Skip to main content

चुंबकीय क्षेत्र आणि प्राण्यांची उभी रहाण्याची दिशा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 26/08/2008 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
आजच बी.बी.सी.वर ही बातमी वाचली. बातमीचा सारांश असा की, प्राणी चरताना, झोपताना साधारणतः दक्षिणोत्तर असतात. आणि याचा संबंध संबंधित शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी लावला आहे, वारा इत्यादिंचा नाही. मला प्रश्न असा पडला की आपल्याकडे पूर्व-पश्चिम झोपावं असं सांगतात. दक्षिणोत्तर झोपलं तर दक्षिणेला डोकं करू नये असं सांगतात. याचा संबंधही पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी असावा असं मला बरीच वर्ष वाटत होतं. कुणाला याबद्दल जास्त माहिती आहे का? जर चुंबकीय उत्तरेला माणसाचं डोकं असेल तर काय फरक पडतो (पृथ्वीच्या बाबतीत चुंबकीय उत्तर, भौगोलिक दक्षिणेला आहे)? माणसाच्या शरीरावर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा काय परीणाम होतो? माणूस इलेक्ट्रीकली न्यूट्रल असतो, पण चुंबकीय गुणधर्मांबद्दल काय? त्यातपण dimagnetic, paramagnetic किंवा ferromagnetic या कुठल्या प्रकारात माणसाच्या शरीराची गणना होते? रक्त प्रवाहित असण्यामुळे काही फरक पडतो का, कारण मृतदेहाचं डोकं दक्षिणेकडे केलं जातं!

वाचने 28174
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

फारच चान्गला विषय आणला आहेस चर्चे साठी माणसाच्या चुंबकीय गुणधर्मांबद्दल माहीती नाही ..जाण्कार मन्डळी देतिलच ... पृथ्वीच्या बाबतीत चुंबकीय उत्तर, भौगोलिक दक्षिणेला आहे पण ... पृथ्वीच्या बाबतीत चुंबकीय उत्तर आणी -दक्षीण कही लाख वर्षानी बदलतात ..म्हनजे उलटे होतात ... ही एक सायकल आहे .... पृथ्वीवरून महाकाय डायनासोरस अचानक नाहिसे होण्या मागे हे पण एक कारण आसावे असे मानले जाते ... ह्या विषया वर अजून माहीती वाचण्यासाठी उत्सूक ... मजेदार विदुषक

>>आपल्याकडे पूर्व-पश्चिम झोपावं असं सांगतात. दक्षिणोत्तर झोपलं तर दक्षिणेला डोकं करू नये असं सांगतात आपल्या पृथ्विवरच्या पोझिशनला धरुन असे सांगितले जात असावे का ? जगातल्या सगळ्या भुभागातले cattle असेच वागतात का ?

>> पृथ्वीच्या बाबतीत चुंबकीय उत्तर आणी -दक्षीण कही लाख वर्षानी बदलतात ..म्हनजे उलटे होतात ... ही एक सायकल आहे .... हो, हे मलाही माहित आहे. पण या चक्राचा कालावधी मला माहित नव्हता. (अवांतर: सूर्याचे ध्रुव २२ वर्षांनी बदलतात) >> पृथ्वीवरून महाकाय डायनासोरस अचानक नाहिसे होण्या मागे हे पण एक कारण आसावे असे मानले जाते ... इतर कारणांमधे एक अशनी पृथ्वीला धडकणे हे पण मानतात. मलाही अजून वाचायचंय म्हणून इथे धागा टाकला. अदिती

आजच बी.बी.सी.वर ही बातमी वाचली. वाचन चांगले आहे बातमीचा सारांश असा की, प्राणी चरताना, झोपताना साधारणतः दक्षिणोत्तर असतात. आणि याचा संबंध संबंधित शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी लावला आहे, वारा इत्यादिंचा नाही. बरे झाले मराठीत सांगितले. मुळ लेख काही वाचायला नको मला प्रश्न असा पडला की आपल्याकडे पूर्व-पश्चिम झोपावं असं सांगतात. दक्षिणोत्तर झोपलं तर दक्षिणेला डोकं करू नये असं सांगतात. उत्तरेला डोके करु नये असे सांगतात मेलेल्याचे पाय दक्षिणेकडे करुन डोके उत्तरेकडे करुन उचलतात जाळतांना पुर्व पश्चिम ठेवुन जाळतात (निदान आमच्या गावात तरी) वास्तुशास्त्रा नुसार घरातील मुख्य कर्त्याने नैऋत्य दिशेच्या खोलीत दक्षिणेकडे डोके करुन झोपावे, झोपेतले व्यवहार करावे ज्याला अध्यात्मात प्रगति करायची आहे त्याने पुर्वेकडे डोके करावे ज्याला संपत्ति मिळवायची आहे पण लग्न झालेले नाही त्याने पश्चिमेला डोके करावे उत्तरेला डोके केल्यास शांत झोप लागत नाही असे जाणकार सांगतात बाकी ते विज्ञान आपल्याला काय ठावुक नाय... (उभ्याउभ्या झोपणारा) नाना

In reply to by अवलिया

उत्तरेला डोके करु नये असे सांगतात मेलेल्याचे पाय दक्षिणेकडे करुन डोके उत्तरेकडे करुन उचलतात .... जे काय असेल ते! मला झोप आली की मी जागा मिळेल तिथे आणि वेळ मिळेल तेव्हा झोपते. आणि मला या विषयात फार गतीही नाही ... आमच्या शाळेत या गोष्टी शिकवल्या नाहीत. पण नाना, माझ्या प्रश्नांची उत्तरं नाहीत इथे! त्या प्रश्नांच्या संदर्भात माझं अज्ञान काही फार महत्त्वाचं नाही! :-) अवांतर: बरे झाले मराठीत सांगितले. मुळ लेख काही वाचायला नको "इंग्रजी येत नाही" असं म्हणाला असतास तर आम्ही (चारचौघात) हसलो नसतो कोणी! (तोंड झाकून हसणारी) १_६ विक्षिप्त अदिती

In reply to by अवलिया

नाना, म्हणतात तसे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असे दोन्ही प्रवाद मी ऐकले आहेत. वास्तुशास्त्राप्रमाणे डोके द. ला करून झोपावे असे म्हटल्याचे आढळले आहे. तर, गणपतीच्या गोष्टीत बहुधा मेलेला हत्ती दक्षिणेकडे डोके करून झोपला होता आणि शंकराने त्याचे डोके कापून आपल्या मुलाला चिकटवले म्हणून द. कडे डोके ठेवून झोपू नये असे ही सांगताना कोणालातरी ऐकले आहे. ;)

In reply to by प्रियाली

तुमच्या भयकथेत कुठल्या दिशेला डोके ठेवलेला "वाचतो" ते सांगावे आजपासुन फक्त त्याच दिशेला डोके करुन झोपू. :-)

In reply to by अवलिया

वास्तुशास्त्रा नुसार घरातील मुख्य कर्त्याने नैऋत्य दिशेच्या खोलीत दक्षिणेकडे डोके करुन झोपावे, ठीक. झोपेतले व्यवहार करावे म्हणजे काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

लोळणे स्वप्न पहाणे पांघरुण अंगावर घेणे पांघरुण अंगावरुन काढुन टाकणे.... इत्यादी अहो झोपुन पहा ना एकदा ... बघा काय काय करता येते ते :)

In reply to by अवलिया

लोळणे स्वप्न पहाणे पांघरुण अंगावर घेणे पांघरुण अंगावरुन काढुन टाकणे.... इत्यादी हाथ तेरी की!!! तुमचीही धाव कुंपणापर्यंतच....???? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

तुम्हाला अपेक्षित कामे आम्ही झोपण्यापुर्वीच करतो. जसे झोपण्यापुर्वी दात घासणे, अंथरुण नीट अंथरणे, गरज असल्यास शौचास जावुन येणे किंवा लघुशंका उरकणे, तसेच दरवाजा नीट बंद केलेला आहे किंवा नाहि याची खात्री करणे, दिवे विझवणे इत्यादी. ही कामे झोपल्यावर करता येत नाहीत असा आमचा अनुभव आहे. बाकी तुम्ही काय म्हणत होता तुम्हाला काय जमत नाही म्हणुन? की मला भास झाला?

In reply to by अवलिया

दात घासणे, शौचास जावुन येणे किंवा लघुशंका उरकणे, दरवाजा नीट बंद केलेला आहे किंवा नाहि याची खात्री करणे ही कामे "झोपेतले व्यवहार" या सदराखाली येतात याची कल्पना नव्हती! असो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

परत तुम्ही गडबड करत आहात नीट वाचा अहो असा गोंधळ कराल तर झोपेतले व्यवहार निट नाही जमणार तुम्हाला

In reply to by सुनील

झोपेतले व्यवहार करावे अरे बापरे ... जै जै प्रभुदेवा प्रसन्न :) बाकी आपण झोपतो वायव्ये कडे डोके करुन पण ऊठतो कुठेही (म्हणजे माझ्याच बेड वर .. पण नैऋत्य किंवा अग्नेय दिशेला डोकं असतं ) पुन्हा एकदा जै जै प्रभुदेवा प्रसन्न -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

उत्तर कॅलिफोर्नियात एक "विक्षिप्त जागा" आहे, तिथे म्हणे गुरुत्वाकर्षणच नाही. तेथे धड उभे राहता येत नाही (हे केवळ ऐकीव नाही कारण मी हा अनुभव स्वतः घेतला आहे). Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by आनंदयात्री

झोपेत असल्याने आता आठवत नसेल जर जावु द्या

In reply to by सुनील

उत्तर कॅलिफोर्नियात एक "विक्षिप्त जागा" आहे, तिथे म्हणे गुरुत्वाकर्षणच नाही. तेथे धड उभे राहता येत नाही (हे केवळ ऐकीव नाही कारण मी हा अनुभव स्वतः घेतला आहे). अशी बातमी दैनिक संध्यानंदमधे आली होती (याच पेप्रात स्वर्गाचा "फोटो" छापला होता, म्हणून विचारलं) का? बाकी धड उभं न रहाता येण्यासाठी इतर बरीच (चांगली) कारणं आहेत!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही संध्यानंद वाचता? अरे वा !

In reply to by अवलिया

रोज नाही, पण कोणी दुसय्रानी विकत घेतला आणि वाचायला मागितल्यावर दिला तर! (फुकट ते पौष्टीक आणि मुळापासून)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही स्वतःच्या पैशाने कोणता पेपर वाचता?

In reply to by अवलिया

अफ्रिकेत आल्या पासून मला एकच पेपर माहीत आहे .. पण तो कोरा असतो ... आणि अंमळ हलका असतो .. आणि अंमळ स्पंजी असतो .. आणि अंमळ ... ... जाउ देत ... तो पेपर मला हॉटेल फुकट देतं ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by अवलिया

>> तुम्ही स्वतःच्या पैशाने कोणता पेपर वाचता? एकही नाही! पेपरचा एक उपयोग आपल्याला आधीच कळला आहे! त्यामुळे मी माहितीजालवरील पेपरच वाचते!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माहितीजालवरील पेपर कि माहितीजालवरीलपेपर ? कारण मग मिसळपाव हे पेपर नाही असे मला वाटते

In reply to by अवलिया

>> माहितीजालवरील पेपरच कि माहितीजालवरीलच पेपर ? धन्यवाद ... हसताना च जरा सरकला! :-)

In reply to by अवलिया

पेपर वाचताना कसा वाचावा? पुर्व-पश्चिम की दक्षिणोत्तर? वाचताना बुब्बुळांवर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होऊ शकतो काय? चुंबक चिकित्सेने चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो म्हणतात, त्याचा ह्या चुंबकीय क्षेत्राचा संबंध आहे काय? -(विज्ञानात ढ) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

पेपर वाचताना कसा वाचावा? उलटा लोकांना रशियन किंवा स्पेनिश वाचतायत असे वाटते जरा आदराने बोलतात पुर्व-पश्चिम की दक्षिणोत्तर? अधोउर्ध्व वाचताना बुब्बुळांवर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होऊ शकतो काय? पेपर वाचतांना आजुबाजुला किती नजर टाकली जाते त्यावर अवलंबुन चुंबक चिकित्सेने चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो म्हणतात, त्याचा ह्या चुंबकीय क्षेत्राचा संबंध आहे काय? खिसा हलका होवु शकतो

In reply to by धमाल मुलगा

>> वाचताना बुब्बुळांवर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होऊ शकतो काय? नैऋत्येच्या खोलीत दक्षिणेला डोकं करून (अर्थात झोपून) वाचू नकोस! :-) >> चुंबक चिकित्सेने चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो म्हणतात, त्याचा ह्या चुंबकीय क्षेत्राचा संबंध आहे काय? वाटत नाही. पृथ्वीचं चुंब़कीय क्षेत्र आहे ~ ०.३ गाऊस! आणि त्या चुंबकांचं १ गाऊस तरी असेल (निव्वळ अंदाज), काय टिकणार ते त्या चुंबकांसमोर!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

उलटा लोकांना रशियन किंवा स्पेनिश वाचतायत असे वाटते जरा आदराने बोलतात
ओ नाना, पण काय वाचतोय ते कसं कळणार? >>अधोउर्ध्व संस्कृतचे क्लास शोधायला जावं म्हणतो. काय बोलताय काय कळंना. >>पेपर वाचतांना आजुबाजुला किती नजर टाकली जाते त्यावर अवलंबुन _/\_
वाटत नाही. पृथ्वीचं चुंब़कीय क्षेत्र आहे ~ ०.३ गाऊस! आणि त्या चुंबकांचं १ गाऊस तरी असेल (निव्वळ अंदाज), काय टिकणार ते त्या चुंबकांसमोर!
धन्यवाद सायंटीश्ट तै! कळलं फक्त इतकंच की परिणामांचा संबंध नाही. बाकी गाऊस का माऊस वगैरे डोक्याच्या पाऽऽऽर १०००० फुटावरुन बुंऽऽग!!!

In reply to by धमाल मुलगा

>> बाकी गाऊस का माऊस वगैरे डोक्याच्या पाऽऽऽर १०००० फुटावरुन बुंऽऽग!!! असेच म्हणतो. - (सहमत) आंद्या चाउस

In reply to by धमाल मुलगा

ओ नाना, पण काय वाचतोय ते कसं कळणार? कळण्यासाठी पेपर कशाला वाचता, त्याचं गाईड वाचा! कळलं फक्त इतकंच की परिणामांचा संबंध नाही. बाकी गाऊस का माऊस वगैरे डोक्याच्या पाऽऽऽर १०००० फुटावरुन बुंऽऽग!!! म्हणजे कमीतकमी तिप्पट असेल पृथ्वीच्या चुंब़कीय क्षेत्रापेक्षा, एवढं तर समजलं (म्हणा कॉपीबद्दूरांना काय कळणार, डोंबल) (ह.घे)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यमे सगळ्यांना हलकं घ्यायला सांगतियेस ... सगळे मिळून तुला एकदा 'जड' देतील आं ... मग दिशाभूल होते .. सगळी चुंबकं सगळ्या साइडनं आपलं क्षेत्र दाखवती ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by टारझन

मी जिमची पावती नेहेमी जवळ बाळगते ते काय उगाच नै, हवं तर धम्या आणि आंद्याला विचार!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी गाऊस च्या ऐवजी गाउन असे वाचले पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी तिथे अनेकदा जावून आलो आहे..(इतक्या जणांना घेवून गेलो आहे की आता कंटाळा आला.) त्याला मिस्टरी पॉईंट म्हणतात. त्याच्या अनेक थिअरीज सांगितल्या जातात..विचीत्र गुरूत्वाकर्षण ही त्यातली एक थिअरी आहे.. -स्वःताला एखादी गोष्ट माहित नसेल तर लगेच ती "संध्यानंद" च्या क्वालिटीची समजायची हा कसला एटिट्यूड ?

In reply to by एक

>> -स्वःताला एखादी गोष्ट माहित नसेल तर लगेच ती "संध्यानंद" च्या क्वालिटीची समजायची हा कसला एटिट्यूड ? संध्यानंदची कॉमेडी व्हॅल्यू मान्य करण्याचा!

In reply to by सुनील

http://www.mysteryspot.com/ प्रचंड फ्रॉड आहे. पाच डॉलर वाया जातात. आमच्याकडे बाहेरून येणारे सर्व नातेवाईक / मित्र तिथे जायचा हट्ट धरतात, म्हणून मी अनेकदा तिथे गेलेलो आहे. -- वैद्य

In reply to by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

काय फ्रॉड आहे हो नक्की? नाही मीही जाऊन आले, खूप मजा आली! पण काहीतरी विचित्र वाटलं.. स्पिरिट लेव्हलची हातचलाखी करतात का वगैरे वाटलं.. पण उतारावरून चेंडू वर जातो घरंगळत! :O किंवा सरळ घरात आपण कंप्लीट तिरके उभे राहतो हे विचित्र गुरूत्वाकर्षणानेच होणार ना? कदाचित तो इफेक्ट एन्हान्स करायला त्यांनी घरांची विचित्र बांधणी केली असावी.. पण नक्की काय आहे हे खरंच समजून घ्यायचंय मला.. काय फ्रॉड आहे? बाकी एकच्या मताशी सहमत.. माहीत नसलेल्या गोष्टींना संध्यानंदच्या बातम्यांशी जोडायची कल्पना नाही पटली. असो..!

In reply to by भाग्यश्री

डोंगराचा उतार एका दिशेला असताना, घराचा उतार दुसर्‍या दिशेने ठेवून प्रेक्षकांची "फ्रेम ऑफ रेफरन्स" बदलली आहे, एवढेच. पण सांगताना गुरुत्वाकर्षणाचे विवर वगैरे काहीबाही ठोकून देतात. आणि हो, उतारावरून चेंडू घरंगळत वर जातो वगैरे ऑप्टिकल इल्युजन्स आहेत, हे माझ्या सहा वर्षाच्या मुलालाही कळले. -- वैद्य

In reply to by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

अरे वा! हुषार आहे की तुमचा सहा वर्षांचा मुलगा.. आम्हाला नाही कळलं बॉ..! बाकी,स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद..

In reply to by भाग्यश्री

सॉरी भाग्यश्री, मला तुमच्या हुषारीविषयी कुठलीही टिप्पणी करायची नव्हती. संपादक महोदय/या, माझा प्रतिसाद कृपया काढून टाकावा, ही विनंती. -- वैद्य

In reply to by भाग्यश्री

मी कधी अमेरीकेत गेले नाही त्यामुळे या जागा बघण्याची वेळ आली नाही. पण माझ्या भौतिकशास्त्राच्या पुस्तकांवर माझा ठाम विश्वास असल्यामुळे काहीतरी भ्रम "मिर्माण" केलेला असणार याची खात्री होती आणि आहे. शिवाय इंटरनेटवर थोडं भ्रमण केल्यावर "" ही लिंक सापडलीच. म्हणूनच मी "संध्यानंद"चा उल्लेख केला. त्यामुळे "संध्यानंद"च्या वाचक, चाहते इत्यादिंच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे. संपादक मंडळी, तुम्ही कात्री चालवू शकता. (पुस्तकी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>त्यामुळे "संध्यानंद"च्या वाचक, चाहते इत्यादिंच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे. =))

In reply to by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

दृश्य गोष्टीतली सापेक्षता आणि ऑप्टिकल इल्यूजन ह्या तत्त्वांचा चतुराईने वापर करुन बांधलेली घरे अशा प्रकारचे 'मिस्टरी स्पॉट्स' बनवू शकतात! गुरुत्वाकर्षण, चुंबकीय क्षेत्र वगैरे बनवाबनवी आहे पण एक मनोरंजक ठिकाण इतपत अपेक्षा ठेवून मजा लुटण्यासाठी एकदा भेट द्यायला हरकत नाही असे माझे मत! हा घ्या दुवा. सांता क्रूझ च्या ह्या स्पॉटवर मी काही फोटोही काढलेले आहेत, नंतर शोधून टाकेन. चतुरंग

In reply to by सुनील

पाहिलेली आहे. त्याचीच डिट्टो कॉपी ओहायोत क्लीव्हलंडजवळही पाहिलेली आहे. मला वाटते मुद्दाम तिरकी जमीन ठेवून केलेला हा काहीतरी भ्रम असावा. (माझ्या वाटण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. केवळ प्रेक्षकांना उल्लू बनवण्याचा काहीतरी प्रकार असावा असा आपला एक अंदाज.)

माझ्या आजीने सांगितलेलं कारणः आपल्या रक्तात लोह असते, दक्षिणोत्तर झोपल्याने रक्तप्रवाह त्या त्या ध्रुवाकडे ओढला जाऊ शकतो, त्यामुळे काही त्रास होण्याचा संभव असतो. आता ह्यात तथ्य कितपत हे मला ठाऊक नाही, पण विचार करण्यासारखा मुद्दा आहे. बाकी, असं काही होऊन त्रास होणे वगैरे हे खरे की खोटे हे एखादे डॉक्टरच सांगु शकतील. -(विज्ञानातही 'ढढ्ढोबा', कॉप्या करुन पास) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

>>>>आपल्या रक्तात लोह असते, दक्षिणोत्तर झोपल्याने रक्तप्रवाह त्या त्या ध्रुवाकडे ओढला जाऊ शकतो, त्यामुळे काही त्रास होण्याचा संभव असतो. हो मा़झे वडिल ही हेच कारण सांगतात.

>>(पृथ्वीच्या बाबतीत चुंबकीय उत्तर, भौगोलिक दक्षिणेला आहे) सर्वप्रथम, माझ्या माहिती प्रमाणे चुंबकीय उत्तर आणि भौगोलिक उत्तर एकाच दिशेने आहेत. फक्त त्यात थोडे अंतर आहे. म्हणजे पृत्वीचा भौगोलिक आस आणि चुंबकीय आस थोडे एकमेकांत कोन करुन आहेत. चुंबकीय क्षेत्र साधारण अडीच लाख वर्षांनी उलटे होते असे शास्त्रज्ञ म्हणतात. (आजवर ते अनेकदा उलटे झाले आहे.) त्याच्या खुणा थराच्या खडकांत असलेल्या लोहयुक्त खनिजांवर्न स्पष्ट होतात. म्हणजे अशी खनिजे जेव्हा स्थिर होत असतात तेव्हा तत्कालिन चुंबक क्षेत्राशी जुळवुन घेतात. या उलट-पालटीचा आणि पृथ्वीवरील उत्पातांचा संबंध लावायचा सुद्धा शास्त्रज्ञ प्रयत्न करत असतात. पृथीचे चुंबक क्षेत्र हे चक्रीवादळांच्या दिशेवर सुद्धा परिणाम करत असते असे वाचलेले आठवते. उत्तर गोलार्धात चक्रीवादळे घडाळ्याच्या दिशेने (की उलट?) असतात तर दक्षीण गोलार्धात त्या उलट. (चुभूदेघे.) प्राण्यांची चरताना उभे रहायची दिशा हा रंजक प्रकार आहे. अजून वाचले पाहिजे :) आपण कसे झोपावे याचा चुंबक क्षेत्राशी संबंध आहे हे मी तरी लहान असल्यापासून ऐकले आहे. (ही चर्चा वास्तूशास्त्र थोतांड आहे की नाही या एकाच आयामावर केंद्रीत होवू नये असे वाटते.) --लिखाळ.

In reply to by लिखाळ

>> सर्वप्रथम, माझ्या माहिती प्रमाणे चुंबकीय उत्तर आणि भौगोलिक उत्तर एकाच दिशेने आहेत. फक्त त्यात थोडे अंतर आहे. म्हणजे पृत्वीचा भौगोलिक >> आस आणि चुंबकीय आस थोडे एकमेकांत कोन करुन आहेत. मग मी दिलेली माहिती ७८००० वर्षांपूर्वीची आहे असं समजू या! ;-) मी अलिकडेच एक चुंबकीय कंपास पाहिलं, ते (भौगोलिक) उत्तरेकडे (चुंबकीय) उत्तर दाखवत होतं, म्हणून मी फसले असणार. धन्यवाद मला जरा माहितीजाल-शोधन करायला लावल्याबद्दल! तो कोन पण बदलतो का? (भौगोलिक आसाचा कोन ७२००० वर्षांच्या चक्रामधे २२.५-२५ अंश एवढा बदलतो, सध्या २३.५ अंश आहे.) >> पृथीचे चुंबक क्षेत्र हे चक्रीवादळांच्या दिशेवर सुद्धा परिणाम करत असते असे वाचलेले आठवते. उत्तर गोलार्धात चक्रीवादळे घडाळ्याच्या दिशेने (की >> उलट?) असतात तर दक्षीण गोलार्धात त्या उलट. चुंबक क्षेत्र हे चक्रीवादळांच्या दिशेवर सुद्धा परिणाम कसं करत असेल असा प्रश्न पडलाय. कारण चक्रीवादळाचा मुख्य कंटेंट पाणी / बाष्प, हवा असतो. माझ्या मते ते पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जे कोरिऑलिस बल (coriolis force) तयार होते त्यामुळे असावं. व्यापारी वाय्रांच्या दिशा तर याच बलामुळे दोन्ही गोलार्धात एकमेकांच्या विरुद्ध असतात (उत्तर गोलार्धात घड्याळाच्या उलट). >> (ही चर्चा वास्तूशास्त्र थोतांड आहे की नाही या एकाच आयामावर केंद्रीत होवू नये असे वाटते.) १००% सहमत!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>तो कोन पण बदलतो का? (भौगोलिक आसाचा कोन ७२००० वर्षांच्या चक्रामधे २२.५-२५ अंश एवढा बदलतो, सध्या २३.५ अंश आहे.) बदलत असावा. वीकिवर बरीच माहिती आहे. >>मी अलिकडेच एक चुंबकीय कंपास पाहिलं, ते (भौगोलिक) उत्तरेकडे (चुंबकीय) उत्तर दाखवत होतं, म्हणून मी फसले असणार अनेकदा कंपासची खालची तबकडी स्थिर असते आणि सुई फिरणारी असते. अश्या वेळी चुंकसुई जेव्हा उत्तर दिशा दाखवते तेव्हा हातातले दिशादर्शक त्याप्रमाणे फिरवून घ्यायचे असते. आणि उत्तरेला उत्तर मिळवायची असते. (म्हणजे उत्तर बरोबर येते :)). आपण पाहिलेला कंपास तसाच असेल आणि आपली फसगत झाली असेल. (की-चेन वगैरे प्रकारात असणार्‍या कंपास मध्ये, सुई आणि देशा लिहिलेली तबकडे एकत्र चिकटवलेली असते.) >>माझ्या मते ते पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जे कोरिऑलिस बल (coriolis force) तयार होते त्यामुळे असावं. बरोबर आहे. माझी चूक झाली बहुधा. माझ्या डोळ्यांसमोर फक्त पुस्तकातली आकृती होती..तपशीलात घोटाळा झाला. -- लिखाळ.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तो कोन पण बदलतो का? (भौगोलिक आसाचा कोन ७२००० वर्षांच्या चक्रामधे २२.५-२५ अंश एवढा बदलतो, सध्या २३.५ अंश आहे.) जालावरील महीती नुसार १. भौगोलिक आस आणी चुम्बकिय आस ह्यात सध्या साधारण ११.९ अन्शाचा कोन आहे http://en.wikipedia.org/wiki/Image:Geomagnetisme.svg २. चुम्बकिय ध्रूव आपले स्थान सतत बदलत असतो .. साधारणतः ११कीमी ... ३. पृथ्वी चे चूम्बकीय बल कमी होत आहे मजेदार विदुषक

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पृथीचे चुंबक क्षेत्र हे चक्रीवादळांच्या दिशेवर सुद्धा परिणाम करत असते असे वाचलेले आठवते. उत्तर गोलार्धात चक्रीवादळे घडाळ्याच्या दिशेने (की >> उलट?) असतात तर दक्षीण गोलार्धात त्या उलट हे एक मिथ आहे. लोक टॉयलेट /कमोड मध्ये गोल फिरणार्‍या पाण्याच्या दिशेबद्दल ही असेच समजतात. पण ते केवळ समज आहेत. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

चला चालत्या बस मधे झोपायला नको.. बस कधी दक्षिणोत्तर होईल सांगता येत नाहि ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

माझा दादा सांगयचा की दक्षिणेकडे पाय करुन झोपल तर यम येतो. लहानपणी ते खर वाटयचा . 8} --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

In reply to by स्नेहश्री

>> माझा दादा सांगयचा की दक्षिणेकडे पाय करुन झोपल तर यम येतो. खरोखर आला का, का तुम्ही पायाला "नाईट गॉगल" लावून, पायाखाली उशी ठेऊन त्याला चकवलंत? >> लहानपणी ते खर वाटयचा . म्हणजे आता तुम्ही मोठ्या झालात का? (ह.घ्या)

आपल्या शरीराचेही चुंबकिय क्षेत्र असते(म्हणे). त्या चुंबकिय क्षेत्राचा उत्तर धृव आपल्या डोक्याकडे आणि दक्षिण धृव पायाकडे असतो (म्हणे). आता चुंबकिय नियमांनुसार असमान धृवात आकर्षण आणि समान धृवात अपाकर्षण होते (प्रुव्ह्ड). त्यामुळे आपण दक्षिणेकडे पाय करून झोपल्यावर दोन समान धृव एकाच ठीकाणी आल्यामुले त्यात अपाकर्षण होऊन रक्ताभिसरणास विरोध होतो. परिणाम स्वरूप आरोग्य नीट राहात नाही. म्हणून दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. मृतदेहास दक्षिणेकडे पाय करून ठेवतात त्यामुळे प्रेत सडण्याची क्रिया मंदावते (दूरचे नातेवाईक यायचे असतात). मृतदेहास उत्तरेकडे पाय करून ठेवल्यास प्रेत लवकर सडू लागते. (म्हणे) दक्षिणेकडे पाय करू नये की डोके करू नये असा अनेकांना संभ्रम असतो. त्यामुळे पूर्व-पश्चिम झोपवे असा सोयिस्कर नियम ते बनवितात (असे मला वाटते). पुजा सांगणार्‍या गुरूजींनी 'दक्षिणे'कडे डोळे ठेवू नयेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पुजा सांगणार्‍या गुरूजींनी 'दक्षिणे'कडे डोळे ठेवू नयेत.
=)) काका, म्हणजे तुम्ही त्यांच्या पोटावरच मारताय की... असं नका हो करु, हवं तर पाठीवर मारा पण पोटावर नको :)

In reply to by धमाल मुलगा

अरे! म्हणजे मनोभावे पूजा सांगावी. दक्षिणेचा अंदाज घेत थोडक्यात आटपू नये, हो! बाकी काही नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मी हे असेच ऐकलेले आठवते, पण मुतदेह सडणे वगैरे माहित नव्हते!
पुजा सांगणार्‍या गुरूजींनी 'दक्षिणे'कडे डोळे ठेवू नयेत.
:=))

आपल डोके अर्धवट कोठेही केले तरी चालेल.......

In reply to by १.५ शहाणा

उरलेल्या अर्ध्या भागाचे काय करायचे भौ?

चुंबकीय क्षेत्र...काय डोमले ठेवले त्याच्यात ? डिस्कव्हरी चॅनेलवर प्रुव्ह केले आहे की ह्याचा माणसाच्या शरीरावर काही परीणाम होत नाही. त्यामुळे चुंबक चिकीत्सा हे एक थोतांड ठरते. त्यापेक्षा हे प्रुव्ह झाले आहे की चुंबन चिकीत्सेने माणुस ज्यास्त ताजातवाना व खुश राहातो.(हं. घ्या.) ;) ;) चुंबन चिकीत्सा जिंदाबाद....

In reply to by खादाड_बोका

त्यापेक्षा हे प्रुव्ह झाले आहे की चुंबन चिकीत्सेने माणुस ज्यास्त ताजातवाना व खुश राहातो कुणी केले? कधी केले? कसे केले? तुमचा सहभाग किती? कसा? पुर्वतयारी काय करावी लागली? लागते? जेवण किती वेळ आधी केले तर चालते? ताजा झाला म्हणजे नक्की काय झाले? नीट उस्तवार करुन सांगा हो अज्ञ लोकांना. अर्धवट सांगितल कि कळत नाही मग चुकीचे प्रयोग झाल्यास कोण जबाबदार?

In reply to by अवलिया

>> ... चुकीचे प्रयोग झाल्यास कोण जबाबदार? हरकत नाही, इग नोबल पुरस्कार मिळेल. ;-)

मूळ चर्चाविषय प्राण्यांची उभी रहाण्याची दिशा असा असताना, चर्चा झोपण्याबद्दल का होते आहे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

प्राणी उभे राहुन आराम करतात तर माणसे झोपुन म्हणुन (एवढे मनावर नका घेवु हो)

In reply to by अवलिया

>> प्राणी उभे राहुन आराम करतात तर माणसे झोपुन म्हणुन अनेक प्रकारचे प्राणीपण झोपून आराम करतात. मूळ लेखात पण हरणांच्या झोपण्याचा उल्लेख आहे! नाना तुम्ही माझ्या कमेंट्स मनावर नाही घेत आहात. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी आरामा बद्दल लिहिले होते झोपे बद्दल नाही आराम आणि झोप यात फरक आहे व तो तुम्हाला मान्य असावा :)