्रांच्या जन्मापूर्वी रामनामाचा जप केला आणि वाल्या कोळ्याचे रुपांतर वाल्मिकी ऋषिंमद्दे झाले, ही आपली संस्कृती आहे. अहो, हिंदुधर्म हा मोदकासारखा आहे. बाहेरुन चाटल्यावर त्याचा गोडावा नाही कळायचा. गाभा‍र्‍यातील रस खाल्यावर कळतं, किती गोड आहे ते. माझ्या तरुण बांधवांना आणि भगिनींना एव्हढीच हात जोडून विनंती आहे की त्यांनी प्रभू रामचंद्रांचा आदर्श ठेवावा, हिंदु संस्कृतिचा आदर्श ठेवावा आणि व्हॅलेन्टाईन नावाचं भूत आपल्या मानगुटीवरून कायमचं उतरवून टाकावं. ज्यांना हा लेख वाचून शहाणपण आलं असेल त्यांना अभिनंदन आणि ज्यांना अजूनही शहाणपण सुचलेलं नाही त्यांना "हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे". धन्यवाद.......... लेखक: जयेश मेस्त्री
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Mon, 02/11/2013 - 12:52

In reply to व्हॅलेंटाईन डे by अविनाशकुलकर्णी

Permalink

माफ करा थोडया रूक्ष

माफ करा थोडया रूक्ष प्रतिसादाबददल. मीही भारतीय (मराठी) आहे मलाही आपल्या संस्कतीचा अभिमान आहे पण काही भारतीयांची ही जुनी खोड आहे. एखादया गोष्टीला जागतिक पातळीवर प्रसिध्दी मिळायला लागल्यावर त्याच उगम भारतीय संस्क।तीत होत अस म्हणण्याची. किती लोक 31 डिंसेबर सोडून नवीन वर्ष साजर करतात हो, अर्थात बरंच आहे म्हणा 31 डिंसेबर हे आपले नुतन वर्ष नाही जे बहुतेक लोक दारू ढोसून वा मांडया चढून साजरे करतात.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/11/2013 - 13:08

In reply to माफ करा थोडया रूक्ष by NiluMP

Permalink

बहुतेक लोक दारू ढोसून वा `मांडया' चढून साजरे करतात?

नक्की काय म्हणायचय तुम्हाला?
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Mon, 02/11/2013 - 13:53

In reply to बहुतेक लोक दारू ढोसून वा `मांडया' चढून साजरे करतात? by संजय क्षीरसागर

Permalink

लोल!

:))
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Mon, 02/11/2013 - 15:19

In reply to बहुतेक लोक दारू ढोसून वा `मांडया' चढून साजरे करतात? by संजय क्षीरसागर

Permalink

अगदी हेच..

मांडया चढून साजरे करतात.
म्हणजे काय हो? कुणाच्या "मांड्या" चढतात? भलतेच उंच बुवा..
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Tue, 02/12/2013 - 15:21

In reply to बहुतेक लोक दारू ढोसून वा `मांडया' चढून साजरे करतात? by संजय क्षीरसागर

Permalink

माडया

स्लिप of Keystroke.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 02/12/2013 - 15:39

In reply to माडया by NiluMP

Permalink

साला एक अनुस्वार

साला एक अनुस्वार आदमी को **** बना देता है =))
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Tue, 02/12/2013 - 15:52

In reply to साला एक अनुस्वार by प्रसाद गोडबोले

Permalink

सुख

माडया चढून दोन मांडयामध्ये
सुख
शोधतात. प्रतिसाद MP च्या नियमावलीत बसत नसल्यास उडवून टाकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 02/12/2013 - 15:56

In reply to सुख by NiluMP

Permalink

काय विचार आहेत..

तुम्हाला खरंच लैंगीक शिक्षणाची गरज आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Wed, 02/13/2013 - 14:52

In reply to काय विचार आहेत.. by परिकथेतील राजकुमार

Permalink

३१

मित्रा, वरील विधान जे लोक माडया चढून 31 साजरा करतात त्यांचासाठी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 02/13/2013 - 15:13

In reply to ३१ by NiluMP

Permalink

अच्छा अच्छा..

कोण कोण आहेत म्हणे असे मिपाकर ?
  • Log in or register to post comments

Submitted by Er.rohit on Mon, 02/11/2013 - 13:57

In reply to व्हॅलेंटाईन डे by अविनाशकुलकर्णी

Permalink

द्रोपदीचे वस्त्रहरण ही कोणाची

द्रोपदीचे वस्त्रहरण ही कोणाची संस्कृती हो? नाय म्या पामर इसरलो इतक्यात... मेनकेला वार्यावर सोडणारा विश्वामित्र....कोणाची संस्कृती हो...म्या पामर लगी ईसरतो बघा
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/11/2013 - 14:09

In reply to द्रोपदीचे वस्त्रहरण ही कोणाची by Er.rohit

Permalink

द्रौपदीवरनं आठवलं!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Mon, 02/11/2013 - 14:14

In reply to द्रोपदीचे वस्त्रहरण ही कोणाची by Er.rohit

Permalink

द्रोपदीचे वस्त्रहरण ही कोणाची

द्रोपदीचे वस्त्रहरण ही कोणाची संस्कृती हो? नाय म्या पामर इसरलो इतक्यात... मेनकेला वार्यावर सोडणारा विश्वामित्र....कोणाची संस्कृती हो...म्या पामर लगी ईसरतो बघा
तुम्हाला संस्कृती - जी समाजाची असते आणि गुणदोष जे व्यक्तीविषयक असतात त्यात फरक करता येत नाही असे दिसतंय. द्रौपदीचे वस्त्रहरण ही भारतीय समाजात अभिमानाची गोष्ट मानली जाते का?
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Mon, 02/11/2013 - 15:05

In reply to व्हॅलेंटाईन डे by अविनाशकुलकर्णी

Permalink

मला पडलेले काही प्रश्न..

१. >>तर हे होते व्हॅलेन्टाईनचे चरित>>> मला तरी तो राष्ट्र्द्रोही वाटला नाही. व्हॅलेन्टाईनची नक्की चुक कोणती? त्याने लग्नं लावून दिली ही, की तो तुरुंगाधिकाराच्या मुलीवर प्रेम करायचा (ज्याला यात नादी लावले असे म्हटलय.) ख्रिस्ती आक्रमकांनी पुढे जे काही केलं याला व्हॅलेन्टाईन जबाबदार नाही ना. २. >>> आपण मात्र आपला वेळ "रोज डे" "व्हॅलेन्टाईन डे" असल्या फ़ालतु गोष्टींवर घालवत आहोत >>> फालतु काय आहे त्यात? हे आपल्या संस्कृतीमधे नव्हतं म्हणुन फालतु का? आपण भारतीय सुद्धा बरेच 'डे' साजरे करतो की. मग प्रेम डे का नको? (चांगल्या गोष्टींची 'आयात' केली तर काय प्रॉब्लेम?) ३. >>> ३१ डिसेंबरच्या रात्री किती दारुच्या बाटल्या फ़ुटल्या? >>> गटारी डे ला किती बाटल्या फुटतात? (३१ चे समर्थन नाही, पण फक्त दुसर्‍याचं 'कुसळ' का दिसतं?) (नोटः हे प्रश्न खरेतर त्या मेस्त्री साहेबांसाठी आहेत. पण..) "हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे".. Image removed. एंजॉय माडी. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं.. कॉन्व्हेंट मधे शिकलात तरी प्रेम करता येतं फक्त ते आंधळं नसावं.. Nothing to xtreme.. everything in moderation..
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Tue, 02/12/2013 - 16:12

In reply to मला पडलेले काही प्रश्न.. by यसवायजी

Permalink

(३१ चे समर्थन नाही, पण फक्त

(३१ चे समर्थन नाही, पण फक्त दुसर्‍याचं 'कुसळ' का दिसतं? कारण ते दुसर्‍याचं असतं. माझ्या मुसळासमोर मला नेहमीच दुसर्‍याचं कुसळ वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 02/12/2013 - 16:18

In reply to (३१ चे समर्थन नाही, पण फक्त by llपुण्याचे पेशवेll

Permalink

वाह !

पुप्या आय लव यू रे !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 02/12/2013 - 16:27

In reply to (३१ चे समर्थन नाही, पण फक्त by llपुण्याचे पेशवेll

Permalink

सगलेच दादा कोंदकेंचे भाऊ

डोक्याला शॉट प्रतिसाद आहे हा पुपेराव =))
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Tue, 02/12/2013 - 16:28

In reply to (३१ चे समर्थन नाही, पण फक्त by llपुण्याचे पेशवेll

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रिया on Mon, 02/11/2013 - 10:58

Permalink

वॅलेंटाइन डे जसजसा जवळ येऊ

वॅलेंटाइन डे जसजसा जवळ येऊ लागतो, तसे प्रेमीजन प्रफुल्लीत होऊ लागतात. पण हा दिवस जवळ येऊ लागतो, तसे उदास होत जाणारे लोकही दिसतात. कदाचित त्याना अजून मनासारखा वॅलेंटाइन मिळालेला नसतो किंवा त्यांचा "ब्रेकअप" झालेला असतो पण वॅलेंटाइन डे हा काही फक्त प्रियकर आणि प्रेयसी यांच्या मधलेच प्रेम व्यक्त करायचा दिवस नाही. आई, वडील, जवळचे मित्र मैत्रीण, मुलं, जवळचे नातेवाईक, आपली काळजी घेणारे व शुभ चिंतणारे कोणी ही वॅलेंटाइन डे साजरा करायला व प्रेम व्यक्त करायला योग्यच आहेत.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com