माझ्या घरचा नवीन गुंड
लेखनविषय:
कामाच्या कागदांची होते भेळ
तुरु तुरु तुझ्या गत पळतेय वेळ
तुझ्यासंग वेळ मुळी काळतच नाय
वेळेला फुटतात सश्याचे पाय
हवी असते मला जेव्हा झोपेची कुशी
तू मारत असतेस या बाबाला ढुशी
बाबाच्या कडेवर होते तुला ख़ुशी
आवडते तुला माझ्या खांद्याची उशी
कीबोर्ड चे माझ्या तोडतेस बटण
बाहुल्यांचे तुझ्या करतेस मटण
हे पाहून आईला फुटतो घाम
काय माझी लेक; टेन्शन येत जाम
आजी आजोबांची लाडकी तू नात
असतात ते तुझे गुण-गान गात
आजीने तुझ्यास्ठी केला मासे-भात
जेव्हा दिसला तुझा पहिला दात
तुझ्या जवळ, म्हणजे boxing रिंग
powerful आहेत तुझ्या डोळ्यांची भिंग
हातात येईल ते मारतेस फेकून
बाबाच्या डोक्याला टेंगळानची शिंग
लेडी बाळ कृष्ण तू, या तुझ्या लीला
सांभाळताना आईचा मणका होतो ढिला
तू आईवरच जा हो - घर ठेव क्लीन
तिच्यासारखीच तू हो bandit queen
- तुझा बाबा
वाचने
2634
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
नववर्षाची छोटीशी भेट
वा वा वा वा
एकदम झक्कास !
आवरा!
In reply to आवरा! by दादा कोंडके
+++++++++++++
छान
सुमार
In reply to सुमार by शुचि
अनमोल
In reply to अनमोल by परिकथेतील राजकुमार
मिपाला नक्की कोणत्या भागात
छान!
अलेले..
नवगुंडस्तवन आवडले.
In reply to नवगुंडस्तवन आवडले. by बॅटमॅन
+१
शुंदल......... मश्तच
मस्त