Skip to main content

विदूषक

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 29/01/2013 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
काय माझ्या रेखिले आहे कपाळी व्हायचे वटवृक्ष की साधी लव्हाळी मागते आहेस का आषाढ श्रावण वाट चुकला मेघ आहे मी उन्हाळी स्पर्श,स्वप्ने,पाकळ्या,गझला नि माझ्या काळजामध्ये किती जपशील जाळी लागतो द्यावा सुखाला रोज पत्ता दुःख येते प्रत्यही शोधीत आळी आसवांवर तेवते आयुष्य माझे वेदनांची साजरी करतो दिवाळी फुंकरी घालू नका जखमांवरी या मी विदूषक द्या मला निर्व्याज टाळी -- उपटसुंभ
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1698
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

फुंकरी घालू नका जखमांवरी या मी विदूषक द्या मला निर्व्याज टाळी
सुंदर...

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

हेच म्हणतो. शेवटचं कडवं सुंदरच आहे.

सगळेच शेर एकापेक्षा एक! गझल आवडली.