Skip to main content

नकोस

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 18/01/2013 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
ती :- दिवसभराचा उजेड उतरत जातो झाडांच्या तळकोषी आरामाला झिरपत जातो हळू हळू अंधार व्यापतो आभाळाला........ तो :- नकोस हिणवू नको ओणवू सावर ग स्वतःला नभी चांदणे येइल अलगद सजविल तव मेण्याला धुके भ्रमाचे विरघळेल उदयेल नवी स्वरमाला हरवुन जाशिल तिथे सोडशिल ना या जन्माला संध्या- छाया ऊन-सावल्या खेळविती हृदयाला उमलविती रोमांकित वलये जागविती मधुशाला रंग नभाचे तसेच आपले अंत नसे क्षितिजाला शब्द कुंचले घेउन हाती हो सुसज्ज लढ्ण्याला ......................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2107
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

संध्या- छाया ऊन-सावल्या खेळविती हृदयाला उमलविती रोमांकित वलये जागविती मधुशाला रंग नभाचे तसेच आपले अंत नसे क्षितिजाला शब्द कुंचले घेउन हाती हो सुसज्ज लढ्ण्याला
व्वाह....

तिचा सूर निराशावादी वाटतोय. नकोस हिणवू नको ओणवू सावर ग स्वतःला... कुठल्यातरी गंभीर परिस्थितीतून ती स्वतःचा धि:क्कार करण्याइतकी खचलेली असताना तो तिला आधार देऊ पाहतोय. या पार्श्वभूमीवर रंग नभाचे तसेच आपले अंत नसे क्षितिजाला शब्द कुंचले घेउन हाती हो सुसज्ज लढ्ण्याला हा जबरदस्त आशावादी आणि सकारात्मक दृष्टीकोण आहे. अप्रतिम कविता.