कविता आणि त्यातून ग़झल ह्यातील काही कळत नाही. पण आपण दिलेल्या ग़झला परिचित आणि आवडत्या आहेत. धन्यवाद. एक चांगली श्रद्धांजली ह्या प्रतिभावंत शायराला आपण अर्पण केली आहे.
अवांतरः आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे).हे गूढ काही उकलले नाही.
अवांतरः आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे).हे गूढ काही उकलले नाही.
सकाळच्या बातमीत तारीख २६ ऑगस्ट अशी आहे, ती चुकली आहे -
http://www.esakal.com/esakal/08272008/International48238962A9.htm
परिचय छान पण फारच त्रोटक दिला आहे असे वाटते.
वेळ मिळाल्यास त्यांच्या इतरही काही रचना इथे नागरीत द्यायचा प्रयत्न करीन.
अगदी जरूर.
तसेच फैज अहमद फैज यांच्याही रचना फार मार्मिक असतात. जमल्यास त्याही देता आल्या तर उत्तम.
(आस्वादक) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
पण वेलेवर श्रद्धांजली द्यावी असे वाटत होते, आणि डोक्याला अनेक व्याप..त्यामुळे जेवढे जमेल तेवढे आत्ता लिहिले आहे, बाकी काही रचना नंतर.
अवांतर - फैज अहमद फैज हे फारच जेष्ठ आणि श्रेष्ठ शायर होते (अहमद फराज़ यांच्यावर त्यांचा कॉलेजच्या काळात प्रभाव होता), त्यांच्याविषयी लिहायला आवडेल - पण इथे ते अप्रस्तुत होईल. हा लेख केवळ अहमद फराज़ ह्यांना श्रद्धांजली म्हणून लिहिला आहे.
मेहदी हसन कित्येक वेळा 'रंजीश ही सही' गातांना हे २ अशआर (शेर चे अनेकवचन) त्यात गुंफायचा; काफिया-रदीफ तोच पण हे अशआर तालिब बागपती ह्यांनी लिहिले आहेत, अहमद फराज़ ह्यांच्या मूळ 'रंजिश ही सही' ह्या गज़ल मधे ते नाहित.
ते अशआर असे -
माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिये आ|
जैसे तुझे आते हैं, न आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिये आ|
काळजीपुर्वक वाचल्यास असे लक्षात येते, खास करून 'रंजिश ही सही' ही गज़ल गज़ल-मुसलसिल असल्यामुळे की मूळ गज़लेतील रंग थोडा दु:खी, तीव्र विरहवेदनेचा आहे; तर ह्या दोन तालिबच्या द्विपदींमधे हा रांग थोडा गुलाबी रुसव्या-फुगव्याचा, छेडछाडीचा आहे. भाव, व्याकरण तेच, पण भावना त्याच नाही -- आणि अर्थातच शायरही तो नाही.
फराज साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. अल्विदा, फ़राज़साहब...
(दु:खी)केशवसुमार
त्यांच्या गझला व कविता इथे आणिइथेवाचता येतील..
(गझल/ कवितांचा दुवा सौजन्य मिलिंद फणसे)
पण त्यापलीकडे काही माहीत नव्हते. 'रंजीश' गजल ह्यांची हे ही नवीनच समजले.
त्यांना माझी श्रद्धांजली!
(फराजच्या मृत्यूनंतर का होईना, तुझ्या लेखामुळे थोडक्यात ओळख झाली त्याबद्दल धन्यवाद मनीष!)
चतुरंग
प्रतिक्रिया
भावपूर्ण श्रद्धांजली....
अवांतरः आज
माहितीबद्
छान पण त्रोटक परिचय
त्रोटक झाला आहे खरा...
रंजिश ही सही चे अजून २ अशआर...
भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली
आदरांजली
असेच म्हणतो!
फराज अहमद हे नाव ऐकलेले होते
बर्याच गझला