Skip to main content

माझ्या घरचा नवीन गुंड

लेखक आर्णव यांनी गुरुवार, 03/01/2013 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
कामाच्या कागदांची होते भेळ तुरु तुरु तुझ्या गत पळतेय वेळ तुझ्यासंग वेळ मुळी काळतच नाय वेळेला फुटतात सश्याचे पाय हवी असते मला जेव्हा झोपेची कुशी तू मारत असतेस या बाबाला ढुशी बाबाच्या कडेवर होते तुला ख़ुशी आवडते तुला माझ्या खांद्याची उशी कीबोर्ड चे माझ्या तोडतेस बटण बाहुल्यांचे तुझ्या करतेस मटण हे पाहून आईला फुटतो घाम काय माझी लेक; टेन्शन येत जाम आजी आजोबांची लाडकी तू नात असतात ते तुझे गुण-गान गात आजीने तुझ्यास्ठी केला मासे-भात जेव्हा दिसला तुझा पहिला दात तुझ्या जवळ, म्हणजे boxing रिंग powerful आहेत तुझ्या डोळ्यांची भिंग हातात येईल ते मारतेस फेकून बाबाच्या डोक्याला टेंगळानची शिंग लेडी बाळ कृष्ण तू, या तुझ्या लीला सांभाळताना आईचा मणका होतो ढिला तू आईवरच जा हो - घर ठेव क्लीन तिच्यासारखीच तू हो bandit queen - तुझा बाबा
लेखनविषय:

वाचने 2641
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

कीबोर्ड चे माझ्या तोडतेस बटण बाहुल्यांचे तुझ्या करतेस मटण तू आईवरच जा हो - घर ठेव क्लीन तिच्यासारखीच तू हो bandit queen
या ओळी वाचून उश्याशी दिवा लावला गेल्या आहे.

In reply to by दादा कोंडके

++++++++++++++११११११११११११११११११११११११ @तिच्यासारखीच तू हो bandit queen >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif हसुन हसुन खपल्या गेलो आहे... http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

छान

In reply to by शुचि

हे पद्य म्हणजे मिपाच्या कोंदणात शोभणारा हिरा आहे.

घरातील जो जुना गुंड, त्याच्या दहशतीबद्दल बोला की वो मालक :)

लब्बाड गुंड कुठला..!

मस्त