मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनुनय

अज्ञातकुल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
असतात रंग ढंगहि वेडे झरतात छटा रत रुधिराच्या हृदयात बंदिशी अनोळखी डोळ्यांकाठी रति भावुकशा खल मदन उरी रण रिपुकांचे ओठांवरती नित शब्द मुका काया माया बहु काटेरी ओढाळ मती अस्वस्थ सखा चंद्रास न कळते झिजलेले पाण्यास व्यथा परि आकळते फेसाळ शिरी कल्लोळे जळ एकांत कुंद साहतो कळा सारेच कसे हे अवरोही तळ नितळ सकळ ढवळे गात्री आभाळ दूर दूरच सरके मग श्वास फिरे नत माघारी डोहात बंद अगणित रात्री गंधर्व क्षणांच्या गंध कुपी अस्पर्शधुंद हा ओलावा अनुनय समिधांचा मापारी ........................अज्ञात

वाचने 2763 वाचनखूण प्रतिक्रिया 13

In reply to by इन्दुसुता

अज्ञातकुल Mon, 01/28/2013 - 10:24
अनुभव आहे.. जीवघेणा.. इथे मला समाधान मिळालं. कविता पोहोचल्याचा आनंद मिळाला. आभारी आहे मनापासून. :-)

अज्ञातकुल Tue, 01/29/2013 - 14:35
मिका, आपल्या प्रतिसाद सातत्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तसा प्रतिसाद इतरांना देण्यात मी कमी पडतो याबद्दल दिलगीर पण आहे. अनेकांचा गैरसमजही होत असेल त्यामुळे. आपला असाच लोभ असू द्यावा. मला वेळ काढायलाच हवा आता. :-)

सांजसंध्या Wed, 01/30/2013 - 14:49
प्रत्येक कडव्यातून वेगवेगळ्या प्रतिमांमधून चित्रदर्शी दिसला. अनुनय एका कडव्यात जाणवला.. इतर कडव्यात शोधतेय अजून.. (काही ठिकाणी शब्दरचना बोजड वाटली)