आई
काल रात्री मैत्रिणीबरोबर "आई" या अथांग विषयावर खूप गुज बोलून झाले. सकाळी उठले तेच हुंदका गळ्यात दाटून. या विषयावर एक तर लिहाल तितके कमी आहे शिवाय कविता हा माझा प्रांत नाही. पण जे काही खरडले ते गोड मानून घ्यावे. आशा करते कवितेमागील भावना पोचतील.
संस्कार, त्याग, गर्भाशय,
ऊब, दिलासा, अंगाईगीत,
उन्हात वणवणताना मिळालेली
शीतल सावली व झुळूक
सवयी, व्यक्तीमत्त्वाची जडणघडण
आणि हो प्रार्थनादेखील.
नाळ, रुजलेली पाळंमूळं व
दाटून आलेला हुंदका सुद्धा
या सार्या गोष्टींचा ,
लहान प्रेमळ देव
आणि त्याला जोडलेले हात.
माझं भलं तिला लागो,
तिचं वाईट मला मिळो.
छान कविता !!!
इतकं टोकालाही जायची गरज नाही.
ठिक-ठाक कविता
छान
या सार्या गोष्टींचा ,
छान कविता
तुमच्या भावना दुखवायच्या नाहित
(No subject)
ए आये!
छान
आई...
भा.पो.
सकाळी उठले तेच हुंदका गळ्यात
खुप छान अभिव्यक्ति! अतिशय
आवडेश
शुची, अंतःकरणातून आलेल्या
छान