Skip to main content

राष्ट्रपिता

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 30/01/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
महात्मा गांधींची आज पुण्यतिथी. आमच्यातर्फे ह्या राष्ट्रनायकाला श्रध्दांजली ! पण आम्ही , राष्ट्रपिता ( अन तेही भारताचे ? ) , ह्या शब्दावर जोरदार आक्षेप नोंदवत आहोत http://www.bbc.co.uk/hindi/india/2012/10/121026_gandhi_father_ac.shtml कोणतीही असंविधानिक गोष्ट स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिकांवर लादण्याच्या ह्या प्रयत्नाचा आम्ही जाहीर णिषेध करतो . ह्या मुद्द्यावर अ‍ॅडमिन अन इतर सर्वांनी आपली भुमिका मांडावी अशी विनंती आहे . आमची भुमिका : आपण सारे भारतमातेचे सुपुत्र आहोत अन सुपुत्रच राहणार ...राष्ट्रापेक्षा कोणी मोठ्ठा नाही !

वाचने 67675
प्रतिक्रिया 283

प्रतिक्रिया

लाक्षणिक अर्थाने पिता हो. प्रत्यक्ष नव्हे. शब्दाचा अगदी तस्साच्या तस्सा अर्थ घ्यायचा तसा तर भारत देश ही काही खरोखरची व्यक्ती नव्हे. त्यामुळे तिला तरी सर्वांची माता कशाला म्हणायचं? शिवाय राष्ट्राचे पिता म्हणजे आपले सर्वांचे पिता (आपण सर्व मिळून राष्ट्र बनले आहे, तेव्हा त्या अर्थाने आपणच राष्ट्र).. "भारत देश" या संकल्पनेचे पिता असं नव्हे.. इत्यादि अनेक अर्थ लावता येतील.. म्हणून प्रचलित अर्थाने शब्द स्वीकारावेत आणि पुढे चालावे हे उत्तम.

In reply to by गवि

पण हे असंविधानिक आहे ! ह्या उपर काय बोलु ? छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति.. (एकदा असल्या असंविधानिक गोष्टींना प्रोत्साहन मिळायला लागले की मग इतर असंविधानिक गोष्टी पॉप अप व्हायला वेळ लागणार नाही )इतकेच बोलते सध्या !! -- राष्ट्रकाकु गिरीजा

In reply to by प्रसाद गोडबोले

राष्ट्रकाकु गिरीजा
हा जाड्या टायपातील शब्दही तितकाच असंवैधानिक आहे मग!!!

In reply to by बॅटमॅन

हे पहा असे होते हे आमचे विनोद करायला गेले की आम्हाला म्हणायचे होते राष्ट्रपिता( असंविधानिक ) + छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति = राष्ट्रकाकु , राष्ट्रमामा , राष्ट्रआजोबा , राष्ट्रपत्नी , राष्ट्र्राख .... वगैरे वगैरे असंविधानिक गोष्टी येतील असो... माफी असावी ...राष्ट्ररक्षक बॅटम्यॅनराव

In reply to by प्रसाद गोडबोले

राष्ट्ररक्षक बॅटम्यॅनराव नै हो.. ते भाषाभक्षक बॅटम्यॅनराव हैत. कोणतीही भाषा आणि विशेषतः त्यातल्या चुका कच्च्याच खातात!!

In reply to by प्रसाद गोडबोले

महात्मा गांधींची आज पुण्यतिथी. आमच्यातर्फे ह्या राष्ट्रनायकाला श्रध्दांजली ! पण आम्ही , राष्ट्रपिता ( अन तेही भारताचे ? ) , ह्या शब्दावर जोरदार आक्षेप नोंदवत आहोत
असं म्हणताना तुम्हीच त्यांना महात्मा असे संबोधले....'महात्मा'शब्द तरी संवैधानिक आहे का हो ?

In reply to by बॅटमॅन

या भूमिकेचा संविधानाशी काही संबंध नाही. मुळात संविधानात काय लिहिले आहे तेच या बाईंना(!) माहीत नाही. फारतर शब्दशिखंडी शब्दावरुन संविधानशिखंडी हा एक चपखल शब्द सुचत आहे.

In reply to by आजानुकर्ण

नीट वाचत चला , http://www.bbc.co.uk/hindi/india/2012/10/121026_gandhi_father_ac.shtml मंत्रालय का कहना था कि संविधान के अनुच्छेद 8(1) शैक्षिक और सैन्य खिताब के अलावा कोई और उपाधि देने की इजाजत सरकार को नहीं देती.

In reply to by प्रसाद गोडबोले

म्हणजे अशी पदवी देण्याचा अधिकार ’सरकार’ला नाही... लोकांना असू शकतो की... आणि वस्तुस्थिती हीच आहे... हे संबोधन सरकारच्या एखाद्या नोटिफ़िकेशनने दिले गेले नाहीये... लोकांनी दिले असेल.. असू शकेल... लोकमान्य किंवा इतर अनेक हृदयसम्राटांप्रमाणे! घटनेमधे लोकांनीही असे म्हणू नये असे नमूद केले आहे का? बघून सांगा बरं... किंवा वकिलाला विचारून सांगा!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लोकमान्य गं बा टिळक , लोकमान्य अणे याना लोकमान्य या उपाध्या कोणी दिल्या होत्या? त्या तत्कालीन रिवाजानुसार वैधनीक होत्या काय? एक शंका " वाकड्या तोंडाचा गांधी , मैद्याचे पोते , बारामतीचा म्हमद्या " या उपाध्या वैधनीक आहेत का?

In reply to by विकास

+१. लोकमान्य गं बा टिळक, लोकमान्य अणे ही नावे मीही पहिल्यांदाच ऐकतोय ;) (किञ्चित अ‍ॅस्पर्जरग्रस्त) बॅटमॅन.

In reply to by विसुनाना

आणि ह्याच गांधीमुळे भारताची फाळणी झाली..."हिंदु माता-भगिनींनी मुस्लिम अत्याचाकर्त्यांना विरोध करु नये, त्यांचे कालातरांनी विचारपरीवर्तन होईल" असल्या बिंडोक विचारांचा पिता अशी ओळख करुन देऊ शकतो फार फार तर. मागुन कोणी स्वराज्य देत नसतं, ते शिवाजी महाराज म्हणा, सावरकर म्हणा, भगतसिंग, राजगुरु आणि असंख्य स्वातत्र्यसैनिकांच्या त्यागामुळेच मिळु शकतं. असल्या षंढ प्रव्रुत्तीचा नाश करणार्या नथुराम गोडसेंचा विजय असो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

खरं तर तुमचा प्रतिसाद अप्रकाशित करावा का याचा विचार करत होतो... पण नको म्हणलं... राहू दे... तुमचेही विचार लोकांना दिसावेत... मात्र, अनेकांनी नमूद केलंय तसं.... तुम्ही गांधीजींचे साहित्य वाचा, समजून घ्या मग हवी तेवढी टीका करा. सध्या तसे काही तुम्ही केले आहेत असे दिसत नाही. आणि न समजून घेता केलेल्या टीकेला फार किंमत द्यावी असे वाटत नाही. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खुशाल प्रतिसाद अप्रकाशित करु शकताय. बरचं वाचलयं मी गांधी विषयी सुद्धा. आणि तरी सुद्धा मला तिरस्कार वाटतो, आणि मी मरेपर्यंत वाटतं राहाणाराच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गांधीजींचं साहित्य वाचलंय म्हणता? लिहा एखादा लेख, साधकबाधक चर्चा होऊ द्या त्याबद्दल. आहे तयारी? असा बिनबुडाचा तिरस्कार करायला विशेष काही लागत नाही.

In reply to by बॅटमॅन

हॅहॅहॅ! अरे ब्याम्या, सोडून सोड रे... मी गांधीजींनी लिहिलेलं वाचायला सांगतोय आणि हे साहेब गांधींविषयी वाचलेलं आहे असं म्हणत आहेत. छोड दे यार... बच्चा है! ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

गांधीजींचं साहित्य वाचलंय म्हणता? लिहा एखादा लेख, साधकबाधक चर्चा होऊ द्या त्याबद्दल. आहे तयारी? असा बिनबुडाचा तिरस्कार करायला विशेष काही लागत नाही.
१-२ आठवड्याचा वेळ द्या. नक्कीच लिहीन. साधक-बाधक चर्चा नक्की घडऊन आणु.
मी गांधीजींनी लिहिलेलं वाचायला सांगतोय आणि हे साहेब गांधींविषयी वाचलेलं आहे असं म्हणत आहेत. छोड दे यार... बच्चा है
आपण मि.पा. च्या सल्लागार मंडळावर आहात. आपल्याकडुन माझ्या मताचा विचार केला जावा अशी अपेक्षा नाही. मी माझं मत मांडलय, तुम्हाला आ़क्षेपार्ह वाटलं असेल तर तुम्ही अप्रकाशित करू शकता.
आणि छोड दे यार..बच्चा है
सल्लागार मंडळावर असलात म्हणुन शिंग फुटल्यासारखे वागु नये ही विनम्र विनंती...धन्यवाद. ही पोस्ट ही आपण "अप्रकाशित" करु शकता..

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरील प्रतिसाद कर्त्याच्या चारही विधानांशी सहमती. पहील्या २ शी फुल्ल आणि २र्‍या २ शी अर्धवट. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका, अप्रकाशित न करण्याविषयी तुमचा विचार पटतो आहे. सर्वांचे विचार एकच नसणार हेही मान्य. पण तरीही एका बर्‍याच मोठ्या लोकसमूहाच्या दृष्टीने सन्माननीय असणार्‍या व्यक्तीविषयी हा धागा आहे, तेव्हा अगदी विरोध असला तरी शिष्टाचाराच्या एका मर्यादेतच सर्वांनी प्रतिसाद द्यावेत अन्यथा अप्रकाशित करण्याशिवाय उपाय नाही हे या निमित्ताने एकदा सांगावं असं वाटलं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ऐंशी वर्षाच्या निःशस्त्र म्हाताऱ्यावर गोळी झाडणारा तरुण मर्द आणि, ती गोळी झेलणारा म्हातारा षंढ? हे काही पटत नाही बॉ. षंढ म्हणजे स्त्रैण किंवा मर्दानगी न दाखवणारा वगैरे म्हणायचे असेल तर आणखी एक वैद्यकीय शंका मनात येते. गांधींना दोन मुले झाली होती, रीतसर विवाह करुन त्यांनी संसारही केला, त्यामुळे ते षंढ किंवा स्त्रैण होते असे मानायला जागा नाही. मात्र नथुराम गोडसेच्या वैवाहिक किंवा लैंगिक जीवनाबद्दल अशी ठोस माहिती नाही. शिवाय नथुराम गोडसेला लहानपणी नथ वगैरे घालून मुलींप्रमाणे वागवले जात होते म्हणे. (http://articles.timesofindia.indiatimes.com/2008-03-02/india/27764227_1…) त्यामुळे कोणत्याच अर्थाने गांधी षंढ होते हे पटत नाही. टीपः स्त्रीत्वाचा अपमान करण्याचा येथे हेतू नाही. जसा प्रश्न तसेच उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. स्त्रीमुक्तीवाद्यांनी माफ करावे.

In reply to by आजानुकर्ण

गांधीजींना चार मुलं होती, हरीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास. (कस्तुरबांच्या चौथ्या बाळंतपणात त्यांना झालेला त्रास, रक्तस्राव पाहून गांधीजींचे काम-आयुष्यासंदर्भातले विचार बदलले. चौघांपैकी हरीलालचा वडलांशी सर्वात जास्त संघर्ष झाला.) बंदूका उचलणारा, सैन्याचं यशस्वी नेतृत्त्व करणारा, अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याचा सर्वात मोठा नायक, जॉर्ज वॉशिंग्टन (लैंगिक अर्थाने) षंढ होता. पारंपरिक अर्थाचं शौर्य दाखवण्याचा पुरुष असण्याशी किंवा लैंगिक कर्तबगारीशी फार संबंध नसावा हे सांगायला जॉर्ज वॉशिंग्टन किंवा झाशीच्या राणीचं उदाहरण पुरेसं असावं.

In reply to by आजानुकर्ण

मग हिंदु माता भगिनींना अत्याचाराला विरोध करु नका असं सांगणार्याला काय "पुरुषोत्तम" म्हणावं का काय? वैद्यकीय मुद्दा काढलाच नाहीये मी. मला त्याच्याशी काही एक घेणं-देणं नाहीये. मी वैचारीक षंढ पणा बद्द्ल बोलतोय. कदाचीत त्यांना एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करायची सवय असेल. पण हल्लीच्या काळात कोणी एका गालावर मारली तर त्याचे दोन्ही गाल तर रंगवायचेच वरुन ४ शिव्या हासडायच्या. असं वागलं तरच जगता येईल सुखानी. खालची लिंक वाचा मग बोला.. http://www.quora.com/Mahatma-Gandhi/Could-Gandhi-really-have-saved-Bhag… Gandhi could have saved Bhagat Singh’s life if he had wished, but regrettably, he didn’t and wouldn’t, and his failure in saving Bhagat Singh’s life from the gallows leaves a black spot on his political career.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वैद्यकीय मुद्दा काढलाच नाहीये मी. मला त्याच्याशी काही एक घेणं-देणं नाहीये. मी वैचारीक षंढ पणा बद्द्ल बोलतोय. कदाचीत त्यांना एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करायची सवय असेल. पण हल्लीच्या काळात कोणी एका गालावर मारली तर त्याचे दोन्ही गाल तर रंगवायचेच वरुन ४ शिव्या हासडायच्या. असं वागलं तरच जगता येईल सुखानी. नाही नाही हो. यवढं प्रॅक्टीकल आणि रॅशनल बोलायचं नसतं. झालंच तर गुंठेपाटलाने, कोपर्‍यावरच्या गुंडाने, पोलिसाने कसा त्रास दिला यावर बुद्धीवादी लेख लिहावेत. गांधीबाबा तुमच्या देशात काय चालले आहे असा आक्रोश करावा.

In reply to by दीपक साळुंके

एक तर राष्ट्रपती ही "पदवी" नाही ...पद आहे . आणि जर ते पदवी सारखे वापरले जात असेल (तर ते असंविधानिक आहे) ताबडतोब काढुन टाकावे ( अर्थात मा. ही पंचाक्षरी शिवी जोडुन त्याची पदवी करता येईल , त्याला संविधानाची हरकत नसावी बहुधा =)) )

भारतावर ब्रिटीशांचे राज्य आले आणि भारतात अनेक बदल झाले. भारतात इंग्रजी शिक्षणामुळे आणि भारतीय सिंधु पर्यटन परत एकदा करायला लागल्यावर समस्त जगभरात होत असलेले बदल भारतीयांना खुणाऊ लागले. स्वातंत्र्य, समता , बंधुता ह्या मुल्यांची ओळख सुध्दा इंग्रजी सत्ता आल्यावर भारताला नव्याने झाली. १८५७ चा उठाव जो झाला होता तो स्वातंत्र्यलढा नक्कीच नव्हता. तो होता त्या त्या स्थानिक राजांनी दिलेला लढा. त्यावेळेस भावी भारताबद्दल कसलाही समान विचार लोकांमध्ये नव्हता. मात्र विसाव्या शतकाच्या सुरूवातीला हे जगातील बदलाचे वारे भारतात आले. वेगवेगळ्या विचारसरणीच्या लो़कांनी वेगवेगळ्या विचारांनी भाराऊन टाकले. कुणी १४ व्या वर्षी देवीसमोर बसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरेपर्यंत लढा देईन असे म्हणून अभिनव भारताची स्थापना करत होते... तर कुणी सरळ ताश्कंदला जाऊन कम्युनिस्ट पार्टीमधे सहभागी होत होतं. कुणी साऊन्डर्सला गोळ्या मारत होते.. तर कुणी काकोरीला सरकारी खजीणा लुटत होते. कुणी फ्रान्समध्ये राहून देशस्वतंत्र झाला पाहिजे म्हणून लढत होतं तर कुणी मुसोलीनी, हिटलर ते जनरल तोजोंच्या मदतीने भारत स्वतंत्र करू पाहत होतं. तर कुणी तरी भारताच्या खेड्यापाड्यातील जनतेला, अबालवृध्दच नव्हे तर स्त्रीयांनासुध्दा रस्त्यावर येऊन स्वातंत्र्याच्या ओढीने अगदी कायदाही हातात घ्यायला लावत होता. प्रत्येकाचे मार्ग जरी वेगवेगळे होते तरी सर्वांना समताधिष्ठीत लोकशाहीप्रणीत शासनव्यवस्था हवी होती. समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना समान संधी - समान दर्जा याबाबत सर्वांचेच एकमत होते. याला कारण असे होते की सर्व जगात अश्याच चळवळी सर्वत्र सुरू होत्या. या चळवळीच्या यशस्वीतेने त्याकडून प्रेरणा घेण्याची , त्या चळवळींची नक्कल करण्याची, त्यांची मळलेल्या वाटेवरून जायची इच्छा प्रत्येकाची होती. कारण प्रत्येकाला आपल्या मातृभूमीची दास्यातून मुक्ती हवी होती. याच काळात स्वतंत्र झालेल्या देशांचे झेंडे तीन किंवा अधिक रंगांचे होते म्हणून स्वातंत्र्य लढ्यात तिरंगा आला. त्याकाळात जी उपमा देण्याची व्यवस्था बाहेर होती ती सुध्दा आपल्याकडे प्रचलीत झाले. जसे भारताचे मार्टीन ल्युथर किंग, किंवा भारतचे मॅन्चेस्टर आदी. याच काळात आणि याच पध्दतीने जगात चाललेली जी पध्दत होती की एखाद्या व्यक्तीचे कार्य जर एवढे मोठे असेल की त्याचे देशातील नागरिकांनी सतत स्मरण ठेवावे असे असेल तर त्यांना Father of the Nation म्हटल्या जात असे. त्याच पध्दतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता असे संबोधले. लोकांना ते आवडले तेव्हा पासून ते प्रचलीत झाले आहे. भारत देशाला मातृभूमी म्हणने हा एक वेगळा भाग आहे तो बराचसा भावनीक व सांस्कृतीक आहे. मी तसं मानतोही. मात्र या संदर्भात महात्मा गांधीचा राष्ट्रपिता हा उल्लेख जोडणे सर्वथा अनाठायी आहे असं वाटतं. ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पातळीवरच्या आहेत. त्याची सरमिसळ अनावधानेने होत असेल ते आपण थांबवलं पाहिजे, मात्र असं म्हटल्याने आपल्या विचारसरणीच्या विरूध्द असलेला पक्ष हा मुद्दा चलनी नाणे म्हणून वापरत असेल आणि त्यासाठी असा बुध्दीभ्रम तयार केला पाहिजे, असा विचार असेल तर मी त्याची निंदा करतो. शेवटी अश्याच अनाठायी तुलनेचे उदाहरण देतो व थांबतो. गाईला आई म्हणून पुजणारे बैलाचे पुत्र होतात का? असा प्रश्न जसा अनाठाई आणि केवळ बौध्दीक कसरतीसाठी असेल तश्याच स्वरूपाची तुलना भारतमाता व राष्ट्रपिता ही आहे असे मला वाटते. शेवटी एकदा पुन्हा राष्ट्रपिता महात्मा गांधीना श्रध्दांजली देतो. - नीलकांत

In reply to by नीलकांत

१८५७ चा उठाव जो झाला होता तो स्वातंत्र्यलढा नक्कीच नव्हता. तो होता त्या त्या स्थानिक राजांनी दिलेला लढा. त्यावेळेस भावी भारताबद्दल कसलाही समान विचार लोकांमध्ये नव्हता.
याबद्दल असहमत. माझ्या माहितीप्रमाणे हा उठाव सैन्याने केला होता, तसेच अनेक सरदार व राजे त्यात सामील होते. ब्रिटीश अंमल झुगारुन दिल्लीच्या बादशाहास राज्यावर बसवणे हा समान विचार त्यात होता. बाकी कुणाला राष्ट्रपिता म्हणणे हे मलाही पटत नाही. कारण राष्ट्र हे सगळ्या जनतेचे आहे आणि सगळ्या जनतेने त्यांना राष्ट्रपिता म्हणायचे ठरविले आहे का ? तसा मतदारांचा कौल झालाय का ? महात्मा म्हणण्यापर्यंत ठीक आहे. (तो ही ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मला श्री मोहनदास गांधी असे म्हणायचे असेल तर महात्मा म्हणायची सक्ती नसावी किंवा मी तसे म्हणणे म्हणजे त्यांचा अपमान असे पण समजले जावू नये). माझे म्हणणे इतकेच की समजा मी एका समूहाचा भाग आहे. काही चांगले अनूभव आल्याने वगैरे समूहातील काही व्यक्तिंनी कुणा एका क्ष व्यक्तीचा गौरव करणे , उदो उदो करणे ठीक आहे पण सगळ्यांच्या वतीने जर कुणी असे म्हणू लागले की ती क्ष व्यक्ती आपल्या समुहास पित्यासमान वा मातेसमान आहे तर तो माझ्या स्वातंत्र्याचा संकोच होतो. म्हणणार्‍याने स्वतःपुरते म्हणावे मला वा समस्त समूहालच गृहीत धरु नये. मी पित्याला वा मातेला द्यावा तसा आदर (इतर) कुणाला द्यावा/न द्यावा हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे.

"राष्ट्रनायक" संविधानिक आहे की नाही ते तपासून बघितलत का?? संविधानात तशी तरतूद नसल्यास "राष्ट्र"ने सुरु होणार्‍या सगळ्या शब्दांची यादी करून कुठली उपाधी कोणाला द्यावी याबाबत तातडीने संविधान दुरुस्ती करून घेण्यासाठी देशव्यापी चळवळ उभी करायला हवी !!!!

का हो लता मंगेशकरांना 'गानकोकिळा', सुनील गावसकर्/सचिन तेंडुलकरला 'लिटलस्मास्टर' किंवा 'मास्टर ब्लास्टर' अशा उपाध्या संवैधानिक आहेत का?तरीही लोकांनी त्या आपुलकीने त्यांना दिल्या आहेत.तुम्हाला गांधीजींना राष्ट्रपिता म्हणायचे नसेल तर म्हणू नका पण त्याला संवैधानिक असण्या/नसण्याच्या हास्यास्पद मुद्द्यावरून इतका विरोध करायचे कारण आहे?ज्यांना गांधीजींना राष्ट्रपिता म्हणायचे ते म्हणतील आणि ज्यांना म्हणायचे नाही ते म्हणणार नाहीत.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

त्याला संवैधानिक असण्या/नसण्याच्या हास्यास्पद मुद्द्यावरून इतका विरोध करायचे कारण आहे? >>> अहो , केन्द्रिय गृहमंत्रालयाने जे म्हणले तेच मी री-इटरेट केलेय ... गैरसमज नसावा ...मी भगवी दहशतवादी नाहीये हो :( म्हणायचे ते म्हणतील आणि ज्यांना म्हणायचे नाही ते म्हणणार नाहीत. >>>म्हणजे मॉब ने जिथं जसं जमेल तसं संविधान मोडलं तर ते मान्य आहे असा अर्थ लागतोय. जो आपल्याला पटतो . धन्यवाद :)

In reply to by प्रसाद गोडबोले

केंद्रीय गृहमंत्रालयाने तुम्हाला घरी पोष्टकार्ड पाठवून 'गांधींना राष्ट्रपिता म्हणा. न म्हटल्यास तुम्हाला अमुकतमुक वर्षे शिक्षा' वगैरे आदेश पाठवला आहे काय? मग तुमच्यावर गांधींना राष्ट्रपिता म्हटल्याचे कुणी लादले आहे ते सांगा.

In reply to by आजानुकर्ण

तुमच्यावर गांधींना राष्ट्रपिता म्हटल्याचे कुणी लादले आहे ते सांगा.>>कोणी नाही . पण माझ्या माहिती नुसार कोणत्याही असंविधानिक पदव्या देणे हा कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे . वकिलाशी बोलुन कळवते ह्या विषयावर .

In reply to by बाळ सप्रे

मंत्रालय का कहना था कि संविधान के अनुच्छेद 8(1) शैक्षिक और सैन्य खिताब के अलावा कोई और उपाधि देने की इजाजत सरकार को नहीं देती.

In reply to by प्रसाद गोडबोले

थोडक्यात सरकार ही पदवी देऊ शकत नाही एवढाच या वाक्याचा अर्थ आहे. इतर कोणी ही पदवी देऊ शकत नाही असे सरकारने सांगितलेले नाही.

In reply to by बाळ सप्रे

शक्य आहे. ते अजून आहेत असं अधूनमधून वाचायला मिळतं. पण संविधान लागू होण्यापूर्वी (पक्षी २६ जानेवारी १९५० पूर्वी) हा गुन्हा घडल्यामुळे बहुधा खटला भरता येणार नाही. आता रेट्रोस्पेक्टिव्ह कायदे लागू करणारे आता राष्ट्रपती झाले आहेत. त्यामुळे ते खटला भरण्याची सूचना करू शकतात. पण पुन्हा ते सुभाषबाबूंचे प्रांतबंधू असल्याने बहुधा असे करणार नाहीत.

गेल्या २-३ महिन्यांमध्ये दै.सकाळमध्ये एक बातमी वाचल्याचं आठवतंय - उत्तर प्रदेशातील एका तरुणीने माहितीअधिकाराअंतर्गत 'म.गांधी ह्यांना राष्ट्रपिता संबोधले जातो तो ' ह्याबद्दल ते योग्या आहे? असा काहीसा प्रश्न विचारला होता. त्याचे सरकारी उत्तर 'हे संविधानाच्या विरोधी आहे' असं काहीसं आल्याचं बातमीमध्ये नमुद केलं होतं. कोणाला सापडल्यास ह्या बाबीचा दुवा इथे देता येईल काय?

राष्ट्रनायीका, राष्ट्रखलनायक, राष्ट्रविनोदवीर,राष्ट्रनायकमित्र, राष्ट्रनायीकासखी इत्यादीं विषयी देखील अधिक वाचायला आवडेल.

केवळ विरोधासाठी मिसळपावचा वापर होऊ नये. यासाठी हा प्रतिसाद संपादित करीत आहोत. सदस्यांना आपले मत मांडण्याचा अधि़कार आहे. त्याचा गैरवापर होऊ नये. ही अपेक्षा आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हा हा हा =)) आमचा "गडद उमराव" पिच्चर पाहिला नाहीत वाट्टे...विदूषकाचा ड्वायलॉक आहे तो. बाकी तुमचा परतिसाद पाहून डोळे पाणावले, कीव आली. चालू द्या. एकेकाची जाण.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बाळा मना नथुराम तुझा आर्दश आहे ना ? पन तु कधी बंदुकीचा आवाज कानाजवळ एकला आहेस का ? जो नथुराम ८० वर्षाच्या निशस्त्र माणसावर गोळ्या झाडतो,तो तुझा आर्दश होय रे,थुत तुझ्या जिंदगीवर्,जी व्यक्ती वयोवृद्धांचा आदर करु शकत नाही ते राष्ट्राच्या भल्याचा विचार करणार होय......

In reply to by बाबा पाटील

मिपाच फेसबुक होतय,संपादक मंडळ माफ करा.पन काही प्रतिसाद सहनशक्तीच्या पलिकडचे आहेत.

In reply to by बाबा पाटील

बाळा मना नथुराम तुझा आर्दश आहे ना ?
निर्विवाद सत्य.
पन तु कधी बंदुकीचा आवाज कानाजवळ एकला आहेस का ?
नाही. वेळ आली नाही कधी. त्याचा काय संबध इथे?
जो नथुराम ८० वर्षाच्या निशस्त्र माणसावर गोळ्या झाडतो,तो तुझा आर्दश होय रे,थुत तुझ्या जिंदगीवर्. जी व्यक्ती वयोवृद्धांचा आदर करु शकत नाही ते राष्ट्राच्या भल्याचा विचार करणार होय......
ये तो कुछ जादा ही हो गया. आदर कर्तुत्ववान व्यक्तींचा करावा. राष्ट्राचं भलं? माझी लायकी नाही हो राष्ट्राचं भलं-बिलं करायची. कुठे आपले थोर, प्रामाणिक, सत्यवादी, नम्र (आमच्याकडे देशंबधु-भगिनिंचे प्राण घेणार्‍याला पण आदरानी श्री. कसाब, हाफिज साहेब असं म्हणतात बरं का), निरपेक्ष, कार्यक्षम, गांधीवादी, "आदर्श"वादी", स्वच्च आणि देशाचं भलं करायला पहाणारे नेते आणि कुठे माझ्यासारखा नालायक, उद्धट आणि नीचं मनुष्य. ते माझं काम नाहीच.
थुत तुझ्या जिंदगीवर्
आवरा. सेम टु यु म्हणायचा मोह आवरतोय. धन्यवाद. आणि आपलीच कुठली तरी कानफटात वैगरे मारायची पोस्ट वाचली होती कुठेतरी. आता ते तुम्हीच का दुसरे कोणी ते आठवत नाहीये. जर मला ती सापडली तर आपण "आदर्श" गांधीवादावर चर्चा करु. :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नथुराम गोडसेला पाठिंबा देणे वा त्यांच्या विचारांशी सहमत असणे गुन्हा नक्कीच नाही. नथुरामने जे केले त्यात त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ होता असे वाटत नाही. पण ते केल्याने विशेष काही साध्य झाले असेही नाही. माझ्या मते नथुरामांनी श्री गांधी यांचा वैचारिक प्रतिवाद करायला हवा होता. पण तसे न करता गोळी झाडल्याने नथुरामांच्या विचारांचा प्रचार न होता ते लहान ठरले आणि गांधी हुतात्मा झाले. राजकारणातला कच्चेपणा ...आणि काय म्हणणार !!

गांधींनी कधीही मला 'राष्ट्रपिता' म्हणा असा आग्रह जनतेकडे धरला नाही. सुभाषबाबूंनी गांधींचे राष्ट्रातील स्थान ओळखून त्यांना ही उपाधी दिली. ही पदवी संविधान येण्यापूर्वीच गांधींना मिळाली होती. संविधानाचा आधार घेऊन असे रेट्रोस्पेक्टिवली काही बदलता येत नसावे. आणि हो राष्ट्रपिता जर असंवैधानिक असेल तर लोकमान्य, स्वातंत्र्यवीर, हिंदूहृदयसम्राट(!), सेनापती वगैरे पदव्याही असंवैधानिकच आहेत. सगळ्याच पदव्यांचा एकदम निकाल लावू या ? कसे? राष्ट्रप्रमुखाबाबत तुमचे हे मत वाचून एकंदर पातळी लक्षात आली. चालू द्या.
अर्थात मा. ही पंचाक्षरी शिवी जोडुन त्याची पदवी करता येईल , त्याला संविधानाची हरकत नसावी बहुधा

In reply to by आजानुकर्ण

आमदार , खासदार पासुन अगदी सरपंच नगर्सेवक लोक निव्वृत्त झाला नंतर / पद गेल्या नंतरही पदापुढे मा. लावुन त्याचा गैरफायदा घेतात ही सत्य परिस्थिती आहे . वाटल्यास पुरावे देते . इथे प्रत्येक वळणावणळावर फ्लेक्ष बोर्ड लागलेत ... उगाच डोळ्यावर कातडे ओढुन घेण्यात काय अर्थ ?