शक्यतो मी हिवाळ्याचा रात्रीचा प्रवास टाळतो. त्यात सोलापूर-बेळ्गाव म्हणजे खाच-खळग्यांचा..
पण आमचे काका नुकतेच बेळ्गाव शहरी Shift झाल्याने आणि माझ्या दैवाने एक अत्यंत खडूस प्रजातीचा बॉस मला लाभल्याने हा प्रवास क्रमप्राप्त होता..म्हणतात ना 'जर नशीबच असेल पाजी तर काय करेल काजी?' त्या टिकीट देण्यार्या माणसाला पण काय हुक्की कोणास ठाऊक? त्याने बरोबर विंडोव्ह सीट दिली. बर म्हटल की शेजारील सहप्रवाश्याला विनंती करुन त्याच्या जागेवर बसावे तर त्या सहप्रवाश्याने मी काही बोलायच्या आत पिशवीतून पांघरुन काढले आणि पांढरा झेंडा दाखविला. आता पुढे त्याला 'ईथे बसता का?' असे विचारणे म्हणजे निर्लज्जपणा होईल.
कोण रीस्क घ्या सहप्रवासी जर पुणेरी असला तर? नुसता कल्पनेने काटा आला. मी खिडकी बंद करण्याचे २-४ असफल प्रयत्न केले पण शेवटी ती पण 'सरकारी खिडकी' समोरच्या माणसाला प्रतिसाद न देण्याचा गुण तिच्याही अंगात (की नसां-नसात? जाणकाराने योग्य शब्द निवडावा) भिणला होता. शेवटी ती मोहीम अर्ध्यावर सोडून मी पेपर वाचण्याचा असफल प्रयत्न करु लागलो. काही वेळातच गाडीने गळा खाकरला आणि मार्गस्थ झाली. थोड्याच वेळात थंडीने आपला बडगा दाखवायला सुरुवात केली. प्रत्येक सेकंदागणिक वरच्या दाताची खालच्या दातांशी गाठी-भेठी होऊ लागल्या. आमच्या ड्राईव्हरच्या वाहन
चालविण्याच्या कौशल्य पाहता तो रीटयर पायलट असावा अशी माझी आधीच समजूत झाली होती.
माझा शेजारचा शाहीस्तेखान (ही उपमा देऊन मला तो गनिम असल्याचे सुचवायचे आहे हे
जाणकार वाचकांनी ताडले असेलच) केव्हाच गाढ झोपला होता. त्याला झोप लागणारच कारण
'उत्तरेकडून' येणारे गार वारे थांबवणारा मी 'हिमालय' होतोच ना? असो काही वेळानंतर मी ही डोळे बंद करुन झोपायचा प्रयत्न करु लागलो. माझ्या प्रयत्नाला यश आले की नाही हे निश्चित सांगणे कठीण तोच काचेवर ट्क-ट्क असा आवाज आला. बहुदा कुठलेसे स्टॅंड आले असावे मी ईकडे-तिकडे पाहू लागलो तोच कंडक्टर जोरात ओरडला 'जामखंडी गाडी १० मिनीटं थांबेल.’ माझ्या खिडकीवर पुन्हा ट्क-ट्क. मी डोळे चोळत पाहीले एक म्हातारा हातात गरमागरम उप्पीट घेऊन उभा होता. 'ऊप्पीट लेंगे क्या साब?' मी प्रवासात सहसा काही खात नाही(बायकोचा धाक दुसर काय?) पण आजची परीस्थिती वेगळी होती. थंडीने आधीच नसंनस गोठली होती शिवाय पोटात भूकेने आधीच थैमान घातले होते.(शिवाय मी काय करतो हे बघायला 'बायको' नावाचा प्राणी नसल्याने मी धाडसाने त्याला विचारले 'कितीला?' तो 'सात रुपये'. मी एक प्लेट घेतली.. पहीला घास खाल्ला आणि एकच शब्द म्हणावा वाटला.. 'वा!!!'
त्या गरमागरम उप्पीटामुळे माझी थंडी कुठल्या कुठे पळून गेली. 'साब ओर एक प्लेट दू क्या?'
कदाचित माझा चेहरा ती असाहाय्य भूक लपवू शकला नाही. मी 'हो' म्हटल्या बरोबर त्याने हॉटेलाकडे
धुम ठोकली त्याला आधीच्या प्लेटचे पैसे घ्यायचेही लक्षात आले नाही. ईथे गाडीत ड्राईवर आणि कंडक्टर आल्याने मला धडधडू लागले. त्या गरीबाचे नुकसान होऊ नये असे मनापासून वाटत होते. 'सगळे आले का?' कंडक्टरने पुन्हा आरोळी ठोकली. मी हातात वीस रुपये तयार ठेवले होते. आत सुट्टे पैसे शोधायला वेळ नव्हता. ईतक्यात घामानं निथळलेला तो धावत खिडकीपाशी आला. दुसरी उप्पीट प्लेट समोर धरली आणि म्हणाला 'वो गरम नही था तो लेट हुआ' एवढ्यात गाडीने पुन्हा गळा खाकरला. मी गडबडीने वीस रुपये त्याच्या हातात कोंबले आणि उप्पीट घेतले. वीस रुपये पाहून भांबावला आणि सुट्टे शोधण्यासाठी खिश्यात हात घातला. ईतक्यात गाडी सुटली तो सहा रुपये देण्यासाठी गाडीमागे धावला पण मीच दुर्लक्ष केले.
त्याने माझी थंडी पार पळवून लावली होती आणि कधी कधी काही नुकसान आनंदही देऊन जाते हो ना?
आपले अभिप्राय व अनुभव जरुर कळवा !!!!!
- पंचम
ता.क. हा माझा पहीलाच लेख आहे.. जमला का नाही ते जरुर कळवा
वाचने
6813
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
पंचम साहेब , लेख नक्कीच आवडला.
लेख आवडला पंचमदा!
+१
In reply to लेख आवडला पंचमदा! by आदूबाळ
प्लेट पुराण
मस्त..
अतिअवांतर
In reply to मस्त.. by यसवायजी
मिपावर स्वागत
वीस रुपये पाहून भांबावला आणि
छान
लेख आवडला..
अनुभव आणि लिखाण दोन्ही आवडले.
मस्त!
सुरेख लिहीलय.
केळीच्या पानात उप्पीट,,,,,,,,
आधिच्या थंडीच्या वर्णानाने
लेखन आवडले.
खूप छान लेख.
व्वा
लिखाणात 'दम' आहे.
छान लेख..
लेखनशैली अतिशय आवडली.
जमखंडीचं उप्पिट
छान लेखन.
धन्यवाद
तडीपार
छान आठवण - उप्पीट-उपमा
In reply to तडीपार by पंचम
साबुदाण्याची उसळ
In reply to छान आठवण - उप्पीट-उपमा by सुनील
घावन आणि नीरदोसा
In reply to छान आठवण - उप्पीट-उपमा by सुनील
तर्री शिवाय मजा नाही.
टिमकी जींची टीमकी आवडली
हात अवघडला असला तरी
In reply to टिमकी जींची टीमकी आवडली by पंचम
मस्त अनुभवकथन.
त्या सौख्याला उपमा नाही
अशीच माहिती म्हणुन..
उगाचच अवांतर
In reply to अशीच माहिती म्हणुन.. by यसवायजी
अहं.. वंटमुरीकर देसाई त्यांचा
In reply to उगाचच अवांतर by आदूबाळ
हां बरोबर! मग जमखंडीचा काय
In reply to अहं.. वंटमुरीकर देसाई त्यांचा by मस्त कलंदर
विंडोव्ह
उप्पीट म्हणजे कोंकण/द
संपलं सगळं.....
In reply to उप्पीट म्हणजे कोंकण/द by गवि
उलट टेसदार..
In reply to संपलं सगळं..... by प्रभाकर पेठकर
"जमखंडी", "जामखंडी" नव्हे