Skip to main content

अहमदाबाद मध्ये पुणे

लेखक रमेश आठवले यांनी मंगळवार, 22/01/2013 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यनगरी हि तेथील पुणेरी (खाष्ट ?) पाट्या साठी प्रसिद्ध आहे. हे लोण आता अहमदाबाद पर्यंत पोचले आहे असे वाटते. नुकतीच Times ऑफ इंडिया मध्ये छापलेली चार उदाहरणे उद्धृत करत आहे. १. शहराच्या मध्यभागात भद्र म्हणून एक विस्तार आहे. पुरातत्व विभागाने त्याची रक्षित स्थानांमध्ये गणना केली आहे. तेथील एका ४०० वर्षे जुन्या गणेश मंदिराबाहेर असा फलक लावला आहे. --मन्दिराच्य्या कोठेही शाखा नाहीत. भाविकांनी फसवणूक होऊ देऊ नये. २. एका लस्सीच्या दुकानाबाहेर मालकांनी वाटर कुलर बसवला आहे आणि त्याच्या शेजारी असा फलक लावला आहे. - शेजारच्या दुकानात दाबेली खाणार्यांनी या कुलरचे पाणी पिऊ नये. ३. आश्रम रस्त्यावरील एका मुतारीत असा फलक आहे. -तुम्ही तुमच्या घरी बाथरूम मध्ये थुंकता का ? मग इथे का ? ४. एका हॉटेल मध्ये शौच घरात असा फलक आहे. - तुम्ही मानवी आरोग्याचा मान राखता ना ! मग साखळी खेचा. ----- हा इंग्लिशमध्ये छापून आलेल्या मूळ गुजराती फलकांचा मराठी अनुवाद आहे. तरी चूक भूल द्यावी घ्यावी..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3969
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

वाव सो फनी यु नो अजून टाका कि "पाट्या "

मला शेवटच्या दोन पाट्या अजिबात खाष्ट वाटल्या नाहीत. १ नं बद्दल काय बोलाव समजत नाही, पण २ नं मात्र काम्हणुन दाबेली पलिकडे खाउन याच्या इलेक्ट्रीसिटीवर बसवलेल्या कुलरच पाणी प्यायच? इकडे पाणी मिळतय म्हणुन दाबेलीवाला सोय करत नाही आहे. मेरेकु बरोबर लग्या.

In reply to by क्लिंटन

तसेही लस्सीवर पाणी कशाला प्यायचे ? काढूनच टाकावा तो कूलर...

को हो आठवले साहेब पुण्यात आणि अहमदाबाद शहरांमध्ये आणखी अधिक चांगले साम्य आहे त्याविषयीही लिहा ना. दोन्ही शहरांमध्ये खाद्यसंस्कृतीचा प्रचंड विकास झाला आहे.पुण्यात जसे विकांताला घरी खाणे कमी आणि हॉटेलात जास्त असते अगदी तसेच अहमदाबादमध्येही असते.पुण्यात श्रेयस, टिळक रोडवर दुर्वांकूर (की आणखी कुठले नाव--आता विसरलो) अशा अनेक ठिकाणी मराठी थाळ्या मिळतात तशा अहमदाबादमध्ये अमे गुजराती,पक्वान,दादी इत्यादी अनेक ठिकाणी गुजराती थाळ्या मिळतात.आणि तिथे खवय्यांची प्रचंड गर्दीही असते (पुण्याप्रमाणे) हे वेगळे सांगायलाच नको. या दोन शहरांमधील अशा साम्यावर लिहिता येईल का? (पुणे आणि अहमदाबाद ही दोन्ही शहरे प्रचंड आवडणारा) क्लिंटन

मी अश्या पाट्या अनेक शहरात पहिल्या आहेत. इंग्लंडात मुख्य चौकात एका हॉटेलच्या बाहेर एक मजेदार पाटी होती. "मुतारी फक्त ग्राहकांचीच " पुण्याचे नाव "झाले " पण इतर शहरे ही काही कमी नाहित.

In reply to by तर्री

पुण्याचे नाव "झाले " पण इतर शहरे ही काही कमी नाहित.
याला अगदी पूर्णपणे सहमती.न्यूयॉर्क मध्ये मॅडम ट्युसॉच्या संग्रहलायाच्या परिसरात अगदी जवळजवळ अशी दोन मॅकडोनाल्ड आहेत.त्यातील एका मॅकडोनाल्डमधून दुसरे दिसते.तिथे मी स्वतः वाचलेली पाटी लिहितो---'Maximum permissible time 20 minutes'. पण होते काय की न्यूयॉर्कमध्ये अशी पाटी असेल तर ते प्रोफेशनॅलिझम असते पण पुण्यात 'ग्राहकांनी विनाकारण दुकानात थांबून खोळंबा करू नये' अशी पाटी असली तर तो कुचकटपणा ठरतो.

हॅ हॅ.. मजेशीर आहे. मागे हरिद्वारमधे असेच बोर्ड बघायला मिळाले होते त्याची आठवण झाली. "गंगा मईया के किनारे हंसी मजाक करना धार्मिक अपराध है", वगैरे. प्रत्येक गावची आपापली ष्टाईल... :)

In reply to by गवि

दिल्लीच्या पराठेवाल्या गल्लीत एका दुकानावर लिहिलेय, "नकली घी साबित करने वाले को रु. १०.००० का इनाम" =))

क्लिंटन साहेबांनी विचारलेल्या माहितीच्या अनुषंगाने -- अहमदाबाद मध्ये दोन भोजनालये खास आहेत. १. विशाला खेड्यातील जुन्या पद्धतीचे पाट, पत्रावळ आणि फक्त कन्दिलाच्चा उजेड व शेकोटी, अशा वातावरणा मधील सुग्रास ग्रामीण घरगुती जेवण अनुभव घेण्यासारखे आहे. इंदिरा गांधी तेथे जेवावयास गेल्या होत्या असे सांगतात. तेथेच जुन्यावेळी पाकक्रियेत वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचे संग्रहालय आहे. २. अगाशिये ( गच्चीवर ) सेठ मंगलदास यांच्या हवेलीच्या अगाशी(गच्ची) वर पारंपारिक शहरी संस्कृतीचे प्रतिक म्हणता येईल असे हे भोजनालय मध्य वस्तीत आहे. येथ कासाच्या ताटात जेवण वाढले जाते. ताटात एक मोठेसे झाडाचे पान ठेवलेले असते . आपण आपल्या पसंतीचे लोणचे त्यावर वाढून घ्यायचे, म्हणजे लोणच्यामधील आम्ल्त्वाचा ताटावर असर होत नाही. दोन्ही ठिकाणे शाकाहारी आहेत आणि आंतरजालावर त्यांच्या विषयी माहिती उपलब्ध आहे.

In reply to by रमेश आठवले

विशाला आणि अगाशिये या दोन्ही ठिकाणी जेवल्याचे आठवते. विशालामध्ये मातीच्या पणतीत ताजे लोणी देतात. ते मला इतकं आवडलं की त्या रिकाम्या पणत्यांचा माझ्या ताटासमोर मनोरा रचला होता! अगाशियेची आठवण म्हणजे तिथले वेटर चक्क लग्नातल्या पंगतींसारखा आग्रह करतात! मला एक प्रश्न पडला आहे - आपण ज्याला "भाकरी" म्हणतो त्याला गुजरातीत काही वेगळं म्हणतात का? कारण गुजराती "भाकरी" आपल्या भाकरीपेक्षा पूर्ण वेगळी असते.

गवि साहेबांनी विचारलेल्या शंकेच्या समाधानासाठी --- अहमदाबाद मध्ये उन्हाळ्यात गरमी प्रचंड असते. दुकानात शिरणारा प्रत्येक माणूस आधी गार पाण्याची अपेक्षा करत असतो. त्यानंतर लस्सी वगैरे .

तिरशिंगराव माणूसघाणे यांनी सुचवल्याप्रमाणे खालील पुस्तकाची माहिती करून देत आहे. ह्या पुस्तकात अहमदाबाद मधील दोनशेहून अधिक हॉटेलांची माहिती दिली आहे. त्यात प्रत्येक ठिकाणाची खासियत , दोन माणसांचे अंदाजे होणारे बिल , पत्ता, फोन व प्रतवारी दिली आहे. या पुस्तकाची नवी आवृत्ती दर वर्षी प्रकाशित होते. पुस्तकाचा संदर्भ : Times फूड गाईड www.timescity .com /ahmedabaad या धाग्यावर अहमदाबाद शिवाय इतर सर्व मोठ्या शहरातील खाण्या पिण्याच्या जागांची माहिती सुद्धा मिळते. .crosswords या दुकानात हे पुस्तक मिळते. ------------- ???? आपण सर्वजण पाट्यांचा विषय सोडून पाटावर येउन बसलो- हे कसे झाले ?

शीर्षक वाचून मला वाटले की पुण्यातल्या काही गृहस्थांनी अहमदाबादेत दुकाने किवा व्यवसाय उघडले असतील त्याच्याबद्दल माहिती असेल. थोडा विरस झाला. पण त्याच्या बदल्यात पुणेरी धर्तीवर लिहिलेल्या पाट्या वाचून करमणूक झाली. दुसरे असे कि आपली संस्कृती भारतव्यापी आहे याची खात्री झाली.

आदुबाळ यांचा प्रश्न : 'मला एक प्रश्न पडला आहे - आपण ज्याला "भाकरी" म्हणतो त्याला गुजरातीत काही वेगळं म्हणतात का? कारण गुजराती "भाकरी" आपल्या भाकरीपेक्षा पूर्ण वेगळी असते' ------------------------------------------------- आपण ज्याला ( बाजरी किंवा ज्वारीची) भाकरी म्हणतो त्याला गुजरातीत रोटलो असे म्हणतात. गुजरातमध्ये ज्वारीचा वापर फार कमी. म्हणजे रोटलो म्हटले कि बाजरीची भाकरी असेच समजायचे