देहाला चाळुन घेता
सुजीत फाटकची एक मस्त कविता मागे वाचली होती. त्याच्याशी संपर्क साधता आला नाही. पण पोरगं नक्की कलंदर असणार. किती जणांनी वाचली असेल कल्पना नाही पण तुम्हालाही ती आवडेल म्हणून इथे देतोयः
देहाला चाळुन घेता
मातीची पखरण व्हावी
हा इकडे देह सरावा
ती तिकडे मूठ भरावी
माझ्यावरच्या शापांचा
उ:शाप तुझ्या ना ठाई
इतक्या उबदार करांची
तू अजून नाहिस बाई
माझ्या वंशाच्या गावी
रंगाला फुटतो गंध
दृष्यांना सुचती कविता
गंधाचा होतो स्पर्श
माझ्या असल्या वंशाचे
कित्येक उमलले कोंभ
परि माझ्यारूपी पक्का
वंशाचा पहिला अंत
(सुजीत फाटक)
कविता गंभीर असली तरी दु:खद खासच नाही. अत्यंत मोजक्या पण नेमक्या शब्दात भावना व्यक्त करण्याच सुजीतचं कौशल्य दाद देण्यासारखं आहे. ज्या सहजतेनं त्यानं लय सांभाळली आहे त्याचंही कौतुक आहे.
मला समजलेला अर्थ असा:
जीवन सार्थ झालं तर नुसता देह सरत नाही तो कित्येकांच जीवन आनंदाच करून जातो. पहिल्या कडव्यात अत्यंत सहजतेनं त्यानं कविताचा आशय उलगडला आहे.
अशा जीवनाला त्या व्यक्तीच्या संवेदनशीलतेमुळे (किंवा दैववशात) अत्यंत प्रतिकूलतेतनं मार्ग काढावा लागतो. कवि ग्रेसनं म्हटलय तसं :
मी महाकवि दु:खाचा
प्राचीन नदीपरि खोलं
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूलं
सुजीत तो आशय एक पाऊल पुढे नेतो. त्याला वाटतं की जीवलग सखीचा सहवास देखील अशा जगण्याला उ:शाप ठरू शकत नाही.
त्याचा लिहीण्याचा अंदाज जीवघेणा आहे. शेवटच्या दोन ओळीतली नज़ाकत पाहा:
माझ्यावरच्या शापांचा
उ:शाप तुझ्या ना ठाई
इतक्या उबदार करांची
तू अजून नाहिस बाई
तिसरं कडवं अफलातून आहे. ते कविच्या अत्यंतिक तरल मनोजगताच वर्णन आहे. संदीप खरेच्या या ओळी :
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळूवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा
ज्या तरलतेनं विमनस्कतेच वर्णन करतात त्यासारख्या या ओळी आहेत. पण त्या जास्त चित्रदर्शी आहेत आणि पुन्हापुन्हा वाचाव्याशा वाटतात. रंगांना गंध असणं, दृष्यांच्या कविता होणं आणि गंधांचे स्पर्श होणं हे निव्वळ लाजवाब आहे!
बेभान आणि कलंदर जगणं प्रत्येकाची आंतरिक आस आहे. ती आपल्या मुक्त स्वरूपाची साद आहे. पण प्रत्येकाला ते जमेल असं नाही. सुजीत या अवस्थेच वर्णन काय अफलातून करतो ते शेवटच्या कडव्यात येतं. त्यानं कहर केलायः
माझ्या असल्या वंशाचे
कित्येक उमलले कोंभ
अशा बेबंद जगण्याची आस कविचं जगणं बघून अनेकांना लागलीये. पण :
परि माझ्यारूपी पक्का
वंशाचा पहिला अंत
अस्तित्व एक आयुष्य एकदाच घडवतं. ते इतकं मौलिक असतं की त्याचा वारसा पुढे चालत नाही. स्वच्छंद ही व्यक्तिगत उपलब्धी आहे, तो वंशपरंपरेनं लाभत नाही. नवा कलंदर पुन्हा नव्या वंशात जन्मावा लागतो. त्या वंशाला मग नवे अभिशाप असतात. त्या अभिशापातून तो जगणं कृतार्थ करतो आणि निरोपाच्या वेळी म्हणतो :
हा इकडे देह सरावा
ती तिकडे मूठ भरावी
वाचने
4096
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
वा! फारच सुंदर उलगडून दाखविली
देहाला चोळून घेता
In reply to देहाला चोळून घेता by आजानुकर्ण
तुझ में 'रब' दिखता है
In reply to देहाला चोळून घेता by आजानुकर्ण
असो... पण छान लिवलय हो,कविता
छान !!!
In reply to छान !!! by धन्या
+१
In reply to छान !!! by धन्या
+१
छान
सही!
मस्त्..रसग्रहण..
माझ्यावरच्या शापांचा
In reply to माझ्यावरच्या शापांचा by कवितानागेश
ते सखीला उद्देशून आहेत
In reply to माझ्यावरच्या शापांचा by कवितानागेश
हा अँगलही रुचतो आहे.
माझ्या वंशाच्या गावी
'देहाला चोळून घेता' असे वाचले
In reply to 'देहाला चोळून घेता' असे वाचले by टवाळ कार्टा
मीही 'देहाला चोळून घेता' असे
छानच
+१
कविता व रसग्रहण आवडले.
रसग्रहण आवडले
In reply to रसग्रहण आवडले by पैसा
कदाचित कवि आपल्या काव्यप्रतिभेला उद्देशून बोलत असेल
In reply to कदाचित कवि आपल्या काव्यप्रतिभेला उद्देशून बोलत असेल by संजय क्षीरसागर
:)
In reply to :) by पैसा
इतक्या उबदार करांची, तू अजून नाहीस बाई!
रसग्रहण आवडले