✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

श्रद्धांजली...

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Wed, 01/30/2013 - 09:33  ·  लेख
लेख
. नक्कीच मोठा माणूस... फार मोठा... इतका मोठा की विरोधकांनाही नीटसा कळला नाही, आणि अनुयायांनाही... 'माणूस' होता म्हणूनच बर्‍यावाईटाचं मिश्रण होतं... आणि 'मोठा' होता म्हणून हे वास्तव (बर्‍यावाईटाचं मिश्रण असणं) स्वीकारण्याची आणि जाहिरपणे मान्य करायची हिंमत होती... गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो... श्रद्धांजली!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
14964 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

बाकी बर्‍याचदा मला असे वाटते

बॅटमॅन
Wed, 01/30/2013 - 20:04 नवीन
बाकी बर्‍याचदा मला असे वाटते की अनेकांमध्ये असलेलू गांधीजींबद्दलची अनादराची भावना ही वास्तवीक, प्रत्यक्षात गांधीजींच्या बद्दल असण्यापेक्षा तथाकथीत गांधीसमर्थकांमुळे (गांधीवादी देखील नाही) आणि त्यांच्या एकंदरीत वर्तनामुळे झालेली आहे.
हांगाश्शी!!!! सेम ऐसेच वाटते मलाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+१

प्रसाद गोडबोले
Wed, 01/30/2013 - 20:11 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

थोर व्यक्ती

तिमा
Wed, 01/30/2013 - 20:10 नवीन
थोर व्यक्तींची किंमत लोकांना त्यांच्या मृत्युनंतरच कळते,असे म्हणतात. गांघीजी हे महान होते. पण काँग्रेसने त्यांच्या पश्चात त्यांच्या नांवाचा फार गैरवापर करुन घेतला.
  • Log in or register to post comments

हो नक्कीच.

मन१
Wed, 01/30/2013 - 20:16 नवीन
काँग्रेसवाल्यांनी नक्कीच केला. आणि गांधीच्या नावाचा गैरवापर बीजेपीवाल्यांनीही(रीड संघवाल्यांनीही) करुन घेतलाच. कुणी गांधी विचारांना समर्थन देत करुन घेतला; कुणी विरोध करण्याच्या निमित्तानं(त्यांच्या विरोधामुळं अधिकच प्रचार होतो असं आता वाटतय.) करुन घेतला. . पण असा वापर कोण कुणाचा करुन घेत नाही? "शिवाजी महाराज" ह्या नावाचा (गैर?) वापरही होतोच की. कधीकधी ते मराठी अस्मितेचे आयडॉल असतात, तर कधी प्रखर हिंदुत्वाचे. कधी कधी ते चक्क आद्य सेक्युलारिस्ट आणि कट्टर गांधीभक्तही(!!) ठरवले जातात निधर्मीवाल्यांकडून. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

काही 'गांधीवादी समाजवादी'

पिंपातला उंदीर
Wed, 01/30/2013 - 20:26 नवीन
काही 'गांधीवादी समाजवादी' लोकाना पण गांधिवादाचा प्रचार केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

राजकारणाच्या दलदलीत अडकलेला

एम.जी.
Wed, 01/30/2013 - 20:34 नवीन
राजकारणाच्या दलदलीत अडकलेला महान समाजकारणी..! पॉलिटिक्स इज अ डर्टी गेम या वाक्याला अजून काय पुरावा हवा...
  • Log in or register to post comments

किंवा उलट

मन१
Wed, 01/30/2013 - 20:37 नवीन
समाजकारणाच्या अवास्तव अपेक्षा ज्याच्याकडून ठेवल्या गेल्या असा श्रेष्ठ "राजकारणी". कसें?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एम.जी.

आश्चर्य

आळश्यांचा राजा
Wed, 01/30/2013 - 21:10 नवीन
१. अस्पृश्यता आणि जातीभेद निर्मूलन २. स्त्री-पुरुष समानता, बुरखा पद्धत विरोध ३. दारुबंदी ४. आरोग्य, गोरगरीब/ दुर्गम भागातील रहिवाशांना वैद्यकीय सेवा ५. स्वच्छता - (सॅनिटेशन) ६. साक्षरता आणि शिक्षण - नयी तालीम ७. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम, स्वदेशी एखाद्या राजकीय (किंवा कोणत्याही क्षेत्रातील) नेत्याने एकाच वेळी एवढ्या महत्वाच्या बाबींचा विचार करुन कृती कार्यक्रम अंमलात आणणे, त्यासाठी प्रचंड प्रमाणात मोबिलायझेशन करुन देश ढवळून काढणे, आणि तेही देशात याविषयी कसलीही "लीगसी" नसताना, विसाव्या शतकाच्या तिसर्‍या दशकात, हे गांधीजींच्या पूर्वीही घडले नव्हते, नंतरही घडलेले नाही. भारतातही नाही. जगात इतरत्रही नाही. आख्खे सरकार हा एवढा कार्यक्रम आखण्यासाठी (१९२० संपून १०० वर्षे होत आली तरीही) अजून धडपडतंय, चाचपडतंय. सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी एक हट्टी म्हातारा आपल्या (बेरकी) राजकारणाला सांभाळून आणि स्वतःच्या आयुष्यात निरनिराळे प्रयोग करत आणखी वर हेही सगळे करत होता. खरं नाही वाटत. यातली एक गोष्ट जरी एखाद्यानं एखाद्या अंशानंही केली तरी त्यासाठी त्याला आपण भारतरत्न मिळालेल्या मंडळींच्या रांगेत बसवू. महात्मा मोहनदास गांधी हे एक आश्चर्य आहे.
  • Log in or register to post comments

truly +1

मन१
Wed, 01/30/2013 - 21:26 नवीन
truly +1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

प्रचंड सहमत

राही
Wed, 01/30/2013 - 21:43 नवीन
मोजक्या शब्दांत नेमके विश्लेषण. स्त्री-शूद्र उन्नयनाचे त्यांचे एकच कार्यदेखील महात्मापद त्यांच्याकडे चालून येण्यास पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

गांधींचे आकलन ही काही साधी गोष्ट नाही

श्रिया
Wed, 01/30/2013 - 23:31 नवीन
+१ साधी राहणी, अंगिकारलेला सत्याचा मार्ग हेही काही त्यांच्या व्यक्तिमत्वातले भावलेले पैलू. खरच गांधींचे आकलन ही काही साधी गोष्ट नाही. सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन कोणत्याही शस्त्राशिवाय एक मोठी क्रांती घडवून आणणं,ही एक कल्पनातीत गोष्ट आहे. भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार महात्मा गांधींना श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

विनम्र श्रध्दांजली

जुइ
Wed, 01/30/2013 - 22:04 नवीन
महात्मा गांधींना......श्रध्दांजली !!
  • Log in or register to post comments

बिका

चिंतामणी
Wed, 01/30/2013 - 23:50 नवीन
गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो.
ह्याच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments

गांधीजी भेटत गेलेले

मनिष
गुरुवार, 01/31/2013 - 02:02 नवीन
अनिल अवचट ह्यांनी लिहलेला मला खूप आवडतो, नक्की वाचावा असा - http://anilawachat.files.wordpress.com/2008/10/gandhiji.gif
  • Log in or register to post comments

गांधीवाद हे केवळ तत्वज्ञान

आनन्दिता
गुरुवार, 01/31/2013 - 03:38 नवीन
गांधीवाद हे केवळ तत्वज्ञान नसुन ती एक जीवनपद्धती आहे.. जन्मापासुन फक्त भौतिकतेच्या पाण्यावरच जगलेल्यांना हे 'अहिंसा, सत्य' म्हणजे बावळटपणा वाटत असला तरी आज अख्ख्या जगासमोर आज ज्या समस्या आ वासुन उभ्या आहेत त्यावर "समग्र जीवनपद्धती" हे एकमेव उत्तर आहे.. महात्मा गांधींना भावपूर्ण श्रद्धांजली!!
  • Log in or register to post comments

एक दिवस उशीराने

नगरीनिरंजन
गुरुवार, 01/31/2013 - 11:33 नवीन
आदरांजली!
  • Log in or register to post comments

आ.रा यांच्याशी पूर्ण सहमत

इन्दुसुता
Fri, 02/01/2013 - 10:02 नवीन
आ.रा यांच्याशी पूर्ण सहमत. गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो... त्यांच्याशी असहमती, ते ( त्यांचे लेखन / विचार ) न समजू शकल्यामुळे असेल काय असे मी स्वतःला अनेकदा विचारले आहे. In the context of his time, his ideas were undoubtedly great and his understanding of the Indian psyche unparalleled ( then, now and ever), असे मला वाटते. त्यांना परत एकदा सादर प्रणाम आणि आदरांजली.
  • Log in or register to post comments

मिसळपाववरील पहिले वर्ष

आनंद घारे
Fri, 02/01/2013 - 10:30 नवीन
मिपाच्या वाचकांनी दिलेल्या इतक्या प्रतिसादांमधून महात्मा गांधीजींना श्रध्दांजली देऊन झाली आहेच, त्याच्या स्मृतीला माझेही प्रणाम. मिसळपाववरले वातावरण नक्कीच थोडे तरी बदललेले आहे. तात्यांच्या काळात लिहिलेल्या "मिसळपाववरील पहिले वर्ष" या लेखात मी असे लिहिले होते, बहुतेक उडप्यांच्या हॉटेलात दारापाशीच एका चांदीच्या चकाकणार्‍या देव्हार्‍यात एक सुंदर मूर्ती ठेवलेली असते किंवा एका स्वामीचा फोटो लावून त्याला ताज्या फुलांचा हार भक्तीभावाने घातलेला दिसतो. मिसळपावच्या मुखपृष्ठावर सुध्दा आराध्य दैवतांची किंवा साधुसंतांची सुंदर चित्रे लावून ते मंगलमय केलेले असते. पण मधूनच कोणी भाबडा (वाटणारा) भक्त एका जगद्वंद्य महात्म्याचा फोटो एका भिंतीला चिकटवून त्याला उदबत्ती ओवाळतो. त्यानंतर दोघेतीघे येतात आणि हिरव्या मिरचीची चटणी, चिंचेचा घोळ, हॉट अँड सॉवर सॉस वगैरेमध्ये बुडवलेली बोटे त्या चित्राला पुसतात. ते पहायलाही कांही लोकांना मजा वाटते. "पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना" असे म्हणतात ना! या लेखाला तात्यांनी दिलेली दाद आता वाचता येत नाही, पण ती सकारात्मक होती. त्यांनी माझे वाक्य कापले नव्हते किंवा त्याला विरोधही केला नव्हता. यावरून ४ वर्षांपूर्वीचे मिपा आणि तेंव्हा ते चालवणारे तात्या या दोन्हींची कल्पना येते.
  • Log in or register to post comments

असेच म्हणावेसे वाटते.

राही
Fri, 02/01/2013 - 11:00 नवीन
मिपामधला बदल सुखद आहे आणि त्यामुळे इथे अधिक काही लिहावेसे वाटू लागले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा