मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

असे का?

विनायक प्रभू · · काथ्याकूट
"तुला हा रोजचा अनुभव असेल"? ??? "तरी सुद्धा तपासुन पहा". ???? तुला एक मुलगा मला पण एकुलता. ????? "अगदी स्वतः च्या घरातुन सुरु कर". ????? "मी म्हणतो ते पटते का बघ". काय पटायला पाहीजे? काय तपासु? "मी अगदी जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घेतली. कधी मारले नाही. ओरडले नाही. अगदी जास्त हट्ट केल्यावर थोडेसे डोळे वटारणे ह्या वरच थांबलो. एवरीथींग बाय बुक. तरी सुद्धा असे का हे कळत नाही. नेमके काय कळत नाही? "नाही म्हणजे नाते संबंधात मुलाचा ओढा आईकडे जास्त असतो आणि मुलीचा बापाकडे. असे का? तुझा काय अनुभव? दहा च्या पट्टीवर तुझ्या आणि तुझ्या मुलाच्या संबंधाला मार्क किती? आणि आईला किती"? मला ६/१०. बायकोला ९/१०. "माझ्याकडे ५/१० आणि बायकोला ९/१०. हे सगळीकडे असेच असते का? त्याला नेमके कारण काय? ह्या नियमाला अपवाद फारच कमी का असतात.टक्केवारीमधे हे प्रमाण काय"? दहा मधे आठ घरात हाच सीन असतो. "पण असे का"? नेमके कारण मला माहीत नाही.मला सहा मधे आनंद आहे. तु पाच मधे आनंदी रहा.

वाचने 5911 वाचनखूण प्रतिक्रिया 30

त्रिवेणी Fri, 12/21/2012 - 20:39
असे असेल का वडिलांना असे वाटते की मुलगी नंतर दुसर्‍याच्या घरी जाणार त्यामुळे त्यांचा ओढा मुलीकंडे जास्तच असतो

त्रिवेणी Fri, 12/21/2012 - 21:17
मी सध्या अच्युत गोडबोले यांचे मनात हे पुस्तक वाचते आहे. त्यात फ्राइड व इतर मानसशास्त्रांनाच्या कार्याची त्यांच्या संशोधनांची खूप छान माहिती दिली आहे.

आबा Fri, 12/21/2012 - 21:23
आई आणि वडिलांकडे मुलाचा समसमान ओढा कसा निर्माण करावा, यावर कोणत्या जाणकारांनी मतं व्यक्त केलियेत (आणि कोणत्या पुस्तकात) ?!

पिवळा डांबिस Sat, 12/22/2012 - 00:26
असू देत तिला ९/१०. पण एक लक्षात घ्या, युवर सन इज युवर सन टिल ही गेट्स हिज वाईफ, युवर डॉटर इज युवर डॉटर फॉर द रेस्ट ऑफ युवर लाईफ!!!! :)

मला ६/१०. बायकोला ९/१० असे वाटणे किंवा युवर सन इज युवर सन टिल ही गेट्स हिज वाईफ, युवर डॉटर इज युवर डॉटर फॉर द रेस्ट ऑफ युवर लाईफ असे वाटणे म्हणजे काही व्यक्तीसापेक्ष अनुभवांचे अतिरंजीत जनरलायझेशन करणे. एकांगी विचार करुन काढलेले भडक निश्कर्ष नेहमीच लोकप्रिय ठरतात. आणि त्यातुन आपल्याला हवे ते अर्थ काढुन सामाधान मानण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पैजारबुवा,

तिमा Sat, 12/22/2012 - 11:29
माझ्या अनुभवावरुन सांगायचे तर ,बाप म्हणून मी मुलीला जेवढा वेळ दिला तेवढा मुलाला देऊ शकलो नाही. (लांबच्या नोकरीमुळे), सहाजिकच मुलाचा ओढा आईकडे जास्त असणारच, कारण तिनेच त्याचे जास्त केलेले असते. तसेच तुम्ही मुलांशी किती प्रेमाने वागता त्यावर बरेच अवलंबून असते. मुलाला मार मिळतो तो बापाकडूनच जास्त असतो. तेही एक कारण असू शकते. आमचा स्कोअर तर २/१० आणि ६/१० आहे.

चिर्कुट Sat, 12/22/2012 - 13:30
जनरलायझेशन होतंय असं वाटतय.. माझा स्कोर माझ्या आई-वडिलांसाठी ७/१० आणि ९/१० असा अनुक्रमे होता (आई होती तोपर्यंत. त्यानंतर २०/१० पप्पा.) कारण पप्पांनी आमच्यावर प्रचंड लक्ष ठेवलं होतं. दिवसातला जास्तीत जास्त वेळ त्यांच्याबरोबरच जायचा. याचा अर्थ असाही नाही की त्यांनी फार मोकळीक दिली होती किंवा आमचे जास्त लाड करत. उलट बराच मार सुद्धा खाल्लेला आहे. पण तो मार देतानाही त्यामागची प्रेरणा आम्ही अगदी लहान असतानाही व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत असल्याने कधी कडवटपणा आला नाही. हीच स्थिती अजूनही काही मित्रांची असलेली पाहिली आहे. (एक इंजिनिअरिंगचा मित्र तर चक्क त्याच्या इंजिनिअर वडलांबरोबर एकाच टेबलवर बसून घेतो. :))

यसवायजी Sat, 12/22/2012 - 13:54
असल काही जमत नाही ब्वॉ आपल्याला.. एकतर प्रेम आहे, किंवा नाही. बस्स.. प्रेम केल तर जीवापाड.. नाहीतर 'नाही'. प्रेमाला अस मोजता येतच नाही. आऊट ऑफ टेन मार्क द्या. :D तुमच आई-वडिलांवरच प्रेम किती 'किलो' सांगा. :D

पैसा Sun, 12/23/2012 - 08:32
हे मार्क्स कसे मोजलेत याबद्दल प्रचंड कुतुहल आहे!

इन्दुसुता Sun, 12/23/2012 - 21:11
असेच म्हणते .. फक्त जरासा बदल करून ... 'मास्तर इज ब्याक .. अ‍ॅन्ड हाऊ' :) रच्याकने, मास्तर यात क्रिप्टीक काय ते कळेना... :)