Skip to main content

राष्ट्रपिता

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 30/01/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
महात्मा गांधींची आज पुण्यतिथी. आमच्यातर्फे ह्या राष्ट्रनायकाला श्रध्दांजली ! पण आम्ही , राष्ट्रपिता ( अन तेही भारताचे ? ) , ह्या शब्दावर जोरदार आक्षेप नोंदवत आहोत http://www.bbc.co.uk/hindi/india/2012/10/121026_gandhi_father_ac.shtml कोणतीही असंविधानिक गोष्ट स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिकांवर लादण्याच्या ह्या प्रयत्नाचा आम्ही जाहीर णिषेध करतो . ह्या मुद्द्यावर अ‍ॅडमिन अन इतर सर्वांनी आपली भुमिका मांडावी अशी विनंती आहे . आमची भुमिका : आपण सारे भारतमातेचे सुपुत्र आहोत अन सुपुत्रच राहणार ...राष्ट्रापेक्षा कोणी मोठ्ठा नाही !

वाचने 67675
प्रतिक्रिया 283

प्रतिक्रिया

In reply to by सुनील

हे असेच जेंव्हा मिपाच्या सुरवातीच्या काळात चालू झाले होते, त्यावेळेस वैतागललेल्या तत्कालीन मालकाने या आणि अशाच काही विषयांवर लिहू नये असे म्हणले होते.

In reply to by विकास

हा हा हा आणि तेव्हा तथाकथित गांधीप्रेमाने भारलेल्या सदस्यांनी खूपच आगपाखड केली होती.

In reply to by विकास

नक्की कोणत्या विषयावर लिहू नये असे म्हटले होते? (आणि कोणत्या विषयांवर लिहिल्यावर "मिपा आज पावन" झाला, अशा भावना व्यक्त केल्या होत्या?) अर्थात, हे खाजगी स्थळ असल्यामुळे मालक-चालकांना अशी एकतर्फी बंधने घालता येतातच वा घालू असे इशारे देता येतात! म्हणूनच शिळ्या कढीला आता पुन्हा पुन्हा उत आणत बसण्यापेक्षा, ते जुने धागे वाचा. तिथे हे सगळे आधीच चघळून झाले आहे, असे सांगायचे होते. असो.

जुन्या धाग्याच्या लिंक्स उसवल्या, एका दमात सगळं वाचून काढलं, बरं वाटलं. ह्या जुन्या धाग्यांना उसवण्यासाठी वहिदा,ऋषिकेश तसेच इतरांनी ते दुवे दिले म्हणूनच हे शक्य झालं. थत्ते, इंद्रा तसेच इतरांचे संदर्भपूर्ण पण संयत प्रतिसाद आवडले, चर्चेचा असा दर्जाच मिसळीला चव आणतो त्याचा प्रत्यय आला.

गांधींच्या उपोषणाची कारणे कोणती असे मी गांधीप्रेमी मिपाकरांना प्रश्न विचारला होता. ह्यावर मला खरड वहीत ही खरड व कारण मिळाली. शांततेसाठीच उपोषण होते यासाठी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली १३० जणांची शांतता समिती नेमण्यात आली होती. १७ जानेवारी रोजी दिल्लीत त्यांची जाहिर सभा झाली. त्यात पुढील ७ अटी मान्य करण्यात आल्या १. हिंदू मुस्लिम, शीख व इतर धर्मिय दिल्लीत भावाभावाप्रमाणे आणि सौहार्दाने राहण्याची हमी देत आहोत. दिल्लीतील मुसलमानांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित राहील अशी प्रतिज्ञा करीत आहोत. २. गेल्या वर्षी प्रमाणे ख्वाजा कुतुबुद्दीन मझचा उरूस होईल. ३. सब्जीमंडी, करोलबाग पहाडगंज व अन्य भागांत मुसलमानांना नेहमीप्रमाणे व्यवहार पार पाडता येतील ४. हिन्दुंनी व्यापलेल्या मशिदी मुसलमानांना परत केल्या जातील आणि दिल्लीत मुसलमानांना म्हणून ठेवलेला जो भाग मोकळा आहे त्याचा हिन्दु कब्जा करणार नाहीत. ५. जे दिल्लीतुन बाहेर गेलेले मुसलमान परत येऊ इच्छितात त्यांना हरकत असणार नाहि व त्यांना पूर्वीचे रोजगार करण्यास प्रतिबंध केला जाणार नाहि ६. हे सारे प्रयत्न वैयक्तीक रित्या करू. यात शासनाची अथवा लष्करची मदत घेतली जाणार नाहि. ७. महात्म्यानी आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा व आपले उपोषण संपवावे आणि आम्हास नेतृत्त्व व मार्गदर्शन करावे. त्यावर माझे मत मी असे व्यक्त केले , ज्या कारणासाठी उपोषण करण्यात आले असे येथे नमूद केले आहे , ते सर्व प्रथम दर्शनी मला थोतांड वाटते. ही कारणे खरी वाटत नाहीत. मुळात ह्यात जी कारणे दिली आहेत , तिचा सरळ अर्थ असा होतो की हिंदू जनतेने भारतात मुस्लिम बांधवांची जप्त केलेली जमिनी , मालमत्ता किंवा मशिदी परत द्याव्या व त्यांना भारतात शांततेने जगू द्यावे ही मागणी दंगलीच्या पार्श्वभूमीवर चूक की बरोबर हा मुद्दा सध्या विचारात घेतला नाही तरी , सामान्य भारतीय हिंदू जनतेकडून मुसलमान लोकांना भारतात निर्भयपणे राहण्यास हमी मिळावी असा त्याचा अर्थ होता. आता ह्यावर समस्त हिंदू भारतीय जनता ज्यांची माथी भडकली आहेत , त्यांच्या वतीने स्वयंघोषित १३० जणांची शांतता कमिटी नेमली जाते ह्यात प्रसाद तमाम जनतेच्या वतीने शांततेची हमी देतात . हे किती हास्यापद आहे , मुळात आजच्या काळात ह्यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का उद्या पाकिस्तान १३० जणांची कमिटी नेमून पाकिस्तान मधील अल्प संख्यांक समुदायाची त्यांच्या सुरक्षित जगण्याची हमी तमाम मुस्लिम पाकिस्तानी जनतेच्या वतीने घेत असेल तर त्यावर विश्वास ठेवावा का एखादे पुस्तक हा काही आधार होत ठरत नाही , मुळात प्रसाद ह्यांचे गांधी ह्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे हे म्हणणे म्हणजे मानभावी पणाचा कळस आहे, मुळात हिंदूंचा मुस्लिम बांधवांच्या विषयी उद्रेक उफाळून येईल पर्यत गांधी मुस्लिम पुरस्कृत हिंसेवर तोडगा काढू शाळे नाही , त्याला उत्तर देणाऱ्या हिंदूला ते थांबवू शकले नाही , म्हणून जर समजा त्यांनी हिंदूनी शांतता राखावी व मुस्लिमांच्या मशिदी परत द्याव्या अश्या ७ मागण्या केल्या . तर एकच प्रश्न असा उद्भवतो प्रसाद व त्यांच्या १२९ सदस्यांना असे का वाटले गांधी ह्यांचे मार्गदर्शन भारतीय जनतेला विशेषतः हिंदू व शीख जनतेला उपयोगी ठरेल , कारण गांधी सुरवातीपासून हिंसेच्या विरुद्ध होते तरी पहिले मुसलमान व मग हिंदू , शीख ह्यांनी हिंसा केली , मुळात माझा सुरवातीपासून हा मुद्दा आहे की ५५ कोटी चा मुद्दा नाही , तर जनतेच्या भावनेचा कदर न करणे व काश्मीर वर हल्ला झाल्यावर त्यांनी भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने काहीही विशेष न करणे व त्यांच्या मनात पाकिस्तानला ५५ कोटी देणे जे त्यावेळच्या सरकारसह जनतेला नामंजूर होते , ह्या गोष्टी त्यांना हटवादी , व जनता च सरकारला इमोशनल ब्लेक मेल करणारा ठरवतात लोकशाहीत एक नागरिक जनतेच्या भावांची कदर न करता आपल्या मागण्या सरकार कडून वदवून घेतो , अरे मुळात गांधी ह्यांचे उपोषण स्थगित करावे म्हणून ही १३० मंडळी दंगलीत होरपळलेल्या हिंदू व शीख बांधवांचे प्रतिनिधित्व करत होती का खुद भारतात मुसलमानी हिंदूची हिंसा केली अगदी कुर्ल्यात व मुंबईत ,मुस्लिम बहुल भागात हिंदूची कत्तल झाली ह्यात माझ्या आजोबांचे मित्र मारल्या गेले , तेव्हा भारतात मुसलमानांनी शांतता राखावी अशी मागणी उपोषणात का बरे मांडली नाही कदाचित मुसलमान आपल्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावतील अशी भीती वाटली असेल. फाळणी नंतर भारतात राहण्याच्या निर्णय घेणाऱ्या मुस्लिम बांधवांचा मला आदर वाटतो , गांधींना पर्याय म्हणून त्यावेळी त्यांना मुस्लिम लीग चे छत्र लाभले , मुळात बोस व जीना एकेकाळी ज्या पक्षात होते त्या पक्षातून मुस्लिम दुरावण्यास गांधी व त्यांचे अनुयायी जबाबदार आहेत. मुळात धर्म व राजकारण अशी गल्लत खिलापत चळवळीला पाठिंबा देऊन गांधी ह्यांनी केली , नेताजी ह्यांनी आझाद हिंद सेनेतील इंग्रजांशी एकनिष्ठ मुस्लिम सैनिकांना देशासाठी लढण्यासाठी प्रवृत्त केले ह्यात नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गांधी त्याच्या उमेदीच्या काळात सुद्धा भारतीय सैनिकांचे इंग्रजांच्या प्रती निष्ठा कमी करू शकले नव्हते , नेताजींनी मुस्लिम सैनिकांना देशाचा हवाला दिला धर्माचा नाही , आजच्या काळात सुद्धा त्यांचे विचार भारतात बाणवला जातात मी प्रथम भारतीय मग धर्म येतो , तेथे गांधीच्या आश्रमात मुस्लिम फक्त अभक्ष्य भक्षण करतात म्हणून राहू शकत नव्हते अशी ही ह्या महात्म्यांची थोरवी ,

In reply to by निनाद मुक्काम …

ह्यांनी आझाद हिंद सेनेतील इंग्रजांशी एकनिष्ठ मुस्लिम सैनिकांना देशासाठी लढण्यासाठी प्रवृत्त केले ह्यात नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गांधी त्याच्या उमेदीच्या काळात सुद्धा भारतीय सैनिकांचे इंग्रजांच्या प्रती निष्ठा कमी करू शकले नव्हते , नेताजींनी मुस्लिम सैनिकांना देशाचा हवाला दिला धर्माचा नाही , आजच्या काळात सुद्धा त्यांचे विचार भारतात बाणवला जातात ह्याच नेताजींनी गांधीजींना राष्ट्रपिता म्हणणे हा निव्वळ योगायोगच असू शकेल काय? श्रीलंका येथील ब्रिटीश विरोधी चळवळीच्या नेत्यांकडून गांधींना बोलावण्यात आले होते. त्याचा हा दुवा. Mahatma Gandhi's visit to Chilaw, Sri Lanka

In reply to by अवतार

श्रीलंकेत त्यांनी गांधी ह्यांना बोलावले असेल , आज त्यांच्या इतिहासात कोणा एका व्यक्तीला महात्मा बनवून त्याला श्रीलंका स्वातंत्र्य प्राप्तीचे फुकटचे श्रेय दिले जात नाही , दुसरे महायुद्ध हे वसाहत वाद संपवणारे ठरले ,हे जागतिक सत्य श्रीलंकन इतिहासात सांगितले जाते , युद्ध हे नेहमी बहुआयामी परिणाम कारक असते , अफगाण मध्ये रशिया युद्ध झाले ह्यात अलकायदा व तालिबान ची निर्मिती झाली , पाकिस्तान अण्वस्त्र सज्ज होतांना डोळे मिटून घेतलेल्या अमेरिकेच्या पैश्याच्या जोरावर काश्मिरी दहशतवाद पोसला , त्यांनी खलिस्तान चळवळीला पाठबळ पुरवले , पण हे युद्ध जेव्हा संपले तेव्हा रशिया फुटला आणि भारताला कधी नव्हे तो साम्यवादी विळख्यातून मोकळा श्वास घ्यायला मिळाला. आणि मग मनमोहन ब नरसिंह राव ह्यांनी खर्या अर्थाने भारताची आर्थिक व परराष्ट्र धोरण वसवले. थोडक्यात दुसरे महायुद्ध हे जगाचा भूगोल बदलण्यात यशस्वी झाले. नेताजी ह्यांना नवीन पक्ष स्थापन करावा लागला देशाच्या स्वतंत्रता संग्राम मध्ये त्यांचे व गांधी ह्यांचे विचार व मार्ग वेगवेगळे होते , गांधी ह्यांना त्यांनी महात्मा असे संबोधले तसे पहिले तर गेल्या दोन चार वर्षात मोदी गुजरात मध्ये गांधी ह्यांचा हटकून उल्लेख करतात, तोही अत्यंत आदराने तेव्हा राजकारणात केलेले वक्तव्य हे तेही एका नेत्याने दुसर्‍या नेत्याबद्दल हे तत्कालीन असू शकते ,किंवा त्यामागे गर्भित अर्थ असतात. आता वाजपेयी ह्यांनी १९७१ च्या विजयानंतर ज्यांना आपल्या हिंदू देवतेची उपमा दिली त्यांच्या विषयी त्यांचे मत आणीबाणी नंतर नक्कीच बदलले होते. तुम्हाला गांधी ह्यांच्या विषयी नेताजी ह्यांची मुलगी अनिता बोस ह्यांचे मत जाणून घ्यायचे आहे. अनिता बोस ह्यांनी आपल्या वडलांना कधीच पहिले नाही , मात्र आपली आई जी नेताजी ह्यांची पत्नी असण्यासोबत आधी त्यांची सेक्रेटरी होती , व नेताजी ह्यांचे भारताविषयी मत , भारतीय नेत्याच्या विषयी मत व त्यांच्या भारताच्या विषयी भविष्याबाबत योजना ह्या सर्व नेताजी ह्यांच्या पत्नीस माहिती होत्या , नेताजी , नेताजी हयंचे जर्मनी मधील कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. पुढे नेताजी ह्यांची कन्या अनिता बोस भारतात नेताजींच्या कुटुंबियांकडे नियमितपणे जायची, एवढेच कशाला नेहरू ह्यांच्या शेवटच्या आजारपणात एक आठवडा त्यांना नेहरू ह्यांनी त्यांना वास्तव्यास बोलावले होते, तेव्हा नेहरू ह्यांनी आपल्या जुन्या मित्राबाबत अनेक आठवणींना उजाळा दिला. कदाचित १९६२ च्या नंतर नेहरू ह्यांचा आपल्या सशस्त्र क्रांती करणाऱ्या मित्रांची आठवण होणे ह्यामागे काव्यगत न्याय होता. एवढे सांगण्याच्या मागे एवढेच की अनिता बोस आपल्या वडलांना न भेटून सुद्धा तुमच्या आमच्या पेक्षा अधिक जाणत होत्या , त्यांनी रेडीफ मेल ला दिलेल्या मुलाखतीत गांधी वोज नो सेंट आणि नेताजी ह्यांच्याविषयी अनेक मत व्यक्त केली आहेत ,

In reply to by निनाद मुक्काम …

जनता करत असते. जिथे जनता लढते तिथे फौजा निकामी होतात. १८५७ ची क्रांती ही सशस्त्र क्रांतीच होती. परंतु जनतेचा पाठींबा न मिळाल्याने त्यातून परिणामकारक काहीही निष्पन्न झाले नाही हा इतिहास आहे. १६८९ मध्ये संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर रायगड पडला. औरंगजेबची लाखोंची खडी फौज आणि प्रचंड आर्थिक ताकद यांच्या समोर पुरेशी शस्त्रे नसतांनाही सामान्य जनता लढली ती कोणत्या प्रेरणेवर? जिथे आदिलशाही आणि कुतुबशाही सारखी राज्ये टिकू शकली नाहीत तिथे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी प्राण पणाला लावून लढण्याची उर्मी जनतेमध्ये कशी निर्माण झाली? प्रश्न हिंसा आणि अहिंसेचा नाही. गांधींना कोणी काय म्हणावे हा देखील नाही. सत्य पाहण्याचा आणि ते समजून घेण्याचा आहे. क्रांती ही सामान्य जनतेच्या पोटात पेटलेल्या आगीतून निर्माण होते. बंदुकीच्या गोळ्यांतून नाही. ज्या क्रांतीला असा व्यापक पाया मिळत नाही ती यशस्वी होत नाही. श्रीलंकेत गांधींना स्वातंत्र्य प्राप्तीचे श्रेय दिले जात नाही. पण तेथील स्वातंत्र्य चळवळ उभी राहण्यात गांधींचे योगदान नाकारता येत नाही. त्याशिवाय त्यांना तिथे बोलावण्याचे कारण नव्हते. गांधीजी श्रीलंकेत आलेच नव्हते असा इतिहास देखील तिथे शिकवला जात नाही. ज्या नेत्याच्या पाठी जनता उभी नसेल तो फार काळ नेता राहू शकत नाही. गांधींशी मतभेद झाल्यावर नेताजींनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडूक जिंकली खरी. पण हा पराभव आपला वैयक्तिक पराभव आहे असे गांधींनी जाहीर केल्यावर नेताजींचा काँग्रेसमधील पाठींबा कमी होऊ लागला होता. नेहरू पटेल सुभाष यांच्याकडे गांधीजींची माणसे म्हणूनच बघितले जात होते. गांधींच्या विरोधात उभे राहिल्यानंतर ह्यांच्यापैकी कोणालाही राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्ररीत्या नेता होणे कठीण होते. एका वृद्ध माणसाकडे कुठलीही आर्थिक, सैनिकी ताकद नसतांना त्याचा इतका प्रभाव का पडत असावा ह्याचे उत्तर फार सोपे नसले तरी अवघड निश्चितच नाही. गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून स्वत:ची राजकीय पोळी जर नेताजींना भाजून घायची असती तर मुळात गांधींशी भांडून काँग्रेसमधून बाहेर पडण्याची त्यांना काहीच गरज नव्हती. हेच काँग्रेसमध्ये राहून करणे त्यांना शक्य होते. पण तसे झालेले नाही. त्यामुळे ह्या विधानात गर्भित अर्थ शोधण्याची गरज नाही. नेताजींच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद सेना विजयी व्हावी असे गांधींना मनातून वाटत होते हे मौलाना आझाद यांनी इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथात नमूद केले आहे. आणि दुसरे महायुद्ध हेच जर स्वातंत्र्य मिळण्याचे कारण मानायचे असेल तर मग नेताजी आणि इतर वीर क्रांतिकारक ह्यांच्या त्यागाचेही काहीच मोल राहत नाही. ह्या सर्वांना स्वातंत्र्याचे श्रेय देणे हा देखील भंपकपणाच म्हणावा लागेल. राज्यसत्ता ही सैन्यावर नाही तर लोकांच्या निष्ठेवर अवलंबून असते. जनतेच्या निष्ठा गमावून बसलेले राज्यकर्ते निव्वळ सैन्याच्या आधारावर राज्य करू शकत नाहीत. ब्रिटीश इंडियाच्या ज्या भागांवर गांधीजींचा प्रभाव कायम राहिला ते सगळे भाग स्वतंत्र भारतात सामील झाले आणि ज्या ठिकाणी गांधीजींचा प्रभाव कमी झाला ते भूभाग भारतापासून तोडले गेले हे ऐतिहासिक सत्य आहे. संस्थाने खालसा करण्याचे श्रेय निश्चितच सरदार पटेल यांचे आहे. पण त्या संस्थानांतील जनतेच्या मनात स्वतंत्र भारतात सामील होण्याची इच्छा कोणी निर्माण केली हे उघडपणे मांडले जात नाही. साम्राज्यवादी राज्याचा प्रतिनिधी असलेला न्यायाधीश ज्यांचे महात्म्य मान्य करतो त्यांना देशभक्तीचे प्रमाणपत्र इतरांकडून घेण्याची आवश्यकता नाही. एरवी गल्लीतील ब्रॅडमन देखील सचिन तेंडूलकरच्या चुका दाखवतच असतात.

In reply to by अवतार

आपला काहीतरी गैरसमज झाला आहे , गांधीजी ह्यांचे ह्या लढ्यात योगदान कोणीच नाकारत नाही , सशस्त्र क्रांती , त्यांचे अनुयायी व क्रांतिकारक ह्या सर्वांचे समान योगदान होते , दुसरे महायुद्ध हे वसाहत वाद संपवायला कारणीभूत ठरले हे देखील निखालस सत्य आहे , आणि तुम्ही जर नेताजींचे मत विचारत असाल आधी हे लक्षात ह्या , ह्या जगात शाश्वत असे काहीच नसते , हेच मताच्या बाबतीत लागू पडते , तर मत हे परिवर्तनीय असते , आज महाराष्ट्राचे मुख मंत्री व मोदी हे घोटाळ्यात अडकले नसल्याने त्यांच्या बद्दल माझी प्रतिमा चांगली आहे , मात्र उद्या त्यांचे नाव एखाद्या घोटाळ्यात उघडकीस आले तर माझे मत नक्कीच बदलेले , टिळकांना त्यांच्या हयातीत जीना हे पुढे फाळणीचे खलनायक ठरतील अशी कल्पना सुद्धा नव्हती , सारे जहासे अच्छा ही कविता लिहिणारे कवी इकबाल पुढे वेगळे होण्याची भाषा करतील असे कोणालाच वाटले नव्हते , वाजपेयी ह्यांनी १९७१ नंतर इंदिरा गांधी ह्यांचे कौतुक केले त्यांना देवीची उपमा दिली पुढे आणीबाणी नंतर त्यांचे मत बदलले , नेताजी ह्यांचे मत बदलू शकते , मुळात जो भारताचा भाग गांधीजींच्या प्रभावाखाली नव्हता तो त्यांची विचारसरणी न मानणाऱ्या मुस्लिम लीग च्या प्रभावाखाली होता , ह्या लोकांनी हिंसा देशावर लादली ह्या हिंसेवर गांधी ह्यांच्याकडे उत्तर नव्हते. आजच्या काळात त्यांची फाशी ची शिक्षा नको हि विचारसरणी अफजल गुरु ला फाशी दिल्यावर आपल्या जनतेने फटाके फोडून आनंद व्यक्त करून साजरा केला , गांधी हे राजकीय नेते होते व इतर नेत्यांप्रमाणे त्यांचे भारताच्या स्वतंत्र संग्रामात योगदान आहे , पण ते महात्मा नक्कीच नव्हते , साने गुरुजी , स्वामी विवेकानंद , विनोबा भावे , र धो कर्वे त्यांचे वडील , संत गाडगे महाराज , असे अनेक द्रष्टे महात्मे ह्या देशात होऊन गेले ,ज्यांनी ह्या देशातील समाज सुधारणा करण्यासाठी समाजातील एका मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून त्यासाठी आपले जीवन वेचले , आपल्या निवडलेल्या जीवन ध्येयाशिवाय उगाच आपली अनेक विषयांवर असलेली मते जनतेवर लादली नाहीत. क्रांती जनता करत असते ही पुस्तकी वाक्ये झाली सध्या आपली भारतीय जनता पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवाद लष्करी मार्गाने सोडवावा ह्या मताची आहे , आतंकवादी फाशीवर चढवावे ह्या मताशी आहे , पाकिस्तानबाबत सामान्य भारतीय जनता अहिंसक मार्गाने उपोषण करून प्रश्न सुटेल ह्या मताची बिलकुल नाही आहे , व देशात हिंसेचा म्हणजे क्रिमिनल रेट पहिला तर गांधी ह्यांची तत्वे किती ठिसूळ होती व सध्या तिचा अपवाद वगळता वास्तविक जीवनात कोठेच वापर केला जात नाही हे दाहक सत्य तुम्ही नाकारत असाल , तर मग हे राम असेच म्हटले पाहिजे. आणि संभाजी राजाच्या मृत्यूनंतर जनता लढली ती काही अहिंसक मार्गाने नव्हे तर सशस्त्र लढा देऊन ह्यातून तुम्हीच म्हटल्या प्रमाणे १८५७ चा लढा यशस्वी झाला नाही पण औरंगजेब विरुद्ध सशस्त्र लढा यशस्वी झाला ह्याचा अर्थ सशस्त्र लढ्याला जनतेची साथ असेल तर मुघल सम्राट ज्याचे वशंज इंग्रजांच्या हून जास्त शतके दिल्ली वर सत्ताधीश होते तो पराभूत झाला , आता प्रश्न असा निर्माण होतो की इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा संपूर्ण भारतात का बरे एकच वेळी उभारल्या गेला नाही , संपूर्ण भारतभर गांधी पोहोचले हे त्यांचे यश आहे हे मी मानतो बहुतांशी भारतात त्यांचे कमी अधिक प्रमाणात अनुयायी निर्माण झाले , त्यांनी सशस्त्र लढा उभारला असता तर इंग्रज अमेरिकेतून जसे पळाले तसे भारतातून पळाले असते , आता अमेरिकेतून इंग्रज हाकलल्या गेले ते सुद्धा वॉशिंग टन ह्याच्या नेतृत्वाखाली अमेरिकन जनतेने उपोषण व अहिंसक मार्गाने आपला लढा चालवला. असेच म्हणावे लागेल.

In reply to by निनाद मुक्काम …

प्रश्न हिंसा आणि अहिंसेचा नाही. गांधींना कोणी काय म्हणावे हा देखील नाही. सत्य पाहण्याचा आणि ते समजून घेण्याचा आहे. नेताजी ह्यांचे मत बदलू शकते अगदी बरोबर आहे. ह्याच नेताजींनी एके काळी गांधीजी हे आउटडेटेड फर्निचर आहे असे म्हटले होते. त्याच नेताजींनी नंतर त्यांना राष्ट्रपिता म्हटले. आउटडेटेड फर्निचर ते राष्ट्रपिता हा प्रवास आश्चर्यजनक आहे. आपले मत देशावर लादणे. लादणे ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय असावा? एका वृद्ध माणसाकडे कुठलीही आर्थिक, सैनिकी ताकद नसतांना त्याचा इतका प्रभाव का पडत असावा ह्याचे उत्तर फार सोपे नसले तरी अवघड निश्चितच नाही. क्रांती जनता करत असते ही पुस्तकी वाक्ये झाली ज्यांच्यासाठी क्रांती करायची त्यांचाच पाठींबा नसेल तर त्या क्रांतीला मुळातच काही अर्थ राहत नाही. क्रांती म्हणजे प्रस्थापित राजकीय व्यवस्था उलथून नवीन राजवट स्थापन करणे. जनतेच्या सहभागाशिवाय हे करणे कसे शक्य आहे ह्याचा उलगडा होणे कठीण आहे. अगदी अलीकडे अण्णा हजारे यांनी जे आंदोलन केले ते शस्त्रांच्या कमतरतेमुळे नव्हे तर जनतेच्या उदासीनतेमुळे अयशस्वी ठरले. पण औरंगजेब विरुद्ध सशस्त्र लढा यशस्वी झाला लढा सशस्त्र होता म्हणून नाही तर जनतेची त्या लढ्याला साथ होती म्हणून यशस्वी झाला. हे तुम्हीच मान्य केले आहे. मुळात जो भारताचा भाग गांधीजींच्या प्रभावाखाली नव्हता तो त्यांची विचारसरणी न मानणाऱ्या मुस्लिम लीग च्या प्रभावाखाली होता स्वतंत्र मुस्लिम मतदार संघ १९०९ मध्ये अस्तित्वात आले. त्याला टिळकांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १९१६ मध्ये लखनौ करार करून अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर गांधींनी मुस्लिम लीगशी एकही करार केला नाही. १९४६ साली सत्तांतराची वेळ जवळ आली तेव्हा दंगली घडल्या. मुस्लिम लीगला मिळणाऱ्या बहुसंख्य मुस्लिम मतांच्या आधारावर पाकिस्तान अस्तित्वात आले. दंगलींच्या आधारावर नव्हे. संपूर्ण भारतभर गांधी पोहोचले हे त्यांचे यश आहे हे फक्त गांधीच करू शकले कारण ह्या देशातील जनतेची मानसिकता त्यांनी नीट ओळखली होती. जी साधने गांधींना उपलब्ध होती तीच साधने इतर नेत्यांना देखील उपलब्ध होती. तरीही लोक गांधींच्याच पाठी का उभे राहिले ह्यातच त्यांचे मोठेपण आहे. जे नेते प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम जनतेच्या पुढ्यात ठेवतात त्यांच्या पाठी जनता उभी राहते. संपूर्ण जनता सशस्त्र स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊ शकत नाही हे सत्य सर्वांनाच कळत होते. अशा लढ्याचे परिणाम काय झाले असते हे काँग्रेसच्या नेत्यांना चांगलेच कळत होते. ब्रिटिशांना भारतातून घालवणे हे महत्वाचे होतेच. पण स्वतंत्र भारत एकसंध ठेवणे हे त्याहूनही जास्त महत्वाचे होते. स्वतंत्र भारतात सामील होण्याला केवळ मुस्लिम लीगचाच नव्हे तर बऱ्याच हिंदू संस्थानिकांचाही विरोधच होता. शिखांचीही स्वायत्ततेची मागणी पुढे आली होती. द्रविडीस्तानची मागणी केली जात होती. अशा परिस्थितीत नि:शस्त्र पण बहुसंख्य असलेल्या जनतेच्या रेट्याच्या दडपणाशिवाय आजचा विशाल एकसंध भारत अस्तित्वात येऊ शकला नसता. हे सगळ्यात महत्वाचे कार्य गांधीजींनी केले आहे. त्यांना महात्मा म्हटले नाही तरी आधुनिक भारत घडवण्यात त्यांचे योगदान हे इतर सर्वांपेक्षा मोलाचे होते हे निखळ सत्य आहे.

In reply to by अवतार

एका वृद्ध माणसाकडे कुठलीही आर्थिक देशात तेव्हा मुठभर उद्योजक होते त्यातील बजाज सारखे असंख्य गांधी भोवती घुटमळत होते. आउटडेटेड फर्निचर ते राष्ट्रपिता हा प्रवास आश्चर्यजनक आहे. आउटडेटेड फर्निचर ही पदवी संविधानात बसते का गांधी व नेताजी एकमेकांच्या देशभक्ती विषयी साशंक नव्हते मात्र त्याच्या स्वतंत्रता मिळवण्याच्या मार्ग वेगवेगळे होते , आणी गांधी ह्यांचा अहिंसक तत्वे निदान भारतात तरी काळाच्या ओघात नष्ट झाली , मुळात गांधी ह्यांनी तत्कालीन समाजाला अहिंसक व भेकड तत्वाच्या गुंगीत ठेवले , पुढे त्यांच्या अवती भवती बालपण घालवलेल्या इंदिराजी नी आपले वडील व गांधी ह्यांच्या उलट राजकारण केले , ह्यात १९७१ चे युद्ध असो किंवा आणीबाणी जेथे त्यांच्यावर महात्म्याच्या महात्म्य प्रभाव टाकू शकले नाही तेथे आजच्या घडीला भारतीय जनतेच्या वर हा प्रभाव कसा राहीन. लढा सशस्त्र होता म्हणून नाही तर जनतेची त्या लढ्याला साथ होती म्हणून यशस्वी झाला. हे तुम्हीच मान्य केले आहे. मी हे मान्य केले आहे पण तुम्ही मान्य केले आहे का इंग्रजांच्या विरुद्ध गांधी ह्यांनी बहुसंख्य जनता त्यांच्या पाठीशी असतांना सशस्त्र लढा का नाही उभारला हाच तर महत्त्वाचा मुद्दा आहे , मुळात गांधी ह्यांनी सशस्त्र क्रांती चे नुसते नाव काढले असते तर अंदमान मध्ये त्यांची तेलाच्या घाण्याला १२ तास दिवसाचे ड्युटी लागली असती , आणि तेथे नरकयातना भोगून ते भारतात जिवंत आले असते तर त्यांना त्यांचे महात्म्य जनतेला दाखविण्याची संधी मिळाली असती , पण इंग्रजांनी गांधी ह्यांचा अंदमान च्या काळा पाण्याच्या शिक्षेसाठी विचार सुद्धा केला नाही , नेताजी एकटे देशाबाहेर पडले , व देशाच्या साठी सशस्त्र क्रांती उभारली , त्यावेळी जर ते इंग्रजांच्या हातात सापडले असते तर त्यांची रवानगी सुद्धा अंदमान येथे नक्की होती किंवा भगत सिंह सारखा फास नशिबी होता , त्यांना आश्रमांत बसून सत्याचे प्रयोग करणे जमले नाही , गांधींनी मुस्लिम लीगशी एकही करार केला नाही. १९४६ साली सत्तांतराची वेळ जवळ आली तेव्हा दंगली घडल्या. मुस्लिम लीगला मिळणाऱ्या बहुसंख्य मुस्लिम मतांच्या आधारावर पाकिस्तान अस्तित्वात आले. दंगलींच्या आधारावर नव्हे. तुमच्या लिहिण्याचा तुम्हाला अर्थबोध झाला आहे का अशी शंका आली. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सत्तांतर जवळ आले नि दंगली झाल्या म्हणजे स्वतंत्र पाकिस्तान साठी दंगल झाली , मुळात जेथे मुस्लिम लीग ची सत्ता होती तेथेच प्रामुख्याने दंगली झाल्या पण पंजाबात व बंगाल मध्ये ह्या दंगली होत होत्या तेव्हा मुस्लिम लीग पुरस्कृत होत्या तेव्हा ह्या दंगलीत जे हिंदू , शीख मरत होते किंवा बलात्कार होत होते तेथे गांधींच्या पक्षाची सत्ता नव्हती थोडक्यात त्या भागात गांधी ह्यांचा प्रभाव नव्हता तेव्हा जर हिंदू व शीख समुदायाला गांधी वाचवू शकत नव्हते तर त्यांना प्रतिकार करण्यापासून गांधी का परावृत्त करत होते ,अहिंसेचा फुकटचा सल्ला देण्याचा त्यांना काय अधिकार , इंग्रजांनी लष्कराचा वापर करण्यास नकार दिला तेव्हा हिंदू व शीख ह्यांनी हिंसेला कसे उत्तर द्यावे जेथे सत्तेवर असलेला मुस्लिम लीग दंगेखोरांना पुरस्कृत करत होता. ह्यांना शेळीचे दुध पियुन , सत्याचे प्रयोग करून शांतता राखण्याचे आव्हान करायला काय जाते , ज्याचे जळते त्याला कळते. बहुसंख्य मुस्लिम असणारा भागात आपण हिंसा केली तर गांधी आणि त्यांची अहिसंक तत्वे आपले काहीही वाकडे करू शकणार नाही हि मुस्लिम लीग ला खात्री होती म्हणूनच त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला ,हे तुमच्या लक्षात आले आहे का थोडक्यात हिंसा ही अहिंसेवर प्रभावी ठरली उद्या त्याच वेळी शीख समुदाय जास्त असलेल्या भागात त्यांनी हिंसा सुरु केली असती तर ह्याच अनुषंगाने पुढे धर्म हाच एक मुद्दा न राहता प्रत्येकाने प्रादेशिकता ह्या मुद्यावर हिंसा सुरु केली असती तर .... ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे इंदिरा गांधी ह्यांनी बांगला देश निर्मितीच्या वेळी बी बी सी च्या आगाऊ पत्रकाराला हेच उत्तर दिले त्याने विचारले तुम्ही लष्करी कारवाई का केली. तेव्हा इंदिरा जी म्हणाल्या आमच्या समोर हिंसा , बलात्कार होत होते ते नुसते पाहून आम्ही गप्प बसायचे का तुम्ही का नाही ज्यू लोकांची हिंसा झाली तेव्हा गप्प बसला , आता मुस्लिम लीग च्या हिंसेला इंग्रजांनी लष्करी हस्तक्षेप नाकारला तेव्हा त्यांच्या हिंसेला उत्तर देणे हे जनतेच्या हातात होते , जेथे वेळप्रसंगी गवताला देखील भाले फुटतात त्या देशात मुस्लिम लीग च्या गाव गुंडांना उत्तर देणे आपल्याला सहजशक्य होते.

In reply to by निनाद मुक्काम …

देशात तेव्हा मुठभर उद्योजक होते गांधींभोवती त्या काळचे सर्वच राजकारण आणि समाजकारण फिरत होते. त्यातच हे उद्योजक देखील होते. हे उद्योजक गांधीजींना वैयक्तिक मदत करत नव्हते. काँग्रेस या संघटनेला आर्थिक मदत करत होते. वर म्हटल्याप्रमाणे जी साधने गांधींना उपलब्ध होती तीच साधने इतर नेत्यांना देखील उपलब्ध होती. तरीही लोक गांधींच्याच पाठी का उभे राहिले ह्यातच त्यांचे मोठेपण आहे. आउटडेटेड फर्निचर ही पदवी संविधानात बसते का संविधानात काय बसते आणि काय नाही याचा विचार करायचा झाला तर इतर अनेक लोकांच्या पदव्या रद्द कराव्या लागतील. संविधानात वंदे मातरम म्हणण्याचीही सक्ती नाही. ते म्हणायला नकार देणारे देशद्रोही नाहीत. हे मान्य करण्याची ज्यांची तयारी असेल त्यांनी संविधानाचा कीस पाडायला हरकत नाही. मी हे मान्य केले आहे पण तुम्ही मान्य केले आहे का वर म्हटल्याप्रमाणे प्रश्न हिंसा आणि अहिंसेचा नाही. गांधींना कोणी काय म्हणावे हा देखील नाही. जे अंदमानात १२ तास तेलाच्या घाण्यावर काम करत होते त्यांच्या सुटकेसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि स्वत: गांधीजींनीही ब्रिटीश सरकारला विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी अहिंसेचा विचार केला नाही. गांधीजींनी जी आंदोलने केली ती आपल्याला कोणती शिक्षा होणार याची पर्वा न करता केली. ते काही राजकीय स्टंट नव्हते. सशस्त्र लढा का नाही उभारला सशस्त्र लढा कोणाच्या विरोधात उभारायचा होता? भारतात ब्रिटीशांची संख्या फक्त तीन लाखांच्या आसपास होती. इतर सर्वच ठिकाणी भारतीयच होते. हे सर्वच भारतीय अत्यंत निष्ठेने ब्रिटीश साम्राज्याचे रक्षण करत होते. अशा परिस्थितीत सशत्र लढ्याचे परिणाम काय झाले असते? इतकी साधी गोष्ट ज्यांना कळत नाही त्यांनी भारताचा इतिहास नीट समजून घ्यावा. पुरातन भारताचा इतिहास हा एकसंध भारताचा इतिहास नाही. अल्लाउद्दिन खिलजीपासून ते पानिपतपर्यंत आणि पोर्तुगीजांपासून ते ब्रिटीश साम्राज्यापर्यंत नजर टाकली तर कुठेही परकीय आक्रमणाचा प्रतिकार एकमुखाने झालेला दिसत नाही. अशा मानसिकतेतून आधुनिक राष्ट्रवाद कसा काय उभा राहणार होता? आज ज्यांना हिंसा करण्याची खुमखुमी आली आहे त्यांना हे हिंसा करण्याचे बळ कुठून प्राप्त झाले हा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारून बघावा. ज्याचे जळते त्याला कळते. माझे आजोबा हे कराचीला राहत होते. पाकिस्तान निर्मितीच्या काळात त्यांना त्यांचे राहते घर आणि नोकरी सोडून कुटुंबासह भारतात परतावे लागले. इथे आल्यावर इतर निर्वासितांप्रमाणे त्यांना देखील मुंबईच्या फुटपाथवर काही दिवस काढावे लागले. माझे वडील आणि त्यांची इतर भावंडे तेव्हा खूपच लहान होती. तेव्हा फाळणीच्या जखमा काय असतात हे मला चांगलेच माहित आहे. ज्याचे जळते त्यालाच कळते ह्याचा अर्थ मला कोणी शिकवू नये. ब्रिटीशांच्या मूळ योजनेप्रमाणे त्यांनी ज्या संस्थानांकडून सत्ता काबीज केली होती त्यांच्याकडे सत्ता सोपवून परत जाण्याचा त्यांचा उद्देश होता. तसेच भारताला वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आले होते. दुबळे केंद्र सरकार आणि शक्तिशाली प्रांतिक सरकारे अशा रचनेचा किती भयानक परिणाम भारतावर झाला असता ते वेगळे सांगण्याची गरज नसावी. ह्या योजनेला विरोध झाला नसता तर माझ्या आजोबांसारख्या असंख्य निर्वासितांना कायम निर्वासित म्हणूनच जगावे लागले असते. ही योजना जिन्ना यांनी मान्य केली असतांनाही नेहरूंनी उधळून लावली. हे गांधींच्या पाठींब्याशिवाय शक्य नव्हते. ज्यांच्यावर मुस्लिम अनुनयाचे आरोप होतात त्यांनी हिंदूंच्या हिताचा विचार करणे हे आश्चर्यच म्हटले पाहिजे. अहिंसेचा फुकटचा सल्ला देण्याचा त्यांना काय अधिकार फुकटचा सल्ला अहिंसेचा असला काय किंवा हिंसेचा असला काय तो फुकटचाच असतो. दुसऱ्यांना चिथावणी देऊन स्वत: कपडे सांभाळण्याचे महान कार्य करणाऱ्यांच्या पाठी कोणीही उभे राहत नाही. दंगली थांबवण्यासाठी अनवाणी पायांनी कोण फिरत होते हे जगजाहीर आहे. अशा वेळी हिंसेचे समर्थन करणारे नेमके काय करत होते? आपल्या जीवाला धोका आहे हे उघड झाले असतांनाही जे पोलिस संरक्षण नाकारण्याची हिम्मत दाखवू शकतात त्यांनी दिलेला सल्ला हा अव्यवहार्य म्हणता येईल पण फुकटचा नक्कीच म्हणता येत नाही. गांधींचा प्रत्येक विचार व्यवहार्य होता, शंभर टक्के बरोबरच होता असा माझा दावा नाही. किंबहुना स्वत: नेहरूंनीच गांधीप्रणीत अर्थव्यवस्थेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पण ज्या आदर्शाच्या दिशेने मानव समाजाला वाटचाल करायची आहे तो आदर्श गांधींपेक्षा फार वेगळा असेल असेही वाटत नाही.

In reply to by अवतार

@तरीही लोक गांधींच्या पाठी का उभे राहिले ह्यातच त्यांचे मोठेपण आहे. बहुसंख्य मुसलमान तर मुस्लिम लीग च्या पाठी उभे राहिले व पाकिस्तान मध्ये म्हणूनच गांधींना हिंदूंचा नेता मानले जाते भले स्वतः गांधीनी स्वतःला तसे समजले नाही तरी , आणि आपण म्हटले तसे त्या काळचे सर्वच राजकारण आणि समाजकारण फिरत होते, थोडक्यात व्यक्ती केंद्रित व्यवस्था निर्माण झाली होती, व त्याच्या पक्षात ही परंपरा आजही पाळली जाते, आणि एकाच व्यक्ती भवती ह्या खंडप्राय देशाचे राजकारण चालावे हे सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने तेव्हाही व आजसुद्धा योग्य नाही आहे , @. दंगली थांबवण्यासाठी अनवाणी पायांनी कोण फिरत होते हे जगजाहीर आहे. अशा वेळी हिंसेचे समर्थन करणारे नेमके काय करत होते? त्यांचे अनवाणी फिरणे हिंसा थांबवू शकले नाही , बलात्कार सुद्धा दंगल थांबवू शकले नाही आणि देशाची फाळणी थांबवू शकले नाही , हे गांधी ह्यांचे अपयश होते. मुळात मुस्लिम लीग ने इंग्रजांच्या सहाय्याने हातमिळवणी करून गांधी व त्यांच्या अनुयायांना हातोहात फसवले,, आझाद ह्यांनी आपल्या एका भाषणात इंग्रजांच्या नादी लागून तुम्ही देश तोडत आहात ह्याचे परिणाम वाईट होतील हे निक्षून सांगितले , पण तेव्हा वेळ निघून गेली होती , गांधी व त्यांचे अनुयायी ह्या सर्व प्रकरणात राजकारणाच्या सर्वच पातळीवर साफ निष्फळ ठरले , हिंसा अहिंसेवर प्रभावी ठरली व देश तुटला , म्हणूनच गांधी हे महात्मा ठरत नाहीत , ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लढणारे एक स्वातंत्र्यसैनिक होते जसे सशस्त्र क्रांतिकारक होते , व्यक्ती गांधींचे अनेक विचार जेथे त्यांच्या अनुयायांनी मानले नाही व आजच्या काळात तर त्यांचा भारतात नगण्य प्रभाव आहे , ज्या देशात बुद्ध जन्मला त्याचे विचार , आचार त्याचे अनुयायी आजही जगभरात अनेक देशांमध्ये निष्ठेने पाळले जातात ,तो खरा महात्मा उगाच महात्मा शब्दाचे अवमूल्यन करू नये. गांधी , नेताजी , भगत सिंह आणि बाबू गेनू सारेच एका विचारधारेचे पाईक होते.सारेच भारत मातेची लेकरे होते , राष्ट्राचे सुपुत्र होते , त्यांना उगाच पिता बनवू नका.

In reply to by निनाद मुक्काम …

थोडक्यात व्यक्ती केंद्रित व्यवस्था निर्माण झाली होती ज्या देशाला स्वत:चे सरकार नाही, संविधान नाही त्या देशातील जनतेचा साम्राज्यवादी सत्तेविरुद्धचा लढा हा व्यक्तीकेंद्रितच असतो. हा लढा सशस्त्र मार्गाने झाला असता तरी व्यक्तीकेंद्रितच झाला असता. नेताजींचा लढा देखील व्यक्तीकेंद्रितच होता. स्वतंत्र भारतात जी घराणेशाही निर्माण झाली त्याचा संबंध गांधींशी जोडणे हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखे आहे. लोकशाही विषयी गांधींचे हे विचार आहेत:- My notion of democracy is that under it, the weakest shall have the same opportunities as the strongest…. No country in the world today shows any but patronizing regard for the weak…. Western democracy, as it functions today, is diluted fascism…. True democracy cannot be worked by twenty men sitting at the center. It has to be worked from below, by the people of every village. त्यांचे अनवाणी फिरणे हिंसा थांबवू शकले नाही बंगाल आणि दिल्ली येथील दंगली कोणामुळे थांबल्या याचे उत्तर इतिहासाने दिलेले आहे. ज्यांचे प्रयत्न अपुरे पडतात त्यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो, हेतूंवर नाही. मुस्लिमबहुल भागांत हिंदूंनी मुस्लिमांना मारल्यावर मुस्लिम हातावर हात धरून स्वस्थ बसले असते असे ज्यांना वाटते त्यांना हिंदूंची कितपत काळजी आहे हे उघड आहे. जिथे आमचे सैन्य अपुरे पडले तिथे गांधीजी हे one man army असल्याचे खुद्द ब्रिटीश व्हाईसरॉयने जाहीर केले. देशाची फाळणी थांबवू शकले नाही , हे गांधी ह्यांचे अपयश होते जिन्ना यांना १६ मे ची योजना का मान्य होती आणि नेहरूंनी गांधींच्या पाठींब्याने ती योजना का उलथून टाकली हे कळले की असले प्रश्न पडत नाहीत. फाळणीचा प्रस्ताव हा स्वत: गांधीजींनी अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीसमोर मांडला आणि मान्य करवून घेतला. केवळ नेहरू, पटेल यांना हे गांधींशिवाय साध्य करणे अशक्य होते. मुस्लिम लीगला जे हवे होते ते देण्याची काँग्रेसच्या नेत्यांची तयारी नव्हती म्हणून फाळणी झाली. दंगलींना घाबरून नव्हे. हिंसा अहिंसेवर प्रभावी ठरली अन्यायाचा प्रतिकार करण्याची दुर्दम्य इच्छा जनतेमध्ये निर्माण होणे हे महत्वाचे आहे. हिंसा-अहिंसा ही नंतरची गोष्ट आहे. शत्रूशी लढण्याची ज्यांची सिद्धताच नसते त्यांच्या हाती शस्त्रे देऊनही काही उपयोग नसतो. अल्लाउद्दिन खिलजीच्या आठ हजारांनी यादवांच्या लाखांची धूळधाण उडवली तेव्हा गांधीजी जन्माला आले नव्हते. गांधी हे महात्मा ठरत नाहीत गांधींना कोणी काय म्हणावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यांना महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हटलेच पाहिजे अशी सक्ती नाही तसेच महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हणूच नये अशीही सक्ती करता येत नाही. गांधींपासून किती देशांतील लोकांनी प्रेरणा घेतली आहे हे सांगण्याची गरज नाही. ज्यांचे नेतृत्व जनतेला मान्य असते त्यांच्याच बाबतीत यश-अपयशाची शक्यता निर्माण होते. ज्यांचे नेतृत्वच जनतेला मान्य नाही त्यांच्या यशालाही किंमत नसते आणि अपयशालाही महत्व नसते.

In reply to by अवतार

@ज्या देशाला स्वत:चे सरकार नाही, संविधान नाही त्या देशातील जनतेचा साम्राज्यवादी सत्तेविरुद्धचा लढा हा व्यक्तीकेंद्रितच असतो. अमेरिकेत त्यांचा लढा यशस्वी झाला पण जॉर्ज तेथे महात्मा बनला नाही. मुस्लिम लीगला जे हवे होते ते देण्याची काँग्रेसच्या नेत्यांची तयारी नव्हती म्हणून फाळणी झाली. दंगलींना घाबरून नव्हे. ह्या अर्थाने खलिस्तान चळवळीच्या नेत्यांना हवे ते सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांची तयारी नव्हती म्हणून देशाची फाळणी झाली का नेताजींचा लढा देखील व्यक्तीकेंद्रितच होता. सशस्त्र क्रांती ही व्यक्ती केंद्रित असती हे मान्य आहे ,निदान ह्यापुढे भारताचा इतिहास पाकिस्तान नेहमी आक्रमण करणार आणि भारत बचाव करत राहणार असे चित्र दिसले नसते. भारतचे स्वतःहून पहिले आक्रमण करणार नाही अशी अनेक धोरणे आपल्या परराष्ट्र नीतीत आली नसती , गांधी हे इतर राजकीय नेत्यासारखे नेते होते व सामान्य माणूस चुका करतो तसे नेते करतात. त्यांचे पाय मातीचे असतात. हे एकदा जाणून घेतले आपण व्यक्ती पूजा करणे बंद करू, सशस्त्र क्रांती ही व्यक्ती केंद्रित असती हे मान्य आहे ,निदान ह्यापुढे भारताचा इतिहास पाकिस्तान नेहमी आक्रमण करणार आणि भारत बचाव करत राहणार असे चित्र दिसले नसते. भारतचे स्वतःहून पहिले आक्रमण करणार नाही अशी अनेक धोरणे आपल्या परराष्ट्र नीतीत आली नसती , गांधी हे इतर राजकीय नेत्यासारखे नेते होते व सामान्य माणूस चुका करतो तसे नेते करतात. त्यांचे पाय मातीचे असतात. हे एकदा जाणून घेतले आपण व्यक्ती पूजा करणे बंद करू, पण गांधी ह्यांनी सशस्त्र क्रांतीला पाठिंबा दिला असता तर मुस्लिम लीग ची स्वतंत्र देश निर्माण करण्याच्या कल्पनेला वेळीच साम, दंड , भेद वापरून ठेसता आले असते , देशाची अखंडता कायम राहावी म्हणून अनवाणी पायाने हिंडून शांततेची भीक हिंस्र लांडग्यांच्या पुढे मागायची वेळ आली नसती , आणि पाकिस्तान निर्माण झाला तरी दंगली चालू होत्या वर काश्मीर समस्या निर्माण झाली , नेभ ळत अहिसंक नेतृत्व असल्यामुळे पाकिस्तानची हि हिंमत झाली. जिथे आमचे सैन्य अपुरे पडले तिथे गांधीजी हे one man army असल्याचे खुद्द ब्रिटीश व्हाईसरॉयने जाहीर केले. तुम्हीपण राव भलतीच कमाल करतात. देऊन देऊन कोणाचा दाखला दिला ह्याच इंग्रजांवर मौलाना आझाद ह्यांनी मुस्लिम समाजाला संबोधत एका भाषणात ह्याच्या नादाला लागून तुम्ही पाकिस्तान निर्माण केला असे म्हटले आहे , हे भाषण खूप महत्त्वाचे ह्यासाठी आहे की ह्यात त्यांनी पाकिस्तान चे पुढे काय भविष्य असेल ह्याबाबत काही मुद्दे सांगितले होते. आणि ते पुढे खरे ठरले , सध्या पाकिस्तानात आझाद ह्यांच्या ह्या भाषणाचा आधार देत त्यांची भविष्यवाणी दुर्देवाने पाकिस्तान बाबत खरी ठरली ह्या अर्थी कार्यक्रम करण्यात आला. क्लिप १२, ४७ पासून भाषण ऐका. भारत व पाकिस्तान मधील दोन्ही बाजूने इंग्रजांना मुस्लिम व हिंदू मध्ये फाळणी दरम्यान संशयित म्हणून पहिले जाते, क्लिप १२, ४७ पासून भाषण ऐका.

In reply to by निनाद मुक्काम …

प्रश्न हिंसा आणि अहिंसेचा नाही. गांधींना कोणी काय म्हणावे हा देखील नाही. हे वारंवार सांगतो आहे. त्याबाबत अधिक चर्चा नको. पण जॉर्ज तेथे महात्मा बनला नाही गांधींना कोणी काय म्हणावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यांना महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हटलेच पाहिजे अशी सक्ती नाही तसेच महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हणूच नये अशीही सक्ती करता येत नाही. हे देखील आधीच सांगितले आहे. तसेच अमेरिकेत जॉर्ज वॉशिंगटन आणि त्याच्या बरोबरीने जे स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले होते त्यांना फाउंडिंग फादर्स ऑफ द युनायटेड स्टेट्स असे संबोधण्यात येते. हे संबोधन राष्ट्रपिता या संबोधनापेक्षा तत्वत: कसे निराळे आहे याची उकल कृपया करावी. भारत स्वतःहून पहिले आक्रमण करणार नाही गांधींना ज्या प्रकारची लोकशाही अपेक्षित होती त्या मार्गाने नेहरू आणि पटेल गेले नाहीत. संस्थाने खालसा करतांना सैनिकी कारवाई करायला ते कचरले नाहीत. युनायटेड नेशन्स ने १९४८ मध्ये युद्धबंदीचे आवाहन केल्यावरही भारतीय सैन्य मागे आले नव्हते. शस्त्रसंधी १९४९ मध्ये झालेला आहे. ज्यांचे प्रयत्न अपुरे पडतात त्यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो, हेतूंवर नाही. गांधी ह्यांनी सशस्त्र क्रांतीला पाठिंबा दिला असता सशस्त्र क्रांतीसाठी त्यावेळी किती लोक तयार होते हे सर्वांनाच माहित आहे. त्याचे परिणाम काय झाले असते हे देखील वरच सांगितले आहे. परत तीच चर्चा नको. आपण व्यक्ती पूजा करणे बंद करू संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे याबाबत दुमत नाही. गांधी हे संविधानापेक्षा मोठे आहेत ही भूमिका चुकीची आहे. तसेच गांधींना विरोध करणारे, त्यांच्या खुनाचा कट रचणारे हे ही संविधानाच्या वर नाहीत. त्यांचेही पाय मातीचेच होते हे देखील मान्य व्हायला हरकत नसावी. देऊन देऊन कोणाचा दाखला दिला हे त्यांचे वैयक्तिक मत नसून ती वस्तुस्थिती आहे. दाखला वस्तुस्थितीच्या आधारे दिला आहे. ह्याच्या नादाला लागून तुम्ही पाकिस्तान निर्माण केला सशस्त्र क्रांती करणाऱ्या नेताजींनी जेव्हा जिन्ना यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी मुस्लिम लीगला "ब्रिटीश सरकारपेक्षा अधिक काहीतरी" देण्याची तयारी दर्शवली होती. हे "अधिक काहीतरी" काय असू शकेल याचा अंदाज करता येऊ शकतो. सुरेंद्रनाथ बानर्जी ते टिळक आणि गांधींपासून ते नेताजींपर्यंत सर्वच नेते मुस्लिम लीगला मिळणारा मुस्लिम जनाधार काढून तो काँग्रेसच्या पाठी कसा उभा करावा ह्या एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत होते. १९१६ मध्ये लखनौ करारात लीगला जे मिळाले त्यानंतर १९४७ पर्यंत लीगची एकही मागणी काँग्रेसने मान्य केली नाही म्हणून फाळणी झाली. आम्ही त्यांच्याकडे गेलो पण त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली असे जिन्ना म्हणत होते त्याचा हा अर्थ आहे. कोट्यावधी जनतेचे प्रश्न हे निव्वळ शस्त्रांचा वापर करून सोडवता येत नाहीत. त्यासाठी राजकारणच करावे लागते. कोट्यावधी जनतेला मारत सुटणे हा पर्याय व्यवहार्यतेच्या चौकटीत कसा बसवायचा ह्याचे उत्तर ज्यांना सापडले आहे त्यांनी तो पर्याय जरूर वापरून पाहावा.

In reply to by अवतार

सत्य परिस्थिती अशी आहे की मुस्लिम बहुसंख्य भागात जेथे मुस्लिम लीग ची सत्ता होती तेथे त्यांनी हिंदू , शीख ह्यांचे खून व बलात्कार सुरु केले ते थांबवणे गांधी ह्यांच्या हातात नव्हते ,मात्र जेव्हा हिंदू व शीख चवताळून उठले तेव्हा त्यांना थांबवण्यात गांधी अग्रेसर होते , बहुसंख्य मुस्लिम दंगलकर्ते हे जीना ह्यांचे समर्थक असून गांधी त्यांना कोणत्याही प्रकारे थांबवू शकले नाही. जीना फाळणी शिवाय दुसरे काही बोलत नव्हते, तर नेहरू ,गांधी पटेल हे फाळणीच्या विरोधात होते , अश्यावेळी अचानक एडविना ह्यांनी नेहरू ह्यांना दंगलीत होणारे मृत्यू व हानीचा दाखला देऊन फाळणीसाठी राजी केले , माउंटबेटन वर १९८६ साली बीबीसी ने एका टेलीविजन सिरीज केली त्यात ह्या घटनेचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे , एडविना व नेहरू ह्यांचे मधुर संबंध त्यांनी ह्यात स्पष्ट पणे दाखवले आहेत , माझ्यामते हे सत्य असल्याशिवाय आपल्यास एका बड्या अधिकाऱ्यांशी अशी खोटी बदनामी ते कशाला करतील , म्हणूनच आझाद ह्यांची त्यांच्या भाषणात माउंट बेटन ह्यांना खलनायक संबोधत त्याने नेहरू व गांधी ह्यांना फाळणीला राजी केले , दोन्ही पक्ष आपापल्या मतावर ठाम होते व दंगल अव्याहत पणे सुरु होती , गांधी ह्यांचे दंगल थांबण्याचे प्रयत्न अपुरे होते कारण जेव्हा हिंदू व शिखांनी प्रतिकार करायला सुरवात केली तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाणार हे पाहून फाळणीसाठी मान्यता देण्यात आली , गंमत म्हणजे ह्याच माउंटबेटन ला नेहरू ह्यांनी स्वतंत्र भारतात पहिला गव्हर्नर म्हणून नेमले मात्र माउंटबेटन ह्यांची इच्छा असूनही जीना ह्यांनी त्यांना पाकिस्तानचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात साफ नकार दिला , म्हणूनच पाकिस्तान मध्ये जीना ह्यांचा शब्द अंतिम होता तर काश्मीर वर हल्ला झाला तेव्हा नेहरू ह्यांना काश्मीर मध्ये सैन्य पाठविण्यात नकार देणारे हेच माउंटबेटन होते, गांधी हतबल होऊन हा तमाशा पाहत होते , आता जीना ह्यांनी काश्मिरात त्यांचे सैन्य घुसले ते काय गांधी ह्यांनी उपोषण करून परत जाणार नव्हते , मुळात त्या जीनची एवढी हिंमत झाली कारण त्यांना आपल्या तत्कालीन नेभळट अहिंसक नेतृत्वावर पूर्ण विश्वास होता जो आपल्या नेत्यांनी खोटा पडू दिला नाही. मुळात जीना ह्यांनी उद्दामपणे पाकिस्तानात हिंसा सुरु ठेवली व काश्मीरवर आक्रमण केले तेव्हा गांधी ह्यांच्या हाताबाहेर परिस्थिती गेली होती कारण काश्मिरात घुसलेल्या पाकिस्तानी सैन्य व पाकिस्तानात होणारे हत्याकांड गांधी कोणत्याही परिस्थितीस थांबू शकत नव्हते. मुळात जो जीना दंगलीला जबाबदार आहे त्याच्याशी ही मंडळी चर्चा करत होती , त्याचवेळी ज्यू हत्या कांडाच्या नंतर जेव्हा हिटलर चा पाडाव झाला तेव्हा नाझी अधिकाऱ्यांना शोधून शोधून मारल्या गेले , मात्र भारत स्वतंत्र झाला तरी काश्मीरवर हल्ला झाला तरी पाकिस्तानात हिंदू व शीख मारल्या गेले तेथे पाकिस्तानात तर गांधी जाऊ शकत नव्हते व हिंसा थांबवू शकत नव्हते, तेव्हा त्यांनी भारतात मुसलमानाची हिंसा होऊ नये म्हणून प्रयत्न चालवले तेव्हा ज्यांचे नातेवाईक पाकिस्तानात मारत आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा त्यांना शांतता राखा असे सांगणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे होते. त्यावेळी जी गोष्ट लाल बहादूर शास्त्री ह्यांनी केली ती गांधी , नेहरू ह्यांनी करणे गरजेचे होते , जेव्हा १९६५ साली अनपेक्षितरीत्या काश्मीर वर आक्रमण झाले तेव्हा शास्त्री ह्यांनी दुसरी आघाडी अकस्मात पंजाबात उघडली.आपले सैन्य लाहोर पर्यंत पोहोचले व तह झाला. पण गांधी व नेहरू हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले , प्रत्येक नेत्याचा उत्कर्षाचा एक काळ असतो व पडता काळ देखील , हिटलर ला डोक्यावर घेणारी जर्मन जनता पुढे युद्धाला कंटाळून त्याला नावे ठेवू लागली. गांधी ह्यांना सुरवातीला सामान्य माणसाला राजकारणात सक्रिय केल्यामुळे ते लोकप्रिय नेते झाले , मात्र मुस्लिम लीग च्या राजकारणापुढे ते पुरते हतबल झाले. म्हणूनच ते राजकीय नेते ,स्वातंत्र्य सैनिक ठरतात महात्मा नाहीत.

In reply to by निनाद मुक्काम …

गांधींना महात्मा म्हणायचे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. स्वत: गांधींनी असा आग्रह धरला नव्हता. ज्यांना ते महात्मा वाटतात त्यांना त्यासाठी स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. ज्यांना ते महात्मा वाटत नाहीत त्यांनाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. काही लोक गांधींना महात्मा मानतात म्हणून त्यांचे महत्व वाढत नाही आणि काही लोक महात्मा मानत नाहीत म्हणून त्यांचे महत्व कमी होत नाही. जीना फाळणी शिवाय दुसरे काही बोलत नव्हते १६ मे १९४६ची योजना ही भारताचे हिंदू वर्चस्व गट आणि मुस्लिम वर्चस्व गट असे विभाजन करणारी होती. बलुचिस्तान, सिंध, पंजाब हा गट तसेच संपूर्ण बंगाल आणि आसाम हा दुसरा असे गट मुस्लिम लीगच्या वाट्याला आले होते. ही योजना जिन्ना यांनी मुस्लिम लीग कौन्सिल समोर मान्य केली कारण त्यांच्या मते "ह्याच्याहून चांगले काही मिळणे शक्य नव्हते" [Nothing better could be obtained]. ७ जुलै १९४६ला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सभेत नेहरू हे अध्यक्ष झाले. १० जुलै ला नेहरूंनी पत्रकार परिषदेत घोषणा केली, "१६ मे च्या योजनेत हवे तसे बदल करायला काँग्रेस स्वतंत्र आहे." काँग्रेस ह्या योजनेत बहुमताच्या जोरावर हवे तसे बदल घडवू शकते हे जिन्ना यांना कळल्यावर त्यांनी २७ जुलै ला ही योजना धुडकावून लावली. परिणामी पाकिस्तानची मागणी पुढे रेटण्याशिवाय लीगकडे दुसरा पर्याय राहिला नाही. संपूर्ण बंगाल, आसाम आणि पंजाब यांच्याऐवजी अर्धा बंगाल आणि अर्धा पंजाब यांच्यावर समाधान मानणे लीगला भाग पडले. असले तुकड्यांत विभागलेले पाकिस्तान स्वीकारल्याबद्दल काही मुस्लिमांनी खुद्द जिन्ना यांच्यावरच हल्ला केला होता. आम्हाला कलकत्त्यापासून कराचीपर्यंत पाकिस्तान हवे आहे ही त्यांची मागणी होती. नेभळट अहिंसक नेतृत्व सशस्त्र क्रांतीत यशाची आठ आणे खात्री असेल तर उरलेल्या आठ आण्यांची शक्यता पडताळून पाहता येते हे टिळकांचे शब्द आहेत. ही खात्री त्यांना वाटत नव्हती म्हणूनच त्यांनी तो मार्ग टाळला. १९१६ च्या लखनौ करारात लीगच्या स्वतंत्र मतदार संघांना आणि सिंध च्या विभक्तीकरणाला मान्यता देणे हे टिळक यांचेच श्रेय आहे. ह्याच आधारावर पुढे मुस्लिम वर्चस्व गट तयार झाले. फाळणीची बीजे खऱ्या अर्थाने इथेच रोवली गेली. एडविना व नेहरू कोट्यावधी हिंदूंचे हित वाऱ्यावर सोडून देणाऱ्या योजनेला गांधी नेहरू पटेल हे संमती देऊच शकत नव्हते. २७ जुलै ला जिन्ना ह्यांनी ही योजना नाकारली.पाकिस्तानच्या मागणीसाठी १६ ऑगस्ट १९४६ हा प्रत्यक्ष कृतीचा दिवस जाहीर झाला. २२ मार्च १९४७ रोजी माउंटबेटन भारतात आला. त्याआधीच फाळणी अपरिहार्य ठरली होती. कोणत्याही परिस्थितीत फाळणी टाळणे हेच काँग्रेसचे उद्दिष्ट असते तर गोष्टी या थराला आल्याच नसत्या. एडविना व नेहरू यांच्या कथा मनोरंजक असल्या तरी वस्तुस्थितीशी त्याचा संबंध नाही. जिथे हिंदूंची बहुसंख्याच नाही तिथे हिंसा किंवा अहिंसा कुठल्याच मार्गाने हिंदूंना ताकद दाखवणे शक्य नव्हते. आज काश्मीरमध्ये इतके सैन्य असूनही ती डोकेदुखी बनली आहे. संपूर्ण पाकिस्तान सैन्याच्या जोरावर जिंकून जरी घेतला तरी तो प्रदेश ताब्यात ठेवणे हे अशक्यप्राय आहे. प्रत्येक प्रश्न सैनिकी कारवाईने सुटत असता तर राजकारणाला महत्वच राहिले नसते. जिथे आपली ताकद दाखवणे शक्य आहे तिथे नियंत्रण मिळवणे आणि जिथे शक्ती कमी पडते तिथे माघार घेऊन जे ताब्यात आहे त्यावर वर्चस्व राखणे ह्याला राजकीय शहाणपण म्हणतात. शिवाजी महाराजांनीही तेच केले. काँग्रेसच्या नेत्यांनीही तेच केले. राजकारण हा शक्तीचा खेळ आहे, भावनांचा नव्हे. ह्याचा विसर ज्यांना पडतो त्यांना आक्रमणाच्या निव्वळ वल्गना करण्याशिवाय पर्याय राहत नाही.

माझ्या प्रतिसादावर काही मिपाकर हमखास वापरतात ती क्लृप्ती वापरण्यास आली. ती वापरण्यात आली म्हणजे माझ्या प्रतिसादाचे काही निवडक वाक्ये हायलाईट करून त्यांच्याशी शब्दांचे खेळ करायचे. त्याला उत्तर मी खरडवहीत न देता येथे ह्या धाग्यावर देतो , कारण हि चर्चा सुरु ह्या धाग्यामुळे झाली, बाकी ठिक.. काही अधिकच्या माहितीवरून आपापले मत बनवावे - पडताळून पहावे इतकेच सांगणे होते. यानंतरही मतावर ठाम आहात असे दिसते. त्यामुळे मी प्रतिवाद करण्यात हशील नाही फक्त दोनच गोष्टी ते सर्व प्रथम दर्शनी मला थोतांड वाटते हा पूर्वग्रह आहे असे म्हणावयास जागा आहे. तो टाळून बघता आले तर उत्तम. स्वतःच्या मताची प्रामाणिक चिकित्सा करताना काही काळापुरता तरी तो बाजुला ठेवला असावा अशी अपेक्षा करतो. हे किती हास्यापद आहे , मुळात आजच्या काळात ह्यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का घटना ज्या काळात घडल्या आहेत त्या काळात हे शक्य होते. आताचे संदर्भ, आताची निती-अनितीच्या कल्पना/परिस्थिती याचा चष्मा त्या काळच्या जनतेला, नेत्यांना का लावावा? असो. इथे आपली सहमती होणे कठीण आहे तेव्हा लेट्स् अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री माझे मत अधिक माहिती बद्द्ल म्हणत असाल तर मिपावर जेव्हा जेव्हा मी राजकारणावर किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणावर मत व्यक्त करतो ते अनेकदा खरे ठरते म्हणजे भविष्यात मी आधी म्हटल्याप्रमाणे एखादी घटना घडते ज्याचा दाखला मी वृत्त पत्रातून आलेल्या बातमीची लिंक देऊन लगेच देतो. उदा मलाला हिचे पार नोबल साठी मानांकन होणे व त्यासाठी परकीय प्रसारमाध्यमांचा अट्टाहास हे जेव्हा भारतात व जगात तिच्या नावाचा जयघोष चालला होता तेव्हा मिपावर लिहिले होते , सांगण्याचा मुद्दा माझी मते वाचन व प्रत्यक्ष लोकांशी जे एखाद्या बातमीबाबत संबंधी असतात त्यांच्याशी बोलून बनवतो. सिंधी व पंजाबी मित्र असल्याने दंगलीचा अनुभव प्रत्यक्ष ऐकला होता , स्वतः माझे आजोबा रेल्वेत कार्यरत असल्याने त्यावेळी त्यांना दिल्लीत निर्वासित शिबिरात काम करण्याचा योग आला , ते सरकारी चाकर होते , संघाशी संबंध नव्हता मात्र एक सामान्य माणूस म्हणून त्यावेळी गांधी ह्यांनी आम्हाला आमच्या कुटुंबाला वार्‍यावर सोडले ही सार्वत्रिक भावना होती , मुळात जीना ह्यांनी आपला समुदाय अल्पसंख्यांक आहे हे माहित असून सुद्धा लढवय्ये पंजाबी , व शीख समुदायाचे हत्याकांड व बलात्कार सत्र सुरु केले , ह्यातून व्यापारी सिंधी सुद्धा सुटले नाही , मुळात त्यांची एवढी हिंमत का झाली ,आजच्या भाषेत त्यांनी ही रिस्क कशी घेतली , त्यांना अशी भीती का वाटली नाही की हिंदू प्रतिकार करतील ह्याचे कारण जीना व मुस्लिम लीग ला पक्की खात्री होती , तेव्हा हिंदूचे प्रतिनिधित्व अहिंसावादी करत आहेत , आपली जमात गांधी ह्यांनी उपोषण केले म्हणून त्यांचे हृदयपरिवर्तन होऊन बलात्कार व हत्याकांड थांबवणार नाहीत किंवा गांधी व त्यांच्या अनुयायांनी कितीही शांततेची आर्जवे केली तर त्याला बळी पडणार नाहीत , आणि त्यांचे चाल यशस्वी झाली , जेव्हा हिंदुनी प्रतिकार सुरु केला तेव्हा माझे अनुयायी अहिंसेला तिलांजली देऊन हिंसा करत आहेत हे पाहणे गांधी ह्यांच्या नशिबी आले , ह्या महात्म्याला त्याच्या हयातीत त्याच्या तत्त्वांची विचारांची पायमल्ली पहावी लागली. व ही पाहणे सहन झाले नाही म्हणून पाकिस्तान ला मान्यता देण्यात आली कारण जीना ह्यांच्या हिंसेला गांधी ह्यांच्याकडे उत्तर नव्हते, राजकारणातून आपली पराभूत तत्वे स्वतः सोबत घेऊन खरे तर गांधी ह्यांनी तेव्हाच साबरमती येथे जाऊन आपला राजकीय सन्यास घेणे अभिप्रेत होते , स्वतंत्र भारतात त्यांना करण्याजोगे खूप होते , आंबेडकर करत होते त्या दलितांच्या उद्धाराचे कार्य ,आपल्या राजकीय गुरु गोखल्यांच्याच शैक्षणिक संस्थांचे जाळे भारतातील गावात पसरवणे, किंवा खेड्यात चला ह्या त्यांच्या सूत्रानुसार एखाद्या खेड्यात जाऊन ते स्वयंपूर्ण करणे व मग त्या धर्तीवर इतर खेडी विकसित करणे , ह्यासाठी उत्तर भारतातील अमेठी पेक्षा सुंदर पर्याय नव्हता , कारण गांधी नावाचे अनेक महात्मे अमेठीत निपजले पण मागाहून विकसित झालेल्या बारामती किंवा कणकवली सारखी प्रगती तेथे अजून होऊ शकली नाही , पण त्यांनी तसे केले नाही, इतर मुस्लिम ,हिंदू संस्थानिक भारतात आपले संस्थान विलीन करत होते , मात्र निजामाला खास वागणूक का देण्यात आली , त्यांचे इंग्रजांशी चांगले संबंध असतील पण इंग्रज काय गांधी , नेहरू ह्यांचे जावई लागत होते का एकवेळ नेहरूंचे आपण समजू शकतो , पण गांधी ह्यांना पाकिस्तान ची कल्पना मान्य नव्हती तर निजामाला स्वतंत्र का राहू दिले , ह्या विरुद्ध त्यांनी उपोषण का केले नाही , हैद्राबादी जनतेच्या भावना त्यांना समजल्या नाही , आपण येथे घटना ज्या काळात घडल्या आहेत त्या काळात हे शक्य होते. आताचे संदर्भ त्या काळच्या जनतेला, नेत्यांना का लावावेत? असे लिहिले तेव्हा मला मौज वाटली. त्यांचे काय आहे , मनुष्याचे मानसशास्त्र हे काळानुसार बदलत नाहीत , नीती अनीतीच्या कल्पना जरी बदलल्या तरी माणसाचे वागणे व वृत्ती तीच राहते , म्हणजे काय तर त्या काळात सध्याच्या पाकिस्तानात व बांगलादेशात जो प्रकार झाला तीला दंगल असे म्हणतात ,ज्यात नरसंहार झाला , व आजच्या काळात गुजरात मध्ये जे झाले त्याला सुद्धा दंगल म्हणतात ज्यात नरसंहार झाला , काळ बदलला म्हणून दंगलीत जे घडते तेच घडले , थोडक्यात सांगायचे तर त्यावेळी व आज सुध्धा गांधी ह्यांना पाकिस्तान निर्मिती थांबणे शक्य झाले नाही किंबहुना भारताकडून आपल्याला ५५ कोटी येणे बाकी आहे ह्या पैशावर आपले राष्ट्र चालवणे अवलंबून आहे हे माहिती असून पाकिस्तानी सैन्य काश्मीर मध्ये आगळीक करत, हे आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणे आहे , आणि त्यांनी ही आगळीक का केली तर भारत सरकार प्रचंड आदर्शवादी असलेल्या नेत्याचे अनुयायी आहेत , कुठल्याही लोकशाही असलेल्या देशात एका व्यक्तीसाठी देशाची इभ्रत व सुरक्षा पणाला लावल्या गेली नाही , जी त्याकाळी हात जोडून प्रसाद ह्यांनी लावली. कुठलाही नेता हा वर्तमानकाळात जे निर्णय घेतो त्यांचे भविष्यातील परिणाम हे त्याच्या जनतेची भविष्यातील पिढीला भोगावे लागतात त्यावरून त्या नेत्याचे मूल्यांकन होते. गांधी हे महात्मा नव्हते तर स्वतःची मत , स्वतःची तत्त्वे , स्वतःचे विचार हे देशाच्या गळी मारणारे होते , त्याकाळात हिटलर ने जर्मन समाज कसा असावा त्यांचे काय आदर्श असावेत हे स्वतःच्या आत्मचरित्रात त्याने लिहून ठेवले , गांधींना सुद्धा तमाम भारतीय समाजाकडून हीच अपेक्षा होती. मुळात एका व्यक्तीची मते ती कितीही चांगली असो पण संपूर्ण समाजाच्या माथी मारणे हे लोकशाही असलेल्या देशात नक्कीच चांगले नव्हते , असे प्रकार एकतर कम्युनिस्ट चीन मध्ये किंवा धर्मावर आधारीत इराण मध्ये होतात , देशाच्या दुर्दैवाने त्याकाळी गांधी व त्यांच्या राजकीय पक्षाला तुल्यबळ विरोधक नव्हते , किंबहुना त्यांचे राजकीय असे विशेष अस्तित्व नव्हते , म्हणूनच आपण म्हणून ती पूर्व दिशा असा गांधी व तत्कालीन सरकारचा ग्रह झाला व ह्यातून त्यांच्याकडून असे वर्तन घडले , कारण आपण घेऊ त्या निर्णयाला देशाची जनता झक मारून पाठिंबा देईल कारण त्यांना दुसरा वाली कोण आहे , हिंदू महासभेला मुस्लिम लीग सारखे राजकीय अस्तित्व निर्माण करता आले नाही , म्हणूनच गांधीचे फावले , पुढे त्यांचा वधाचे निमित्त सरकार व प्रसार माध्यम ताब्यात असणार्‍या तत्कालीन सरकार ने आपल्या विरोधकांना गोबेल नीतीमुळे जनतेत पुरते बदनाम केले व सत्ता आपल्या हातात ठेवली जर गांधी ह्यांचा खून दंगलीत स्वकीय गमावलेल्या एका मुस्लिम तरूणाकडून भावनेच्या भरात झाला असता तर काय झाले असते अशी कल्पना डोक्यात आली. तर गांधीच्या अनुयायांनी त्यांची घरे सुद्धा जाळायला कमी केले नसते , भारतासारख्या देशात व्यक्ती पूजेचे स्तोम आहे. एखाद्या व्यक्तीला महात्मा ठरवले की त्यांच्यात दोष असे नव्हतेच , त्याने चुकीचे निर्णय घेतलेच नाही. असे जर मानायचे ठरवले तर खेदाने हे राम असेच म्हणावे लागेल.

गाम्धिनी निराळ्या दलित मतदार संघास विरोध करुन मोठे काम केले .. नाहि तर आज ओबीसी निराळे मतदार संघ दिसले अस्ते का?

बाकी गांधी ना राष्ट्रपिता म्हणणे म्हणजे एक भंपक पणा आहे . आज गांधी राष्ट्रपिता ( अनधिकृत का होईना, पण आहे . भारत सरकार ने अधिकृत जाहीर केले नाही राष्ट्रपिता , म्हणून अनधिकृत ) पुढच्या शतकात अजून कोणी होईल असाच एखादा राष्ट्रपिता. अजून २/३ शतकांनी तिसरा कोणी !! मला हिंदी सिनेमातील एक संवाद आठवतो . त्या मुलीला वाईट मार्गाला लावायचा प्रयत्न होत असतो. तिला कुस्करताना तो खलनायक म्हणतो - आजसे हर दिन तेरी शादी होगी . हर दिन नया दुल्हा . तसाच हा प्रकार वाटतो . बाकी जगात असा दुसर कोणता देश आहे का ज्याला असे पिता / माता आहेत ? बहुतेक नसावेत. No one is bigger than this Country. If some one tries to project himself that way, he is enemy no 1 of the country. बाकी गांधीना जी न लावल्यामुळे कोणची मने दुखावली असतील तर क्षमस्व . पण , सावरकर टिळक यांना का नाही बरे हा जी लावत कोन्ग्रेस् वाले आणि इतर लोक ?

In reply to by अभिजित - १

बाकी जगात असा दुसर कोणता देश आहे का ज्याला असे पिता / माता आहेत ? बहुतेक नसावेत. >>> अहमद शाह अब्दाली हा अफगाणिस्तानचा राष्ट्रपिता आहे !!

In reply to by अभिजित - १

>> भारत सरकार ने अधिकृत जाहीर केले नाही राष्ट्रपिता , म्हणून अनधिकृत च ) ओक्के. >>पुढच्या शतकात अजून कोणी होईल असाच एखादा राष्ट्रपिता. अजून २/३ शतकांनी तिसरा कोणी !! बरोबर. तसे होतच असते. होतच राहील. त्यात काही प्रॉब्लेम आहे असे वाटत नाही. >>No one is bigger than this Country. If some one tries to project himself that way, he is enemy no 1 of the country. गांधींना (पाहिजे तर गांधीला असं म्हणू या) राष्ट्रपिता म्हणतात देशपिता नाही. तुमच्या वाक्यात कंट्री असा शब्द आहे. आणि मी राष्ट्रपिता आहे/मला राष्ट्रपिता म्हणा असं गांधीने कधी म्हटल्याचं ऐकलं नाही. त्यामुळे तुमचं दुसरं वाक्य गैरलागूच आहे. एनिमी नं वन वगैरे तर कै च्या कै.... >>बाकी गांधीना जी न लावल्यामुळे कोणची मने दुखावली असतील तर क्षमस्व . हॅ हॅ हॅ. मी गांधी या विषयावर मिसळपाववर भरपूर प्रतिसाद लिहिले आहेत. कधीही मी गांधीजी असा उल्लेख केलेला नाही. पण त्याने कोणा गांधीप्रेमींची मनं दुखावली जाण्याचा इतिहास नाही. गांधींना गांधीजी म्हणण्याचीसुद्धा कोणी सक्ती केलेली नाही. बाय द वे बाकीच्यांचं सोडा. टिळक आणि सावरकर यांना तुमच्या प्रतिसादापुरतं तरी तुम्ही "जी" जोडायचं होतं की !!!!!

In reply to by नितिन थत्ते

गांधींना मिपावर कोणी काहीही म्हटले तरी मिपावरच्या गांधीवाद्यांच्या बाबतीत 'पित्त खवळणे','गरळ ओकणे',असले काही होत नाही.तसेच साप,विंचू,षंढ,कुत्रा असले शब्दही कधी त्यांना वापरावेसे वाटत नाहीत,वापरावे लागत नाहीत.त्यांच्या प्रतिसादांत कधीही आक्रस्ताळेपणा.त्रागा,आगपाखड दिसून येत नाही. या बाबतीत त्यांची तुलना मुंबईकरांशी करावीशी वाटते. समोरचा जर काही अद्वातद्वा बोलत असेल तर ते केवळ चेहेर्‍यावर आश्चर्य आणून 'हो का? खरं की काय?' असे काहीसे म्हणून बाजूला सरतात !

>>पुढच्या शतकात अजून कोणी होईल असाच एखादा राष्ट्रपिता. अजून २/३ शतकांनी तिसरा कोणी !! बरोबर. तसे होतच असते. होतच राहील. त्यात काही प्रॉब्लेम आहे असे वाटत नाही. ------------------------------------------------------------------------------------------------------------ मी हार्बर रेल्वे ने प्रवास करत होतो. मानखुर्द , गोवंडी .. दुपारची वेळ होती. दोन १५ / १६ वर्षाची टपोरी मुले बाजूला उभी होती. तिथलीच .. त्यांचा संवाद - १ ला मुलगा - मुन्ना आजकाल तेरे घर में वो नया कोन आयेला है ? २ रा - अरे वो समझले मेरा नया बाप हि है . अपना सब खर्चा पानी छुटता है . तो अपने को क्या करना है। कोई भी आये। 1 ला - लेकिन तेरा असली बाप ? और साला हर साल तेरे घर में नया नया आदमी दिखता है। मजे है तेरे माँ के . 2 रा - वो तो साला पता नहीं किधर गया। माँ भी जवान है . और साला फ़ोकट में किसीको देने से ये बेहतर है। सबसे बड़ी बात .. बोल मत किसिक्को .. शुरुवात में मैंने साला बहोत आवाज किया पहले बार . तो तब वो आदमी था . मेरे को बजुमे लेके गया। और एक गाँधी थमा दिया हातमे. साला ५०० रुपया .. बस्स मई खुश। माँ का भी काम होता है। घर का खर्च पानी चलता है। सबसे बड़ी बात अपने को हर महीने एक गाँधी। साला गाँधी है अगर साथ तो हर छे महीने में नया बाप .. अपने को क्या ? 2 रा - हॅ हॅ हॅ. ( इथे मला मिसळ पाव वरील त्या व्यक्तीचे हसणे आठवले . आणि यांना पण दर वर्षी नवीन बाप हे आनंदाचे वाटते हे बघून .. )

In reply to by अभिजित - १

'मुक्त स्त्री'चं अर्धमुर्ध का होईना, चित्रण आवडलं. झोपडपट्टीतल्या, टपोरी दिसणार्‍या मुलांनाही व्यक्तिस्वातंत्र्याचं मूल्य समजतं हे ही रोचक आहे. आणि १५-१६ वर्षाच्या पोराशी गोडी-गुलाबीने वागावं हे सावत्र बापाला समजणं हे तर आणखीनच उत्तम.

In reply to by अभिजित - १

गलिच्छ. 'संभवामि युगे युगे' असे तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनीच म्हणून ठेवले आहे. हिंदु लोक पुनर्जन्म मानतात. आत्म्याला पुनर्जन्म असतो मग महात्म्यालाही तो असावा. ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. गुजरातीमध्ये संत मानवांना बापू,बाप्पा (बाप,पिता या अर्थी)म्हणण्याची प्रथा आहे. जसे, मोरारजी बापू,अनिरुद्ध बापू,आसाराम बापू,बाप्पा रावळ इ.

भारतातील मोहनदास करमचन्द गान्धी हे जगातल्या बर्याच देशातील लोकांना माहीत आहेत. त्यांनी वाचलेले आहेत. त्यांच्या कडे त्यांच्या भाषेतील पुस्तकांत गान्जीजी चे चांगल्या प्रकारे वर्णन आहे. शिवाय पापीस्तान सोडता. अहो हॉलीवूड वाले त्यांच्यावर सिनेमा काढतात व जग तो पहातो म्हणजे काय तो लहान मानुस होता?

नव्या काळात पदव्या पुन्हा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्यास सुचवण्या : राष्ट्रपिता (या शब्दास शब्दशः जागेल असं व्यक्तिमत्व) - आ. इम्रान हाश्मी लोकमान्य - सलमान खान नेताजी - मौलाना मुलायमसिंहजी महात्मा - भास्कर जाधव राष्ट्रसंत - रामदेवबाबा क्रांतिवीर - बाबू बजरंगी / दारासिंह और उनके अन्य साथी (मी वक्ता कसा झालो या मनजींच्या नव्या पुस्तकातून साभार. यास सोनियाची प्रस्तावना लाभलेली आहे ) हा ट्रेण्डसेटर धागा श्रद्धांजलीसाठी होता का ?

चर्चा चांगली आहे, पण ह्याबाबतीत लोकाच्या भावना जास्त महत्वाच्या. लोकांच्या मनात ते राष्ट्रपिताच.

महात्मा गांधींना चे पुण्यतिथी निमित्त पुण्यस्मरण आणि विनम्र अभिवादन ! ( ह्यावर्षी "राष्ट्रपिता" हा टॅग लावलेला नाही हे पाहुन बरे वाटले ... चला ....हळु हळु का होईना आपण मॉबोक्रसी कडुन अ‍ॅबसोल्युट कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रसी कडे सरकायला लागलो तर :) )

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्यावर्षी "राष्ट्रपिता" हा टॅग लावलेला नाही हे पाहुन बरे वाटले
माणसाने असेच अल्पसंतोषी रहावे! :)

In reply to by सुनील

पृथ्वी गोल आहे, प्रसादभाऊंची जाणीव खोल आहे (सुभाषचंद्र बोस ह्यांनी राष्ट्रपिता ह्या नावानं गौरव केलेल्या, नसता केला तरी तसेच असलेल्या) महात्मा गांधींना विनम्र अभिवादन.

In reply to by प्रसाद गोडबोले

पुण्यतिथी निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र आदरांजली वाहतो!

In reply to by प्यारे१

ती चर्चा झालिये ते माहितिये. पण राष्ट्रकाकू गिरिजांना हा पण वाद उकरायची इछ्छा आहे का ते विचारल?

In reply to by अनुप ढेरे

नाही. त्यावादात रस नाही ...मरणान्तिनी वैराणि.... झालं गेलं सिंधुला मिळालं ... ते लोक त्यांच्या काळात जगले , आपण आपल्या काळात जगतोय ...आणि महत्वाचे म्हणजे इथे वाद केवळ संविधान मानायचे (की ज्याच्या मते अशी कोणतीही पदवी देता येत नाही , एव्हन भारतरत्न कोणा अमुक्तमुक व्यक्तीने मी भारतरत्न अमुकतमुक असे लावले तर भारतरत्नही काढुन घेतात ) की व्यक्तिपुजा असा आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस यांचे अनुक्रमे शिवाजी टर्मिनस आणि टिळक टर्मिनस असे नामांकुचन करण्यासाठी रेल्वेला कळवायलाच हवे! ;) आणि हो, सरदार सरोवर नव्हे, सरोवर बर्र्का!! ;) खेरीज, विविध xxx पुरुष आणि xxx सम्राट ह्यांचा उल्लेखदेखिल नुसत्या नावानिशीच नै का? ;)

In reply to by सुनील

सुनिलराव तुम्ही फार घोळ करताय साहेब ... जरा एकदा चर्चेतुन फिरुन या की व्यवस्थित ... इथे कोणी महात्माजींच्या महात्मा पदवी विषयी काही तरी बोललय का ? प्रश्न राष्ट्रविषयक पदवी द्यावी की नको असा आहे . आता उद्य्या राष्ट्रसरदार किंवा राष्ट्रमान्य किंव्वा राष्ट्रपुरुष अशा पद्या कोणाला दिल्या गेल्यातरी त्याला विरोध केलाच पाहीजे . अवांतर : काही काही ठिकाणी समर्थ रामदासस्वामींना "राष्ट्रगुरु" अशीही पदवी लावतात , त्यालाही विरोध नोंदवलेला आहे मी .

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमचा मुद्दा पदवी "संविधानिक" नाही असा होता. आणि "राष्ट्रपिता" या शब्दाला आक्षेप होता. आता "राष्ट्र" विषयक असा करताय!!! :-) तुम्ही चर्चेतुन फिरण्यापूर्वी तुमच्या धाग्याच्या शब्दातून फिरुन या!! तेथे तुम्ही स्वतः "राष्ट्रनायक" असा शब्द वापरलाय !!! :-) - :-)

In reply to by बाळ सप्रे

दगडापेक्षा वीट मऊ ! शिवाय सगळेच बदल असे एका झटक्यात नाही करता येत .... ते हळु हळुच करावे लागतात .... २०१३ मधे राष्ट्रपिता च्या ऐवजी राष्ट्रनायक म्हणु २०१४ मधे राष्ट्रनायकच्या ऐवजी केवळ महात्मा म्हणु पुढे २०१५ मधे महात्माच्या ऐवजी मोहनदास करमचंद गांधी म्हणु ... असे हळु हळु जाऊ .... कसं आहे की एका पक्क्या राजकारणी माणसाला ही देवत्वाची चढवलेली पुंटं ही हळु हळुच काढावी लागतील .... जर गडबडीत काढायचा प्रयत्न केला तर मुर्तीभंजनाचा आरोप येईल ( शिवाय मुर्तीपुजक अजुनच कट्टर होतील ) स्लो बट स्टेडी

In reply to by प्रसाद गोडबोले

मूळ मुद्दा तुम्ही सोडुन दिला आहे .. त्यावर मुद्देसूद प्रतिवाद करता येत नाहिये.. पळवाट काढ्लेली आहे.. त्यामुळे आमचा पास !!

आदरणीय महात्मा गांधी ना विनम्र श्रद्धांजली ! " गांधी " नावाची कॉंग्रेस नी जी लक्तरे केली आहेत , त्यावर खरे म्हणजे अधिक भाष्य करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यांचे अनुयायी त्यांचा खून रोज करतात .. एखाद्या नेत्याच्या नशीबी इतकी मोठ्ठी शोकांतिका यावी यापरता दुर्दैव नाही. त्याच बरोबर गांधी-हत्येमुळे हिंदुत्वाचे जे कमालीचे नुकसान झाले,त्यासारखे ही दुर्दैव नाही! १.कदाचित गांधीजी आणखी २/४ वर्षे असते तर त्यांनी आपल्या हातांनी काँग्रेस विसर्जित केली असती , जवाहरलालनी जरा कमी गुण उधळले असते आणि २.कदाचित कदाचित स्वातंत्र्यपूर्व काळात असणारी साधनशुचिता आणि चांगली माणसे काँग्रेस मधे राहीले असती आणि पर्यायाने भारतीय राजकारणातही ! ३.कदाचित भारताचा विकास "भारतीय" पद्धतीने झाला असता , पाश्चिमात्य लोकांचे अंधानुकरण झाले नसते. ४.कदाचित भारत हा अधिक हिंदू राहिला असता , हिंदू धर्माला आणि पर्यायाने जगाला बरे दिवस आले असते. ५.कदाचित हिंदू लोक त्यांच्या स्व्-भावहून वेगळे इतके आक्रमक झाले नसते ६.कदाचित सर्वधर्म समभाव सारख्या भोंगळ आण बावळट कल्पना प्रचारात आल्या नसत्या पण प्रत्यक्षात मात्र धार्मिक -सौहार्द राहिले असते ७.कदाचित गांधीजींचा अपसमज ( हिंदू- मुस्लिम ऐक्य ) दूर झाला असता (आणि तशी सुरुवात झाली होती )आणि काँग्रेसचे अल्पसंख्यांक तुष्टीकरणाचे घाणेरडे राजकारण अस्तित्वात आले नसते. ८.कदाचित मुस्लिमांचा खरा खुरा विकास झाला असता. ९. कदाचित भारत शक्तिशाली झाला असता. जाऊ द्या .. या जर्-तर ला काही अर्थ नाही . जसे व्यक्तिचे प्रारब्ध असते तसे राष्ट्राचेही असावे कदाचित ...

कसं असतं की काही काही वाद विवाद हे कायम होत राहिले पाहिजेत आणि एखाद्या विषयावर चर्चा होते ह्याचाच अर्थ की तो विषय १००% सर्वमान्य नाहीये .... ... वादविवाद चर्चा अन त्यातुन इव्हॉल्व्ह होत जाणार्‍या विचारधारा हाच लोकशाहीचा प्राण आहे . नुसत्या व्यक्तिपुजेला चिकटुन राहुन धर्म तयार होत असतात ...लोकशाही नव्हे .... . असो . चर्चा मागील पानावरुन पुढे चालु ... ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ये नाम केचिदिह न: प्रथयन्त्यवज्ञां जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः | उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ||

राष्ट्रपिता महात्मा गांधींना मनःपुर्वक श्रद्धांजली..

खरंच ह्या राष्ट्राचा पिता म्हणवून घेण्याची इच्छा असती तर ते स्वातंत्र्यदिनाच्या समारंभासाठी दिल्लीत आवर्जून हजर राहिले असते. पण ते मात्र एकटेच चरखा चालवत बसले! ज्यांच्या नावाने कालपर्यंत घोषणा देत होतो ते आज कशा अवस्थेत आहेत हे विचारण्याची तसदी एक टक्का भारतीयांनी देखील घेतली नाही. दंगलींमध्ये होरपळून निघालेल्या जीवांची कोणाला पडलेली नव्हती तर महात्म्याची काय कथा? स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही येते हे भान त्याच क्षणी विसरले गेले. त्यानंतर उरल्या त्या केवळ जयंत्या, पुण्यतिथ्या आणि पोकळ अस्मितांच्या घोषणा! केवळ नाईलाज म्हणून एकत्र राहणाऱ्या कळपांना "राष्ट्र" म्हणणे ही राष्ट्रवादाची कुचेष्टा आहे. अमुक तमुक आमचे राष्ट्रपुरुष आहेत किंवा नाहीत ह्याचा फैसला साठ वर्षांनंतरही जिथे लागत नाही त्या भूभागाला नेमके काय म्हणायचे ह्याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

In reply to by अवतार

खरंच ह्या राष्ट्राचा पिता म्हणवून घेण्याची इच्छा असती तर ते स्वातंत्र्यदिनाच्या समारंभासाठी दिल्लीत आवर्जून हजर राहिले असते. पण ते मात्र एकटेच चरखा चालवत बसले! ज्यांच्या नावाने कालपर्यंत घोषणा देत होतो ते आज कशा अवस्थेत आहेत हे विचारण्याची तसदी एक टक्का भारतीयांनी देखील घेतली नाही. दंगलींमध्ये होरपळून निघालेल्या जीवांची कोणाला पडलेली नव्हती तर महात्म्याची काय कथा? >>> नेमके एकदम!

गांधी हे महात्मा नव्हते तर स्वतःची मत , स्वतःची तत्त्वे , स्वतःचे विचार हे देशाच्या गळी मारणारे होते ,
१००% सहमत...!!!

@पण ते मात्र एकटेच चरखा चालवत बसले! त्यांच्या हातात अजून काय उरले होते , जीना ह्यांनी त्यांच्या नाकावर टिच्चून पाकिस्तान घेतला , अल्प संख्यांक मुस्लिम लीग ने भारताच्या घशातून पाकिस्तान घेतला म्हणजे नक्की काय केले तर हिंसेने अहिंसेवर विजय मिळवला ,आपल्यावर हल्ले होतांना पाहून हिंदू व शीख ह्यांनी हिंसेंचा मार्ग स्वीकारला , तेव्हा देशभर आजतागायत अहिंसेचे थोतांड काही दिवसात गळून गेले की जीना हे मिळालेल्या पाकिस्तानवर खुश नव्हते . हे गांधींना माहिती होते , त्यामुळे ह्यापुढे हिंसेच्या जीवावर स्वतंत्र पाकिस्तानचे जनक जीना अजून काय काय करतील ह्याचा नेम कोणालाही नव्हता. जीना जिंकले नेहरू ह्यांना मंत्रिपद मिळाले ,आता जागतिक राजकारणात त्यांना भराऱ्या मारणे शक्य होणार होते , गांधींना काय मिळाले , हिंसेने ग्रस्त भारत अहिंसा वादाला दिलेली तिलांजली. आपल्या तत्वांचा झालेला पराभव त्याना जिव्हारी लागला नसता तरच नवल होते.

In reply to by निनाद मुक्काम …

हा तत्वांचा होत नसतो. ती तत्वे न पेलवणाऱ्या मानसिकतेचा होत असतो. इथे हिंसा-अहिंसा वाद उकरून काढण्याचा हेतू नाही. "नैतिकता" हा एकमेव फरक सोडला तर पशू आणि मानव ह्यांच्यात इतर कोणताच फरक उरत नाही. आजपर्यंत मानव समाजाची जी काही प्रगती झाली आहे ती मानवातल्या पशुत्वाला मोकाट सोडण्यातून नव्हे तर पशुत्वाला लगाम घालण्यातून झाली आहे. बुद्धापासून गांधींपर्यंत सर्वांनी ह्या पशुत्वाला लगाम घालण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्यात त्यांना व्यक्तिगत पातळीवर यश मिळाले तरी समाज मात्र ह्या तत्वांसाठी अजून पूर्णत: तयार नाही हेच वास्तव आहे. पण आज हिंसा करणाऱ्यांनाही हिंसेचे बौद्धिक पातळीवर समर्थन करावे लागते हे देखील पशुत्वाकडून मानवत्वाकडे होणाऱ्या प्रगतीचेच लक्षण आहे. गांधींनी काय मिळवले आणि काय गमावले ह्याचा हिशोब गांधींबरोबरच संपला. गांधींना समर्थन देऊन किंवा विरोध करून आज आपण काय मिळवतो किंवा गमावतो आहोत आणि आपल्या येणाऱ्या पिढ्या काय मिळवणार किंवा गमावणार आहेत ह्याचा विचार होणे आवश्यक आहे. मुळात गांधी ही व्यक्ती महत्वाची नसून ज्या तत्वांसाठी त्यांनी संघर्ष केला ती तत्वे व्यवहार्य पातळीवर आणण्याची क्षमता आपल्या किंवा पुढील पिढ्यांमध्ये निर्माण होऊ शकते काय हा प्रश्न महत्वाचा आहे. प्रतिसादाबद्दल आभार!

हा फार मोठा विनोद आहे. आपल्या पिढीत गांधी फक्त नोटेवर , रस्त्यांच्या नावांवर व जयंती साठी उरले आहेत. त्यांची भाकड तत्वे त्याच्या सोबत अस्ताला गेली. कारण ती अव्यवहारी होती , ही वस्तुथिति आज तुम्ही नाकारू शकत नाही , हा तत्वांचा होत नसतो. ती तत्वे न पेलवणाऱ्या मानसिकतेचा होत असतो मुळात सर्व सामान्य माणसाला न पेलवणारी तत्वे त्यांच्या गळी उतरवणे खरच गरजेचे होते का गोधरा कांड झाले व त्यानंतर जी दंगल झाली त्याचा परिणाम म्हणून आजतागायत गुजरात मध्ये परत दंगल झाली नाही , ज्या दिवशी जीना ह्यांच्या सांगण्यावरून पहिला हिंदू मारला गेला ,पहिली हिंदू शीख महिलेवर बलात्कार झाला तेव्हा हिंदूंना त्यांच्या पद्धतीने प्रतिउत्तर देण्याचा मार्ग मोकळा असता तर आज बांगला देश व पाकिस्तान बनले नसते , ज्या ज्यू राष्ट्राच्या निर्मितीला गांधी ह्यांचा तात्विक विरोध होता त्याच राष्ट्राने हिंसेला हिंसेने उत्तर देऊन नुसते आपले अस्तित्व टिकवले नाही तर आज त्या छोट्या राष्ट्रापुढे जो आपल्याबरोबर ह्या जगात अस्तित्वात आला त्यांच्याकडून शस्त्र विकत घ्यावी लागतात व दहशतवादांच्या विरूध लढण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते. गांधीजी ह्यांची तत्वे म्हणजे कागदी तलवार आहे , जी भिंतीवर लटकलेली छान दिसते ,पण प्रत्यक्ष तिचा वापर शून्य असतो , देशाला चाणक्य ,नेताजी ह्यांच्या विचार , तत्वे ह्यांची गरज होती व आजही आहे. गांधी हे तत्कालीन अनेक देश्भक्तच्या पैकी एक असून कॉँग्रेस चे एक पुढारी होते , त्यांना काही लोक मानायचे + इतकेच .

In reply to by निनाद मुक्काम …

निव्वळ भौगोलिक सीमा नव्हे. राष्ट्र म्हणजे कोट्यावधी जनतेच्या मनात असलेली एकसंध सांस्कृतिक घटक म्हणून जगण्याची प्रबळ इच्छा. आज रशियाने चेचन्यामध्ये गेली कित्येक दशके शस्त्रे आणि सैन्य यांच्या जोरावर वर्चस्व निर्माण केले आहे. पण त्याची किंमत त्यांना आजही चुकवावी लागत आहे. बांगलादेशच्या निर्मितीला पाकिस्ताननेही संघटित अत्याचारांच्या जोरावरच लगाम घालण्याचा प्रयत्न केला. परिणाम काय झाला ते समोर आहेच. अगदी भारताची मदत मिळाली नसती तरी तो असंतोषाचा वणवा विझवणे हे शस्त्रांच्या जोरांवर शक्य नव्हते. आज पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तान मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. पण तरीही तेथील जनता जाहीरपणे स्वत:ला पाकिस्तानी नव्हे तर बलुच म्हणवून घेते. श्रीलंकन सैन्याने प्रभाकरनला संपवले पण तमिळ जनतेच्या मनातील तमिळ इलमची इच्छा अजूनही संपलेली नाही. ह्या सर्व देशांप्रमाणेच भारताची अवस्था व्हावी असे वाटत असेल तर निव्वळ हिंसा आणि शस्त्रांवर विश्वास असणाऱ्या लोकांनी पाकिस्तान आणि बांगलादेश येथील जनतेच्या भावनांची पर्वा न करता बिनधास्तपणे त्यांच्यावर आक्रमण करावे. पण त्यानंतर तरी हिंदुंचा खरेच विजय होणार आहे का हे हिंदूंना स्पष्ट करावे.
मुळात सर्व सामान्य माणसाला न पेलवणारी तत्वे
गांधी हे माझ्या तुटपुंज्या माहितीप्रमाणे कोणी प्रेषित नसून वासना आणि विकारांच्या आहारी गेलेली एक सर्वसामान्य व्यक्ती होते. बुद्धाची कहाणी देखील काही फार वेगळी नाही. त्या अवस्थेतून जर बुद्ध किंवा गांधींसारखा सामान्य मनुष्य स्वत:च्या व्यक्तीमत्वात एवढा प्रचंड बदल घडवून आणू शकतो तर इतरांना ते करणे अशक्य नाही. पण त्यासाठी जी इच्छाशक्ती लागते ती आपल्यापैकी कोणातच नाही. ज्यांना स्वत:मध्ये बदल घडवायचा नसतो ते इतरांना दोष देण्याशिवाय काहीच करू शकत नाहीत. अस्तित्व टिकवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हा कोणालाच चुकलेला नाही. पण अस्तित्व नेमके कशासाठी टिकवायचे हा प्रश्न केवळ माणसालाच पडतो. त्या प्रश्नामागचे कुतूहल कायम राहणे ह्यातच माणसाचे माणूसपण आहे.

In reply to by अवतार

अस्तित्व नेमके कशासाठी टिकवायचे हा प्रश्न केवळ माणसालाच पडतो. त्या प्रश्नामागचे कुतूहल कायम राहणे ह्यातच माणसाचे माणूसपण आहे.
>> तुफ्फान. +१

In reply to by निनाद मुक्काम …

ज्या दिवशी जीना ह्यांच्या सांगण्यावरून पहिला हिंदू मारला गेला ,पहिली हिंदू शीख महिलेवर बलात्कार झाला तेव्हा हिंदूंना त्यांच्या पद्धतीने प्रतिउत्तर देण्याचा मार्ग मोकळा असता तर....
गांधींचा हिंसेला विरोध होताच पण हा मार्ग कोणी अडवला होता? हा मार्ग तेव्हाही मोकळाच होता आणि ज्यांना चोखाळायचा होता ते तो चोखाळत होतेच! असो.

In reply to by निनाद मुक्काम …

अतिशय अप्रतिम प्रतिसाद.... सहमत. केवळ व्यक्तिपुजेत रमलेल्या, इतिहासातुन कधीही काहीही न शिकणार्‍या, जागतिक व्य्वहाराकडे व राजकारणाकडे काणाडोळा करणार्‍या व त्याच्याशी आपले काहीही घेणेदेणे नाही असे समजणार्‍या, आपल्या भवितव्याची विवन्चना असणार्‍या परन्तु त्यावरचा उपाय माहित नसणार्‍या, अर्धपोटी राहणार्‍या एकुणच बधीरता आलेल्या समाजातल्या मोठ्या वर्गाला ह्या असल्या वान्झोट्या तत्वप्रणालीचा काय उपयोग ?? व्यावहारिक द्रुष्ट्या त्याचा काय उपयोग ?? त्याने जर एकुणच सर्व सामाजिक प्रश्ण सुटणार असतील तर गोष्ट निराळी. आदर्श तत्वे ही एकन्दरीत सर्वार्थाने आदर्श ( सामाजिक, सास्क्रुतिक, आर्थिक व राजकीय या अर्थाने ) समाजासाठी काही प्रमाणात ठीक आहेत आजच्या जगात, केवळ तोन्डी लावण्यापुरती. आता अजुन किती दिवस हा असला टाळ्कुटेपणा चालायचा हे तो परमेश्वरच जाणे. विनोद१८

आपले अस्तित्व टिकवणे हे बेसिक इन स्टिंग आहे ते माणसाला निसर्गाने बहाल केले आहे . माणूसपण वैगैरे ह्या भ्रामक कल्पना असून मानव हा आपल्या मेंदूच्या जीवावर पृथ्वीतलावर इतर प्राण्यांना वेठीस धरून किंबहुना पाळीव बनवून जगतो , आपल्याला डासाने चावले तर अगदी झोपेत सुद्धा त्याला हाताने मारून आपण हिंसा करतो. कारण माणसाला जगण्यासाठी हत्या करावी लागते. शरीरात घुसलेल्या विषाणूंना आपण जगण्यासाठी पर्ति जैविके देऊन मारावे लागते. जगातील सर्व प्रश्नावर हिंसा हे उत्तर नसते , मात्र हिंसेवर फक्त हिंसा हेच उत्तर असते.

In reply to by निनाद मुक्काम …

हा एकच शब्द सोडला तर बाकी वाक्याला हरकत नाही. सर्वनाश करून घेण्यापेक्षा शांतीचा मार्ग नेहमीच उत्तम असे महाभारतात स्वत: भगवान श्रीकृष्णानेच सांगून ठेवले आहे. संयम हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. याबाबत दुमत नसावे (अशी उगाचच आपली वेडी आशा!). यावरून एक जुने गाणे आठवले.
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळराने खडकात!
(हे तुम्हाला व्यक्तिश: उद्देशून नसून हिंसेला पर्यायच नाही या विचारसरणीला उद्देशून आहे.)

अवतार यांचे सर्व प्रतिसाद विशेषतः 'राष्ट्रप्रेम हे' हा वरील प्रतिसाद फार आवडला. इतरांच्या आक्रस्ताळी, शब्दबंबाळ,आणि गैरलागू मुद्द्यांनी भरलेल्या प्रतिसादांमध्ये हे सर्व प्रतिसाद आपल्या संयत भाषेमुळे आणि मुद्देसूदपणामुळे उठून दिसले. विशेषतः पाकिस्तान आणि बांग्लादेशवर आक्रमण करून किंवा त्यांच्याशी युद्ध करून त्यांना जिंकून घ्यावे म्हणणार्‍यांचा प्रतिवाद छान केला आहे. नुसती भूमी जिंकून उपयोग नसतो. तेथील जनताही अनुकूल असावी लागते. नाही तर गनिमी युद्ध सुरू होते जे आटोक्यात आणणे कठिण असते. पुन्हा एव्हढा मोठा प्रदेश स्थानिकांच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने ताब्यात ठेवायचा म्हणजे मोठाच ताप. जागोजागी सैन्य तैनात करावे लागेल. आपल्या सीमा इराण, अफ्घानिस्तान, ब्रह्मदेश या सारख्या अशांत प्रदेशाला जाऊन भिडतील. त्या शिवाय एवढी मोठी मुस्लिम लोकसंख्या बृहद्भारतात समाविष्ट झाली तर हिंदूचा लोकसंख्येतील टक्का कमालीचा घसरेल. सैन्यात, सरकारी नोकर्‍यांत सगळीकडेच ते लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मागतील. हां, आता तेथील मुस्लिम लोकसंख्येबाबत हिट्लरचा मार्ग आचरावा असे कोणाचे मत असल्यास गोष्ट वेगळी.

१५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश या नवीन मिपा धाग्या करता प्रतिसाद हवे आहेत. (आणि त्या करता विनंती या धाग्यावर का करत आहे हे वेगळे सांगणे न लगे :) )