Skip to main content

आई

लेखक शुचि यांनी शनिवार, 02/02/2013 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री मैत्रिणीबरोबर "आई" या अथांग विषयावर खूप गुज बोलून झाले. सकाळी उठले तेच हुंदका गळ्यात दाटून. या विषयावर एक तर लिहाल तितके कमी आहे शिवाय कविता हा माझा प्रांत नाही. पण जे काही खरडले ते गोड मानून घ्यावे. आशा करते कवितेमागील भावना पोचतील. संस्कार, त्याग, गर्भाशय, ऊब, दिलासा, अंगाईगीत, उन्हात वणवणताना मिळालेली शीतल सावली व झुळूक सवयी, व्यक्तीमत्त्वाची जडणघडण आणि हो प्रार्थनादेखील. नाळ, रुजलेली पाळंमूळं व दाटून आलेला हुंदका सुद्धा या सार्‍या गोष्टींचा , लहान प्रेमळ देव आणि त्याला जोडलेले हात. माझं भलं तिला लागो, तिचं वाईट मला मिळो.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2692
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

आईच्या प्रेमापुढे सारं काही फिकं असतं. पण काही दुर्दैवी जीवांच्या नशिबी अशीही आई येते. जन्मदात्रीच आयुष्याचा नरक बनवते. उभं आयुष्य आपण अशा आईच्या पोटी जन्माला आलो ही एक दुर्दैवी घटना (ट्रॅजिक ईव्हेंट) होती अशी स्वतःचीच समजूत घालून आपलं "सायकॉलॉजीकल मेस" असलेलं आयुष्य सावरताना नकोसं होऊन जातं.

In reply to by धन्या

इतकं टोकालाही जायची गरज नाही. आईसाठी उमाळा आला की नवर्‍याची/बायकोची आई आठवावी म्हणजे झालं. ;-)

वरती वाकडाजीरावांशी सहमत. हल्ली अश्या कविता वाचून भावना डोक्यापर्यंत पोहोचत नाहीत. रोजचा पेपर उघडला की दिड-दोन हजारात तान्ह्या मुलांना विकणार्‍या आया दिसतात, जन्माआधीच विहिरीत फेकणार्‍या आया दिसतात, काही आया अंगावरचं दूधही न सोडलेल्या पोटच्या पोरांना नवर्‍याच्या हवाली करून आधिच्या प्रियकराबरोबर पळून जातात. त्यामुळे वैयक्तीक अनुभवांपर्यंतच ठिक आहे.

या सार्‍या गोष्टींचा , लहान प्रेमळ देव आणि त्याला जोडलेले हात. माझं भलं तिला लागो, तिचं वाईट मला मिळो.
हे फार सुरेख शुचि.

सकाळी उठले तेच हुंदका गळ्यात दाटून. या विषयावर एक तर लिहाल तितके कमी आहे...पण जे काही खरडले ते गोड मानून घ्यावे.
होय! म्हणुनच जे काही खरडले ते गोड मानले आहे... अन्यथा...

मनातलं जे आहे तसं मांडलंय. कवितेचा बांधा आहे का? वृत्त्/मीटर आहे का? वगैरे काही नाही. जे आतून आलंय ते मांडलंय. खरं तर अशा रचना आवडत नाहीत मला. पण ही रचना अपवाद! शेवट तर खूपच छान. धन्यवाद ही कविता इथे दिल्याबद्दल.

इतक्या सर्वांची काळजी घेणं एकट्या देवाला शक्य होत नाही म्हणून त्याने 'आई' निर्माण केली. पण दुर्दैवाने तशी 'आई' हल्ली दुर्मिळ होत चालल्याचे जाणवते आहे.

सकाळी उठले तेच हुंदका गळ्यात दाटून. या विषयावर एक तर लिहाल तितके कमी आहे...पण जे काही खरडले ते गोड मानून घ्यावे. हे वाचताना मलाही हुंदका अनावर झाला ग... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी..!!!!!!!!!!!!!

शुची, अंतःकरणातून आलेल्या उमाळ्यातूनच खर काव्य प्रसवतं असं मला वाटतं. त्यामुळे तुमची कविता/काव्य सुंदरच आहे.