✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हिंसा आणि अहिंसा...

श
श्रावण मोडक यांनी
Sat, 02/02/2013 - 19:46  ·  लेख
लेख
मोहनदास करमचंद गांधी यांच्यासंदर्भात दोन-तीन धागे गेल्या काही दिवसांत मिपावर चर्चेत आले आहेत. काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. धाग्यांवरील चर्चेत काही जण गांधी यांच्या अहिंसावादाचे समर्थक आहेत. बाकी काही जण त्याचे विरोधक आहेत. ते असो. जे अहिंसेचे विरोधक आहेत, त्यांच्या मांडणीतून काही गोष्टी मला जाणवल्या (हे माझे आकलन, समज वगैरे आहे): १. गांधींनी मांडलेली अहिंसा ही एक प्रकारे कमजोरीच असते, तो भ्याडपणा असतो. २. गांधींची हत्या समर्थनीय ठरू शकते, कारण नथुराम गोडसे यांची (यांची, याची नव्हे) तशी राष्ट्रविषयक, मातृभूमीविषयक धारणा होती. ३. हिंसेला उत्तर अहिंसा हे असू शकत नाही, तिथे हिंसा करावीच लागते. गांधींच्या अहिंसेविषयीचे ज्याचे-त्याचे आकलन, समज वगैरे काहीही असो. माझ्या आकलनात आणि समजेनुसार काही प्रश्न निर्माण झालेच. भारतात एक राजकीय पक्ष आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) असे त्याचे नाव आहे. या पक्षावर बंदी आहे. पण त्या पक्षाचे 'कार्य' सुरू असते. या पक्षाने हिंसेचे तत्वज्ञान केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार राज्यसंस्था हिंसा करतेच, 'आहे रे' वर्ग हिंसा करत असतोच. त्याला प्रत्युत्तर हिंसेचेच असू शकते, म्हणून आमच्या (तथाकथित) हिंसेकडे त्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. आता मला असे दिसते आहे की, गांधींचा मारेकरी आणि त्याच्या बाजूने होत असलेले तत्वज्ञान हे 'हिंसा हा सामाजिक परिवर्तनाचा (यात सारे काही आले) एक मार्ग (किंवा साधन म्हणा) आहे' अशाच स्वरूपाचा आहे. माझ्यासमोरचे प्रश्न आहेत: नथुरामवादी व माओवादी या दोघांना एक मानायचे का? नथुरामवादी व माओवादी समधर्मी नसतील तर त्यांच्यातील फरक कशाच्या आधारे करावयाचा? मला फक्त या साम्यस्थळांचा किंवा त्यांच्यातील भेदाचा विचारविमर्ष अपेक्षीत आहे आणि तो करताना हिंसा हा मुद्दा यावा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19801 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

>>नथुरामवादी व माओवादी या

अमोल खरे
Sat, 02/02/2013 - 20:06 नवीन
>>नथुरामवादी व माओवादी या दोघांना एक मानायचे का? नथुरामवादी व माओवादी समधर्मी नसतील तर त्यांच्यातील फरक कशाच्या आधारे करावयाचा? सगळ्यात आधी हे स्पष्ट करतो की तुमचा ह्या विषयातील अभ्यास खुप आहे हे मला पुर्ण माहिती आहे. पण तरीही एकच सांगतो की माओवादी सगळ्या पोलिसांना, निमलष्करी दलातील लोकांना मारत सुटले आहेत. नथुरामने एकाच माणसाला मारलं. त्याबद्दल त्याला फाशीची शिक्षा पण झाली. नथुराम मी भारतातील सत्ता उलथुन टाकतो वगैरे म्हणाला असं मलातरी माहित नाही. तुम्हाला नक्षलवाद्यांविषयी सहानुभुती असेल तर ते तुमच्या पुरते मर्यादित ठेवा. काहिच्या काही वैचारिक मुद्दे उपस्थित करुन दिशाभुल करु नका. जो जो माणुस ह्या देशाला आव्हान देतो त्याला ठार मारायलाच हवे. मग ते गडचिरोलीतील नक्षलवादी असतील किंवा काश्मिरमधील दहशतवादी. मुळात आपण नक्षलवाद्यांना दहशतवादी का म्हणत नाही हा मला खुप काळापासुन पडलेला प्रश्न आहे. त्या नक्षलवाद्यांवर अन्याय झालाही असेल पण त्यांनी निवडणुक लढवावी व आपापल्या एरियात सुधारणा कराव्यात. कोणी अडवलाय ? म्हणजे एकीकडे अण्णा हजारेंना निवडणुक लढवा म्हणुन सुनवायचे पण दुसरीकडे नक्षलवाद्यांबद्दल सॉफ्ट कॉर्नर बाळगायचा असा दुटप्पी प्रकार आहे. ज्या प्रकारे नथुरामला किंवा ईंदिरा गांधींच्या मारेकरयांना फाशी दिली गेली तशीच राजीव गांधींच्या खुन्यांना पण द्यायला हवी होती. ती लोकं, अफजल गुरु, पंजाबमध्ये तो एक दहशतवादी (बियांत सिंग खुनातील आरोपी) ह्या सगळ्यांना टॉप प्रायॉरोटीवर फाशी द्यायला हवी होती. केवळ वोट बँक पॉलिटिक्स मुळे आपली लोकं ह्यांना मारत नाहीत आणि आपण बॉम्बस्फोट झाले की हळहळतो. हे थांबायलाच हवे. पण त्याची सुरुवात आपण हा वैचारिक गोंधळ थांबवुन केला तर बरे.
  • Log in or register to post comments

तुम्हाला नक्षलवाद्यांविषयी

आळश्यांचा राजा
Sun, 02/03/2013 - 13:24 नवीन
तुम्हाला नक्षलवाद्यांविषयी सहानुभुती असेल तर ते तुमच्या पुरते मर्यादित ठेवा. काहिच्या काही वैचारिक मुद्दे उपस्थित करुन दिशाभुल करु नका.
नक्षलवाद्यांविषयी सहानुभूती असल्याचे या लेखात मला काही दिसलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

मुळात नक्षलवाद्यांविषयी असा

अमोल खरे
Sun, 02/03/2013 - 15:39 नवीन
मुळात नक्षलवाद्यांविषयी असा वैचारिक गोंधळ उडणेच चुकीचे आहे. हा लेख काढावासाच का वाटला ? श्रामोंची ह्या आधीची अनेक मते त्या नक्षलवाद्यांना सहानुभुती दाखवणारी होती असं माझं फिलिंग आहे. मी चुकीचा असल्यास सर्वात जास्त आनंद मलाच होईल. पोलिसांना मारुन त्यांच्या पोटात पाकिस्तानी बनावटीचा बॉम्ब लपवणारे हे नक्षलवादी आहेत, त्यांच्याबद्दल सहानुभुती असलीच तर ती पुर्ण चुकीची आहे असं मी म्हणेन. आज हे नक्षलवादी गडचिरोली मध्ये आहेत, उद्या मुंबईत येऊन धुमाकुळ घालायला लागले तर आपण काय करणार आहोत ? ह्य सर्व नक्षलवाद्यांवर हवाईहल्ले करुन त्यांना संपवले पाहिजे ह्या मताचा मी आहे. ह्यात अनेक इनोसन्ट लोकंही मरु शकतात, (बहुदा हवाईदलाने ह्याच कारणांकरिता ह्या पर्यायास विरोध केला होता) पण जर ती गावातील लोकं ह्या नक्षलवाद्यांना पाठिंबा देत आहेत तर त्यांनी ही मरायलाच हवे. लोकल सपोर्ट शिवाय नक्षलवाद पसरु शकत नाही. जेव्हा पंजाब मध्ये लोकांना त्यांची चुक कळुन त्यांनी दहशतवादाला सपोर्ट देणे बंद केलं तेव्हा तेथील दहशतवाद आटोक्यात आला. तसंच नक्षलवाद्यांचा प्रश्नही बळानेच सोडवायला हवा. गोडगोड बोलुन त्यांचे मन वळवायचे प्रयत्न सरकारने आत्तापर्यंत केलेच असतील. आता सरकारने फायनल स्टेप घेऊन नक्षलवाद्यांना संपवायलाच हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

ह्य सर्व नक्षलवाद्यांवर

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 02/04/2013 - 00:59 नवीन
ह्य सर्व नक्षलवाद्यांवर हवाईहल्ले करुन त्यांना संपवले पाहिजे ह्या मताचा मी आहे. ह्यात अनेक इनोसन्ट लोकंही मरु शकतात
शांत गदाधारी भीम, शांत..... करूया हां हल्ला आणि मारुया सगळ्यांना.... बाकी, त्या इनोसन्ट लोकांत आपल्या ओळखीचे कुणी नसेल तर आपल्या बापाचे काय जाते ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

नक्की कुठले?

विकास
Sat, 02/02/2013 - 20:55 नवीन
आता मला असे दिसते आहे की, गांधींचा मारेकरी आणि त्याच्या बाजूने होत असलेले तत्वज्ञान हे 'हिंसा हा सामाजिक परिवर्तनाचा (यात सारे काही आले) एक मार्ग (किंवा साधन म्हणा) आहे' अशाच स्वरूपाचा आहे. नक्की कुठले तत्वज्ञान?
  • Log in or register to post comments

प्रतिसाद....

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 02/02/2013 - 22:16 नवीन
हिंसेला उत्तर अहिंसा हे असू शकत नाही, तिथे हिंसा करावीच लागते.
पण हिंसा किती प्रमाणात करायची ह्यालाही काही मर्यादा आहेत. जशास तसं आणि दुप्पट उत्तर द्यावं असं माझं मत आहे. आपण कोणालाही स्वतः त्रास द्यायला जाऊ नये आणि कोणि आपल्याला त्रास देत असेल त्याला सुखानी जगु देऊ नये, हाच खरा न्याय. अन्याय सहन करणारा, अन्याय करणार्‍याच्या जोडीनी जबाबदार असतो. आरे ला का रे उत्तर दिल्याशिवाय ह्या जगात काहीही होऊ शकत नाही एवढं खरं.
  • Log in or register to post comments

२. गांधींची हत्या समर्थनीय

अग्निकोल्हा
Sat, 02/02/2013 - 22:24 नवीन
२. गांधींची हत्या समर्थनीय ठरू शकते, कारण नथुराम गोडसे यांची (यांची, याची नव्हे) तशी राष्ट्रविषयक, मातृभूमीविषयक धारणा होती.
फक्त धारणेचाच विचार करायचा असेल तर जिहादही समर्थनीय होऊ शकतो पण... सुज्ञास जास्त सांगणे न लगे! भारतात माओवाद हा विवीध पातळ्यांवरुन कमकुवत गटाचे संघटीतपणे व सातत्याने शोषण होत असल्यानेच फोफावला. म्हणून त्यांचा मार्ग चुकिचा असला तरी सर्व बाजुनी झालेली कोंडी समजु शकते, कारण अहिंसेचा मार्ग यशस्वी होण्यासाठी लागणारी व्यापकता ही प्रमुख गरज समाजाने ह्या आपल्याच पिडीत बांधवांना नाकारली आहे. मेणबत्ति संप्रदाय नक्षलवाद्यांच्या न्याय मागण्यांसाठी देशव्यापी अहिंसक आंदोलन करेल काय / केलेय काय ? म्हणुनच त्यांचा मार्ग चुकिचा असला तरी त्यांची सर्व बाजुनी झालेली कोंडी समजु शकते. मणिरत्नमने जेव्हा त्याने बनवलेल्या "रावण" या चित्रपटातुन सोन्यांची लंका बाळगणारा सर्व देवांना बंदिवान बनवणारा सुपर बलवान रावण प्रतिकात्मक रुपाद्वारे जेव्हां नक्षलवादी, आगतिक, दुखांने पिचलेला अन्याय झालेला दाखवला व रामाला प्रतिकात्मक रुपाद्वारे अन्यायखोर व एकतर्फी दाखवले तेव्हां त्याच्या नालायकपणाचा अतिशय संताप आला. सर्वात महत्वाचं म्हणजे माओवाद हा व्यक्तिसापेक्ष व संकुचित नाही. तो एकाच व्यक्तिला कधीच शत्रु मानत नाही.
  • Log in or register to post comments

श्रामो, अहिंसा हे अत्यंत वेगळं डायमेंशन आहे

संजय क्षीरसागर
Sun, 02/03/2013 - 01:04 नवीन
ते व्यक्तिगत जगण्यासाठी महावीरानं सांगितलेलं परम सूत्र आहे. गांधीजी किंवा नक्षलवादाशी त्याचा काहीएक संबंध नाही. महावीरानं जगण्यासाठी पंचशील (पाच तत्व) सांगितली (अहिंसा,सत्य,अपरिग्रह, अस्तेय आणि ब्रह्मचर्य). त्यावर शिष्यांनी त्याला : ती अंतर्विरोधी किंवा गोंधळात टाकणारी आहेत, तुम्ही एकच सर्वसमावेशक सूत्र सांगा असं म्हटलं. यावर महावीर म्हणाला : `अहिंसा परमोधर्मः' हे एकच सूत्र अवलंबून तुम्ही सगळं आयुष्य सुखाचं करू शकता! अहिंसेचा अर्थ : स्वतःला दुखवू नका! हे अत्यंतिक सूत्र आहे. वरवर दिसायला सोपं (किंवा चूक देखील) वाटेल पण इट इज अल्टीमेट! आचरणात आणायंच तर हरघडी विस्मरण होईल असंये. पण आहे एकदम डेलीकेट! महावीराच्या सांगण्यामागे एक अनादी सत्य आहे : ते म्हणजे जाणीव एक आहे. ती गांधीजींची असो, नथुरामची असो की नक्षलवाद्याची असो. ज्यावेळी तुम्ही दुसर्‍याला दुखावता त्यावेळी स्वतःही दुखावले जाता. तो व्यक्तिगत संवेदनाशिलतेचा भाग आहे. ज्याचा तो अनुभव होईल त्यालाच सूत्राची सार्थकता लक्षात येईल. तो हिंसा विरूध्द अहिंसा (किंवा द अदर वे) असा विषय नाही. इट इज अ सिंगल डायमेंशन. इथे कितीही चर्चा केली तरी अहिंसेला परमोधर्मः का म्हटलंय ते लक्षात येणार नाही आणि एकदा लक्षात आलं की चर्चेचा प्रश्न उरणार नाही.
  • Log in or register to post comments

सुंदर!

बाळकराम
Sun, 02/03/2013 - 02:23 नवीन
अहिंसेचा हा अर्थ माहित नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अहिंसा म्हणजे `हाऊ टू रिस्पाँड किंवा नॉट टू रिस्पाँड' नाही

संजय क्षीरसागर
Sun, 02/03/2013 - 10:54 नवीन
ते जगण्याचं `व्यक्तिगत सूत्र' आहे हा बेसिक मुद्दा लक्षात आल्याशिवाय कितीही चर्चा केली तरी काहीही निष्पन्न होणार नाही. एक थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करा इतकं ते ढोबळ सूत्र नाही. इट मीन्स, जस्ट रिमेन अनाफेक्टेड अँड नाऊ अ‍ॅक्ट फ्रॉम दॅट स्टेट. उत्तर द्या पण देतांना स्वतःपासनं दुरावू नका. मजा अशीये की अहिंसा ज्याला कळली तो दुखावला जात नाही आणि दुखावला जात नाही म्हणून त्याच्या हातून हिंसा घडत नाही! ते परम स्वातंत्र्य आहे. तो हरक्षणी उपलब्ध असलेला विकल्प आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

एकदम भारी संजय साहेब. लगे रहो

अधिराज
Sun, 02/03/2013 - 12:18 नवीन
एकदम भारी संजय साहेब. लगे रहो. पर्तिसाद आन् तुमचं इचार आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

लगे रहो : चर्चा काय वळण घेतेय त्यावर सगळं अवलंबून आहे!

संजय क्षीरसागर
Sun, 02/03/2013 - 13:40 नवीन
राजकारण आणि इतिहाससंशोधन माझ्या नावडीचे विषय आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

स्वसंरक्षणासाठी केलेली हिंसा हि समर्थनीय....

हिटलर
Sun, 02/03/2013 - 07:34 नवीन
जास्तीत जास्त हिंसा टाळण्यासाठी कमीत कमी हिंसा करावी लागली तर ते गैर नसावं. पाकिस्तानातील हिंदुंवर मुसलमानांकडून अत्याचार होत होते म्हणून ते पाकिस्तान सोडून भारतात परतले. यावर गांधींचा उपदेश असा होता कि तुम्ही कशाला आलात इकडे? परत जा पाकिस्तानात आणि मुसलमानांनी तुमच्यावर शास्त्र उगारली तरीही तुम्ही त्याचा प्रतिकार करू नका. ती हिंसा ठरेल. परत जाताना पोलिस किंवा सैन्याची देखील मदत घेऊ नका कारण जर कोणी आक्रमण करायला आलं तर ते मुसलमान बंधूंवर गोळ्या झाड्तील. हिंसा वाढेल. याला गांधीवादी काय म्हणतील अहिंसा कि षंढपणा ?
  • Log in or register to post comments

नाही रे, आहे रे.

राही
Sun, 02/03/2013 - 08:52 नवीन
'नाही रे' वर्गाचे 'आहे रे'मध्ये रूपांतर करण्यासाठी माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग अनुसरला आहे असे समजून पुढे असे म्हणता येईल की जर राज्यसत्ता आणि आहे रे वर्ग हे हिंसा करीतच असतात हे सार्वकालिक असेल तर नाही रे चे आहे रे झाल्यावर निर्माण झालेला 'नव आहे रे'वर्गसुद्धा हिंसा करेलच. किंवा मग हिंसेला जीवनातून हद्दपार करता येणारच नाही हे तत्त्व मानावे लागेल. हिंसा ही आहेच,असणारच,गरिबी,विषमतानिर्मूलन हे केवळ टप्पे किंवा थांबे आहेत,ते गाठले तरीही हिंसेची आवश्यकता असणारच असे काहीसे तत्त्वज्ञान यातून पुढे येते. अर्थात सर्वंकषपणे गरिबी अथवा विषमतानिर्मूलन कधीच होत नसते असे आर्ग्यूमेंट करता येईल, हे खरे. नि:शेष भागाकार होणारच नाही,हिंसेची आवश्यकता असलेले शेष काहीतरी सदैव उरतच रहाणार असा तर्क अनुत्तरित करणारा आहे.
  • Log in or register to post comments

थोडीशी भर

राही
Sun, 02/03/2013 - 09:14 नवीन
हिंसा हे साधन न मानता गाइडलाइन किंवा मार्गदर्शक तत्त्व मानले की मग या तत्त्वाचे तत्त्वज्ञान बनवता येते.या तत्त्वज्ञानाचा प्रतिवाद गीतेतल्या निष्कामकर्मयोगाने करता येऊ शकेल. हिंसा ही कधीच जिंकत नसते,क्रांती कधीच चिरस्थायी नसते,ती आपल्या पिलांना खाते,उत्क्रांती हीच टिकाऊ परिवर्तन घडवते वगैरे क्लीशे पुन्हा पुन्हा उगाळण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

वाचतो आहे

श्रावण मोडक
Sun, 02/03/2013 - 09:24 नवीन
प्रतिसाद वाचतो आहे. विचार करतो आहे.
  • Log in or register to post comments

प्रश्न

नितिन थत्ते
Sun, 02/03/2013 - 09:43 नवीन
आता माओवादी, सशस्त्र स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदुत्ववादी यांचे एकत्रीकरण झाल्याच्या निमित्ताने एक वेगळाच प्रश्न पुढे आला. हुतात्मा भगतसिंग यांना परकीय इंग्रजांपासून भारत मुक्त करून एतद्देशीयांचे राज्य आणायचे होते की भांडवलदार इंग्रजांपासून भारत मुक्त करून कामगारांचे* राज्य आणायचे होते? *कम्युनिस्ट लोक देशनिष्ठा वगैरे मानत नसल्याने जगातले सर्व कामगार एकच आहेत असे समजतात. म्हणून (भगतसिंग कम्युनिस्ट असल्याने) भारतीय कामगारांचे असा शब्दप्रयोग केलेला नाही. भारतीय कामगारांचे राज्य आले काय आणि रशियन किंवा इतर कामगारांचे राज्य आले काय; दोन्ही एकच.....
  • Log in or register to post comments

?

अन्या दातार
Sun, 02/03/2013 - 12:11 नवीन
भगतसिंग कम्युनिस्ट होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

म्हणू शकतो.

आळश्यांचा राजा
Sun, 02/03/2013 - 13:30 नवीन
भगतसिंग कम्युनिस्ट होते असे बरेचजण मानतात. सोशॅलिस्ट म्हणा हवे तर. कम्युनिस्ट असण्याची व्याख्या भलतीच लवचिक आहे. चीनमधला कम्युनिझम आणि रशियातला कम्युनिझम यात बरेच अंतर आहे. पण "जगातल्या" कामगारांना एकत्र करुन लढा देण्यावर भगतसिंगांचा विश्वास असेलसे वाटत नाही. लाला लजपतराय यांच्यासारख्या "नॅशनॅलिस्ट" नेत्याचे ते चेले होते. विवेकानंद एका ठिकाणी म्हणाले आहेत - (संदर्भ देता येत नाही) - कॅपिटॅलिझम आणि कम्युनिझम मध्ये निवड करायचीच झाली तर मी कम्युनिझम निवडीन. गांधीजी लंडनला गोलमेज परिषदेला गेले असताना आवर्जून तिथल्या कामगार वस्तीमध्ये जाऊन आले होते. खूप शेड्स आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

बरोबर

विकास
Sun, 02/03/2013 - 19:44 नवीन
भगतसिंग हे कम्युनिस्ट होते असे म्हणणे योग्य आहे. त्याच्या (आझादांपासूनच्या) संघटनेचे नाव हिंदूस्तान सोशॅलीस्ट रीपब्लीक आर्मी असे होते. तो शेवटच्या काळात पूर्णपणे निरीश्वरवादी पण झाला होता. पण इतर श्रद्दावानांच्या तो विरोधात नव्हता. तसेच त्याला हवा असलेला कम्युनिझम हा आत्ताचा (अथवा आपल्याकडील कॉमी विचारवंतांचा अथवा माओवादी) नव्हता असे त्याचे वाचताना, विशेष करून त्याचे शेवटच्या तीन दिवसातील लेखन वाचताना लक्षात येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

होय

विसुनाना
Sun, 02/03/2013 - 13:33 नवीन
भगतसिंग कम्युनिस्ट होते. पण त्यावेळी व्यक्तींचे देशप्रेम त्याच्या पक्षावरून/जातीवरून/धर्मावरून/विचारसरणीवरून जोखले जात नसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

चुकीचे अथवा खोडसाळ

विकास
Mon, 02/04/2013 - 03:41 नवीन
आता माओवादी, सशस्त्र स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदुत्ववादी यांचे एकत्रीकरण झाल्याच्या निमित्ताने एक वेगळाच प्रश्न पुढे आला. हे विधान चुकीचे वाटते. श्रामोंनी चर्चाप्रस्तावात माओवादी आणि नथुरामवादी यांचे एकत्रिकरण केले आहे. सशस्त्र स्वातंत्र्यसैनिक अथवा हिंदूत्ववादी हे नथुरामवादी होते हे म्हणणे किमान चुकीचे आणि कमाल खोडसाळपणाचे आहे. ---- सशस्त्र स्वातंत्र्यसैनिकांच्या लेखी त्यांनी ब्रिटीश सत्ता म्हणजे ब्रिटन विरुद्ध भारत असे युद्धच मानले होते आणि त्यामुळे जे काही युद्धात शत्रूविरोधात (everthing is fair)करायचे असते ते त्यांची करायची धारणा होती. हिंदूत्ववाद हा सावरकरांनी मांडलेला भारताच्या संदर्भातील राष्ट्रसिद्धांत आहे. त्यात कुठेही हिंसेचा विचार / संदर्भ नाही अथवा समर्थन नाही. माओवाद हा एकूणच देशांतर्गतच काय समाजांतर्गत देखील हिंसेचे समर्थन करतो आणि आमलात देखील आणतो. त्या अर्थाने ती एक हिंसक विचारसरणी आहे आणि म्हणूनच कम्युनिझमच्या उदयाच्या काळात ती काही अंशी समर्थनीय वाटली असली तरी नंतर त्यातील फोलपणा देखील समजला आणि जिथे त्या विचारसरणीचा उदय झाला तेथे ती अस्तास देखील गेली... नथुरामवाद हा शब्द अंमळ नवीन वाटला (आधी ऐकलेला नव्हता). नथुरामने केलेल्या दुष्कृत्याचे त्याने स्वतः जे काही बचाव म्हणून नाही पण "justicfication" या अर्थाने समर्थन केले त्याला नथुरामवाद म्हणता येईल. अर्थातच ज्यांना अजूनही नथुरामचे कृत्य (अगदी त्यातील गुन्हा, फाशीच होणे योग्य वगैरे म्हणत पण) योग्य वाटते त्यांना नथुरामवादी म्हणता येईल. पण अशा नथुरामवाद्यांचा देखील नथुरामवाद देखील (माझ्या लेखी चुकीचास असला तरी) गांधीहत्येच्या संदर्भात म्हणजे इतिहासातील एका घटनेसंदर्भातच मर्यादीत आहे. त्याचा वर्तमानातील कृतीशी काही संबंध नाही. जे माओवादाबाबत म्हणता येत नाही. -------------- नथुराम हिंदूत्ववादी होता असे म्हणत गांधीहत्येचा संपूर्ण दोष हिंदूत्ववादावर देणे म्हणजे गांधीहत्येनंतरच्या दंगलींचा दोष हा गांधीवादावर आणि इंदीरागांधी हत्येनंतरच्या दंगलींचा दोष काँग्रेसपक्षाकडे देण्यासारखे होईल. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अहिंसा - इट इज नॉट अ विल टू

खटासि खट
Sun, 02/03/2013 - 11:05 नवीन
अहिंसा - इट इज नॉट अ विल टू किल, इट इज नीड टू किल ( कुणी म्हटलंय ? बहुतेक बुद्ध )
  • Log in or register to post comments

पण काही गटांना...

गब्रिएल
Sun, 02/03/2013 - 12:32 नवीन
पण काही गटांना आपल्या विचारांबरोबर संमत नाहीत अश्या सगळ्यानाच मारण्याची गरज आहे (नीड टू किल) असं वाटतं त्याचं काय? ते पण अहिंसकच काय ?.... अतिमाननीय दिग्विजय सिंह यांनी हे वचन ऐकलेलं दिसत नाही.... नाहीतर आतापर्यंत "आपला सत्ताधारी पक्षही अश्या लोकांची मनधरणी करत असतो, तेही याच अहिंसावादी तत्वात बसते म्हणूनच" हे ऐकायला / वाचायला मिळाले असते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

अहिंसा : इट इज नॉट अ विल टू किल, इट इज नीड टू किल - बुद्ध?

संजय क्षीरसागर
Sun, 02/03/2013 - 13:36 नवीन
इंपॉसिबल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

<<अहिंसा - इट इज नॉट अ विल टू किल, इट इज नीड टू किल >>

बाळकराम
Sun, 02/03/2013 - 15:38 नवीन
कुणी म्हटलंय ? बहुतेक बुद्ध ) - बुद्धाला इंग्लिश येत होतं? (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

बुद्धाला इंग्लिश येत होतं ?

खटासि खट
Mon, 02/04/2013 - 08:26 नवीन
बुद्धाला इंग्लिश येत होतं ? ज्याने इंलिशमधे अनुवाद केला त्याला पाली यायला काही अडचण ? ;) मॅक्स्म्युल्लरचं उदाहरण हाये कि राव ! बुद्धाने अपरिहार्य परिस्थितीत हिंसेला किंवा अभक्षभक्षणाला विरोध केलेला नाही. फक्त ती हिसा ही स्वतःच्या फायद्यासाठी केलेली नाही याची खात्री हिंसा करणा-याला असायला हवी. अभक्षभक्षणाला विरोध हा भिक्खूसंघासाठी कडक होता, पण सर्वसामान्यांसाठी त्याचा फक्त आग्रह होता. सक्ती करू नये असं म्हटलंय. महायान आणि हीनयान या पंथांनी आपापले अर्थ लावले असल्याने आणि एक पंथ कट्टर असल्याने गैरसमज असावेत. (खटाचं डोकं अशा बाबतीत फारसं चालत नसल्याने जे काही अल्पबुद्धीने लिहीलं ते बरोबरच असेल असं काही नाही. मिपावरची प्रगल्भ चर्चा वाचणे हाच खटाचा आनंद असतो. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

चुकीची तुलना

विसुनाना
Sun, 02/03/2013 - 13:19 नवीन
श्रामो मी काय म्हणतो आहे त्याकडे तुम्ही नीट लक्ष द्यालच! नाहीतर माझा आशीस नंदी व्हायचा.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद अर्धवटच राहिला

विसुनाना
Sun, 02/03/2013 - 13:27 नवीन
तर- ही तुलना चुकीची आहे. कारण उजव्या गटाकडून (पक्षी हिंदू बाजूकडून होणारी) हिंसा ही एका न्यूनगंडातून येते आणि ती त्या बाजूचीच अपरिमित आणि अपरिवर्तनीय हानी करते. या उलट माओवादी आणि जिहादी हिंसा ही हक्काच्या म्हणजे अहंगंडी जाणीवेतून येते आणि तिने अल्पकालीन का होईना पण त्यात्या बाजूंचा फायदा करून दिलेला दिसतो. बाकी, हिंसा गैर की नाही त्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल. त्यावर माझे मत हे की सर्वच हिंसा गैर नसते. त्याकारणे देण्याचे हे ठिकाण नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

नाही

श्रावण मोडक
Sun, 02/03/2013 - 13:29 नवीन
तुमचा आशीष नंदी करायला मी 'तो' नाही! :-) तुलना चुकीची का होतेय ते लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

छ्या!

विसुनाना
Sun, 02/03/2013 - 13:37 नवीन
या क्रोमवरून टायपायला फारच त्रास होतोय. तसे बरेच लिहावेसे वाटले. पण नंतर लिहितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ऑफेन्स आणि डिफेन्स

आळश्यांचा राजा
Sun, 02/03/2013 - 13:49 नवीन
हिंसा आणि अहिंसा यांना आध्यात्मिक धारणेतून पाहू गेल्यास त्याचा व्यवहाराशी मेळ घालणे कठीण वाटते. परंतु माझ्या मते आक्रमण - स्वतःचा कोणतातरी लाभ होण्यासाठी - करणे आणि त्यातून जन्मलेली हिंसा ही गैर होय. आणि बचावासाठी हिंसा करावी लागली तर त्याला अहिंसाच म्हणायला हवे. भारतीय सैन्याला इंग्रजीत "डिफेन्स" फोर्स - "रक्षा" दल असे त्यासाठीच म्हणतात. साप आपल्या घरात आला, आणि त्याला पकडताही येत नाही; तो विषारीही आहे, आणि त्याला मारल्याशिवाय पर्यायही नाही अशा परिस्थितीत निरुपायाने जर मारावा लागला तर माझ्या मते ती हिंसा नाही. पण त्याचे बिळ शोधून काढून त्याला मारणे ही हिंसा. आता तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे -
नथुरामवादी व माओवादी या दोघांना एक मानायचे का? नथुरामवादी व माओवादी समधर्मी नसतील तर त्यांच्यातील फरक कशाच्या आधारे करावयाचा? मला फक्त या साम्यस्थळांचा किंवा त्यांच्यातील भेदाचा विचारविमर्ष अपेक्षीत आहे आणि तो करताना हिंसा हा मुद्दा यावा.
"नथुरामवाद" नावाच्या तत्वज्ञानाविषयी काही कल्पना नाही. परंतु एका भ्याड खुनाला तत्वज्ञानाचा मुलामा कुणी देत असेल तर तो केविलवाणा प्रकार आहे. या खुनाला काहीच आगापिछा नाही. त्याआधी कसला नथुरामवाद नव्हता, आणि त्यानंतरही त्या "वादा"ला धरुन कसली चळवळ/ क्रांती वगैरे झालेली नाही. माओवाद नावाचा प्रकार ही एक आज अस्तित्वात असलेली एक चळवळ आहे. त्याला आधार म्हणून एकेकाळी चीनमध्ये लौकिक यश मिळवलेल्या माओप्रणीत चळवळीच्या विचारांचा आधार घेतला जातो. नथुराम नावाच्या एका माणसाने केलेल्या एका खुनाची तुलना एका चळवळीशी होऊ शकत नाही. नथुराम किंवा त्याच्या कृत्याशी सहानुभूती बाळगणार्‍यांच्या मते त्या खुनाला काही वैचारिक पाया वगैरे असला तरी त्या वैचरिक पायाचे कसलेही लॉजिकल एक्स्टेन्शन कुठेही झालेले दिसत नाही. (लॉजिकल एक्स्टेन्शन म्हणजे त्या कृत्यापासून "प्रेरणा" घेऊन एखाद्या क्रांतिकारी चळवळीचा आरंभ/ एखाद्या राजकीय पक्षाची स्थापना इत्यादि आणि त्याद्वारा त्या विचारांचा प्रसार, आणि उद्दिष्ट्ये (उदा. अखंड भारत, सिंधु नदीमध्ये अस्थीविसर्जन, पाकिस्तानचा नायनाट इत्यादि) साध्य करण्यासाठीचे प्रयत्न.)
  • Log in or register to post comments

मांडणी नक्की काय आहे?

विसुनाना
Sun, 02/03/2013 - 15:23 नवीन
विषयाची फोड करताना प्रस्तावक श्री. श्रावण मोडक यांनी त्यांना होत असलेले विविध गटांच्या हिंसेच्या समर्थनाचे आकलन मांडलेले आहे आणि या आकलनानुसार (स्पष्टच सांगायचे तर ;) ) जिहादी दहशतवाद, प्रतिजिहादी दहशतवाद, माओवादी दहशतवाद अथवा रणवीरसेना दहशतवाद इ.इ. हे सारेच समान या न्यायाने गर्हणीय आहेत. त्यांच्यामागे असलेली वैचारीक पार्श्वभूमी कोणतीही असो, हिंसेचे समर्थन करता कामा नये असा एक दृष्टीकोन यामागे असू शकतो. त्याबरोबरच 'आमचे ते क्रांतीकारी, तुमचे ते दहशतवादी' हा दृष्टीकोनही असू नये,यात स्थल-काल-पार्श्वभूमी यांनाही कोणतेही स्थान नसावे असेही श्री. श्रावण मोडक यांना म्हणायचे असावे..असे माझे आकलन आहे. असे त्यांना म्हणायचे आहे काय? आणि नसेल तर नक्की काय म्हणायचे आहे? कृपया स्पष्ट व्हावे म्हणजे त्यानुसार चर्चेत भाग घेता येईल. ;)
  • Log in or register to post comments

+

नितिन थत्ते
Sun, 02/03/2013 - 15:55 नवीन
मलाही असेच वाटले. एरवी हिंसेचे समर्थन करणारे (सत्याग्रहाने, अहिंसेने, अर्जविनंत्यांनी, मतपरिवर्तनाने काही साध्य होत नाही असे म्हणणारे) केवळ "माओ"वादी असा शब्द आहे म्हणून विरोध करतात की काय असा मुद्दा श्रामोंनी मांडला आहे. श्रामो खुलासा करतीलच. बाकी हिंसेची आवश्यकता गांधींनीही मांडलेली होतीच. अहिंसेचे खरे स्वरूप या विषयी गांधींनी पुढीलप्रमाणे लिहिले आहे. Even manslaughter may be necessary in certain cases. Suppose a man runs amuck and goes furiously about, sword in hand and killing anyone that comes his way and no one dares to capture him alive. Anyone who despatches this lunatic will earn the gratitude of the community and be regarded as benevolent man. From the point of Ahimsa, it is plain duty of everyone to kill such man. He who refrains from killing a murderer who is about to kill his ward (when he cannot prevent him otherwise) earns no merit but commits a sin, he practices no ahimsa but himsa out of of a fatuous sense of ahimsa. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

'आमचे ते क्रांतीकारी, तुमचे ते दहशतवादी'

संजय क्षीरसागर
Sun, 02/03/2013 - 15:45 नवीन
हा एकमेव मुद्दा आहे! आणि त्यामुळे या विषयावर कितीही चर्चा केली तरी काहीही उपयोग होणार नाही.
  • Log in or register to post comments

निराशा+पलायनवाद आहे हा. अशा

बॅटमॅन
Sun, 02/03/2013 - 17:19 नवीन
निराशा+पलायनवाद आहे हा. अशा विचारसरणीचा उपयोग कधीच होत नसतो. मुख्य म्हणजे जनरल थिअरी न बनवता समोरचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा यावर फोकस केले पाहिजे. हिंसा-अहिंसेच्या थिअरीज प्रसंगवशात बनवता येईल. ढीगभर आधीच आहेत. त्यांची व्यवहार्यता तपासून पाहिली पाहिजे. नुस्त्या ग्रँड थिअरीज बनवण्यात काय अर्थ आहे? भारतीय टीमचा अ‍ॅव्हरेज कागदावर जगातभारी असला तरी मैदानावर ते लोक मैदानावर कसे ढेपाळतात हे पाहिलेच आहे. त्यामुळे नुस्ते उपयोग होणार नाही म्हणून हस्तिदंती मनोर्‍यात जाऊन न बसता व्यवहार्य तोडग्यावर फोकस केले पाहिजे , इतकेच म्हण्णे आहे. उपदेश किती तर्कशुद्ध असला तरी तो आचरणात आणला जात नसेल किंवा व्यवहार्यतेची मर्यादा त्याला असेल तं कै फायदा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

दादा, ती थिअरी नाही, महावीरच्या असामान्य बुद्धीमत्तेचा

संजय क्षीरसागर
Sun, 02/03/2013 - 17:56 नवीन
अद्वितीय पैलू आहे तो. मी पहिल्यांदाच म्हटलंय नुसता वादविवाद करून उपयोग नाही. जे लिहीलय त्यावर शांतपणे विचार करा, ते सूत्र पूर्णपणे, मनोमन आपलंस करा. रात्रंदिवस ध्यास घेऊन फक्त चार दिवस त्या चित्तदशेत जगून पाहा.....आणि मग प्रतिसाद द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मीही प्रतिसादातच म्हटलंय की

बॅटमॅन
Sun, 02/03/2013 - 18:08 नवीन
मीही प्रतिसादातच म्हटलंय की ती थिअरी कितीही भारी असली तरी कुठेतरी लार्ज स्केलवर अप्लाय करता आली पाहिजे. इतके संतमहात्मे झाले, पण अशा पर्सन-इंटेन्सिव्ह गोष्टी लोकांना झेपत नाहीत हे जाणून काहीतरी जुगाड करायला हवे होते. अशा पर्सन-इंटेन्सिव्ह गोष्टी फारशा पॉप्युलर कधीच होत नाहीत असे निरीक्षण आहे. लोकांना नीट झेपेल असे काहीतरी पाहिजे. रात्रंदिवस ध्यास वगैरे ठीक आहे, चांगले आहे, मी लै लक्षपूर्वक केले तर होईलही तसे कदाचित, पण हे सगळ्यांना जमणार नाही ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे ह्या थिअरीचा एक अंमळ माईल्ड व्हॅरियंट मिळाला तर चांगले होईल इतकेच माझे म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मी लै लक्षपूर्वक केले तर होईलही तसे कदाचित

संजय क्षीरसागर
Sun, 02/03/2013 - 18:24 नवीन
व्हायलाच पाहीजे आणि नि:संशय होईल!
पण हे सगळ्यांना जमणार नाही ही वस्तुस्थिती आहे
सगळ्यांचा विचार कोण करतंय? असे सगळेच `इतरांचा' विचार करतायत म्हणून तर प्रश्न सुटत नाहीये!
थिअरी कितीही भारी असली तरी कुठेतरी लार्ज स्केलवर अप्लाय करता आली पाहिजे.
आर यू नॉट लार्ज इनफ टू ट्राय? द मोर अँड मोर वन बिकम्स पर्सनल, ही बिकम्स युनिव्हर्सल, दॅटस द वे!
इतके संतमहात्मे झाले, पण अशा पर्सन-इंटेन्सिव्ह गोष्टी लोकांना झेपत नाहीत हे जाणून काहीतरी जुगाड करायला हवे होते.
येस, अँड वेरी मच. आपण त्यांना समजू शकलो नाही. दे मेंट वन थींग अँड वी इंटरप्रिटेड अदर वे. आणि अहिंसा तर सगळ्यात मोठा गैरसमज झालेला विषय आहे. आजपर्यंत लाखो लोकांनी करोडो वेळा या विषयावर चर्चा केलीये. मी म्हणतोय तो अर्थ माझ्या कधीही वाचनात आला नाही. तो अँगल कुणाच्या लक्षात आलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सहमत आणि असहमत आणि काही

बॅटमॅन
Sun, 02/03/2013 - 18:37 नवीन
सहमत आणि असहमत आणि काही बाबतींत नो कमेंट्स. फक्त असहमतीच्या मुद्द्यांचा काथ्या थोडका कुटतो:
सगळ्यांचा विचार कोण करतंय? असे सगळेच `इतरांचा' विचार करतायत म्हणून तर प्रश्न सुटत नाहीये!
एखादी विचारसरणी राबावायची म्हंजे पहिले स्वतःचा विश्वास तिजवर बसणे आवश्यकच आहे. त्यामुळे म्हणतो, की सगळे इतरांचा विचार करत असल्यानेच प्रश्न सुटत नाहीये की इतरांच्या गळी उतरविण्याचे नेमके साधन मिळेना म्हणून प्रश्न सुटत नाही? हा निव्वळ शब्दच्छल नाहीये हे कृपया लक्षात घ्या. असो. बाकी फुरसतीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एखादी विचारसरणी राबावायची म्हंजे पहिले स्वतःचा विश्वास

संजय क्षीरसागर
Sun, 02/03/2013 - 19:48 नवीन
तिजवर बसणे आवश्यकच आहे
दॅटस द पॉइंट!
सगळे इतरांचा विचार करत असल्यानेच प्रश्न सुटत नाहीये की इतरांच्या गळी उतरविण्याचे नेमके साधन मिळेना म्हणून प्रश्न सुटत नाही
नाही. तत्वं एक नंबर आहे. दुसर्‍यानं काय करावं हे आपण ठरवतोय त्यामुळे `आपला प्रश्न' जिथल्या तिथे आहे. दहशतवाद्याला आपण दहशतवादीच म्हणणार आणि ज्यांनी त्याला ट्रेन केलंय ते शहीद म्हणणार... हा प्रश्न सुटणारा नाही. अहिंसा नक्की काय आहे आणि व्यक्तिगत जीवनात तिचा काय उपयोग आहे इतकंच मी सांगायचा प्रयत्न करतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओके.

बॅटमॅन
Sun, 02/03/2013 - 19:58 नवीन
ओके.
अहिंसा नक्की काय आहे आणि व्यक्तिगत जीवनात तिचा काय उपयोग आहे इतकंच मी सांगायचा प्रयत्न करतोय.
तुमच्या साधारण विवेचनाचा भर नेहमी व्यक्तिगत जीवनावर असतो. हे उत्तम आहे. पण सार्वजनिक क्षेत्रात तसे होणे लै अवघड, सस्टेंड बेसिसवर आणि लार्ज स्केलवर होणे लैच लैच औघड आहे. त्यामुळे डिफ्रंट अ‍ॅप्रोच लागेल असे मला वाटते. त्यामुळेच, ज्या समाजात बुद्ध-महावीर-तुकाराम-एकनाथ-गांधी वगैरेंसारखी उत्तुंग व्यक्तिमत्वे होऊन गेली, तो समाज मात्र नेहमी मेंढरांचाच राहिला. त्यामुळे समाजाला सुधारायला गुंड माणूस लागतो, असे माझे मत आहे. गांधीजींसारखा माणूस लैऽच विरळा. त्यापेक्षा या मेंढरांना सुधारायला जरा डोके जागेवर असलेले गुंड पाहिजेत असे मला वाटते. सारांश-मी माझ्या वैयक्तिक जीवनात जसं आचरण करतो त्याची पुनरावृत्ती इतरजण करू शकले की झालं हे चित्र इतकं साधंसोपं नाहीये. माणसाचा वैयक्तिक दिमाग जितका जास्त तितके त्याला कंट्रोलिंग करायचे अपॅरेटस देखील व्यामिश्र पण कुठेतरी अ‍ॅनिमल सिंप्लिसिटीचा टच कायम असलेले असले तरच बरे, असे आपले मला वाटते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सुधारायला ऐवजी राजकीय कामे

बॅटमॅन
Sun, 02/03/2013 - 20:01 नवीन
सुधारायला ऐवजी राजकीय कामे करून घ्यायला असे वाचावे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ज्या समाजात बुद्ध-महावीर-तुकाराम-एकनाथ-गांधी वगैरेंसारखी उत्तुंग

संजय क्षीरसागर
Sun, 02/03/2013 - 20:14 नवीन
व्यक्तिमत्वे होऊन गेली, तो समाज मात्र नेहमी मेंढरांचाच राहिला.त्यामुळे समाजाला सुधारायला गुंड माणूस लागतो, असे माझे मत आहे.
आपला पास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सारांश-मी माझ्या वैयक्तिक

अग्निकोल्हा
Sun, 02/03/2013 - 22:01 नवीन
सारांश-मी माझ्या वैयक्तिक जीवनात जसं आचरण करतो त्याची पुनरावृत्ती इतरजण करू शकले की झालं हे चित्र इतकं साधंसोपं नाहीये.
क्या बात है! एखादी गोश्ट समुह म्हणुन जर करणे शक्य असेल तरच त्यात समाजासाठी अर्थ आहे. तसही वैयक्तिक आयुष्य हे वैयक्तिक शिदोरीवर जगलं जातं. नाहीत तर प्रत्येकच जण तुकाराम, श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर, गाडगेबाबा वगैरे वगैरे बनु शकले नसते काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ज्जे बात!

सोत्रि
Sun, 02/03/2013 - 20:21 नवीन
असे सगळेच `इतरांचा' विचार करतायत म्हणून तर प्रश्न सुटत नाहीये!
शंभर नंबरी! आणि विषेशत: त्यात आपल्याला जे पटतेय ते इतरांना का पटत नाही, ते पटलेच पाहिजे हा विचार आणखिन गुंता वाढवतो.
आर यू नॉट लार्ज इनफ टू ट्राय?
कडक! _/\_ - (विचारी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बॅटमॅन

विसुनाना
Sun, 02/03/2013 - 18:04 नवीन
नक्की कोणता निराशा+पलायनवाद आहे? कृपया विशद करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आपले ते क्रांतिकारी, तुमचे ते

बॅटमॅन
Sun, 02/03/2013 - 18:13 नवीन
आपले ते क्रांतिकारी, तुमचे ते दहशतवादी हा अ‍ॅट्टिट्यूड सर्वांचा असतो हे वर उल्लेखिलेले वाक्य- त्याच्याशी सहमत आहे. पण त्यामुळे कधीच काही होणार नाही हे म्हणणे म्हणजे निराशा+पलायनवाद आहे. अशा समस्यांकडे लोक सार्वकालिकपणे पाहतात आणि कायमच्या युद्धखोरपणाच्या इतिहासामुळे निराश होतात. पण असे निराश न होता, आहे ते निस्तरले की झाले, असे मला वाटते. गेल्या ५००० वर्षांच्या इतिहासात शांतीची वर्षे लै कमी होती हे खरेय, पण त्याबरोबरच चांगल्या गोष्टीदेखील झाल्याच की. त्यामुळे कधीच काहीच होणार नै असे म्हणू नये, असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

आपले ते क्रांतिकारी, तुमचे ते दहशतवादी हा अ‍ॅट्टिट्यूड सर्वांचा

संजय क्षीरसागर
Sun, 02/03/2013 - 18:30 नवीन
असतो हे वर उल्लेखिलेले वाक्य- त्याच्याशी सहमत आहे. पण त्यामुळे कधीच काही होणार नाही हे म्हणणे म्हणजे निराशा+पलायनवाद आहे.
कोण क्रांतिकारी आणि कोण दहशतवादी हा प्रश्न बापाजन्मी सुटणार नाही इतकंच म्हणणंय! आणि अहिंसा नक्की काय आहे ते समजेल हा दुर्दम्य आशावाद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आमच्यासाठी हा प्रश्न सुटलाय बॉ !

परिकथेतील राजकुमार
Sun, 02/03/2013 - 18:55 नवीन
कोण क्रांतिकारी आणि कोण दहशतवादी हा प्रश्न बापाजन्मी सुटणार नाही इतकंच म्हणणंय!
क्रांतिकारी = मिथुनदा / मनोज कुमार दहशतवादी = आयेशा धारकर उगाच फालतु फालतु रिप्लाय चालू आहेत इकडे म्हणून आमची पण भर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा