इतिहास मोठा क्रूर आहे. काही लोकांना त्याने देव पदी पोचवले तर काही जणांना उपेक्षेने मारले. ज्याव्यक्तिरेखांची इतिहासाने उपेक्षा केली त्यांत शत्रुघ्नाचे नाव फार वरती आहे. किंबहुना सर्वात वरती तेच आहे. वटवृक्षांच्या सावलीत एखादे रोप कोमेजुन जावे तशी शत्रुघ्नाची व्यक्तिरेखा कोमेजुन गेल्यागत भासते. राम तर देवपदी पोचला. लक्ष्मण अजरामर झाला. भरत भ्रातृप्रेमावर आणि निस्पृहतेवर गाजला. शत्रुघ्नाच्या वाट्याला मात्र ते मोमेंट्स ऑफ फेम आलेच नाहीत.
नाही म्हणायला तसे महाभारतातले नकुल सहदेव देखील उपेक्षित. पण त्यांच्याबद्दल निदान काही कौतुकास्पद शब्द लिहिले गेले. नकुलाची अश्वपरीक्षा आणि सहदेवाची भविष्यपरीक्षा यांवर काही मिथके तरी वाचायला मिळाली आहेत. नकुल / सहदेव म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर महाभारतातले नकुल सहदेवच येतात. शत्रुघ्न म्हटल्यावर मात्र आपल्या डोळ्यासमोर "खामोश" "जली को आग कहते है बुझी को राख कहते है" वगैरे म्हणणारा शत्रुघ्न सिन्हा येतो. (तोच तो सोनाक्षी सिन्हा चा बाप. काही वर्षांनी तो केवळ दगडीचा बाप म्हणुनच देखील ओळखला जाउ शकतो. द्गडी म्हणजे सोनाक्षी. अंदर की खबर आहे की तिचे मूळ नाव सोनाक्षी नसुन 'स्टोना'क्षी आह'. तिच्या डो़ळ्यात आणि दगडात एकच भाव असतात. कधीकधी दगडही सुंदर दिसतो तशी स्टोनाक्षीही सुंदर दिसते. साम्यस्थळे एवढ्यात संपतात. बाकी दगडाचा अपमान करण्याचा काही हेतू नाही. असो. विषय बदलला. त्या शत्रुघ्नाचे दुर्दैव. लेखाचा विषय आहे शत्रुघ्न आणि लिहितो आहे सिन्हांच्या दगडीवर.)
पण आज शत्रुघ्नाबद्दल विचारले तर आपल्यापैकी कितीजण धाडधाड १० ओळी म्हणुन दाखवु शकतील. राम बोला लक्ष्मण बोला, अर्जुन म्हणा कर्ण म्हणा लोक अधिकारवाणीने थोडेफार बोलतील. महाभारतातल्या खलनायकांबद्दलही लोकांना माहिती आहे पण रामायणातल्या बंधुनिष्ठ शत्रुघ्नाबद्दल नाही. कारण मुळात त्याचे आख्खे जीवनच अळणी आहेत. त्यात काही माल मसाला नाही, मेलोड्रामा नाही. तो रामासारखा वलयांकित नाही, लक्ष्मणासारखा पराक्रमी आणि सेवाव्रती नाही. भरतासारखा उदार आणि त्यागी नाही कारण मुळात त्याला कधी तो चान्सच मिळाला नाही. भरतासारखे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेउन त्याने कधी राज्य केले नाही कारण मुळात त्या राजपदाचे मापच त्याच्या पदरी पडले नाही. शत्रुघ्नाचे आख्खे आयुष्यच आपल्यासाठी केवळ भरताचा धाकला भाऊ इतपतच सिमीत आहे. आणि हीच मुळी प्रचंड मोठी शोकांतिका आहे कारण तो भरताचा सख्खा धाकटा भाऊ नसुन लक्ष्मणाचा जुळा भाऊ आहे. शत्रुघ्न मुळात कोण होता हेच जर माहिती नसेल तर त्याचे कार्य काय माहिती असणार?
शत्रुघ्न म्हणजे शत्रुंचा नाश करणारा. दशरथ आणि सुमित्रेचा मुलगा. लक्ष्मणाचा जुळा भाऊ, राम आणी भरताचा सावत्रभाऊ आणि चार भावंडांमधला सर्वात धाकटा (जुळा असुनही). पण शत्रुघ्नाची खरी ओळख याहुनही खुप मोठी आहे. त्याच्या आयुष्यातला प्रसिद्धीचा एकमेव क्षण लवणासुराच्या वधात आला. लवणासुर म्हणजे मधु राक्षसाचा मुलगा. या मधुच्या नावावरुनच मथुरा हे नाव आले. या मधुने देव दानव मनुष्य या सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. प्रजाहितदा होता. त्यावर खुष होउन साक्षात शिवाने त्याला स्वतःचा त्रिशूळ दिला. जो मधुच्या मृत्युन्ंतर लवणासुराकडे आला. लवणासुर स्वत: पराक्रमी आणि अस्त्रनिपुण होता. मात्र ऋषीमुनींना आणि मनुष्यांना त्रास देणारा होता. प्रजानन त्रासले आणि रामाकडे आले आणि रामाने याकामी भरताला लावुन दिले. पराक्रम गाजवण्याचा हा एक क्षणही वाट्याला येत नाही हे बघुन अखेर शत्रुघ्नाने रामाकडे या कामगिरीची मागणी केली आणि मिळवली. रामाने खास विष्णुने दिलेले अस्त्र शत्रुघ्नाकडे देउन त्याला लवणासुराकडे धाडले. आख्यायिका अशी आहे की लवणासुराच्या महालात अनेक दैवी अस्त्रे होती जी जवळ असेतो तो अजेय होता. त्यामुळे शत्रुघ्नाने भक्ष्याचे आमिष दाखवुन त्याला महालापासु दूर नेले आणि मग युध्दाचे आव्हाने दिले. याबाबत त्याने त्याच्या जुळ्या भावाचा कित्ता गिरवला. त्यानेही इंद्रजिताला असेच अजेय अस्त्रांपासुन दूर ठेवले होते. अखेर लवणासूर मेला. मथुरेचे राज्य त्यानंतर शत्रुघ्नाकडे आणि मग त्याच्या मुलांकडे गेले. लवणासुर वधाने आणि अश्वमेध दिग्विजयाने त्याने मिळवलेले किर्ती अखेरच्या क्षणी त्याच्या पुतण्यांनी त्याला हरवुन त्याच्यापासुन हिरावुन नेली.
पण शत्रुघ्नाचा मोठेपणा लवणासुर वधात किंवा अश्वमेधाच्या दिग्विजयात नाहिच मुळी. त्याचा मोठेपणा इतिहासाने कधी अधोरेखितच केला नाही. त्याचा मोठेपणा आहे राम - लक्ष्मण वनवासात गेलेले असताना आणि भरत रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवुन अयोध्येबाहेर कुटीत राहत असताना निरपेक्ष, नि:स्पृह वृत्तीने अयोध्येच रक्षण करण्यात आहे. १४ वर्षाच्या काळात अयोध्या कधी नव्हे इतकी सजली, नटली, बहरली, समृद्ध झाली. याचे श्रेय सर्वांच्या अनुपस्थितीत राज्य योग्यप्रकारे सांभाळणार्या शत्रुघ्नाकडेच जाते. याबदल्यात त्याच्या पदरात कुठलेच कीर्तीचे माप पडले नाही. १४वर्षांनी राम परतल्यावर लोक म्हणाले भरताने रामाला राज्य परत केले. पण ते राज्य भरताने तरी कुठे केले होते. ते शत्रुघ्नानेच तर केले.
वास्तविक पाहता लक्ष्मणाने जी सेवा रामाची केली तशीच शत्रुघ्नाने भरताची केली. लक्ष्मण रामाची सावली बनुन राहिला तर शत्रुघ्न भरताचे प्रतिरुप बनुन. दोन्ही जुळ्या भावंडांनी निरपेक्षपणे आपल्या सावत्र भावांची सेवा करण्यात धन्यता मानली. परंतु इंद्रजित वधामुळे असेल कदाचित किंवा वनवास भोगल्यानेही असेल पण लक्ष्मणाची प्रतिमा एका वटवृक्षा एवढी मोठी झाली तर शत्रुघ्न त्या वटवृक्षाची केवळ एक सावली बनुन राहिला. लक्ष्मणाच्या मृत्युनंतर रामापाठोपाठ भरतानेही जलसमाधी घेतली तसे कायम त्या दोघांबरोबर सावली सारखा राहिलेला शत्रुघ्नही सरयूत विलीन झाला. बंधुप्रेमाचे याहुन उदात्त उदाहरण इतिहासात नाही.
राम उदात्ततेचे प्रतीक आहे तर लक्ष्मण बंधुप्रेमाचे, भरत त्यागाचे आणि उदारपणाचे प्रतीक आहे तर शत्रुघ्न निरपेक्ष आणि नि:स्पृह व्रुत्तीचे. त्याच्या या नीरक्षीरसमान वृतीला सलाम करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
वाचने
21277
प्रतिक्रिया
130
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>राम उदात्ततेचे प्रतीक आहे
+१
In reply to >>>राम उदात्ततेचे प्रतीक आहे by नाना चेंगट
+१
In reply to >>>राम उदात्ततेचे प्रतीक आहे by नाना चेंगट
रामायण हे काव्य असल्याने
In reply to >>>राम उदात्ततेचे प्रतीक आहे by नाना चेंगट
तर इतिहास म्हणजे काय त्यांचे
In reply to रामायण हे काव्य असल्याने by धन्या
हशा आणि टाळ्या !
In reply to >>>राम उदात्ततेचे प्रतीक आहे by नाना चेंगट
...रामाचे नाव घेतले की पूर्वी भुते पळून जात हल्ली गोळा होतातहशा :)) आणि टाळ्या !तरीही
In reply to >>>राम उदात्ततेचे प्रतीक आहे by नाना चेंगट
मुद्द्याशी तत्वतः सहमत आहे.
In reply to तरीही by श्रावण मोडक
शत्रुघ्न उपेक्षित राहिला हे
रंजक व्यक्तिचित्र.
शत्रुघ्नाबद्दल नविन माहिती
उत्तम लेख.
नाही नाही. दिग्विजयात लव
In reply to उत्तम लेख. by प्रचेतस
असे तर प्रत्येक कथे मधल्या
In reply to नाही नाही. दिग्विजयात लव by मृत्युन्जय
छ्या !
In reply to असे तर प्रत्येक कथे मधल्या by अनुराधा१९८०
मान्य आहे. पण प्रत्येक
In reply to असे तर प्रत्येक कथे मधल्या by अनुराधा१९८०
काय हे ?
In reply to मान्य आहे. पण प्रत्येक by मृत्युन्जय
अर्रे असे आहे होय, मग आय माय
In reply to काय हे ? by परिकथेतील राजकुमार
रामायणात महाभारत शोधू पाहणार्
मस्त रे
ही तर खाजवून खरूज
खाजवुन खरुज हे काही कळाले
In reply to ही तर खाजवून खरूज by अनुराधा१९८०
तुम्ही एक शत्रुघ्नायण लिहा आणि त्यात रामा
In reply to खाजवुन खरुज हे काही कळाले by मृत्युन्जय
साधारणपणे खाजवुन खरुज आणणे
In reply to तुम्ही एक शत्रुघ्नायण लिहा आणि त्यात रामा by अनुराधा१९८०
अरे बाबा कशाला स्वतःला
In reply to साधारणपणे खाजवुन खरुज आणणे by मृत्युन्जय
ऑ?
हम्म..
लेखन अवडले
लेखन अतिशय आवडले.
उपेक्षितांच्या समस्या सा-या
मस्त लिहिले आहे.
सहीच...!!
आजच्या आधुनिक काळात अशीच एक
छान लेख
+१
In reply to छान लेख by पैसा
"स्टोनाक्षी " मार्मिक!
लेख आवडला. भलताच रंजक झालाय.
>>>पूर्वी रामायण, महाभारत
In reply to लेख आवडला. भलताच रंजक झालाय. by रेवती
सर्व प्रतिसादकर्त्यांना
छान लेख.
निषेध
तुम्हाला पैलवान सोनाक्षि
In reply to निषेध by आदिजोशी
एक माणुस म्हणुन शत्रुघ्न रॉकिंग वाटतोय!
चला आता या बाजुने विचार करणे
In reply to एक माणुस म्हणुन शत्रुघ्न रॉकिंग वाटतोय! by अग्निकोल्हा
उगा कशाला विचार करताय,
In reply to चला आता या बाजुने विचार करणे by ५० फक्त
:) :) :)
In reply to उगा कशाला विचार करताय, by प्रचेतस
असो!
In reply to :) :) :) by अग्निकोल्हा
ग्लिफूकाका ती अजुन एक काडी
In reply to असो! by अग्निकोल्हा
ओ.के.
In reply to ग्लिफूकाका ती अजुन एक काडी by मृत्युन्जय
पण तरीही शत्रुघ्न हा
In reply to ओ.के. by अग्निकोल्हा
:)
In reply to पण तरीही शत्रुघ्न हा by ५० फक्त
अहो ग्लिशूकाका पण त्याचे
In reply to ओ.के. by अग्निकोल्हा
मृत्युंजय साहेब ?
In reply to अहो ग्लिशूकाका पण त्याचे by मृत्युन्जय
बोटं मोडण्यात काहिच हशील नाही
In reply to मृत्युंजय साहेब ? by अग्निकोल्हा
शोकांतिका तर नाहीच नाही पण ड्यु क्रेडिट देणेही अनाकलनीय!
In reply to बोटं मोडण्यात काहिच हशील नाही by मृत्युन्जय
अहो रामायणच घडले नसते तर
In reply to शोकांतिका तर नाहीच नाही पण ड्यु क्रेडिट देणेही अनाकलनीय! by अग्निकोल्हा
मला मुद्दाच कळाला नाही.
In reply to अहो रामायणच घडले नसते तर by मृत्युन्जय
कधी कधी नाही. समोरचा माणूस
In reply to मला मुद्दाच कळाला नाही. by अग्निकोल्हा
जर एखाद्या गोष्टीसाठी २
In reply to कधी कधी नाही. समोरचा माणूस by मृत्युन्जय
लक्षात घ्या!
In reply to जर एखाद्या गोष्टीसाठी २ by अग्निकोल्हा
तिन्ही भावंडांनी घालुन
In reply to लक्षात घ्या! by अग्निकोल्हा
=))=))=))
In reply to तिन्ही भावंडांनी घालुन by मृत्युन्जय
तसेच आदर्श शत्रुघ्न युध्द काळात
In reply to =))=))=)) by अग्निकोल्हा
सैन्य घेउन मदतिला का येउ शकला
In reply to तसेच आदर्श शत्रुघ्न युध्द काळात by अग्निकोल्हा
तुमच आमच असं यात काही यात नाही!
In reply to सैन्य घेउन मदतिला का येउ शकला by मृत्युन्जय
अहो तो रावण येऊन रोज तुमच्या
In reply to तुमच आमच असं यात काही यात नाही! by अग्निकोल्हा
अहो पण चुका केल्या म्हणुन
In reply to =))=))=)) by अग्निकोल्हा
सविस्तर प्रतिसाद आधिच इथे
In reply to अहो पण चुका केल्या म्हणुन by मृत्युन्जय
सविस्तर प्रतिसाद तुमच्या
In reply to सविस्तर प्रतिसाद आधिच इथे by अग्निकोल्हा
समजा रामायण घडले नसते व राम
In reply to मृत्युंजय साहेब ? by अग्निकोल्हा