"तुला हा रोजचा अनुभव असेल"?
???
"तरी सुद्धा तपासुन पहा".
????
तुला एक मुलगा मला पण एकुलता.
?????
"अगदी स्वतः च्या घरातुन सुरु कर".
?????
"मी म्हणतो ते पटते का बघ".
काय पटायला पाहीजे? काय तपासु?
"मी अगदी जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घेतली. कधी मारले नाही. ओरडले नाही. अगदी जास्त हट्ट केल्यावर थोडेसे डोळे वटारणे ह्या वरच थांबलो. एवरीथींग बाय बुक. तरी सुद्धा असे का हे कळत नाही.
नेमके काय कळत नाही?
"नाही म्हणजे नाते संबंधात मुलाचा ओढा आईकडे जास्त असतो आणि मुलीचा बापाकडे. असे का? तुझा काय अनुभव?
दहा च्या पट्टीवर तुझ्या आणि तुझ्या मुलाच्या संबंधाला मार्क किती? आणि आईला किती"?
मला ६/१०. बायकोला ९/१०.
"माझ्याकडे ५/१० आणि बायकोला ९/१०. हे सगळीकडे असेच असते का? त्याला नेमके कारण काय? ह्या नियमाला अपवाद फारच कमी का असतात.टक्केवारीमधे हे प्रमाण काय"?
दहा मधे आठ घरात हाच सीन असतो.
"पण असे का"?
नेमके कारण मला माहीत नाही.मला सहा मधे आनंद आहे. तु पाच मधे आनंदी रहा.
असे का?
वाचने
5970
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रभू मास्तर, क्लासमधला सीन
प्रभू मास्तर, क्लासमधला सीन का हा?
नेमके कारण मला माहीत नाही.मला
:)
असेच म्हणतो.
क्ररच असे का? :ऑ
क्ररच असे का? :ऑ
असे असेल का
असे असेल का
वडिलांना असे वाटते की मुलगी नंतर दुसर्याच्या घरी जाणार त्यामुळे त्यांचा ओढा मुलीकंडे जास्तच असतो
मुलगी नंतर दुसर्याच्या घरी
In reply to असे असेल का by त्रिवेणी
मग आईला तसे वाटत नसेल का?
नाही नाही मला तसे नव्हते
नाही नाही मला तसे नव्हते म्हणायचे. नऊ महीने तीनेच तर सांभाळले असते मुलांना पोटात.
फ्रॉईडने यावर बरीच उत्तरे
फ्रॉईडने यावर बरीच उत्तरे शोधली आहेत. पैकी काही खोटी ठरली बहुधा. इडिपस कॉम्प्लेक्स वगैरेचा संबंध याच्याशी असावा.
ओडिपस
In reply to फ्रॉईडने यावर बरीच उत्तरे by अप्पा जोगळेकर
ओडिपस कॉम्प्लेक्स सुद्धा बराच क्रिटिसाईझ झालाय.
मी सध्या अच्युत गोडबोले यांचे
मी सध्या अच्युत गोडबोले यांचे मनात हे पुस्तक वाचते आहे. त्यात फ्राइड व इतर मानसशास्त्रांनाच्या कार्याची त्यांच्या संशोधनांची खूप छान माहिती दिली आहे.
शंका
आई आणि वडिलांकडे मुलाचा समसमान ओढा कसा निर्माण करावा, यावर कोणत्या जाणकारांनी मतं व्यक्त केलियेत (आणि कोणत्या पुस्तकात) ?!
a man will alwayas hate a man
a man will alwayas hate a man, its in the genes.
& व्हॉट अबाउट
In reply to a man will alwayas hate a man by ५० फक्त
वुमेन?
सेम..
In reply to & व्हॉट अबाउट by तुषार काळभोर
सेम.. ;)
हे प्रमाण नेहमीच म्हणजे
हे प्रमाण नेहमीच म्हणजे सगळ्या वयात असंच असते का? की ३५-४० नंतर हे १०पैकी मार्क उलटसुलट होतात?
असू देत
असू देत तिला ९/१०. पण एक लक्षात घ्या,
युवर सन इज युवर सन टिल ही गेट्स हिज वाईफ,
युवर डॉटर इज युवर डॉटर फॉर द रेस्ट ऑफ युवर लाईफ!!!!
:)
युवर सन इज युवर सन टिल ही
In reply to असू देत by पिवळा डांबिस
तंतोतंत सहमत!!
तुम्ही दोघे स्वतःवरून सांगता
In reply to युवर सन इज युवर सन टिल ही by किसन शिंदे
तुम्ही दोघे स्वतःवरून सांगता आहात का हे ?
पिडां काकांशी सहमत..
पिडां काकांशी सहमत..
मला ६/१०. बायकोला ९/१० असे
मला ६/१०. बायकोला ९/१० असे वाटणे
किंवा
युवर सन इज युवर सन टिल ही गेट्स हिज वाईफ,
युवर डॉटर इज युवर डॉटर फॉर द रेस्ट ऑफ युवर लाईफ
असे वाटणे म्हणजे काही व्यक्तीसापेक्ष अनुभवांचे अतिरंजीत जनरलायझेशन करणे.
एकांगी विचार करुन काढलेले भडक निश्कर्ष नेहमीच लोकप्रिय ठरतात.
आणि त्यातुन आपल्याला हवे ते अर्थ काढुन सामाधान मानण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
पैजारबुवा,
सहमत
In reply to मला ६/१०. बायकोला ९/१० असे by ज्ञानोबाचे पैजार
सहमत
मास्तर इज बॅक
:)
खरे कारण
माझ्या अनुभवावरुन सांगायचे तर ,बाप म्हणून मी मुलीला जेवढा वेळ दिला तेवढा मुलाला देऊ शकलो नाही. (लांबच्या नोकरीमुळे), सहाजिकच मुलाचा ओढा आईकडे जास्त असणारच, कारण तिनेच त्याचे जास्त केलेले असते. तसेच तुम्ही मुलांशी किती प्रेमाने वागता त्यावर बरेच अवलंबून असते. मुलाला मार मिळतो तो बापाकडूनच जास्त असतो. तेही एक कारण असू शकते.
आमचा स्कोअर तर २/१० आणि ६/१० आहे.
हम्म..
जनरलायझेशन होतंय असं वाटतय..
माझा स्कोर माझ्या आई-वडिलांसाठी ७/१० आणि ९/१० असा अनुक्रमे होता (आई होती तोपर्यंत. त्यानंतर २०/१० पप्पा.) कारण पप्पांनी आमच्यावर प्रचंड लक्ष ठेवलं होतं. दिवसातला जास्तीत जास्त वेळ त्यांच्याबरोबरच जायचा.
याचा अर्थ असाही नाही की त्यांनी फार मोकळीक दिली होती किंवा आमचे जास्त लाड करत. उलट बराच मार सुद्धा खाल्लेला आहे. पण तो मार देतानाही त्यामागची प्रेरणा आम्ही अगदी लहान असतानाही व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत असल्याने कधी कडवटपणा आला नाही.
हीच स्थिती अजूनही काही मित्रांची असलेली पाहिली आहे. (एक इंजिनिअरिंगचा मित्र तर चक्क त्याच्या इंजिनिअर वडलांबरोबर एकाच टेबलवर बसून घेतो. :))
हे काय आहे बरं काहीच कळत
हे काय आहे बरं काहीच कळत नाहीए, स्कोअर अँड ऑल..:(
असल काही जमत नाही ब्वॉ
असल काही जमत नाही ब्वॉ आपल्याला..
एकतर प्रेम आहे, किंवा नाही. बस्स..
प्रेम केल तर जीवापाड.. नाहीतर 'नाही'.
प्रेमाला अस मोजता येतच नाही.
आऊट ऑफ टेन मार्क द्या. :D
तुमच आई-वडिलांवरच प्रेम किती 'किलो' सांगा. :D
रंजक माहिती
बाकी प्रेम मोजमापात सांगणे कठिण आहे.
आई बाप दोघेही सारखेच.....
आई आणी बाप दोघेही त्यांच्या पिल्लांवर सारखेच प्रेम करतात फक्त बाप डोळस प्रेम करतो आणी माय आंधळ प्रेम करते.....
मास्तर
हे मार्क्स कसे मोजलेत याबद्दल प्रचंड कुतुहल आहे!
वेलकम बॅक मास्तर !
वेलकम बॅक मास्तर !
मास्तर इज बॅक>
असेच म्हणते .. फक्त जरासा बदल करून ... 'मास्तर इज ब्याक .. अॅन्ड हाऊ' :)
रच्याकने, मास्तर यात क्रिप्टीक काय ते कळेना... :)