Skip to main content

रेखाटने.

लेखक नितिन वस्त यांनी शुक्रवार, 29/08/2008 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .मी नितिन वस्त. माझी काही चित्रं आपल्यासमोर ठेवत आहे. माझे शिक्षण नूतन कला मंदीर येथे झाले. ए.ए. आलमेलकर आणि परदेशी सर हे माझे गुरु.ही सर्व रेखाटने चारकोलनी पेपरवर केलेली आहेत. मिपावर मला घेउन आले आहेत माझे मित्र आणि दी मोटीव्हेटर श्री. रामदास.काल आम्ही बँकेच्या रांगेत एकत्र उभे होतो आणि आज मी रेखाटने मिपावर टाकतो आहे. रामदास यांचा आभारी आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7672
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

सर्वच रेखाटने अप्रतिम! शेडिंगची कमाल आहे. लहानग्यांच्या चेहेर्‍यावरचे निरागस भाव अप्रतिम. घोड्यांच्या डोळ्यातले उमदे भाव आणि अंगाची तुकतुकी अत्यंत प्रभावीपणे चितारली आहेत. आपल्या सारख्या चित्रकाराची ओळख करुन दिल्याबद्दल रामदासशेठचेही आभार! चतुरंग

In reply to by चतुरंग

शब्द संपलेले आहेत. आम्हास आपला हेवा वाटतो ... चतुरंगांशी पुर्ण सहमत -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by चतुरंग

शब्द नाहीत. बेश्टेश्ट. निव्वळ लाजवाब!! भरपूर शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून. :) अगदी खासच म्हणायचे तर पहिले, दुसरे अन् चौथे जास्त आवडलेत, अगदी किंचित उजवे. आता तुमची चित्रे मापदंड म्हणून मानायला हरकत नसावी येथे कुणाची!! इतकी वास्तववादी रेखाचित्रे काढणे म्हणजे त्यास वाहून घ्यावे लागते. तुमच्या गुरूंना येथेच साष्टांग नमस्कार आणि रामदास यांना शतश: धन्यवाद! (अत्यानंदीत) राघव

अप्रतिम.... चित्र क्रमांक ५ मधली लहान मुलगी खूपच छान आहे. बिपिन.

अतीशय उच्च दर्जाची रेखाटने. निव्वळ अप्रतिम!!!!! तुम्हाला इथे घेउन येणार्‍या रामदासजींचे देखिल आभार. आणखी येउ द्यात..

नितिन, सर्व चित्रे इतकी चांगली आहेत की मी सांगु शकत नाही. अतिशय आवडलीत. स्वप्निल..

दुसरं आणि पाचवं चित्र केव़ळ सुरेख..! मिपाला एक चांगला चित्रकार दिल्याबद्दल रामदासरावांचा मी ऋणी आहे! तात्या.

नितिन जी... सर्वच रेखाटने सुंदर. अप्रतिम. तुमच्या हातात जादू आहे. शेडींग सर्वात छान. अजून येऊद्या. आजचा दिवस छान जाणार ! ....बबलु-अमेरिकन

रेखाटने केवळ अप्रतिम आहेत. :)

सर्व रेखाटने अप्रतिम आहेत.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

अतिशय अप्रतिम रेखाटने. रेखाटने जिवंत वाटत आहेत. आपल्यासारख्या कलाकाराशी आमची मिपातर्फे भेट घडावी हे आमचे भाग्यच. - सूर्य.

अगदी हेच म्हणतो !!! ++++१ बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अतिशय सुंदर कलाकारी!

जबरदस्त... आपल्यातल्या कलेला आणि आपल्या गुरूंना सुद्धा वंदन... मजा आ गया... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वा नितीन, सगळीच चित्रे अतिशय सुंदर!!!! मिसळपाववर मनापासून स्वागत! रामदास यांचेही आभार! कुरळ्या केसांचे बाळ विशेष आवडले :) एक शंका: माझ्या स्क्रीनवर चित्राचा मध्य-फोकस काळ्या पांढर्‍या रंगात तर भवतालचे चित्र काहिसे तपकिरी दिसते आहे. ते असेच आहे? का स्कॅन्र/कॅमेराचा प्रभाव? का माझ्या स्क्रीनचा दोष? -(सरळ केसांचा) ऋषिकेश

सर्वच चित्रे अप्रतिम आहेत. मिपाला एक चांगला चित्रकार दिल्याबद्दल रामदासरावांचे हार्दिक आभार!

In reply to by विसुनाना

अगदी हेच म्हणतो. मिपावर अजुन एका मोठ्या कलाकाराचा प्रवेश! स्वतंत्र चित्रकला विभाग लवकर झालाच पाहीजे!

मस्त................ केवळ अप्रतिम आहेत सर्व चित्र.............

अप्रतिम! शब्दच नाहीत माझ्याकडे ....

सर्व रेखाटने पाहून जे वाटले, ती भावना शब्दांच्या चिमटीत पकडणे केवळ अशक्य. वरील रेखाटने पाहून मी माझी सर्व रेखाटने जमिनीत दहा फूट खोल पुरून टाकली आहेत.

प्रत्येक चि त्रातले डोळे, केस, घोड्यांच्या चित्रात तोंडावरले, नाकावरले शेडींग्ज इतके अप्रतिम रेखाटले आहे कि बास्स . . . . सलामच

रेखाटने आवडली. ( रामदास यांनी मिपावर आपली भेट घडवून आणल्याबद्दल आभार )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रेखाटने आवडली. प्रत्येक चित्र सुरेख. शेवटचे ...छोट्या मुलीचे सर्वात जास्त आवडले. धन्यवाद. ईश्वरी

बघा कुठे कुठे लपलेले असतात हे हीरे. शाब्बास रे मोटीवेटरा. विनायक प्रभु

फारच सुंदर चित्रे.. सर्वच आवडली. क्र. २ चे घोड्याचे चित्र तर फार सुंदर. --लिखाळ.