नमस्कार मंडळी,
मिसळपाववर मागे जाहिर केल्याप्रमाणे मतमोजणीच्या आधी माझे अंदाज जाहिर करत आहे.या अंदाजांसाठी मी १९८० पासून झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि १९९९,२००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल तसेच उमेदवार लक्षात घेतले.विधानसभा मतदारसंघांचे क्षेत्र सर्वसाधारणपणे तालुका हे असते.गुजरातमधील तालुका पातळीवरील राजकारण मला कळते असा माझा अजिबात दावा नाही.तेव्हा या उमेदवारांविषयी गुगलून काही माहिती मिळते का हे बघितले. केशुभाई पटेलांचा गुजरात परिवर्तन पक्ष (गु.प.प) नक्की किती प्रभाव पाडेल याचा मतदारसंघांविषयी माहिती मिळवून सब्जेक्टिव्ह कॉल घेतला.अर्थातच ही माहिती गुगलून आणि गुजरातमध्ये प्रसिध्द होणारे इंग्रजी पेपर वाचून मिळवली आहे.प्रत्येक मतदारसंघातील जातनिहाय मतदारांची संख्या माझ्याकडे नाही.तसेच अनेक उमेदवारांविषयी काहीच माहिती मिळाली नाही.तरीही केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या कॉंग्रेस पक्षाविरूध्द किती जनमत गेले आहे,राज्यात ११ वर्षे सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदींच्या सरकारविरूध्द किती जनमत गेले आहे आणि केशुभाईंचा पक्ष नक्की किती परिणाम करेल याचा एकूण परिस्थितीचा सब्जेक्टिव्ह कॉल घेतला आहे.तसेच मागच्या निवडणुकांचा कल लक्षात घेता हे बदललेले आकडे निकाल फिरविण्याइतका परिणाम करतील का याचे विश्लेषण केले आणि त्या आधारे हे अंदाज व्यक्त करत आहे. या अंदाजांमध्ये नक्की कोणत्या कारणांमुळे त्रुटी होऊ शकेल हे लिहिलेच आहे.आणि एक गोष्ट आणखी सांगतो. माझ्याकडे कोणत्याही एक्झिट पोलचा विदा नाही की इतर कसलेही आकडे नाहीत.हे सर्व अंदाज माझ्या सब्जेक्टिव्ह कॉलवरूनच घेतले आहेत.आणि सब्जेक्टिव्ह कॉल अधिक अचूकपणे घेण्यासाठी खूपच जास्त अभ्यास हवा. पण तितका अभ्यास करायला, वाचन करायला मला खरोखरच वेळ झाला नाही.तेव्हा हे एक कारणही त्रुटी निर्माण करू शकेल.
तेव्हा माझा अंदाज पुढीलप्रमाणे:
एकूण जागा: १८२
भाजप: १०९
कॉंग्रेस: ७१
गु.प.प: २
माझ्या मते भाजप नक्की जिंकेल अशा जागा पुढीलप्रमाणे: अबाडासा, मांडवी (कच्छ),भूज,अंजार,वाव, दीसा,राधनपूर,चनासमा,विजापूर,हिम्मतनगर,गांधीनगर (दक्षिण),घाटलोडिया,वेजलपूर,वाटवा,एलिस ब्रीज, नारणपुरा, निकोल,नरोडा,ठक्कर बाप्पा नगर,अमराईवाडी,दरियापूर,मणीनगर,साबरमती,दासकरोई,ढोलका, मोरबी,टनकारा,राजकोट (पश्चिम),राजकोट (दक्षिण),द्वारका,मानवदार,जुनागढ,मांगरोल (जुनागढ),कोडीनार, धारी,राजुला,महुवा (भावनगर), तलाजा,गरियाधार,पलीटाणा, भावनगर (पूर्व), भावनगर (पश्चिम), मातर, हलोल,देवगढ बारिया,वाघोडिया, बडोदा शहर, सयाजीगंज, अकोटा,रावपुरा, मंजालपूर, पादरा, भरूच, अंकलेश्वर, ओलपड,कामरेज,सुरत (उत्तर), वारच्छा रोड,करान्ज,लिंबायत,उधना, माजुरा,कटारगाम, सुरत (पश्चिम),चोरयासी,जलालपोर,नवसारी, वलसाड आणि उंबरगाव
माझ्या मते भाजप जिंकायची शक्यता जास्त आहे अशा जागा पुढीलप्रमाणे: गांधीधाम, थारड, धनेरा, देवदार, पाटण, खेरालू,उंझा,बेचाराजी,इदर,मोडासा,दानीलिमडा,धांधुका,लिमडी,चोटीला,राजकोट (पूर्व),राजकोट ग्रामीण,जामनगर (उत्तर),जमजोधपूर,खंबालिया,कुटीयाना,लाठी,सावरकुंडला,गधडा,खंबायत,सोजीत्रा, मेहमदाबाद, शेहरा, लिमखेडा, सावली,छोटा उदयपूर,जेतपूर(बडोदा),सानखेडा,करजान,नांदोद,जंबुसार,मांगरोल(सुरत),बारडोली,डांग, गणदेवी आणि पारडी
माझ्या मते कॉंग्रेस नक्की जिंकेल अशा जागा पुढीलप्रमाणे: रापड,दांता,वडगाम,पालनपूर,सिधपूर, खेडब्रम्हा, भिलोडा, मनसा,विरामगाव,ध्रांगध्रा,वांकानेर,जसदान,धोराजी,पोरबंदर,केशोद,भावनगर ग्रामीण, बोरसाद, अंकलाव, पेटलाड, महुधा,थासरा,कपडवंज,बालासिनोर,संतरामपूर,फतेपुरा,दाहोद,मांडवी(सुरत) आणि व्यारा.
माझ्या मते कॉंग्रे जिंकायची शक्यता जास्त आहे अशा जागा पुढीलप्रमाणे:कांकरेज, विसनगर,काडी, मेहसाणा, बायड, प्रांतिज,देहगाम,गांधीनगर (उत्तर),कलोल (गांधीनगर),सानंद,बापुनगर,जमालपूर-खाडिया,असारवा, दसादा, वाधवान, जेतपूर (राजकोट),कालावड,जामनगर ग्रामीण,जामनगर (दक्षिण), सोमनाथ,तलाला, उना, अमरेली, बोटाड, उमरेठ, आणंद,नडियाद,लुनावाडा,मोरवा हदाफ, गोध्रा, कलोल(पंचमहल), झालोड, दभोई, देडियापाडा, वागरा, झगाडिया, सुरत(पूर्व),महुवा (सुरत),निझार, वंसदा, धरमपूर आणि कपराडा
माझ्या मते केशुभाई पटेलांचा 'गुजरात परिवर्तन पक्ष' स्वतः केशुभाईंची विसावदार आणि गोवर्धन झाडपियाचीं गोंडाल या दोन जागा जिंकेल.
मला २० तारखेला मतमोजणीच्या दिवशी रजा हवी आहे असे माझ्या बॉसला सांगून ठेवले आहे आणि अशी रजा मिळायला फार अडचण येऊ नये.पण बॅंकेत डिसेंबरचा क्वार्टर एंड जवळ आला असल्यामुळे आयत्या वेळी रजा मिळायला काही अडचण येऊ शकते.तशी अडचण न आल्यास (आणि इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित असेल) तर मी याच धाग्यावर निकालांचे धावते समालोचन करेनच.
वाचने
15587
प्रतिक्रिया
98
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
In reply to हबिणंदण क्लिंटनभौ. लय किचकट by बॅटमॅन
अधिकृत - अनधिकृत
११९
धन्यवाद
अभिनंदन!
In reply to धन्यवाद by क्लिंटन
"यापुढील निवडणुकांमध्ये अधिक
In reply to धन्यवाद by क्लिंटन
यामंदी डीटेल सापडल ..
नरेंद्र मोदींचं भाषण आवडलं
४५ मि.
In reply to नरेंद्र मोदींचं भाषण आवडलं by पुष्करिणी
सांगता
मागच्या तुलनेत मोदी यांनी दोन
हो करणार आहे
In reply to मागच्या तुलनेत मोदी यांनी दोन by आनंदी गोपाळ
हेच म्हणत होतो.
In reply to हो करणार आहे by क्लिंटन
माझ्या प्राथमिक विदा वापरून
मोदींचे अभिनंदन
काँग्रेसवाल्यांची जम्मतग
आजपर्यंत बकवास करायचा मक्ता
In reply to काँग्रेसवाल्यांची जम्मतग by श्रीगुरुजी
नो ट्वीट
In reply to आजपर्यंत बकवास करायचा मक्ता by बॅटमॅन
क्लिंटन यांचे
केशूभाईंचा दणका
१ टक्क्यांचा फरक म्हणजे १० जागा
गुजरातेतला ही असा फरक ऐकायला आवडेल.
In reply to १ टक्क्यांचा फरक म्हणजे १० जागा by श्रीगुरुजी
४८ व ३९
In reply to गुजरातेतला ही असा फरक ऐकायला आवडेल. by आनंदी गोपाळ
युवराजांच्या प्रचाराचा प्रभाव?
हो/नाही
In reply to युवराजांच्या प्रचाराचा प्रभाव? by हुप्प्या
अरेरे!
In reply to हो/नाही by क्लिंटन
"काँग्रेससाठी सुरक्षित
अभिनंदनीय उपक्रम !