काकबन
एका काकबनात असंख्य कावळे नांदत होते. वेगवेगळ्या मतप्रवाहाचे थवे होते त्या काकबनात. पत्येक थवा आपापल्या मतप्रवाहांवर ठाम होता. त्या मतप्रवाहांमधली विवीधता त्या काकबनाचे वैषिठ्य होते. अनेक नविन कावळे त्या बनात येऊन आनंदाने विहार करायचे. बरेच कावळे त्या काकबनात असलेल्या थव्यांना बिचकूनही असायचे. कारण हे थवे कधी कधी झुंडीने काही वेगळेपणा दाखवणार्या कावळ्यांवर तुटून पडायचे. त्या काकबनाच्या इतिहासात असे बरेच वेगळे असणारे कावळे हार मानून काकबन कायमचे सोडून निघून गेले होते. त्यात त्या काकबनाचेच नुकसान झाले. पण हे त्या थवे करुन रहणार्या कावळ्यांच्या कधी लक्षात आलेच नाही. कारण ते त्यांच्या थव्यांमध्येच मशगूल होते.
बर्याच दिवसांनी एक वेगळा भासणारा कावळा त्या काकबनात आला. वेगळाच होता तो. स्वत:चे एक वैचारिक अधिष्ठान घेऊन आला होता हो. त्याची मते टोकाची होती पण वास्तविक होती. कधी कधी ती सामान्य कावळ्यांच्या आकलना पलिकडची होती. हा नविन आलेला कावळा काही मते मांडायचा आणि ती त्याचे ठाम मते असल्याने त्यांचा पाठपूरावा करून ते मते समजावून सांगायचा प्रयत्न करायचा. त्यात काही थव्यांना त्याची मते पटायची नाही. कदाचित त्याची ती मते त्यांच्या थव्याच्या मतप्रवाहापेक्षा वेगळी असावित. पण त्यांना कोणी एक कावळा येऊन असे त्याची मते रेटतोय असेच वाटायचे. त्या कावळ्यावर सगळे झुंडीने तुटून पडायचे. तरीही तो कावळा त्याच्या मूळ मतांवर ठाम राहून ती मते तो समजावून सांगायचा प्रयत्न करायचा. पण तो जेवढा प्रयत्न करायचा तेवढेच त्याच्या मूळ भूमिकेवर शंका घेतली जायची.
तो कावळा बिचारा वैचारिक पातळीवर वाद-प्रतिवाद करायचा प्रयत्न करायचा. अर्थात एवढ्या सगळ्यांच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागायचे त्यामुळे त्याला शब्दांचे खेळही करायला लागायचे. पण कदाचित तो सर्वसमावेशक व्हावे म्हणून, म्हणजे वेगवेगळ्या मतप्रवाहाच्या सर्वांना समजावे म्हणून, तसे करत असावा कदाचित पण त्याने आणखिनच गुंता वाढायचा. मग त्याच्या मूळ मुद्याकडे दुर्लक्ष होऊन तो कसा आपल्याच मतांशी ठाम आहे ह्यावर लक्ष केंद्रित व्हायचे. आणि मग त्या वेगवेगळ्या मतप्रवाहाच्या थव्यांकडून पुन्हा तेच शब्दांचे खेळ होत रहायचे. पण मग ते कधीकधी वैचारिक न राहता व्यक्तिगत व्हायचे. त्या शब्दांच्या खेळांना, तो वेगळा कावळा परत शब्दांचेच खेळ करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आणि हे चक्र चालूच राहयचे.
ही अशी काकबने आजही अस्तित्वात आहेत. कोर्पोरेट क्षेत्रात, समजात, सरकारी कचेर्यांत. अव्याहत चालू असणारा हा खेळ आहे. आता हे त्या वेगळ्या कावळ्यांवर अवलंबून असते की त्यांनी थव्यांच्या झुंडशाहीपुढे हताश होऊन हार मानायची की आपल्या मतांवर ठाम राहयचे...
प्रतिक्रिया
या अश्या जंगलाच्या, गावांच्या
बर्याच दिवसांनी एक वेगळा भासणारा कावळा त्या काकबनात आला.
बर्याच दिवसांनी एक वेगळा भासणारा कावळा त्या काकबनात आला. वेगळाच होता तो.बरेच प्रश्न पडले.. तो कावळा आधीच्या स्वर्गीय काकबनातून या झुंडशाहीयुक्त नरकसमान काकबनात का आला असेल..? आधिच्या काकबनातील कावळ्यांनी त्याला हुसकून टाकले असावे का..? जर तिथे तो सुखी असेल तर नवीन काकबन कशासाठी धुंडाळेल..? सध्या इतकेच. ;-)हेच प्रश्न पडले! उत्तरे
(No subject)
हम्म
+१००
कावळा आणि थवा ही रुपक आवडली :
तो कावळा मिसळकावचा सभासद आहे
जया अंगि मोठेपण तया यातना कठिण
धन्यवाद,
धन्यवाद!
माफ करा पण 'एकांडा' कावळा
माफ करा
इरसाल!
पण कावळा एकांडा कसा. अंड तर
अंड आणि अंडं
मरतंय तिच्यायला..
स्वसंपादन नाही
ना "अ" ला काना हवाय ना "ड" वर अनुस्वार...
माफ करा पण 'एकांडा' कावळा
पास !
हा हा हा!
:)
का-वळा
कावळा हा सामाजिक पक्षी आहे.
+१
खरं आहे
सोकाजी अतिशय समर्पक कथन करुन
रुपक कथा आवडली, सध्याच्या
क्रॉकटेल ठिक
@याप्रमाणे विद्यार्थी व्हायचं
आगळा कावळा - "तो पहा मावळता
ह ह पु वा.
प्रयत्नांती परमेश्वर
हे काय पटलं नाही
खरच काही कळलं नाही. कोण कावळा
चेतनाचा हा प्रतिसाद सर्वोत्कृष्ठ आहे!
सोत्रीकाका, जनरली सगळेच कावळे
कशाला बोधकथा फिथकथा..