✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मला समजलेले गांधीजी (भाग - १ ) - गांधीहत्या आणि मी

र
राजघराणं यांनी
गुरुवार, 01/31/2013 - 12:35  ·  लेख
लेख
मला समजलेले गांधीजी (भाग - १ ) - गांधीहत्या आणि मी मला समजलेले गांधीजी (भाग - १ ) १. गांधीहत्या आणि मी विद्यार्थिदशेत मी मुंबई ला राहायचा . बांद्रे . मातोश्री पासुन पाच मिनिटावर . हिंदुत्वान भारलेलं वातावरण होत . रुद्राक्षाच्या माळा . गंध . शाल . खणखणाट. शिवसेनेच्या शाखेवर कोलनितलि पोरं पडिक असत. कैरम खेळताना तिथं चाललेल्या देशभक्तीच्या चर्चा कानावर पडत असत. त्यात गांधिजिंचा उल्लेख टकल्या असाच हमखास होत असे. त्यानं देशाची वाट लावली असं ठाम मत सोंगट्या उडवताना व्यक्त केल जाई . आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला होता. त्यांची बकरी , पंचा, मुसलमानांच लांगुलचालन हे सारे आमच्यासाठी विनोदाचे विषय होते. गांधिंनि सगळ्या हिंदुना बकरी बनवायचा ध्यास घेतला होता . मुसलमानांच्या बकरी ईद ची सोय करायला ... किवा ... हो गांधीजी हे राष्ट्र पिता आहेतच कारण - त्यांनी देशाची आई **ली...... . किंवा याहून घाणेरड्या विनोदांना आम्ही धो धो हसून दाद देत असू. पुढे कुठल्यातरी पुस्तक प्रदर्शनात गोपाळ गोडसे यांच पुस्तक हाती लागलं . पुस्तकाच्या कव्हरवर आगीच्या ज्वाळा होत्या . विकत घेऊन वाचल. त्या पुस्तकांनी त्यावेळी मनात आग पेटली होती . देशाची फाळणी करणाऱ्या आणि दुश्मन पाकड्यांसाठि पंच्चावन्न कोटीचे दान देणार्या या अधमाला नथुराम गोडसे मारतो ते एक राष्ट्रीय काम होते असे मला वाटत असे. देशभक्ती हे पाप असेल तर मी पापी घोर भयंकर । मात्र पुण्य ते असेल जर मग नम्र माझा अधिकार तयावर ! a अहिंसे चे बाळकडु पाजून गांधीने देश षंढ बनवला. हिंदुस्थान च्या नामर्द पणाचा हा बाप आणि पाकिस्तानचा राष्ट्रपिता - त्याविषयी आदर वाटणं मला शक्यच न्हवतं . वाचनाच्या गोडितुन पुढे मला विज्ञानाविषयी प्रचंड आकर्षण आणि कुतूहल निर्माण झालं . प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो आणि मानवी बुद्धीला अधिक प्रयत्नाने आज ना उद्या तो उलगडू शकतोच असे मला वाटे. पूर्वी वरुणराजा पाउस पाडत असे. त्यानं तो पाडावा म्हणुन ऋषी यज्ञ करत असत . आता समुद्रातल्या वाफेचे ढग बनून नैऋत्य मोसमी वार्यांमुळे पाउस पडतो हे ठौक झालय. आपण कृत्रिम पाउसही पाडू लागलोय . जगातली सर्व रहस्ये विज्ञान उलगडू शकते ... आज नाही तर उद्या पण मानवी तर्कशास्त्राला सारे उलगडेल .. अशी आमची विज्ञान निष्ठ - बुद्धिवादी दृष्टी विकसित होत होती . त्यामुळे तर गांधी विषयीच्या तीरस्कारात भरच पडत गेली. अस्पृश्यता काढता म्हणुन भुकंप होतात असे म्हणणारे सनातनी आणि अस्पृश्यता पाळता म्हणुन भुकंप होतात असे म्हणणारे गांधी.... दोघेही सारखेच मूर्ख आहेत असे मला वाटे . गांधिजिंचे अध्यात्म - आत्मशुद्धीचे उपास, श्रद्धावानांचा सेनानी होण्याचा त्यांचा मनसुबा, त्यांची विज्ञान विरोधी भूमिका , हिंद स्वराज मध्ये त्यांनी रेल्वे पासून सर्व तंत्रद्न्यानाला केलेला विरोध त्यांचे ब्रह्मचर्य आणि सत्याचे प्रयोग सार - सार बालिश खेडवळ आणि बावळटपणाच आहे असा मजबूत ग्रह मी करून घेतला होता. समग्र सावरकर साहित्याचे वाचन केल्यावर (थोड्याकाळासाठि का होईना) पण सावरकर वाचले असते तर खुद्द मोहनदास करमचंद गांधीही -- गांधिवादाचे विरोधक बनले असते असे वाटे. b पुढे वाचन वाढलं तसतसं देशासमोरचे अधिक प्रश्न नजरेस पडु लागले. डॉ आंबेडकरांच कीर लिखित चरित्र वाचल्यावर- जातिव्यवस्था हा रोग संपविल्याशिवाय देशाच भल होणार नाही हे मनापासून पटल. तिथेही व्हिलन गांधीच होता. चातुर्वणाचा समर्थक गांधी हा सनातनी होता आणि म्हणुनच त्याचे विचार आपल्या देशाला जातिमुक्त होऊ देत नाहीत असेही वाटे. पुढे सावरकर लिखित गांधी गोंधळ , अरुण सारथिंचे गांधिंवरिल टिकास्त्र आणि डॉ आंबेडकरांचे - गांधी आणि कोंग्रेस ने अस्पृश्यांसाठी काय केले ? हि पुस्तके माझ्या मनातला गांधी विरोध अधिकाधिक प्रबळ करत गेली . एक वेळ अशी आली कि वेगवेगळ्या पुस्तकातली उलट सुलट मते आणि तर्क वाचण्या बरोबरच ... माणसं वाचण अधिक आवश्यक आहे अस मला वाटु लागलं. कारण मत बनत ते माणसाच्या अनुभवातून . माणसं वाचू लागलो तसे नवे गांधी कळत गेले ... आणि गांधिंच हे पुस्तकाबाह्य आकलन फार वेगळ होतं . आज गांधीचा स्मृतिदिन .त्यानिमित्ताने ३ भागात माझे गांधिंविषयि आकलन लिहिण्याचे ठरवले आहे. हिंदुत्व वादी आणि आंबेडकरवादी या दोघांचाही गांधी हा प्रमुख आणि समान शत्रू आहे. तरीही या मुद्द्यापुराता का होईना पण या दोन प्रवाहांचा संगम झाल्याचे आढळत नाही. ते का ? हा चिंतनिय प्रश्न आहे. आणि लेखमालेच्या उद्याच्या दुसर्या भागात त्याचा उहापोह आपण करू . हिंदुराष्ट्र वादाच्या ध्येयाने पछाडलेल्या बहुसंख्य अतृत्प आत्म्यांना मात्र गांधी "वध " हा समर्थनीय आणि वधकर्ता पूजनीय वाटतो . ( कधी उघड पण निदान मनात तरी कायम ! ) साधारणत : पाच वर्षापूर्वी पुण्यातल्या एका हिंदुत्व वादी मंडळाने २ ऑक्टोबर ला समारंभाचे आयोजन केले होते. . कडव्या हिंदुत्व वादी मंडळिंनि गांधिजयंतिचा कार्यक्रम ठरवला या धक्क्यातून कसाबसा सावरत मी कार्यक्रमस्थळि पोचलो . तिथे ढोल ताशांचा गजर चालू होता . गुलाल उधळला जात होता. मंडळी नाचत होती . अध्यक्षांना भेटलो. अध्यक्षसाहेब म्हणाले " अभिनंदन ". "?". " आज गोडसेंनि गांधीला ठोकला !" . मी कपाळावर हात मारून घेतला. जयंती आणि पुण्यतिथि यातला फरक सांगण्यापासून सुरवात करावी लागणार होती ! विनोदाचा भाग सोडाहो . पण अज्ञान हा दोष नाही . गडबडीत चूक होऊ शकते . ३० जानेवारी हि गांधिंचि पुण्यतिथि साजरी केली जात नाही . कारण त्या दिवशी त्यांचा खून झाला होता. २ ऑक्टोबर हि एकच गांधी तारीख जनतेत बहुदा ड्राय डे मुळे फ़ेमस आहे. बिचार्यां अध्यक्षांनि गांधी विषयीच्या अज्ञानामुळे हा गोंधळ घातला होता. नथूरामच्या नाटकाने आणि गोपाळ गोडसेंच्या पुस्तकाने असे भरपूर अज्ञान पसरले आहे. मुख्य गोंधळ आहे तो वध - हत्या - खून या शब्दावरून .संस्कृतात किवा मराठीत कोणत्या अर्थाने हे शब्द वापरले जातात ? इथपासून गोंधळ सुरु होतो. संस्क्रुत डिक्शनरी - १) http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?page=424&table=molesworth&display=utf8 २) http://www.andhrabharati.com/dictionary/sanskrit/index.php#ws-1 वध आणि हत्या यात फारसा फरक नाही . वध म्हणजे वाइट व्यक्तीला ठार मारणे असा अर्थ तर बिलकुल नाही . 'पाञ्चजन्य'मध्येसुद्धा 'गोवधबंदी' असा शब्द वापरला गेलेला आढळला. गोवध हा शब्द कसा रुढ झाला मग ? गाय हि आपल्या पूर्वजांच्या मते दुष्ट होती काय ? दोन व्यक्तींच्य समोरासमोरच्या द्वंद्वात होतो तो वध. आणि युद्धात सामुहिक होतात त्या हत्या . साधरणत: असे वापरण्याचा प्रघात आहे. मी नथुराम बोलतोय नाटकाचे मराठीला योगदान काय ? असा प्रश्न कोणि विचारला तर वध शब्दावरून घातलेला घोळ असे त्याचे उत्तर येईल. c नाटकातला नथुराम म्हणतो : " आपण शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला असे म्हणतो - हत्या नाही - म्हणुन मी पण गांधीचा वध केला असे म्हणावे" असे नाटकातल्या नथूरामचे म्हणणे आहे. कंसवध हा शब्द वापरला जातो ते दोन व्याक्तीतले द्वंद्व युद्ध होते म्हणुन . चांगल्याचा वाइटावर विजय या अर्थाने नव्हे. हे नाटकातल्या नथुरामला कळलेले दिसत नाही . इथे त्या नथुरामचे संस्कृत भाषेविषयीचे अज्ञान दिसून येते. नाहीतर वध हा शब्द अनेकदा वाइट अर्थानेही वापरला जातो हे त्याच्या लक्षात आले असते. निदानपक्षि गोवध , अभिमन्यू वध, पितृवध, मातृवध, इत्यादी शब्द तरी "पंडित" नथुरामला ठाउक नकोत का? मुळ मुद्दा असा आहे कि इथे नथुरामला स्वत: ला शिवरायांची आणि गाधिंना अफझलखानाची उपमा द्यायची आहे. नथूरामची उपमा चुकली आहे. कंसवध , जरासंधवध , अफझलखान वध इत्यादी वधांच्य प्रसंगी समोरासमोरचे द्वंद्व युद्ध झाले होते . दोन्ही बाजू सशस्त्र होत्या . युद्धसज्ज होत्या . तूल्यबळ होत्या. एका शक्तिहीन निशस्त्र म्हातार्या माणसावर गोळ्या झाडणे हे समोरासमोरचे द्वंद्व आहे काय ? पुरुषार्थ आहे काय ? निदान नथुराम ने गांधिंना प्रतिकाराची संधि तरी दिली होती काय ? गांधिंनि प्रतिकार केला नसता हि गोष्ट वेगळी .. पण जिथे द्वंद्व् झालेच नाही तिथे वध होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . तो एक भ्याड खून होता. गांधिंना हरवण्याचा द्वंद्वात्मक मार्ग होता . - तो म्हणजे लोकशाही मार्गाने कोंग्रेसला पराभूत करणे. हि लोकशाही गांधीची कोंग्रेसच देऊ पाहात होती. नथुरामला प्रतिकार करण्याची संधि गांधीच देत होते. पण नथुरामला आणि त्याच्या हिंदुमहासभेला गांधिंना निवडणुकीत हरवणे शक्य वाटत न्हवते. म्हणुन त्यांनी निवडणुकांच्या लढाइतुन पळ काढला . आणि खुनाचा शोर्ट कट स्वीकारला. राजकीय खून हे इतिहासात घडलेले आहेत. जेंव्हा इतर सर्व मार्ग बंद होतात तेंव्हा खुनाचा पर्याय शिल्लक राहतो. मदनलाल धिंग्रा किंवा भगतसिंग यांनीही राजकीय वध केले होते . पण इंग्रजांशि लढण्यासाठी तेंव्हा लोकशाहीचे कोणतेहि मार्ग शिल्लक न्हवते. त्यामुळे ते समर्थनीय वाटतात . bk मग नथुरामचा शोर्ट कट त्याच्या अनुयायांना का समर्थनीय वाटतो ? देशाची फाळणी हा हिंदुत्व वाद्यांच्या लेखी एका महान गुन्हा आहे. आणि मातृभूमीचे तुकडे करणार्याला त्यांच्या लेखी एकच शिक्षा आहे - वध ! ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे. अखंड भारतात बांग्लादेश तर येतोच पण पाकिस्तान सकट ची सर्व मुस्लिम लोकसंख्या ही येते. अखंड भारतातली मुस्लिम लोकसंख्या ४०% च्या आसपास जाते. आज १२% मुस्लिमांसमोर हतबल झालेले राजकीय हिंदू नेत्रुत्व अखंड भारतात शिल्लक तरी राहिल का? हिंदू लोक शेतकरी. जमिनीला माता मानणारे. भूगोलावर त्यांचे लैच प्रेम. त्यांचा मनात अखंड भारतमाता घर करून बसली आहे. पण अखंड भारत म्हण़जे केवळ भुगोलांची बेरीज न्हवे. त्यात लोकसंख्येची बेरीज आहे. इतिहासाची वजाबाकी आहे आणी धर्माचा भागाकार आहे. खरे पाहता हिंदू समाजात आणी धर्मात तुलनेने राष्ट्रवादी गोष्टी कमी आहेत. हिंदूधर्माची मूलभूत शिकवण - परधर्म सहिष्णुता विरुद्ध इस्लामी जिहाद आणी उम्मत( कुराणसिद्ध मुस्लिम बंधुभाव) विरुद्ध हिंदू ची जातिव्यवस्था. ही लढाईच विषम आहे. हिंदुंकडची एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांची लोकसंख्या. अखंड भारतात त्या एकमेव जमेच्या बाजूचे महत्व झपाट्याने कमी होणार होते. फाळणी केवळ भूभागांची झाली नाही. फाळणी मुस्लिम लोकसंख्येची झाली . अन भारतातल्या मुस्लिमांचे सांख्यीकी महत्व झटकन उतरले. मुस्लिमांचे पायचाटे म्हणून गांधींना अहोरात्र शिव्या देणारे लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात. . कुरुंदकर म्हणतात " एका मुसलमानाला तीन मतांचा अधिकार देउन; लखनौ कराराच्या वेळी कोंग्रेस मधील मुस्लीम लांगुलचालनाचा पाया; खुद्द लोकमान्य टिळकांनी घातलेला आहे. हे हिंदुत्ववादी का विसरतात ?" फाळणीमुळे अखंड भारताच्या धोक्यापासून हिंदूंचे रक्षण झाले. हे वास्तव समजून घेतले पाहिजे. bb १५ ऑगस्ट १९४७ ला झालेल्या फाळणीला जवाबदार कोण ? हा प्रश्न गेली गेली ६५ वर्षे हिंदुस्थानी विचारवंतांना छळतो आहे. हिंदुत्ववादी अखंड हिंदुस्थानचा जप करत यासाठी गांधींच्या अहिंसक स्वभावाला जवाबदार ठरवतात. तर सेक्यूलर विचारवंत फाळणीसाठी संघाचा आक्रमक हिंदुत्ववाद आणी सावरकरांनी द्वीराष्ट्रवादाला दिलेली मान्यता या गोष्टी दोषपूर्ण मानतात. सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल. द्विराष्ट्रवादाची मागणी फाळणीसाठी न्हवतीच ती अखंड भारतासाठी होती. सर सय्यदांची द्विराष्ट्रवादी भुमिका एकदा समजली की फाळणीची अपरिहार्यता चटकन लक्षात यील. मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे. भारत स्वतंत्र झाला की लोकशाही आलीच. संख्येच्या बळावर हिंदू ही राज्यकर्ती जमात बनेल. डोक्याचे वजन न मोजता डोक्यांची फक्त संख्या मोजणारी भुक्कड लोकशाही सय्यद अहमदांना मान्य न्हवती. हिंदू आणी मुसलमान हे भारत नावाच्या वधूचे दोन सुंदर डोळे आहेत म्हणून राजकीय सत्तेचे वाटप दोन्ही डोळ्यांना समान झाले पाहिजे. आणी म्हणूनच सर्व सत्ताकेंद्रात (लोकसभा ते ग्रामपंचायत) ५० % राखीव जागा मुस्लिमांसाठी असल्या पाहिजेत असे सय्यदांचे म्हणणे होते. ३०% मुस्लिमांसाठी ५०% जागा आणी हिंदूच्या भावनेसाठी अखंड भारत. असा द्विराष्ट्रवादाच्या मागणीचा आशय आहे. मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्‍याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली ! सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:! (अर्थः सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली तर शहाणा माणूस अर्ध्याचा त्याग करतो आणी उरलेल्या अर्ध्या चा स्वीकार करतो ! ) त्यामुळे गांधिंनि फाळणी करून हिंदुचा घात केला आणि म्हणुन त्यांचा वध समर्थनीय आहे असे म्हणणारे डबल ढोलकी ठरतात. मग गांधी हत्येचे समर्थन करण्याचे काही कारण उरते काय ? गांधिंनि हिंदुचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टीने योजनापूर्वक फाळणी केली असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही . पण गांधिहत्येच्या समर्थकांनाहि ते कारण पुढे करता येणार नाही कारण सकृत दर्शनी तरी फाळणी हिंदुना हितकारक ठरली आहे. ५५ कोटीचे कारण तसेच फुसके आहे. गांधीना मारायचे प्रयत्न ५५ कोटीच्या आधीपासूनचे आहेत. असे अनेक प्रयत्न नथुराम गटाने बरीच वर्षे केलेले आहेत. डॉ आंबेडकरांचे पाकिस्तान ओर पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तक अशाच डबल ढोलकी विचारवंता कडुन अनेकदा वापरले जाते. वस्तुत: आंबेडकरांनि हे पुस्तक फाळणीचे समर्थन करण्यासाठी लिहिलेले आहेत. दार उल हार्ब आणि दार उल इस्लाम अशी जगाची वाटणी इस्लामी धर्मशास्त्राने केलेली असल्याने मुस्लिमांचे हिंदुबरोबर सहजीवन अशक्य आहे - फाळणी अपरिहार्य आहे असे आंबेडकर म्हणतात. अखंड भारतात धार्मिक प्रश्न उग्र बनून राहतील आणि मग सामजिक सुधारणांकडे लक्ष द्यायला कुणाला वेळच उरणार नाही . या भावनेतून वेगळ्या चुली मांडणे बरे म्हणत आंबेडकरांनिहि फाळणीला पाठिंबा दिला आहे. नथुरामला आणि त्या विचारसरणीच्या लोकांना हिंदु समाजाचे आकलन झालेलेले न्हवते . आजही झालेले नाही . हिंदु समाज अहिंसक वगैरे कधीच न्हवता. महाभारतातलि भाउबंदकि आधुनिक भारतापर्यंत सनातन चालू आहे. शेतिच्या बांधावरुन भाऊ भावाचे खून करतो. राज्यावरून चुलत्यांचे रक्त वाहवले जाते. जातिपातिंचा आजचा संघर्ष थेट एकलव्य किवा शंबुक किंवा परशुराम पर्यंत भिडवला जातो. हिंदु लोक एक राष्ट्र - एक जीव नाहीत. आधुनिक राष्ट्रवादाच्या, लोकशाहीच्या परिप्रेक्षातुन हिंदुना पहायला शिकवणे हि काळाची गरज होती. त्यासाठी गांधिंनि अहिंसा हे उपकरण वापरले. त्यानेच त्यांनी हिंदु लोकांची मने जिंकली. महाराष्ट्रातले उदाहरण द्यायचे झाले तर ब्राह्मणेतर चळवळीचे देता येईल . टिळकांची जहाल कोग्रेस ब्रहमणेतर चळवळीला कधीच आपली वाटली नाही. त्या जहाल्पणात काहिंना ब्राह्मण्याचा वास येत होता. पण अहीसक गांधिंच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेतर पक्ष कोंग्रेस मध्ये आला हे विसरता येईल काय ? गांधिजिंच्या अहिंसेबद्दल आपण तिसर्या भागात अधिक सविस्तर चर्चा करू. फाळणी झाल्यानंतरहि मुस्लिमांना दंगलीची झळ पोचू नये म्हणुन हा महात्मा वणवण फिरत होता. पाकिस्तानातल्या हिंदुवर होणार्या अत्याचाराने नथुराम पेटुन उठला होता. त्याला इथल्या मुस्लिमांवर सुड उगवायचा होता ...... आणि हिंदुसमाजाला सुडाच्या तत्वाद्न्यानापासून दूर नेणारा महात्मा त्याला नको होता असाही तर्क लढवता येईल . सूडाचे तत्व अस्तनिताल्या निखार्यासारखे असते ते स्वत:लाही जाळतेच . दशतावादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानात आज तोच जिहाद अंतर्गत भस्मासुर बनला आहे हे दिसत नाही काय ? तरी क्षणभर युक्तिवादासाठी मान्य करू ...कि नथुरामला सुड घ्यायचा आहे. गांधिहत्येचा परिणाम काय झाला ? गांधीला गोळी घालताच एका क्षणात भारतातल्या मुस्लिम विरोधी दंगली थांबल्या हे खरे नाही काय ? नथुरामच्या गोळीने असंख्य मुस्लिमांचे जीव वाचले . त्याचे सुडाचे तत्व फेल झाले . पाकिस्तान ची निर्मिती हा गांधिविचाराचा पराभव आहे असे कोणास म्हणायचे असेल तर गांधिहत्येचा परिणाम हा नाथुरामि बदला तत्वाचा पराभव आहे हे हि मान्य करावे लागेल . पाकिस्तानची निर्मिती हा गांधीच्या सर्वधर्म समभावाचा पराभव होता असे म्हणणारे लोक कुराणाचा दाखला देण्यात पटाईत आहेत . कुराणातला जिहाद. काफ़िरांना मारण्याच्या आज्ञा . इस्लाम धर्माची ( कुराण प्रणित ) इतर धर्माप्रती असहिष्णुता याचे दाखले - कुराणातल्या आयतिंचे क्रमांक देत अवश्य देता येतील . गांधिजिंचि सर्वधर्म समभाव नावाची एक छोटीशी पुस्तिका आहे. त्यात गांधीजी विनम्रपणे म्हणतात कि दास आणि दस्युंविरोधातल्या ऋग्वेदातल्या ऋचांचे क्रमांक हि असेच दाखवता येतील . मानुस्मृतीतली शुद्रविरोधी टिपणे श्लोकांच्या क्रमांकासहित प्रसिद्ध झालेली आहेत . त्याचा नेमका अर्थ वेगळाच आहे असा वाद सर्व धर्म मार्तंड घालत बसतात. गांधीबाबा हि सुट - धर्माचा आधुनिक अन्वयार्थ काढण्याची सुट .... सर्वच धर्मांना देतात आणि त्याला - सर्वधर्म समभाव असे नाव देतात . आर्य समाजाचे संस्थापक , दयानंद सरस्वतिंनि आपल्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात मानुस्मृतीतली समता (!) उलगडली आहे. आंबेडकरांनि दयानंद सरस्वतिं बद्दल अनेकदा आदर व्यक्त केलेला आहे. फुलेंनी त्यांची पुण्यात मिरवणुकाही काढली होती. शाहू महाराज तर आर्य समाजिस्टच! कारण ग्रंथात काय आहे यापेक्षा ... भाष्य काराचा हेतू काय आहे हे महत्वाचे असते. गांधिंच्या मौलाना आझाद नामक शिष्याने कुराणातला सर्वधर्म समभाव उलगडला आहे ! गांधिंचा सर्वधर्म समभाव हा असा आहे. hkj थोडक्यात गांधिहत्येचे हिंदु म्हणुन समर्थन करता येत नाही हे मला उमगले आहे. त्यांच्या सर्व धर्म समभावा वर टिका करताना भान सोडले जाते हेही समजले आहे . तरी अधुनिक दृष्टिकोनाचे बुद्धिमान विचारवंत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यात वाद का झाले त्याचे खरे स्वरुप काय होते ... हा प्रश्न मला अस्वथ करतो. .. (क्रमश:) आगामी २) डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी ३) पुस्तकांपलिकडचे गांधी
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
37454 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

उत्तम लेख

क्लिंटन
गुरुवार, 01/31/2013 - 13:15 नवीन
राजघराणे यांचा अजून एक उत्तम लेख.
फाळणी केवळ भूभागांची झाली नाही. फाळणी मुस्लिम लोकसंख्येची झाली . अन भारतातल्या मुस्लिमांचे सांख्यीकी महत्व झटकन उतरले.
+१. अखंड हिंदुस्तान रहावा असे म्हणणारे एक गोष्ट विसरतात (आणि मी पण सुमारे ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत अशा विसरणार्‍यांपैकी एक होतो) की देश अखंड ठेवणे म्हणजे केवळ भूप्रदेशांची बेरीज नाही तर लोकसंख्येचीही बेरीज आहे. १९४७ मध्ये जर फाळणी झाली नसती तर त्यानंतर सततची अशांतता नांदली असती.आज पाकिस्तानात भारतापेक्षा जास्त बॉम्बस्फोट होत आहेत हे समोर दिसतच आहे.आपल्याच धर्माच्या लोकांचा जीव घ्यायला ते लोक स्वतः मानवी बॉम्ब बनून आपला जीव द्यायला मागेपुढे बघत नाहीत हे समोर दिसतच आहे.आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक सीमा आहे.त्यामुळे आजही पाकिस्तानातील अशा तत्वांना भारतात मुक्त प्रवेश नाही तर लपून-छपून यावे लागते. जर का ती सीमाच नसती तर अशा तत्वांचा अगदी मुक्त संचार सर्वत्र असता आणि अखंड भारतात किती अशांतता नांदली असती याचा विचार कोणी केला आहे का? तेव्हा मला वाटते जे काही १९४७ मध्ये झाले ते एका अर्थी चांगलेच झाले.त्यातूनही १९४७ मध्ये फाळणी झाली नसती तर ती भविष्यात कधीतरी झालीच असती.त्यातूनही मुस्लीम लीगचे स्वप्न-- पूर्ण पंजाब (दिल्लीपर्यंत) आणि पूर्ण बंगाल (कलकत्त्यापर्यंत) पाकिस्तानात जायची शक्यता अधिक ठळक झाली असती. तेव्हा १९४७ मधल्या परिस्थितीत फाळणी मान्य करणे हाच योग्य विचार ठरला.मुस्लीम लीगला पाकिस्तान हवा होता त्यापेक्षा बराच लहान पाकिस्तान त्यांना मिळाला आणि त्याला "मॉथ इटन पाकिस्तान" असे म्हटले गेले.पण असा "मॉथ इटन पाकिस्तान" देऊन देशाचा आणखी लचका भविष्यात तोडला जायचा धोका तर त्यामुळे कमी झाला? १९४७ मध्ये अगदी जालंधर-लुधियाना शहरांमध्येही मुस्लीम बहुसंख्या होती-- जिल्ह्यात नव्हे.पण त्यावेळी झालेल्या दंगलींमध्ये तिथल्या मुस्लीमांना एक तर यमसदनी धाडले गेले किंवा पाकिस्तानात हाकलले गेले आणि यातूनच सध्या भारतात असलेल्या प्रदेशात मुस्लीमांचा टक्का कमी झाला.तीच गोष्ट जम्मू प्रांताची. तिथेही मुस्लीम बहुसंख्या होती पण दंगली आणि स्थलांतरे यामुळे आता तिथे हिंदू बहुसंख्या आहे. या गोष्टी हिंदूंच्या हिताच्या ठरल्या कारण अशा ठिकाणी नव्या पाकिस्तानची मागणी व्हायची शक्यता घसरलेल्या मुस्लीम टक्क्यामुळे कमी झाली.अर्थातच सगळ्या मुस्लीमांनी नव्या पाकिस्तानची मागणी नक्कीच केली नसती पण अशी मागणी करणारे मुस्लीमच असते आणि एकूणच मुस्लीम टक्का कमी झाला त्यात अशांचाही टक्का कमीच झाला नाही का? तेव्हा प्रश्न हा की गांधींना फाळणीचा दोष द्यायचा की फाळणीचे श्रेय द्यायचे.
मुस्लिमांचे पायचाटे म्हणून गांधींना अहोरात्र शिव्या देणारे लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात. . कुरुंदकर म्हणतात " एका मुसलमानाला तीन मतांचा अधिकार देउन; लखनौ कराराच्या वेळी कोंग्रेस मधील मुस्लीम लांगुलचालनाचा पाया; खुद्द लोकमान्य टिळकांनी घातलेला आहे. हे हिंदुत्ववादी का विसरतात ?"
अगदी अगदी.पण होते काय की स्वातंत्र्यलढ्यात मुस्लीमांचा सहभाग असावा या हेतूने गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला तर ते "दाढ्या कुरवाळणारे" ठरतात पण त्याच उद्देशाने टिळकांनी लखनौ करार केला तर ते मोठे मुत्सद्दी ठरतात.कलकत्त्याचे महापौर असताना सुभाषचंद्र बोसांनीही मुस्लीमांना राखीव जागा दिल्या होत्या असे वाचल्याचे आठवते.पण त्याबद्दल सुभाषचंद्रांना कोणी दोष देत नाही.या सगळ्या प्रकारात एकच दुवा समान दिसतो आणि तो म्हणजे आंधळा गांधीद्वेष. सध्या इतकेच.वेळ मिळेल त्याप्रमाणे या चर्चेत भाग घेईनच.
  • Log in or register to post comments

फाळणी

सुधीर
Fri, 02/01/2013 - 11:45 नवीन
फाळणीवरचा प्रा. शेषराव मोरे यांनी लिहिलेला "अखंड भारत" गांधीजींचाच नकोसा हा लोकरंग मधला लेख (मूळ ग्रंथ "‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?") वाचल्यावर फाळणीबद्धलची भावनिक मतं बदलली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?

भ ट क्या खे ड वा ला
Wed, 10/16/2013 - 19:55 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

सहमत

आजानुकर्ण
Fri, 02/01/2013 - 23:22 नवीन
उत्तम लेख. पाकिस्तान आणि फाळणीबाबत आंबेडकरांनीही वेगळ्या देशाचे समर्थन केलेच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

थोडासा फरक आहे

आनन्दा
Sat, 10/26/2013 - 14:45 नवीन
लोकमान्य टिळकांनी आणि सुभाष्चन्द्र बोसांनी ही असे करार केले असतील.. पण त्यांचे बाकीचे वागणे हिन्दुविरोधी नव्हते. उदा. श्रद्धानंद खून खटला परंतु हेच गांधी भगतसिंगांच्या फाशीच्या वेळेस उभे राहिले नाहीत. अश्या प्रकारची उदाहरणे इतरांबद्दल उपलब्ध नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

आँ? देजा वू??

मन१
गुरुवार, 01/31/2013 - 13:30 नवीन
ह्यातला बराच भाग तुमच्याच "फाळणी : काँग्रेसचे हिंदुंवर उपकार" अशा कुठल्याशा धाग्याखाली वाचले होते. बरीच सविस्तर चर्चा केलेली दिसत आहे.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख आहे.

अमित
गुरुवार, 01/31/2013 - 14:11 नवीन
पुढील भाग लवकर येऊ दे :)
  • Log in or register to post comments

अगदी असेच म्हणतो... उत्तम लेख

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/31/2013 - 14:39 नवीन
अगदी असेच म्हणतो... उत्तम लेख +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित

मस्त !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/31/2013 - 14:49 नवीन
बर्‍याच दिवसांनी काही निखळ विनोदी आणि मनोरंजनात्मक लेखन वाचनात आले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

बघा आता. गांधीहत्येचा इशय

अधिराज
गुरुवार, 01/31/2013 - 16:22 नवीन
बघा आता. गांधीहत्येचा इशय तुमाला इनोदाचा आणि मनोरंजनाचा वाटतो व्हय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

एकूणात लेख आवडला.. तपशीलात

ऋषिकेश
गुरुवार, 01/31/2013 - 14:49 नवीन
एकूणात लेख आवडला.. तपशीलात शिरत नाहि
  • Log in or register to post comments

३० जानेवारी हि गांधिंचि

चावटमेला
गुरुवार, 01/31/2013 - 15:03 नवीन
३० जानेवारी हि गांधिंचि पुण्यतिथि साजरी केली जात नाही . कारण त्या दिवशी त्यांचा खून झाला होता. २ ऑक्टोबर हि एकच गांधी तारीख जनतेत बहुदा ड्राय डे मुळे फ़ेमस आहे ३० जानेवारीला बी ड्राय डे असतोय वो, म्हैत नसतया बर्‍याच जणांना आनि घोळ हुतुया मग ऐन येळी :( असो, लेख आवडला. पुलेशु
  • Log in or register to post comments

गांधीजींची तत्वे पुर्णतः

मृत्युन्जय
गुरुवार, 01/31/2013 - 15:03 नवीन
गांधीजींची तत्वे पुर्णतः चुकीची किंवा गोंधळलेली होती हे आपल्याला पटते की नाही? सगळा त्रास तिथेचतिसुरु झाला. बाकी गांधींजींबद्दल आदर नसणे हे मात्र मला समजत नाही. ही ४ वाक्ये बोलुन अध्यक्षमहारज मी माझे छोटेसे भाषण संपवतो.
  • Log in or register to post comments

अभिराम, तुमचा व्यासंग व्यापक आणि मांडणी उत्तम आहे

संजय क्षीरसागर
गुरुवार, 01/31/2013 - 15:10 नवीन
वास्तविकात इतिहास आणि त्याचं विष्लेशण यात मला रूचि नाही कारण, `आता काय करता येईल' ही दिशाच नेहमी मार्गदर्शक ठरते. फाळणी झालीये आणि तिच्यावर काथ्याकुटून आता उपयोग नाही. हत्या पाशवी आहे पण गांधीहत्त्या घडून गेली आहे आणि त्यावर उपाय नाही. नोबडी कॅन एव्हर गो बॅक इन टाईम. मला वाटतं, कोणत्याही समाजाविषयी स्वतःची ठाम मनोधारणा करून घेणं (आणि ती पसरवणं) हे सगळ्यात विघातक आहे. त्यानं सर्वधर्म समभावात अडथळा निर्माण होतो. एखादी व्यक्ती चूक करते, याचा अर्थ ती संपूर्ण जातीची विचारसरणी आहे असा नाही. किंबहुना तश्या अर्थामुळे दोन सामाजात तेढ निर्माण होते. तुमचं हे विधान :
मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे.
एकांगी आहे. वरचष्मा गाजवणं ही प्रत्येकाची प्रवृती आहे. ती घरापासून तख्तापर्यंत दिसते. जात आणि धर्माचा त्याच्याशी संबंध नाही. जिवेष्णेचा (स्वतःचं अस्तित्व टिकवण्याच्या) प्रेरणेचा तो भाग आहे. वृती गैर आहे हे नक्की पण तुमच्या विचारसरणीत एकांगीपणा येऊ देवू नका. त्यामुळे विचार आणि प्रयत्न दोन्हींची दिशा भरकटते.
  • Log in or register to post comments

उपदेश

पुण्याचे वटवाघूळ
गुरुवार, 01/31/2013 - 15:57 नवीन
वृती गैर आहे हे नक्की पण तुमच्या विचारसरणीत एकांगीपणा येऊ देवू नका. त्यामुळे विचार आणि प्रयत्न दोन्हींची दिशा भरकटते.
का हो सगळ्यांना उपदेश करायचा जन्मसिध्द हक्क तुमचा आहे असे तुम्हाला वाटते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तो अभिराम आणि माझा प्रश्न आहे

संजय क्षीरसागर
गुरुवार, 01/31/2013 - 16:18 नवीन
त्याला वाटलं तर तो घेईल नाही तर सोडून देईल. ही इज अ पब्लिक स्पिकर अँड रायटर त्यामुळे जे लिहीलय ते जनहितार्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

कोणत्याही समाजाविषयी स्वतःची

अग्निकोल्हा
गुरुवार, 01/31/2013 - 17:55 नवीन
कोणत्याही समाजाविषयी स्वतःची ठाम मनोधारणा करून घेणं (आणि ती पसरवणं) हे सगळ्यात विघातक आहे.
टाळी एका हाताने वाजत नसते हो, बरेचदा नाइलाजानेच का असेना पण... ! @ राजघराणं लेख वाचनिय आहे. सर्व भाग चाळण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

टाळी एका हाताने वाजत नसते हो, बरेचदा नाइलाजानेच का असेना पण... !

संजय क्षीरसागर
गुरुवार, 01/31/2013 - 18:25 नवीन
मुद्दा साधाये : एखाद्या व्यक्तीवरनं त्याच्या सर्व धर्मियांना वेठीला धरणं पुन्हा धार्मिक कलह निर्माण करणं आहे. आणि ही मानसिकता प्रत्येकजण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत धर्मनिरपेक्ष समाजाचं स्वप्न अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

ते विधान

सुनील
गुरुवार, 01/31/2013 - 18:10 नवीन
तुमचं हे विधान : मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे. एकांगी आहे.
मला वाटते, ते विधान राजघराणं यांचे स्वतःचे नसून, अशी सर सय्यद अहमद यांची भूमिका आहे/होती, असे राजघराणं याना सांगायचे असावे. ते खुलासा करतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सर सय्यद अहमद

पैसा
गुरुवार, 01/31/2013 - 18:20 नवीन
मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे.
हे डॉक्टर म्हणत नाहीयेत, तर ते सर सय्यद अहमद यांचं विधान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ते सय्यद अहमद यांचं विधान आहे हे माहितीये पण

संजय क्षीरसागर
गुरुवार, 01/31/2013 - 18:35 नवीन
इथून पुढे लेखनाची दिशा ती असणार आहे: तुम्ही लक्षपूर्वक वाचा:
सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल. सर सय्यदांची द्विराष्ट्रवादी भुमिका एकदा समजली की फाळणीची अपरिहार्यता चटकन लक्षात यील. मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

म्या पामराचे नाहि.

राजघराणं
गुरुवार, 01/31/2013 - 19:12 नवीन
मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे.
हे मत सर सय्यद अहमद यांचे आहे. म्या पामराचे नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

जबरदस्त लेख , उत्तम विश्लेषण

सुनिल पाटकर
गुरुवार, 01/31/2013 - 15:17 नवीन
जबरदस्त लेख , उत्तम विश्लेषण
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

पैसा
गुरुवार, 01/31/2013 - 18:21 नवीन
उत्तम मुद्देसूद लेख. या लेखाचा काही भाग आधी वाचला होता असं आठवतं. पण विस्तारही उत्तम आहे. पुढचा भाग लवकर येऊ द्या!
  • Log in or register to post comments

छान लेख आहे.....

बाबा पाटील
गुरुवार, 01/31/2013 - 19:51 नवीन
नशिब आमच गाधींना समजाउन घेवुन लेख लिहिणारा कुणी तरी लेखक भेटला. -कुणी बोट दाखवल तर सरळ कानफाटात मारणारा--बाबा पाटील....
  • Log in or register to post comments

पुन:प्रत्यय...

विकास
गुरुवार, 01/31/2013 - 19:54 नवीन
वर मन१ यांनी म्हणल्याप्रमाणे लेखातला प्रमुख भाग हा आधी देखील वेगळ्या लेखात आधी येथेच आल्याचे आठवते. त्यामुळे येथे माझा प्रतिसाद देणे चोप्य पस्ते इतके सोपे झाले आहे. :-) सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती ...द्विराष्ट्रवादाची मागणी फाळणीसाठी न्हवतीच ती अखंड भारतासाठी होती. द्विराष्ट्र हा विषय कायम चघळला जातो. म्हणून वरील वाक्यांशी सहमत असलो तरी थोडे अधिक लिहीत आहे. (हा आपल्या विधानांशी प्रतिवाद नाही!). सर सय्यद अहम्मद यांचे १८८७ सालातले लखनौचे प्रसिद्ध भाषण हे उर्दू मधे होते. ते १८८८ साली अलाहाबादच्या पायोनियर प्रेस ने इंग्रजीत भाषांतरीत करून प्रसिद्ध केले. त्यात, उर्दूमध्ये जेथे जेथे त्यांनी समाज (कम्युनिटी) या अर्थाने "कौम" हा शब्द वापरला होता, त्याचे भाषांतर प्रत्येक ठिकाणी, "नेशन" असे केले. त्यात अजून एक लफडे म्हणजे नेशन ह्या शब्दाचा मराठी/हिंदीत/संस्कृत मध्ये "राष्ट्र" असा केला जातो, ज्याचा अर्थ पण बर्याचदा "देश" या संकल्पनेपेक्षा वेगळा असतो, पण तुर्तास ते बाजूस ठेवूयात. आता हे लिहीत असताना सर सय्यद यांच्या भाषणाच्या बाजूने लिहीत नाही कारण त्यात "ते" विरुद्ध "आपण" अशीच भाषा आहे. पण नेशन हा श्ब्द नाही आणि त्या अर्थाने व्दिराष्ट्रवाद नाही. याचे त्यांच्या भाषणातील सुरवातीचे उदाहरण म्हणजे: "Although my own thoughts and desires are towards my own community, yet I shall discuss whether or not this agitation is useful for the country and for the other nations who live in it. " अजून एका ठिकाणी त्यांनी म्हणले आहे: "England and Scotland are a case in point. In the past many wars were waged between those countries, and many acts of bravery were done on both sides; but those times have gone, and they are now like one nation. But this is not the case with our country, which is peopled with different nations. Consider the Hindus alone. The Hindus of our Province, the Bengalis of the East, and the Mahrattas of the Deccan, do not form one nation." थोडक्यात जात-धर्म-भाषा-संकृती यांनी वेगळे झालेल्यांचे त्यांच्या लेखी राष्ट्र होते पण अशा सर्व राष्ट्रांचे एकत्रिकरण हे एका देशात होत होते. ते होताना समान वंश, रहाणीमान आणि समान भौगोलीक कक्षेतील इतिहास हे कारण असावे. पण तात्पर्य एकचः राष्ट्र आणि देश या संकल्पना समान न धरता भिन्न धरल्या गेल्या आहेत. ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे. ते आजच्या वर्तमानातील भारतीय उपखंडाचा अखंड भारत व्हावा असे म्हणतात असे आपल्याला नक्की वाटते का? कारण मला तसे वाटत नाही. त्यांचा अखंड भारतवाद हा १९४७ सालासाठी असतो आणि त्याच्या मागेपुढे घेतलेल्या राजकीय निर्णय आणि निर्णयक्षमतेविषयी असतो. तो बरोबर का चूक हा येथे मुद्दा नाही, पण तुम्हाला जो विनोद म्हणायचा आहे, तो अस्तित्वात आहे असे मला वाटत नाही. मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली ! असहमत. वरील विधान वाचताना असे वाटू शकते की गांधीजी हे फक्त हिंदूंच्या बाजूने होते आणि त्यांना मुसलमान जनता नको होती. जे काही केले ते दूरगामी/स्ट्रॅटेजिक होते. पण वास्तव तसे होते असे इतिहासातली पाने चाळताना वाटत नाही. १९२० सालापासून (खिलाफत चळवळीपासून) गांधीजींची धोरणे. तेच १९२१ च्या मोपला दंगलीनंतर... १९४० नंतर विचार बदलला असेलही पण तरी हे काही फार स्ट्रॅटेजिकली कोणीच केले असे वाटत नाही, हिंदूंच्या हिताचा विचार करत केले असा निष्कर्ष काढणे अधिकच अवघड जाते. याचा अर्थ त्यांनी मुद्दामून हिंदूंच्या अहीताचा विचार केला असे अजिबात म्हणायचे नाही. प्रतिसाद देखील क्रमशः :-)
  • Log in or register to post comments

हे वाक्य वरिल लेखात आलेले आहेच

राजघराणं
गुरुवार, 01/31/2013 - 20:37 नवीन
हे वाक्य वरिल लेखात आलेले आहेच
? गांधिंनि हिंदुचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टीने योजनापूर्वक फाळणी केली असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही . पण गांधिहत्येच्या समर्थकांनाहि ते कारण पुढे करता येणार नाही कारण सकृत दर्शनी तरी फाळणी हिंदुना हितकारक ठरली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आधी

विकास
गुरुवार, 01/31/2013 - 21:10 नवीन
आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, मी आपल्या आधीच्या लेखातील माझा प्रतिसाद चोप्य पस्ते केला होता. त्यात ते (आपले वरील) वाक्य नसावे. तसेच हाच सूर मी कुरूंदकरांच्या लेखात पण वाचलेला आहे आणि त्याच्याशी मी असहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजघराणं

आठवलं म्हणून

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 02/02/2013 - 01:54 नवीन
मोपल्यांचं बंड हे मुळात हिंदू-मुसलमान धर्माधारित दंगा अशा प्रकारे सुरू झालेलं नव्हतं. गरीब मजूर आणि श्रीमंत मालक अशा प्रकारचा तो वाद होता. लवकरच त्याला हिंदू-मुसलमान असा रंग आला. गांधीजींना असा रंग आल्याचं समजलं नाही. संदर्भः लोकमान्य ते महात्मा. (याचा तपशीलवार खुलासा दुसर्‍या खंडात आहे.) कुरूंदकरांनी या विषयातले तपशील दिलेले आहेत का हे निबंधवजा लिखाण आहे? (कुरूंदकरांचं मूळ लिखाण वाचलेलं नाही म्हणून जिज्ञासा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

country nation देश राष्ट्र भूमी कौम समाज वंश ह्याबद्दल

मन१
Fri, 02/01/2013 - 12:58 नवीन
स्वतःलाच quote करण्याचा मोह आवरत नाहिये. ह्याशब्दांबद्द्ल जे जाणवलं ते मी इकडेच जालावर काही ठिकाणी लिहिलय. country nation देश राष्ट्र भूमी कौम समाज वंश हे शब्द अगदि जवळून एकमेकांस कित्येकदा स्पर्शून जातात तर कधी समानार्थी म्हणून वापरले जातात. कुठल्या संदर्भात वापरतोय, त्यावरून ते ठरते. संपूर्ण जग तेव्हा nation , country(राष्ट्र, देश) ह्या शब्दांतील फरक शोधत होतं. जगभर मध्ययुगात nation हे एखाद्या जातीचं, जमातीचं, मोठं रूप(extension) मानलं जात होतं. देश शब्दाची आजची "व्यवस्था"/system ह्याजवळ जाणारी व्याख्या अजून बनायची होती. race आणि nation (वंश/कबिला/टोळी आणि राष्ट्र)ह्या कल्पना एकमेकांना स्पर्श करत होत्या. त्यांच्या सीमा धूसर होत्या. जवळच्या नात्यातील लोक एकत्र आले की कुटुंब बनते. समानता असणारी काही कुटुंबे एकत्र आली की एक वंश, एक राष्ट्र , एक टोळी बलागते.त्यामुळेच कधीकधी भारतातली हरेक जात एक अशीच स्वतंत्र राष्ट्र वाटू लागते. . . नकाशावरच्या भूभागाला "देश " म्हणतात. देश = जमीन = भूमी = country = वतन(मराठी,हिंदी, आणी उर्दुमधील) बस्स. इतकच. कुटुंब हे चार भिंतीमध्ये/फ्लॅटमध्ये "वसते " तसेच राष्ट्र हे देशात "वसते". राष्ट्र हा चालक असून देश हे चाल्य(गाडी/वाहन) आहे. दोन देश exclusively वेगळ्या भागातच असतात. पण एकाच देशात्/एकाच भूभाग काही वेगवेगळे समाज, वेगवेगळी राष्ट्रे नांदू शकतात. हंगेरी ह्या देशात बराच काळ रोमन आणि हूण ही दोन राष्ट्रे मध्ययुगाच्या प्रारंभी वसत होती; तसेच. घरातून कुटुंब जागा सोडून जाते. तसेच एखाद्या राष्ट्राला एखाद्या देशातून घालवून देता येते. एखादे राष्ट्र एखाद्या देशाचा ताबा घेउन त्याला आत्मसात करते. ग्रीको-रोमन राष्ट्राला तुर्क राष्ट्राने बायझेंटाइन्/तुर्कस्थान "देशातून" काढले तसेच. किंवा "स्पेन्/अल अंदालूस" देशातून अरब राष्ट्र बाहेर फेकले गेले तेराव्या शतकापर्यंत तसेच काहीसे. . . भारत वेगळ्या मार्गावरून जातो आहे. आम्ही त्या अर्थाने(धार्मिक्,वांशिक) एकसंध नाहीत. पण आमच्यात एकच एक धागा(बृहत सांस्कृतिक??) अशी ही कल्पना आहे. आपण वेगळे असलो तरी तुला मारलं की मला दुखतं अशी काहीशी एक कल्पना आहे. मध्यमवर्गानं ही स्थापित होण्यास नकळातपणे फार मोठा हातभार लावलाय. भारत ही "संकल्पना" जाणवून घ्यायची असेल तर तुम्ही सलग पाच-सात वेळेस मूळ "मिले सूर मेरा तुम्हारा" हा सुंदर मैफिल पाहिली पाहिजे. साध्या साडीतली कुलीन गुजराती स्त्री "बणे सूर जो तारो मारो बणे आपणो सूर निराळो" असं काहीसं म्हणते ; पूर्वेकडच्या राज्यात कुणीतरी " सृष्टी होउ कोइ कोतान्/कोइ कोशू" अशी सुरेल कुणी हाक देतं, मराठीत फिल्मस्टार तनुजा "तुमच्या माझ्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा" म्हणत समेवर येते. अहाहा. सुरेख. सुंदर. त्या गीतातल्या सगळ्याच भाषा समजतात असे नाही, पण खूपच प्रसन्न वाटते. "मला तुमची भाषा येत नाही पण मी तुमच्या भावना समजू शकतो" ह्या अर्थाचे काहीसे हे भारतीय संघराज्य एकत्रित आहे. ह्यात भाषाभिमानी अतिप्राचीन वाङ्मयासोबत तमिळ आहेत, बाबो मोशाय त्याच्या मिठायांसोबत आहे, नेकिचा नोकरदार नि कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी मराठीही आहे. परंपराप्रिय राजपूत्/राज्स्थान हे आहेत नि आमचेच निसर्गाच्या सहवासात राहणारे उडिया लोकंही आहेत. दिल्लीकडच्यांना अकबराबद्दल प्रेम्/आदर आहे ना, असूं देत, त्याचं (मेवाडी)राजपूतांना आदरस्थानी असणार्‍या राणा प्रतापाशी युद्धही झालं होतं ना? असूंदेत. तरीही आम्ही दोन्हीचा सांस्कृतीक वारसा सांगू. कुणीकडून काय मिळालं हे मांडू. "मिले सूर मेरा तुम्हारा " च्याच धर्तीवर, त्या दर्जाची नसली, काहीशी populist वाटली तरी "तारक मेहता का उल्टा चश्मा" मध्ये ही भारताच्या वैविध्याची नि एकतेचीही कहाणी मस्त मांडलिये. म्हणजे, तो कथेचा मूळ गाभा नसेलही, पण प्रत्येकाला त्यात आपलच, किंवा आपल्या जवळच्यांचं representation सापडतं. एका हिंदी सिरियलमध्ये " पापड कसले बनवतेस तू माधवी" म्हणणारा मराठी श्रीयुत भिडे नि कच्छवाले(गुजराती) जैन व्यावसायिक जेठालाल एकमेकांची सुमडी सुमडीत खेचू पाहतात. पण खरच अवघड वेळ आली तर भिडेला जेठालाल ला सोडून जेवणही जात नाही. अर्थात जेठालाल सुटला की ह्यांचे पुन्हा ट ऑम अ‍ॅन्ड जेरी सारखे उद्योग सुरुच. सोसायटीच्या बाहेर व्यवसाय करणारा अब्दुल त्यांच्या परिवाराचाच एक सदस्य आहे. सरदारजी त्यांच्या पारशी बायकोसाबत धमाल आणताहेत. ते मद्राशाला(हौ. सगळे साउथ इंडिअन हे मद्राशीच असतात.) छोले भटुरे आठवणीनं आणून देतात , मद्राशी सगळ्या उत्तर भारताच्या उत्सवात सहभागी होताना दिसतो. "आपण वेगळे आहोत पण आपण शत्रू नाहीत" अशी काहीशी ही भावना आहे. सध्याची भारत ही संकल्पना यशस्वी झाली तर ती जणू एका मोठ्या प्रच्चंड मोठ्या कोलाज च्या रुपातील असेल. मोठा कॅनव्हास, अनेकानेक रंग तरी त्यांची एकमेकांना सोबत. एकजिनसीपणा नाही, पण एकत्रित बांधणी पक्की आहे. एकाच पुस्तकात प्रत्येक पान वेगवेगळ्या रंगाचं असावं तरीही त्याची बायंडिंग घट्ट असावी, तसच काहीसं. . एक भारत" म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर रेल्वेने प्रवास करावा. आधी जम्मू ते मदुरै आणि नंतर सुरत ते गुवाहाटी असं जाउन पहा. रेल्वेतच बसले राहिलात तरी खूप काही बघणं होइल. अल्पशा मोबदल्यात आख्खे भारत दर्शन होउन जाइल्.रेल्वेत भेटणारी माणसे, त्यांची आयुष्ये त्यांनी "भारत " कल्पनेबद्द्ल काहीही भाष्य न करताच तुम्हाला खूप काही सांगून जातील. कॅनव्हास मोठा करायला एकदा स्लीपर कोच, नि एकदा तरी ए सी असे जा. खूप काही जाणवेल. . . वतन्--कौम्---मुल्क उर्दु भाषेतलं उदाहरण त्यातल्या त्यात परिचित असल्यामुळं घ्यायचं म्हटलं तर काय दिसतं? "ऐ वतन ऐ वतन तेरी राहों में हम जां तक लुटा जाएंगे" असं कुणी म्हणतं. "गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे" हे त्याचं मराठी रूप. भूमी- जमीन- वतन ह्यांच्याशीही बांधिलकी मानलेलीच दिसते. इथे जमीन- वतन हे शब्द निष्प्राण, निर्जीव नाहीत, आपले, आपल्या लोकांचे तिथे पूर्वापार वास्तव्य आहे ही भावन त्या जमिनीच्या तुकड्याला मोल प्राप्त करुन देते. एरव्ही "जमीनीचा तुकडा" ह्या अर्थाने हेच शब्द जमीन्-दार, वतन-दार असे दिसतात. . सध्या बोली उर्दु मध्ये मुल्क हा शब्द सर्रास आढळतो. मराठीत आपण "देश" म्हणतो; बोलीभाषेतही "देश" वापरतो अगदि त्याच अर्थाचा आणि वापराचा हा शब्द. ह्यात मला तितकासा जिवंतपणा जानवत नाही. कलरलेस, ओडरलेस, निरुपद्रवी असा हा शब्द. . "राष्ट्र " ह्या कल्पनेशी "बृहद कुटुंब" किंवा "टोळी" किंवा "वंश" ह्याच्या जवळ जाणारा उर्दु शब्द म्हणजे "कौम" "कदम कदम बढाये जा खुशी के गीत गाये जा यह जिंदगी है तू कौम पे लुटाये जा" असं आझाद हिंद सेनेचं विजय गीत होतं. भारत ही एक "कौम" मानण्यात आली होती. एक बृहत कुटुंबच. पण अर्थातच ह्या शब्दाचं मूळ तितकं उदात्त नाही. आज आफ्रिकन एकाच आफ्रिकन "देशा"त अनेक "कौम " पहायला मिलतात. एक "कौम" दुसर्‍या "कौम" ला हाकलायला पाहते ; उर्दु च्यानेल पाहिल्यावर "कौम" ह्या शब्दाचा हा अर्थही जाणवेल. वतन, मुल्क, कौम हे मराठीत अनुक्रमे वतन/भूमी/जमीन,देश, राष्ट्र बनून येताना दिसतात. . देश- राष्ट्र ही तुलना सर्वात अचूक करता येइल ती संस्था/संघटना -- संस्थेचे कार्यालय ह्या जोडिशी. एखाद्या संस्थेला एखाद्या कार्यालयातून, बिल्डिंगमधून घालवून देता येते. पण म्हणून त्यांची संघटना संपत नाही, तिचे फक्त कार्यालय जाते, तसेच काहीसे. संघटना असणे, संघटनेचे सभासद असणे हे एका नात्याने, धाग्याने बांधले जाणयसारखे आहे . "राष्ट्र‍ " ह्या कल्पनेत असे बांधले जाणे अपेक्षित आहे. एकमेकांशी नाते अपेक्षित आहे. त्यामुळेच "राष्ट्र" हा एक जिवंत शब्द आहे. "देश" हा एक निव्वळ कार्यालय असावे तसा शब्द आहे; मूळचा बराचसा निर्जीव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

खूप खूप छान

रणजित चितळे
Fri, 02/01/2013 - 19:02 नवीन
मन अगदी मनातले लिहिलेत. फार आवडले. http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

लक्ष लक्ष दुऑ...

श्रीरंग_जोशी
Sat, 02/02/2013 - 01:46 नवीन
मनोबा - वर जे काही विचार मांडले आहे त्यास तोडच नाही... माझ्या सुदैवाने मला गोकूळधाम छाप सोसायटीमध्येच लहानाचं मोठं व्हायला मिळालं. हेवेदावे होतेच पण त्यांचे जात व धर्माशी काहीच घेणे देणे नव्हते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

लेख छान आहे

रणजित चितळे
गुरुवार, 01/31/2013 - 20:01 नवीन
हिंदू लोक शेतकरी. जमिनीला माता मानणारे. भूगोलावर त्यांचे लैच प्रेम. त्यांचा मनात अखंड भारतमाता घर करून बसली आहे. पण अखंड भारत म्हण़जे केवळ भुगोलांची बेरीज न्हवे. त्यात लोकसंख्येची बेरीज आहे. इतिहासाची वजाबाकी आहे आणी धर्माचा भागाकार आहे. वाक्य भयंकर आवडले. लेख वाचला. मी स्वतः सावरकर भक्त. त्यांचे सगळे लेख एकदा नाही बरेचदा वाचले व वाचतो. आपला लेख खूप चांगला झाला आहे. माझ्या काही टिपण्णी आहेत काही आपल्या लेखावर काही बाकीच्यांच्या प्रतिसादांवर - १. आपले - अखंड भारत परत होणे म्हणजे मुस्लीम जनता ४० टक्के झाली असती व त्यामुळे बरेच प्रश्न उपस्थित झाले असते - पटले. २. अखंड भारत नाही ह्याचे दुःख आहे पण त्याच बरोबर पुढे जायचे असेल तर WE SHOULD MAKE PEACE WITH HISTORY हे करायलाच पाहिजे. ३. ह्याच बरोबर इतिहासाचे अवलोकन, अध्ययन हे आपण केले पाहिजे, आपण कोठे चुकलो हे त्याने कळते. नाहीतर त्याच चुका परत परत होत राहतात. ४. लेख खूप छान आवडला - एक खटकले त्यात काही ठिकाणी भाषा पार्लमेटरी वापरली असतीत तर त्याला अजून उंची आली असती असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

पार्लमेंटरी भाषा

सुनील
गुरुवार, 01/31/2013 - 21:50 नवीन
काही ठिकाणी भाषा पार्लमेटरी वापरली असतीत
PJ मोड ऑन पार्लमेंटरी भाषा म्हणजे कोणती हो? म्हणजे "भ"कारी की मा(पंचाक्षरी)? नाय म्हणजे, पार्लमेंटात सगळे चोर-दरवडेखोर बसतात, असे म्हणतात म्हणून विचार्तोय हो ;) PJ मोड ऑफ कृपया, हे फार ताणून चांगल्या धाग्याचा विचका करू नये. आमची विनोदाची उबळ खोकल्यासारखी असते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

मला समजलेले गांधि असा विष्य आहे.

राजघराणं
गुरुवार, 01/31/2013 - 20:38 नवीन
मिच पार्ल्मेंटरि न्हाइ तर भाषा कशि व्हनार :-) .. असो... पुढ्च्या वेळपासुन लक्षात ठेविन ... ढन्यवाद
  • Log in or register to post comments

...........

रणजित चितळे
गुरुवार, 01/31/2013 - 21:25 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजघराणं

भाषा पार्लमेटरी

धन्या
गुरुवार, 01/31/2013 - 21:44 नवीन
भाषा पार्लमेटरी म्हणजे कशी? - अडाणी धन्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

प्रतिवाद करण्यासाठी मुद्दे

रामपुरी
गुरुवार, 01/31/2013 - 21:36 नवीन
"मदनलाल धिंग्रा किंवा भगतसिंग यांनीही राजकीय वध केले होते." 'ते' वध का आणि हा 'खून' का? तुमच्याच व्याख्येनुसार त्यावेळीही समोरची (इंग्रज) माणसे नि:शस्त्र/बेसावध होती. समर्थनिय असतील तर दोन्हीही आहेत किंवा दोन्हीही नाहीत. "पण इंग्रजांशि लढण्यासाठी तेंव्हा लोकशाहीचे कोणतेहि मार्ग शिल्लक न्हवते." अतिशय चुकीचे/विनोदी विधान. अजून बराच प्रतिवाद करता येईल पण ते व्यर्थ आहे. तेव्हां असोच... पुलेशु
  • Log in or register to post comments

लेख खुप आवडला... दोन तीन

आनन्दिता
गुरुवार, 01/31/2013 - 21:58 नवीन
लेख खुप आवडला... दोन तीन दिवसांपासुन गांधींवर इथल्या काही काजव्यांनी आपल्या अल्पमती चा प्रकाश टाकायचं काम केल्याने , तुमच्या लेखाचं शिर्षक वाचताच आता गांधीवर अजुन राळ नको अशी प्रार्थना करतच लेख वाचायला घेतला.. त्यांच्यावरील आरोपांचा सकारत्मक आणि अभ्यासपुर्ण उहापोह करायला घेतल्या बद्दल तुमचे मनापासुन आभार.. पुढचे लेख पटापट येऊद्यात.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद....

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/31/2013 - 22:44 नवीन
उत्तम अभ्यासपुर्ण लेख. इथल्या काही "हुश्शार (?)" लोकांना गांधीविरोध का हे कालपासुन सांगायचा प्रयत्न करत होतो. तुमच्या लेखाची मदत नक्कीच झाली आणि होईल. माझ्या गांधीविरोधाची कारणं:- १. आपल्यावर अत्याचार होत असताना तो निमुट सहन करणं हा अत्याचार करण्याहुन गंभिर गुन्हा आहे. आज पाकिस्तान भारताच्या हद्दीत घुसुन आपल्या सैनिकांना मारायचं धाडस करतोय, त्यावेळी मात्र ह्यातले बहुसंख्य गांधीवादी हिप्पोक्रिट लोकं पाकिस्तान ला सडेतोड उत्तर द्या म्हणुन मागणी करतातच ना? मग कुठे जातो तुमचा गांधीवाद तेव्हा? तेव्हा असं का नाही म्हणत, अरे दोनचं का मारले अख्खी रेजिमेंट देतो पाठऊन हाल हाल करुन मारा त्यांना म्हणुन? हा एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करा ची शिकवण दिल्याबद्दल गांधींविषयी मला राग आहे. २. मी हिंदु मुस्लिम असा रंग द्यायचा प्रयत्न करत नाहीये. कोण कुठला तो ओवेसी येऊन हिंदु संस्क्रुती, देव-देवता आणि आर.एस.एस. बद्दल बोलुन जातो. मग त्यावेळी गांधींच्या तालमीत तयार झालेल्या काँग्रेस नी काय कारवाई केली त्याच्यावर? नुसते खटले भरले म्हणजे झालं का? का धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली फक्त हिंदुनांचं लक्ष करायचं? ह्या भेकड व्रुत्तीची सुरुवात गांधींमुळे झाली त्यामुळे मला राग आहे. सर्वांना न्याय समान हवा. ३. भगतसिंग आणि राजगुरु ह्यांना श़क्य असुनही गांधींनी का वाचवलं नाही? पुढच्या राजकारणामधे आपल्या स्थानाला धक्का ह्या दोघांमुळे लागु शकतो हे त्यांना माहीत होतं का? दोन देशभक्त क्रांतिकारकांचा म्रुत्यु म्हणजे राजकीय हत्येचा भागच होता असं का म्हणु नये? आपली इतिहासाची पुस्तकं आठवा शाळेतली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधींबद्द्ल आणि त्यांच्या चळवळी बद्द्ल धडेच्या धडे आणि बाकीच्या महत्त्वाच्या स्वातंत्र्यसैनिकांची नुसती तोंडओळख का? त्यांचा सहभाग सारखाचं किंबहुना जास्त महत्वाचा होता. हा पद्धतशिर पणे कोणाचा प्रचार शाळकरी मुलांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न आहे हा वादाचा मुद्दा आहे. अवांतर- विनायक दामोदर सावरकरांचा फोटो विशेष आवडला.
  • Log in or register to post comments

इथे महात्मा गांधींवर चर्चा

आनन्दिता
Fri, 02/01/2013 - 00:57 नवीन
इथे महात्मा गांधींवर चर्चा चाललीये आत्ताच्या "मॅडम गांधीं " वर नाही त्यामुळे तुमचे पहिले दोन मुद्दे बाद ठरतायत... त्यांच्या नाकर्तेपणाच्या पावत्या बापूंच्या नावे फाडू नका... भेकडपणा ची सुरुवात गांधींपासुन झाली असं सांगताय तर त्याच गांधींच्या प्रभावाखालि लहानाची मोठी झालेल्या अन पाकीस्तानाला नानी याद करायला लावणार्या इंदिरा गांधी बद्दल तुम्ही काय प्रतिवाद कराल?. गांधींची अहिंसा आणि सत्याग्रह ही मुल्ये स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित होती.. पण याचा अर्थ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने एक सार्वभौम राष्ट्र म्हणून जगासमोर उभे राहताना लष्कर न बाळगणार दुबळं राष्ट्र म्हणून उभं रहावं असं गांधीवाद खचितच सांगत नाही... १९४७ मधे काश्मिरात घुसखोरी करणार्या पाक ला रोखण्यासाठी तिकडे लष्कर पाठवायचा सल्ला गांधींनी स्वतः नेहरूंना दिला होता हे विसरुन चालणार नाही..
भगतसिंग आणि राजगुरु ह्यांना श़क्य असुनही गांधींनी का वाचवलं नाही? पुढच्या राजकारणामधे आपल्या स्थानाला धक्का ह्या दोघांमुळे लागु शकतो हे त्यांना माहीत होतं का?
या वाक्याला मात्र मनापासुन दाद..खुद्द भगत सिंग,राजगुरु, अन सुखदेव (यांना तुम्ही विसरलाय बहुतेक) यांच्यासुद्धा हे लक्षात आलं नसेल... गांधी -आयर्विन करारा नंतर गांधीजींच्या अटीनुसार सुमारे ९०,००० जणांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती अन विषेश म्हणजे हे ९०,००० लोक सत्याग्रहाच्या चळवळीचा हिस्सा कधीही नव्हते.. या तिघांच्या सुटकेसाठी ही गांधींनी करारात नेगोशियेट करायचा प्रयत्न केला होता हे स्वतः आयर्विन कबुल करतो.. According to a report in the Indian magazine Frontline, Gandhi did plead several times for the commutation of the death sentence of Singh, Rajguru and Sukhdev, including a personal visit on 19 March 1931. In a letter to the Viceroy on the day of their execution, he pleaded fervently for commutation, not knowing that the letter would be too late. Lord Irwin, the Viceroy of India later said: As I listened to Mr. Gandhi putting the case for commutation before me, I reflected first on what significance it surely was that the apostle of non-violence should so earnestly be pleading the cause of the devotees of a creed so fundamentally opposed to his own, but I should regard it as wholly wrong to allow my judgment to be influenced by purely political considerations. I could not imagine a case in which under the law, penalty had been more directly deserved.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

खूप छान प्रतिसाद दिलाय

अधिराज
Fri, 02/01/2013 - 14:06 नवीन
खूप छान प्रतिसाद दिलाय ताईसाहेब तुम्ही. चांगली माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

छान माहिती मांडलीत आनन्दिता....

बाबा पाटील
Fri, 02/01/2013 - 01:01 नवीन
छान माहिती मांडलीत आनन्दिता....
  • Log in or register to post comments

मला समजलेला लेख

आनंद घारे
Fri, 02/01/2013 - 08:34 नवीन
खूप मेहनत घेऊन लिहिलेल्या या विस्तृत लेखामधून मला एवढे समजले की लेखकाच्या मनात त्याच्या अजाण वयात पेरल्या गेलेल्या द्वेषाच्या विषाने काही काळासाठी त्याचा ताबा घेतला होता. स्वतंत्रपणे विचार करण्याएवढी समज आल्यानंतर 'प्रचार' आणि 'विचार' यातला त्याला फरक समजू लागल्यामुळे या विषाचा अंमल कमी झाला आणि मुख्य म्हणजे त्याला जे काही पाजले गेले होते ते 'अमृत' नसून 'विष' होते याची जाणीव झाली. या लेखाचा मथळा "मला समजलेले गांधीद्वेषाचे स्वरूप" असा असता तर तो जास्त समर्पक वाटला असता. हा लेख चांगला लिहिला असला तरी व्यक्तिशः मला आतापर्यंत गांधीजी जितके समजले होते त्यात हा लेख वाचून काही भर पडली नाही. मिसळ्पाववर आलेला हा लेख आणि त्यावर आलेले अनेक सकारात्मक प्रतिसाद वाचून असे वाटते की इथले वातावरण आता बदलायला लागले आहे.
  • Log in or register to post comments

लेखकाला उमजलेले गांधी आणि गोडसे...

बन्या बापु
Fri, 02/01/2013 - 12:19 नवीन
लेख विस्तृत विचार मांडणारा आहे.. त्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.. तरीही हे लेखकाचे मत असल्याने त्याला "गांधीहत्या आणि मी" असे शीर्षक समर्पक नाही. तसेच वाचनातून प्रत्येकाला समजलेले सारखेच असेल असेही नाही. वैचारिक मतभेद असल्यामुळे आपला पास.. बन्या बापु बाकी संजय क्षीरसागर साहेबांची सहमत.. १००० %
  • Log in or register to post comments

बर्‍याच वेळा एकांगी विचार केल्यामुळे

वेताळ
Fri, 02/01/2013 - 12:27 नवीन
दुसरी बाजु विचारात घेतली जात नाही. लेख वाचल्यावर लक्षात येते कि दुसरी बाजु देखिल तितकीच महत्वाची किंबहुना सत्य आहे. गांधीजीं बद्दल माझेही मत तितके चांगले नाही.पण त्याच्यावर टिका करण्या इतपत माझी योग्यता देखिल नाही. गांजीनी काही निर्णय चुकीचे(आपल्यामते)घेतले असले तरी त्यामागे काहीतरी ठोस कारणे असली पाहिजेत.ती कारणे उजेडात येणे महत्वाची आहेत. एक चांगला व दर्जेदार लेख लिहल्याबद्दल राजघराणेंचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

भारत स्वतंत्र झाल्यावर

श्रीगुरुजी
Fri, 02/01/2013 - 14:01 नवीन
भारत स्वतंत्र झाल्यावर "स्वतंत्र भारताला सैन्याची गरज नाही" असे गांधीजींनी लिहिले होते असे वाचले आहे. हे खरे आहे का? हे खरे असल्यास हे अत्यंत भाबडे विधान मानावे लागेल.
  • Log in or register to post comments

गांधीवादी समाजवाद पेक्षा पण

पिंपातला उंदीर
Fri, 02/01/2013 - 15:50 नवीन
गांधीवादी समाजवाद पेक्षा पण भाबडा का भारत-पाकिस्तान-बांगलादेश याना एकत्र करून अखंड हिंदुस्तान निर्माण करण्याच्या उद्दिष्तापेक्षा पण भाबडा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

माझ्या माहितीप्रमाणे

विकास
Fri, 02/01/2013 - 19:37 नवीन
भारत स्वतंत्र झाल्यावर "स्वतंत्र भारताला सैन्याची गरज नाही" असे गांधीजींनी लिहिले होते असे वाचले आहे. हे खरे आहे का? हे खरे असल्यास हे अत्यंत भाबडे विधान मानावे लागेल. गांधीजींच्या "आदर्श राज्याच्या" (ideal state) संकल्पनेत पोलीस आणि सैन्यदलाची गरज नव्हती. पण त्यांनी तसे होणे शक्य नाही हे मान्य करत "कमीत कमी" पोलीस आणि सैन्यदल असावे असे म्हणले होते. "गरज नाही" असे म्हणले नव्हते. मात्र जे नेहमी होते तेच झाले, राजापेक्षा राजनिष्ठ आणि गांधींजींच्या पेक्षा गांधीवादीच जास्त बोलू लागले. त्यातून एक अत्र्यांनी एका भाषणात केलेला विनोद आठवला. शंकरराव देव आणि अत्रे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खांद्याला खांदा लावून लढले. पण एकमेकांशी राजकीय विरोधात कमी नसावेत. गांधीहत्येनंतर मला वाटते शंकरराव देवांसकट काही (promininent) गांधीवादी हे नेहरू-पटेलांकडे ह्ट्ट करू लागले होते की आपल्याला सैन्य नको (कारण गांधीजींचे स्वप्न/इच्छा वगैरे). त्यावर अत्र्यांनी अशी काहीशी टिपण्णी केली. "भारताला सैन्य नको हे त्या महात्म्याने म्हणणे वेगळे आणि (त्यांच्यासारखा पंचा नेसणार्‍या) शंकररावांनी म्हणणे वेगळे... उद्या पाकीस्तान अथवा चीन ने हल्ला केला तर त्यांचे सैन्य काय तुमच्या सैन्यात गुंडाळायचे का?" :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गांधी हत्ये नंतरची दंगल

विकास
Fri, 02/01/2013 - 20:24 नवीन
गांधीहत्ये नंतर विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात जातीय दंगलीचा डोंब उसळला होता. त्यात अनेकांची भिषण पद्धतीने हत्या झाली, लूटमार झाली आणि अनेक घरेदारे उध्वस्त झाली. सातारा आणि सभोवताली तर खूपच वित्त आणि मनुष्यहानी झाली. मुंबईत सावरकर सदनात, डॉ. बाळाराव सावरकरांना ज॑मावाने घरातून बाहेर ओढून इतके मारले की त्याची परीणती त्यांच्या मृत्यूत झाली. सरकारने काही प्रमाणात नंतर मदत केली असे म्हणतात, पण ती सामान्यांपर्यंत पोचली जाण्याची शक्यता नव्हती. (आजही नाही, त्याकाळी तर जातीय तणावात आणि बाबूगिरीत विचारच करायला नको). सगळ्यात गंमत म्हणजे हे ज्यांच्या हत्येमुळे झाले ते अहींसावादी आणि नंतरचे सामान्य जीवनाची हत्या करणारे हत्येकरी हे गांधीटोपीधारी गांधीवादी झाले. गांधीहत्येबद्दल कायम तेच ते विश्लेषण ऐकायला येते. त्याचे इतिहास संशोधन केले जाते. पण महाराष्ट्रातील आणि देशात इतरत्र झालेल्या दंगलीसंदर्भात ना त्या काळात काही चौकशी समिती नेमल्याचे ऐकले नाही, ना त्याचे कोणी इतिहास संशोधन केल्याचे ऐकले नाही अगदी गेला बाजार कोणी नाटक अथवा चित्रपट पण काढल्याचे ऐकलेले नाही. दंगलग्रस्तांना, स्वतःची सातत्याने victim म्हणून प्रतिमा तेवत ठेवायला आणि पर्यायाने तो मुद्दा जळत ठेवणे उचीत वाटले नाही हे एकूण समाजासाठी आणि कालौघात त्या त्या कुटूंबासाठी चांगलेच झाले पण इतर कोणाच मानवतावाद्यांना, इतिहासाच्या विद्यार्थ्याला त्याचे महत्व कसे वाटले नाही? त्याबद्दल कधी कोणी का लिहीत नाही. स्वतंत्र भारतातील आणि ते देखील ज्याला घटनेने असो/नसो लोकप्रेमाने/हक्काने आणि त्याच्या खर्‍याखुर्‍या कर्तुत्वामुळे ज्याला राष्ट्रपिता संबोधले गेले, त्याच्या नावाने हा काळीमा फासला गेला असे वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा