Skip to main content

सिद्धोबा

लेखक विसुनाना यांनी शुक्रवार, 25/01/2013 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो. थोडं आत वळल्यावर - भर दुपारी अचानक एक हिरवाकंच पाचू सामोरा येतो. मूळ खोड नसणाऱ्या पारंब्यांच्या वडाखाली मोरांचा एक थवा केकारवत फिरतो इकडेतिकडे. तहानलेल्या डोंगराच्या पायथ्याशी एक नितळ झरा आहे, थंडगार! वेळू आणि आमराई वगैरेही- निळंशार आकाश, स्वच्छ मन, निवलेले डोळे, अक्षय शांती- तोच सिद्धोबा! पण थोडं आत वळावं लागतं - स्वतःच्या. कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो - तिथे रहदारी असते फक्त. .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3235
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

पण थोडं आत वळावं लागतं - स्वतःच्या. कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो - तिथे रहदारी असते फक्त.
अप्रतिम!

विसूनाना, मस्त कविता. 'थोडं आत वळावं लागतं स्वतःच्या' केवळ सुप्पर. -दिलीप बिरुटे

विसुनाना: आप बहुत कम लिखते हैं, मगर बहुत सही लिखते हैं ! नुकत्याच वाचलेल्या यशोधरा यांच्या मनाचिये गुंती या अशाच सुंदर मुक्तकाची आठवण झाली.

In reply to by पैसा

हात्तिच्या.. गंडले! मिपावर एवढे भारी लोक्स आहेत की खरंच तसं चित्रही टाकतील. बाकी शब्दचित्राचं कवतिक केलंच आहे वर.

पण थोडं आत वळावं लागतं - स्वतःच्या. कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो - तिथे रहदारी असते फक्त. क्लास!

लई भारी लिहिलेत, पण ते आत वळायचे दरवाजे आम्ही आमच्याच हातानं बंद केले आहेत, कुलुपं लावलीत आणि चाव्या कुणा दुश्मनाकडं निगुतीनं सांभाळायला दिल्यात, आता परत मिळवायच्या म्हणजे सुद्धा तह करावा लागणार, न परवडणा-या अन न झेपणा-या अटींचा.