लेख आवडला.
ललित लेखाच्या आवरणात शात्रीय माहिती फार सुन्दर रीतीने दिली आहे.
"देजा वू" चा अनुभव सर्वांना कधी ना कधी तरी आलेला असतोच. एखादी घडत असलेली घटना, भेटलेली व्यक्ती वा ऐकलेला संवाद इ. पूर्वी कधीतरी घडला होता असा भास होणे, याला "देवा वू" म्हणतात. ही काही फार गंभीर अशी समस्या नाही तरी असे भास हे स्मरणशक्तीच्या झालेल्या किंचित उलथापालथीमुळेच होतात.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सुनीलजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
"देजा वू" म्हणजे काय ते आपल्या स्पष्टीकरणावरून मला कळलं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
ललित लेखाच्या आवरणात फार सुन्दर रीतीने दिलेल्या शात्रीय माहितीबद्धल धन्यवाद.
' मुन्नाभाई एम बी बीएस ' या चित्रपटात असे स्मरणशक्तीत झालेली उलथापालथ अथवा कांही आभास यांचा विनोदी ढंगाने केलेला उल्लेख आहे.
त्याला विनोदाने ' भेजामधे झालेला केमिकल लोच्या ' असे म्हटलेले आहे. आपला लेख वाचून त्याची आठवण झाली. खरोखरच अशी उलथापालथ होऊ शकते कां?
अरुणजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
मी स्मृतीवर कुठे तरी वाचलं होतं.ती माहिती तशीच्या तशी शास्त्रीय माहिती म्हणून देण्याऐवजी जरा मनोरंजक करण्याचा प्रयत्न केला एव्हडेच.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
मैने गांधी को नही मारा ची आठवण आली. माणुस नॉस्टल्जिक का होतो ते समजलं. सामंत साहेब सुंदर लेख आमच्या पर्यंत पोचवलात. शीर्षक आकर्षक असल्याने तो वाचला गेला.
प्रकाश घाटपांडे
शीर्षक आकर्षक असल्याने तो वाचला गेला
म्हणजे तुम्ही २०% वाले (संदर्भ - आसपास शोधा म्हणजे सापडेल!)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
लेख आवडला
छान माहिती दिली आहे.
अलझायमर रोगात मेंदू तील ऐसीटाईल कोलीन हे प्रथीन कमी होते.
मेंदू आकाराने आकूंचन पावतो.
६० नंतर हा रोग होण्याची शक्यता जास्त असते.
अमेय
सामंतसाहेब, हा लेख छान जमलाय...
मजा आली...
उत्तम माहिती, त्या त्या प्रसंगात गुंफत मांडलीत... धन्यवाद
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
सामंत काका, लेख खूप आवडला! वाचनखुणांमधे टाकावा असा झालाय! एकदम संग्रहणीय..
अशाच विषयावर आधारीत असलेल रिडर्स डायजेस्टने काढलेलं एक पुस्तक आहे, 'मेकींग मोस्ट ऑफ युअर ब्रेन' .. अशीच सर्व माहीती, त्या अनुसरून काही मेमरीचे खेळ, चित्रं ..इतकं भन्नाट पुस्तक आहे ते! बोर झालं की उघडून बसायचे.. संग्रही असावे असे पुस्तक आहे..
देजावू बद्दलही त्यात माहीती होती.. डावा मेंदू आणि उजवा मेंदू यांच्यातले सिंक्रोनायझेशन बिघडणे ( काही क्षणांपुरते) , हे देजावूचे एक कारण आहे.. बर्याचदा ज्यांना मायग्रेनचा त्रास होतो,त्यांना देजावू जास्त होतो असंही लिहीले होते..
अजुन एक इंटरेस्टींग बाब.. जसं देजावू म्हणजे, अनोळखी गोष्टी ओळखीच्या वाटणे.. तसंच जमैसवू असे, ज्यात ओळखीच्या गोष्टी अनोळखी वाटतात.. जसे , घरातले फर्निचर, मांडणी अचानक काही क्षणापूरती अनोळखी वाटते..
तसंच जमैसवू असे, ज्यात ओळखीच्या गोष्टी अनोळखी वाटतात.. जसे , घरातले फर्निचर, मांडणी अचानक काही क्षणापूरती अनोळखी वाटते..
अशी अवस्था उत्तम प्रतीचा चरस सेवन केल्याने होऊ शकते. उत्तम दर्जाच्या चरसाचा सुगंध आणि त्यातून येणारी वर वर्णीलेली उन्मुक्त अवस्था...अहाहाहाहा.... आजकाल साला पूर्वीसारखा चरस कुठे मिळतच नाही.
सामंत साहेब,
छान लेख. संजयची एक गोष्ट जरा वेगळी वाटली. त्याच्या बाबांना मुलगतवानी सुप आवडायचं म्हणून त्याने त्यांच्या निधनानंतर ते सोडून दिलं. तोच संजय त्याच्या बाबांना आवडणारं अकुरी on टोस्ट आवर्जुन खातो.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बाजारात तेजरस, शंखपुष्पी अशी औषधं उपलब्ध आहेत. त्यानी काही फायदा होतो का?
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
त्याच्या बाबांना मुलगतवानी सुप आवडायचं म्हणून त्याने त्यांच्या निधनानंतर ते सोडून दिलं.
हे मलातरी पटत नाही. जी गोष्ट आपल्याला आवडते ती इतरांनाही आवडली तर आपल्याला जास्त आनंद होतो. त्यामुळे वडीलांना आवडणारी एखादी गोष्ट आपण करायची नाही म्हणजे पर्यायाने त्यांच्या आत्म्याला दु:ख द्यायचे असे वाटते.
माझ्या वडीलांना 'गुलाबजाम' आवडायचे. त्यांच्या मृत्यू नंतर माझ्या मावसभावाने मला विचारलं होतं, 'त्यांच्यासाठी तू काय सोडणार?' मी म्हणालो, ' अशी तर त्यांची आठवण सदैव माझ्या हृदयात जागृत असणार आहे. त्यातूनही त्यांच्या आवडीचे 'गुलाबजाम' खाताना मला त्यांचा तृप्त सहवासही लाभेल.
प्रभाकरजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपण म्हणता ते ही खरं आहे पण बरचंस हे व्यक्ति व्यक्तिच्या भावनेवर अवलंबून आहे.असं मला वाटतं.गेलेल्या व्यक्तिबद्दलचं वाटणारं प्रेम जो तो आपल्या समजूती प्रमाणे एक्सप्रेस करतो.
गेलेली व्यक्ति पाहून काहीना रडूं आवरत नाही तर काही शांत राहून आपलं दुःख दाखवतात.खरं आहे ना?
"सहज सुचलं" यांच्या प्रतिक्रियेवर मी दिलेलं स्पष्टीकरण आपण कृपया वाचल्यास कदाचीत आपल्या प्रतिक्रियेलाही संजयच्या दृष्टीकोनातून उत्तर दिल्या सारखं होईल असं मला वाटतं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपला विचार बरोबर आहे,पण एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे ती ही की बरचसं हे व्यक्ति व्यक्ति वर अवलंबून असतं.त्याशिवाय त्या वस्तुचं सोडून देणं किंवा आवर्जून खाणं हे पण मागे राहिलेल्या व्यक्तिला ती वस्तु आणि आवडीने खाणार्या त्या व्यक्तिचं-हयात नसलेल्या- त्या त्यावेळी झालेलं मागे राहिलेल्या व्यक्तिवरचं इम्प्रेशनवर अवलंबून आहे.असं मला वाटतं.
"संजयने मुलगतवानी सूप बाबाना आवडायचं म्हणून सोडून दिलं"
याचं कारण बाबा हे सूप संजयच्या आईला दर विकएन्डला घरात करायला लावायचे.ते निघून गेल्यावर संजयच्या आइनेच ते घरी करायचं बंद केलं.कारण मुलगतवानी सुपाचा कप ओठाजवळ आणल्यावरून बाबांच्या आठवणीने आईला भरून यायचं.ही सिच्युएशन पाहून tifr मधल्या कॅन्टीन मधलं सूप संजयने आईबाबांसाठी सोडून दिलं.
अकुरी on टोस्टचं प्रकरण वेगळं आहे.संजय आपल्या सहकार्या बरोबर कॅन्टीन मधे जेवायला जाताना कधी कधी बाबांच्या बरोबर काम केलेले इतर सहकारी त्याच टेबलावर बसून जेवताना त्याला म्हणायचे,
"अरे संजय आज अकुरी on टोस्ट आहे.तुझ्या बाबांना खूप आवडायचा चला आपण त्यांची आठवण काढून खावूया"
म्हणून तो त्यांना जॉईन व्हायचा.
तिच गोष्ट मुलगतवानी सूपा बद्दल कुणी म्हणाल्यास तो आईची गोष्ट इतराना समजावून सांगायचा आणि त्यामुळे इतर त्याला ते घ्यायला आग्रह करीत नसत.
मला वाटतं मी आपल्या शंकेचं जमेल तव्हडं निरसन केलं असावं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
माझ्या वाचीव माहितीनुसारः-
मेंदू, एखाद्या वस्तूची माहिती साठविताना ती वेगवेगळ्या सेल्स मध्ये साठवून ठेवतो. ह्या सेल्सना जोडणारा एक पुल असतो. जेंव्हा त्या वस्तूचे स्मरण होते तेंव्हा ते पुल सर्व सेल्समधील माहिती 'जोडून' एक सलग वस्तु आणि त्या बद्दलचे ज्ञान आपल्या स्मरण केंद्रास करून देते.
उदा. 'हातोडा' ह्यावस्तूचे लोखंडाचा भाग वेगळ्या सेल मध्ये, दांडा वेगळ्या सेल मध्ये, त्याचे वजन तिसर्या सेल मध्ये, तो आपटल्यावर येणारा आवाज चौथ्या सेल मध्ये ......असे 'हातोडा' संबंधीत वेगवेगळी माहीती वेगवेगळ्या सेल्स मध्ये साठविली जाते. जेंव्हा आपण ह्यातील काही गोष्टीचे स्मरण करतो तेंव्हा हे सर्व 'पुल' सर्व माहिती 'जोडून' आपल्या नजरेसमोर हातोड्याचे चित्र उभे करतात.
अल्झमायर मध्ये हे पुल निकामी होतात. त्यामुळे नेहमीच्या वापरातील वस्तूंचे ज्ञानही रुग्णाला होत नाही. शर्ट किंवा पँट हातात घेतली तरी ह्याचे काय करायचे हे आठवत नाही. सतत बरोबर असिस्टंट लागतो.
अल्झमायर्स ची शक्यता टाळण्यासाठी सतत मेंदूला कामात ठेवावा असे म्हंटले आहे. म्हणून वयोवृद्ध माणसांनी 'शब्दकोडे' सोडविण्याची, तारखा-नांवे लक्षात ठेवण्याची प्रॅक्टीस ठेवावी, असेही सुचविले आहे.
मस्त एकदम.
काही गोष्टी नीट समजण्याकरीता पुन्हा एकदा नीट वाचेन.
"tifr ची खासीयत मी तुम्हाला काय सांगू?तुम्हाला सर्व माहित आहे.डॉ.भाभांच्या शिस्तित हे बसत नाही.त्यांच म्हणणं रिसर्च करणाऱ्यावर कसलीच बंधन असता कामा नयेत. जो तो त्याची जबाबदारी जाणतो. कांमाचा अपव्यय न होवू देण्याची त्याला ह्यामुळे संवय लागते.माझ्या संशोधनाच्याच संबंधाने आपण बोलत असल्याने मी माझ्या कामाचा अपव्यय करीत नाही असं माझं मन सांगतं.आणि तुम्हाला ही ह्या विषयात इंटरेस्ट असल्याने मला तुम्हाला हवी असलेली माहिती सांगायला पण बरं वाटतं.
आपल्याला आवडली ही पॉलीसी. अशा वातावरणात खरोखरच संशोधनाला खूप मदत होत असेल :)
देवदत्तजी,
खरं आहे आपलं म्हणणं.
निसर्गाकडून निर्माण होणारी सृष्टी कुठल्याही बंधना शिवाय असते.गुलाबाने असंच फुलावं,मोगर्यानं तसंच फुलावं असं बंधन नाही.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
उत्तम लेख, सामंत साहेब....
मेंदू बद्दल अतिशय विवेचक स्वरूपात माहिती दिली आहे.
शीर्षकावरून असं वाटलं होतं, की हा एखादा विनोदी लेख असावा; पण वेगळाच विषय आहे.
सोबत संजय ची आठवण जोडल्यामुळे फक्त माहितीपर लेख न होता,
त्यातून माहिती तर मिळालीच, शिवाय उत्सुकतेने संपूर्ण लेख वाचल्या गेला.
धन्यवाद.
त्यांचं म्हणणं, रिसर्च करणार्यावर कसलीच बंधने असता कामा नयेत. जो तो त्याची जबाबदारी जाणतो. कामाचा अपव्यय न होवू देण्याची त्याला ह्यामुळे सवय लागते.
संपूर्णपणे सहमत.
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.
प्रतिक्रिया
छान - देजा वू
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अधिक २
आभार
आभार
केमिकल लोच्या..
आभार
मैने गांधी को नही मारा
अवांतर - २० %
आभार
आभार
लेख
प्रथिन??
आभार
सामंतसाहे
आभार
सामंत
चरस...
आणखी माहिती
आभार
आभार
सामंत
प्रेम...
संजयने मुलगतवानी सूप का सोडलं.
संजयने मुलगतवानी सूप का सोडलं आणि अकुरी on टोस्ट का खायचा
सामंत
नाही पटले...
अल्झमायर....
अरे वा !!!
आभार
मस्त
आभार
उत्तम लेख!
आभार
छानच