असतात रंग ढंगहि वेडे
झरतात छटा रत रुधिराच्या
हृदयात बंदिशी अनोळखी
डोळ्यांकाठी रति भावुकशा
खल मदन उरी रण रिपुकांचे
ओठांवरती नित शब्द मुका
काया माया बहु काटेरी
ओढाळ मती अस्वस्थ सखा
चंद्रास न कळते झिजलेले
पाण्यास व्यथा परि आकळते
फेसाळ शिरी कल्लोळे जळ
एकांत कुंद साहतो कळा
सारेच कसे हे अवरोही
तळ नितळ सकळ ढवळे गात्री
आभाळ दूर दूरच सरके
मग श्वास फिरे नत माघारी
डोहात बंद अगणित रात्री
गंधर्व क्षणांच्या गंध कुपी
अस्पर्शधुंद हा ओलावा
अनुनय समिधांचा मापारी
........................अज्ञात
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2799
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनुनय समिधांचा मापारी
म्हणजे काय? अनुनय कळलं, समिधाही कळल्या, एकुण वरवर कवितेच्या संदर्भाने सारी कविता उमजली पण, मापारी?
मापारी म्हणजे मोजमाप करणारा.
In reply to अनुनय समिधांचा मापारी by स्पंदना
मापारी म्हणजे मोजमाप करणारा. अनुनयाच्या समिधांचं मोजमाप करणारा.
वाटलच होतं. पण आम्ही मापाड्या
In reply to मापारी म्हणजे मोजमाप करणारा. by अज्ञातकुल
वाटलच होतं. पण आम्ही मापाड्या हा शब्द जाणतो, म्हणुनच जरा खात्री करु घेतली.
धन्यु!
छान
काहीतरी तरल आहे हे जाणवले.
धन्यवाद
In reply to छान by शुचि
धन्यवाद :-)
ओढाळ मती अस्वस्थ सखा
ओढाळ मती अस्वस्थ सखा
अनुभव आहे.. जीवघेणा...
कविता आवडली
अनुभव आहे.. जीवघेणा.. इथे मला
In reply to ओढाळ मती अस्वस्थ सखा by इन्दुसुता
अनुभव आहे.. जीवघेणा.. इथे मला समाधान मिळालं. कविता पोहोचल्याचा आनंद मिळाला. आभारी आहे मनापासून. :-)
छान.
कविता आवडली.
चंद्रास न कळते झिजलेले पासूनच्या पुढील ओळी खासच.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद बिरुटे सर
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद बिरुटे सर :-)
आपल्या
आपल्या कल्पनाविस्तारास __/\__
अतिशय आशयगर्भ आहे रचना...
मिका,
मिका,
आपल्या प्रतिसाद सातत्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तसा प्रतिसाद इतरांना देण्यात मी कमी पडतो याबद्दल दिलगीर पण आहे. अनेकांचा गैरसमजही होत असेल त्यामुळे. आपला असाच लोभ असू द्यावा. मला वेळ काढायलाच हवा आता. :-)
प्रत्येक कडव्यातून वेगवेगळ्या
प्रत्येक कडव्यातून वेगवेगळ्या प्रतिमांमधून चित्रदर्शी दिसला. अनुनय एका कडव्यात जाणवला.. इतर कडव्यात शोधतेय अजून..
(काही ठिकाणी शब्दरचना बोजड वाटली)
छान आहे कविता ......
छान आहे कविता ......