Skip to main content

गुजरात विधानसभा निवडणुक-२०१२

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 17/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिसळपाववर मागे जाहिर केल्याप्रमाणे मतमोजणीच्या आधी माझे अंदाज जाहिर करत आहे.या अंदाजांसाठी मी १९८० पासून झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि १९९९,२००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल तसेच उमेदवार लक्षात घेतले.विधानसभा मतदारसंघांचे क्षेत्र सर्वसाधारणपणे तालुका हे असते.गुजरातमधील तालुका पातळीवरील राजकारण मला कळते असा माझा अजिबात दावा नाही.तेव्हा या उमेदवारांविषयी गुगलून काही माहिती मिळते का हे बघितले. केशुभाई पटेलांचा गुजरात परिवर्तन पक्ष (गु.प.प) नक्की किती प्रभाव पाडेल याचा मतदारसंघांविषयी माहिती मिळवून सब्जेक्टिव्ह कॉल घेतला.अर्थातच ही माहिती गुगलून आणि गुजरातमध्ये प्रसिध्द होणारे इंग्रजी पेपर वाचून मिळवली आहे.प्रत्येक मतदारसंघातील जातनिहाय मतदारांची संख्या माझ्याकडे नाही.तसेच अनेक उमेदवारांविषयी काहीच माहिती मिळाली नाही.तरीही केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या कॉंग्रेस पक्षाविरूध्द किती जनमत गेले आहे,राज्यात ११ वर्षे सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदींच्या सरकारविरूध्द किती जनमत गेले आहे आणि केशुभाईंचा पक्ष नक्की किती परिणाम करेल याचा एकूण परिस्थितीचा सब्जेक्टिव्ह कॉल घेतला आहे.तसेच मागच्या निवडणुकांचा कल लक्षात घेता हे बदललेले आकडे निकाल फिरविण्याइतका परिणाम करतील का याचे विश्लेषण केले आणि त्या आधारे हे अंदाज व्यक्त करत आहे. या अंदाजांमध्ये नक्की कोणत्या कारणांमुळे त्रुटी होऊ शकेल हे लिहिलेच आहे.आणि एक गोष्ट आणखी सांगतो. माझ्याकडे कोणत्याही एक्झिट पोलचा विदा नाही की इतर कसलेही आकडे नाहीत.हे सर्व अंदाज माझ्या सब्जेक्टिव्ह कॉलवरूनच घेतले आहेत.आणि सब्जेक्टिव्ह कॉल अधिक अचूकपणे घेण्यासाठी खूपच जास्त अभ्यास हवा. पण तितका अभ्यास करायला, वाचन करायला मला खरोखरच वेळ झाला नाही.तेव्हा हे एक कारणही त्रुटी निर्माण करू शकेल. तेव्हा माझा अंदाज पुढीलप्रमाणे: एकूण जागा: १८२ भाजप: १०९ कॉंग्रेस: ७१ गु.प.प: २ माझ्या मते भाजप नक्की जिंकेल अशा जागा पुढीलप्रमाणे: अबाडासा, मांडवी (कच्छ),भूज,अंजार,वाव, दीसा,राधनपूर,चनासमा,विजापूर,हिम्मतनगर,गांधीनगर (दक्षिण),घाटलोडिया,वेजलपूर,वाटवा,एलिस ब्रीज, नारणपुरा, निकोल,नरोडा,ठक्कर बाप्पा नगर,अमराईवाडी,दरियापूर,मणीनगर,साबरमती,दासकरोई,ढोलका, मोरबी,टनकारा,राजकोट (पश्चिम),राजकोट (दक्षिण),द्वारका,मानवदार,जुनागढ,मांगरोल (जुनागढ),कोडीनार, धारी,राजुला,महुवा (भावनगर), तलाजा,गरियाधार,पलीटाणा, भावनगर (पूर्व), भावनगर (पश्चिम), मातर, हलोल,देवगढ बारिया,वाघोडिया, बडोदा शहर, सयाजीगंज, अकोटा,रावपुरा, मंजालपूर, पादरा, भरूच, अंकलेश्वर, ओलपड,कामरेज,सुरत (उत्तर), वारच्छा रोड,करान्ज,लिंबायत,उधना, माजुरा,कटारगाम, सुरत (पश्चिम),चोरयासी,जलालपोर,नवसारी, वलसाड आणि उंबरगाव माझ्या मते भाजप जिंकायची शक्यता जास्त आहे अशा जागा पुढीलप्रमाणे: गांधीधाम, थारड, धनेरा, देवदार, पाटण, खेरालू,उंझा,बेचाराजी,इदर,मोडासा,दानीलिमडा,धांधुका,लिमडी,चोटीला,राजकोट (पूर्व),राजकोट ग्रामीण,जामनगर (उत्तर),जमजोधपूर,खंबालिया,कुटीयाना,लाठी,सावरकुंडला,गधडा,खंबायत,सोजीत्रा, मेहमदाबाद, शेहरा, लिमखेडा, सावली,छोटा उदयपूर,जेतपूर(बडोदा),सानखेडा,करजान,नांदोद,जंबुसार,मांगरोल(सुरत),बारडोली,डांग, गणदेवी आणि पारडी माझ्या मते कॉंग्रेस नक्की जिंकेल अशा जागा पुढीलप्रमाणे: रापड,दांता,वडगाम,पालनपूर,सिधपूर, खेडब्रम्हा, भिलोडा, मनसा,विरामगाव,ध्रांगध्रा,वांकानेर,जसदान,धोराजी,पोरबंदर,केशोद,भावनगर ग्रामीण, बोरसाद, अंकलाव, पेटलाड, महुधा,थासरा,कपडवंज,बालासिनोर,संतरामपूर,फतेपुरा,दाहोद,मांडवी(सुरत) आणि व्यारा. माझ्या मते कॉंग्रे जिंकायची शक्यता जास्त आहे अशा जागा पुढीलप्रमाणे:कांकरेज, विसनगर,काडी, मेहसाणा, बायड, प्रांतिज,देहगाम,गांधीनगर (उत्तर),कलोल (गांधीनगर),सानंद,बापुनगर,जमालपूर-खाडिया,असारवा, दसादा, वाधवान, जेतपूर (राजकोट),कालावड,जामनगर ग्रामीण,जामनगर (दक्षिण), सोमनाथ,तलाला, उना, अमरेली, बोटाड, उमरेठ, आणंद,नडियाद,लुनावाडा,मोरवा हदाफ, गोध्रा, कलोल(पंचमहल), झालोड, दभोई, देडियापाडा, वागरा, झगाडिया, सुरत(पूर्व),महुवा (सुरत),निझार, वंसदा, धरमपूर आणि कपराडा माझ्या मते केशुभाई पटेलांचा 'गुजरात परिवर्तन पक्ष' स्वतः केशुभाईंची विसावदार आणि गोवर्धन झाडपियाचीं गोंडाल या दोन जागा जिंकेल. मला २० तारखेला मतमोजणीच्या दिवशी रजा हवी आहे असे माझ्या बॉसला सांगून ठेवले आहे आणि अशी रजा मिळायला फार अडचण येऊ नये.पण बॅंकेत डिसेंबरचा क्वार्टर एंड जवळ आला असल्यामुळे आयत्या वेळी रजा मिळायला काही अडचण येऊ शकते.तशी अडचण न आल्यास (आणि इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित असेल) तर मी याच धाग्यावर निकालांचे धावते समालोचन करेनच.

वाचने 15572
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा!
तरीही केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या कॉंग्रेस पक्षाविरूध्द किती जनमत गेले आहे,.... याचा एकूण परिस्थितीचा सब्जेक्टिव्ह कॉल घेतला आहे.
या सर्वांबरोबरच मोदींविरोधात पक्षांतर्गत राजकारण देखील असू शकेल आणि त्याचा परीणाम होईल असे वाटते का?

In reply to by विकास

या सर्वांबरोबरच मोदींविरोधात पक्षांतर्गत राजकारण देखील असू शकेल आणि त्याचा परीणाम होईल असे वाटते का?
हो असेलच.तसे पक्षांतर्गत राजकारण काँग्रेसमध्येही आहेच.तिकिटवाटपावरून झालेल्या मारामारीमुळे ती गोष्ट समजलीच आहे. या गोष्टीचा थोडाफार परिणाम नक्कीच होईल.

तुमचे समालोचन वाचायला निश्चित आवडेल.

आता पर्यंत ऐकलेल्या अंदाजांपैकी बहुतेक केवळ तुम्हीच भाजपला २००७ पेक्षा कमी जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. शिवाय गु.प.प. ला सर्वात कमी अंदाजही तुम्हीच वर्तवला आहे. तुमचा हा अंदाज रोचक आहे. माझा स्वत:चा अंदाज (अगदीच कमी अभ्यासावर काढलेला) भाजपः ११५-१२० काँग्रेसः ६०-६५ गु.प.प.: १-२ इतरः ११-०

In reply to by ऋषिकेश

सविस्तर प्रतिसाद रात्री लिहितो.
आता पर्यंत ऐकलेल्या अंदाजांपैकी बहुतेक केवळ तुम्हीच भाजपला २००७ पेक्षा कमी जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
हो बरोबर आहे.माझा अ‍ॅनॅलिसिस तीन पातळीवर आहे. पहिली पातळी म्हणजे राज्यवार मते कशी फिरतील यावरून अंदाज बांधणे.दुसरी पातळी म्हणजे विभागवार आणि तिसरी पातळी म्हणजे प्रत्येक मतदारसंघनिहाय अंदाज बांधणे.पहिल्या पातळीवरचा अ‍ॅनॅलिसिस करून भाजपला १२४ ते १२७ जागा मिळतील असे मिसळपाववर मागेच जाहिर केले होते. पुढे प्रत्येक मतदारसंघात कोण उमेदवार आहे, बंडखोरी झाली आहे का,गुपपचा उमेदवार किती तगडा आहे इत्यादी माहिती काढायचा प्रयत्न केला.तसेच त्यावरून मागच्या वेळेपेक्षा नक्की किती टक्के मते फिरू शकतील हा सब्जेक्टिव्ह कॉल घेणे ही पुढची पायरी.त्यावरून १०९ हा आकडा आला. या प्रकारचा अ‍ॅनॅलिसिस करणे हे खूप वेळखाऊ काम असते आणि शेवटी सगळ्या उमेदवारांची नक्की ताकद किती आणि ते किती मते खाऊ शकतील ही माहिती मिळणे जरा कठिणच आहे.निवडणुकांचे अंदाज बांधणे हा प्रकार मी अगदी १९९६ च्या लोकसभा निवडणुकांपासून करत आहे (पहिल्या पातळीवरचा अ‍ॅनॅलिसिस करून).२००९ च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच मी माझे अंदाज मिसळपाववर जाहिर केले होते आणि ते काही राज्यांमध्ये बरेचसे बरोबरही आले होते. पण तीन पातळ्यांवरील अ‍ॅनॅलिसिस हा प्रकार मी पहिल्यांदाच केला आहे. तेव्हा हा प्रकार कितपत उपयुक्त आहे हे या क्षणी मला सांगता येणार नाही.पण जर असे समजले की पहिल्या पातळीवरचा अ‍ॅनॅलिसिस पुरेसा आहे आणि तीन पातळ्यांवरील अ‍ॅनॅलिसिस करायला खूपच जास्त अभ्यास/माहिती हवी तर भविष्यातील निवडणुकांसाठी तीन पातळ्यांवरचा अ‍ॅनॅलिसिस करणार नाही.गुजरात सारख्या राज्यात दोन मुख्य पक्ष आहेत तिथे एका पक्षाची कमी झालेली मते दुसरा पक्ष खाणार असेल तर हा प्रकार जास्त योग्य ठरेल पण उत्तर प्रदेश सारख्या राज्यात चार पक्ष आहेत तिथे एका पक्षाची कमी झालेली मते नक्की कोणता पक्ष खाणार याचा सब्जेक्टिव्ह कॉल घ्यायला खूपच जास्त अभ्यास हवा. अर्थात अशा राज्यात अगदी पहिल्या पातळीवरचा अ‍ॅनॅलिसिससुध्दा किती उपयुक्त ठरेल याविषयी साशंकच आहे.
शिवाय गु.प.प. ला सर्वात कमी अंदाजही तुम्हीच वर्तवला आहे.
मागच्या वेळी मताधिक्य असेल त्या मताधिक्याला नेगेट करेल इतकी टक्के मते फिरतील का हा प्रत्येक मतदारसंघनिहाय सब्जेक्टिव्ह कॉल घेतला आहे. उदाहरणार्थ मागच्या वेळी भाजपचे एखाद्या मतदारसंघातील मताधिक्य २०% असेल तर या वेळी तिथे भाजपचा पराभव होण्यासाठी गुपपने भाजपची २०% मते खायला हवीत आणि इतकेच नाही तर काँग्रेसची मते गुपपने खायला नकोत.तरच तिथे भाजपचा पराभव होईल.समजा मागच्या वेळी भाजपला ५५% आणि काँग्रेसला ३५% मते आहेत.गुपपला २०% मते मिळाली आणि ती सगळी मते भाजपची खाल्लेली असतील तर भाजप आणि काँग्रेस दरम्यान चुरशीची लढत होईल.पण गुपपने भाजपची १५% आणि काँग्रेसचीही ५% मते खाल्ली तर मताधिक्य कमी होऊनही भाजपच जिंकेल.इतकी मते घेऊनही गुपप जिंकणार नाही. गुपप सौराष्ट्रात बरीच मते घेईल पण ती विजयी व्हायला पुरेशी असतील असे वाटत नाही.तरीही केशुभाई स्वतः आणि गोवर्धन झाडपिया स्वतःच्या नावावर निवडून येतील असे वाटते.सुरतमधील एका मतदारसंघात कै.काशीराम राणांचा मुलगा निवडणुक लढवत आहे.तिथे काशीराम राणांविषयीच्या सद्भावनेतून तो काही मते घेईल पण निवडून येणार नाही. तरीही मतविभागणी होऊन काँग्रेस निवडून येईल असे वाटते.अशा प्रकारचा अ‍ॅनॅलिसिस अगदी प्रत्येक मतदारसंघात केला आहे. १९९८ मध्ये वाघेलांच्या राष्ट्रीय जनता पक्षाने १२% मते घेतली होती पण त्या पक्षाचे केवळ ४ आमदार निवडून आले होते.आणि या पक्षाने भाजपपेक्षा काँग्रेसचे जास्त नुकसान केले होते अशाप्रकारचे घटकही ध्यानात घेतले आहेत. आता इतके घटक ध्यानात घेऊन अ‍ॅनॅलिसिस चा पॅरॅलिसिस होतो का हे दोन दिवसांनी समजेल आणि त्यावरून भविष्यात इतके घटक लक्षात घेऊन त्यावर इतका वेळ घालवायचा की नाही हे पण कळेल. :)

In reply to by क्लिंटन

या त्रिस्तरीय विश्लेषणाचे यशापयश कसे मोजावे?अमुक एक जागा नक्की कोणता पक्ष जिंकेल हा अंदाज बांधला आहे त्याचप्रमाणे निकाल लागल्यास एक पॉईंट आणि तसा निकाल न लागल्यास शून्य पॉईंट.१८२ पैकी जास्तीत जास्त पॉईंट मिळायला हवेत. समजा कोणतेही विश्लेषण न करता प्रत्येक जागा भाजपला मिळेल असे म्ह्टले आणि भाजपला समजा प्रत्यक्षात १२० जागा मिळाल्या असतील तर काही न करता १८२ पैकी १२० पॉईंट तसेही मिळतील.तेव्हा बहुमतवाल्या पक्षाला जितक्या जागा मिळाल्या आहेत त्यापेक्षा जास्त पॉईंट मिळाले तरच या उपक्रमावर घालवलेला वेळ आणि केलेले कष्ट सत्कारणी लागले असे म्हणता येईल. सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

In reply to by क्लिंटन

विश्लेषणाचे यशापयश मोजण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात अंदाजाबरहुकुम निकाल लागला तर +१ आणि न लागला तर -१ असे गुण दिल्यास अधिक योग्य ठरेल. म्हणजे, तुम्ही म्हटले त्याप्रमाणे,कोणतेही विश्लेषण न करता प्रत्येक जागा भाजपला मिळेल असे म्ह्टले आणि भाजपला समजा प्रत्यक्षात १२० जागा मिळाल्या असतील तर काही न करता १८२ पैकी १२० पॉईंट तसेही मिळतील, हे खरे. पण चुकीच्या अंदाजाचे -६२ मिळून एकूण गुण ५८ होतील. बघू, घोडामैदान आता फार लांब नाही!

In reply to by सुनील

विश्लेषणाचे यशापयश मोजण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात अंदाजाबरहुकुम निकाल लागला तर +१ आणि न लागला तर -१ असे गुण दिल्यास अधिक योग्य ठरेल.
हो बरोबर.असे नेगेटिव्ह मार्किंग ठेवणे अधिक योग्य ठरेल.

In reply to by ऋषिकेश

बरोबर आला आपला अंदाज ! श्री क्लिंटन यांनी अभ्यास केला त्याबद्दलही अप्रूप आहे.

In reply to by ऋषिकेश

बरोबर आला आपला अंदाज ! श्री क्लिंटन यांनी अभ्यास केला त्याबद्दलही अप्रूप आहे.

वा. उपक्रमाला शुभेच्छा. हे किती बरोबर किती चुकीचे ते गौण आहे. तु इतका अभ्यास केलास हेच कौतुकास्पद. साले आम्हाला महाराष्ट्रातल्या पण सगळ्या शिटा सांगता येणार नाहित. बाकी भाजपा जेवढे सहजी जिंकेल असे सगळे जण म्हणताहेत ते मला थोडे अवघडच वाटते आहे. भाजपाला १०० पेक्षा कमी जागा मिळतील.

In reply to by मृत्युन्जय

+१००, \साले आम्हाला महाराष्ट्रातल्या पण सगळ्या शिटा सांगता येणार नाहित' फार पुढचं बोललात, मला तर एस्टितल्या पण सिटा मोजता येत नाहीत.

समालोचनाची वाट बघतोय.

In reply to by दादा कोंडके

समालोचनाची वाट बघतोय.

मी बडोदा व बलसाड हया दोन विभागांचा प्रत्यक्ष / फोन वर /मिडिया द्वारे धांडोळा घेतला होता. तेंव्हा माझेही मत काल पर्यंत भा.ज.प. १०० जागांवर राहील हेच होते. आता मात्र माझा अंदाज भा.ज.प. १५० जागा जिंकेल असे आहे. प्रचंड मतदान हे मोदींना "अभूतपूर्व " यश देणार आहे ! आणि जर भा.ज.प. ला १६५ जागा मिळाल्या तरीही मला आश्चर्य वाटणार नाही.

या लेखाची वाट बघत होते! प्रत्यक्ष निकाल २० ला येतील त्या दिवशी सरकारी बँकांमधे संप आहे, त्यामुळे तुला समजा ऑफिसात जावे लागले तरी काम नक्कीच कमी असेल. तेव्हा निकालांचे धावते समालोचन वाचायला नक्कीच आवडेल.

भाजप १२०-१२५ व काँग्रेस ५०-५५ जागी जिंकेल असे वाटते. गुपप २-३ जागा जिंकेल. मोदी विधानसभा प्रचंड मताधिक्याने जिंकतात. पण लोकसभा निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब पडत नाही. डिसेंबर २००२ मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने १८२ पैकी १२७ जागा (७० टक्के) जिंकल्या होत्या व काँग्रेसला फक्त ५० जागा (२८ टक्के) मिळाल्या होत्या. पण मे २००४ मधल्या लोकसभा निवडणुकीत एकूण २६ पैकी भाजप १४ व काँग्रेस १२ अशी जवळपास बरोबरीची स्थिती होती. डिसेंबर २००७ मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने १८२ पैकी ११७ जागा (६४ टक्के) जिंकल्या होत्या व काँग्रेसला फक्त ५९ जागा (३१ टक्के) मिळाल्या होत्या. पण मे २००९ मधल्या लोकसभा निवडणुकीत एकूण २६ पैकी भाजप १५ व काँग्रेस ११ अशी स्थिती होती. यावेळी जरी भाजपने १२५ चा आसपास जागा जिंकल्या तरी मे २०१४ मधल्या लोकसभा निवडणुकीत भाजप त्या प्रमाणात (२६ पैकी किमान १८-१९ जागा) जिंकू शकेल का याची खात्री वाटत नाही.

In reply to by नितिन थत्ते

२००७ मध्येही मोदी ९५ ते १०५ जागा जिंकतील असे पोल आले होते.पण प्रत्यक्षात जागा जिंकल्या ११९.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

बरोबर. हा बुकींचा जुगारच आहे. बरोबर येईल किंवा न येईल.

उद्याची आतुरतेने वाट पाहात आहे. ह्यावेळी ७०% मतदान झालेले आहे. जेव्हा जेव्हा असे मोठ्या प्रमाणावरती मतदान होते तेव्हा तेव्हा ते सहसा सत्ताधार्‍यांच्या विरोधातच जाते असे मानले जाते / बर्‍याचदा दिसते देखील. मात्र सध्या इकडे मोदी मोदी आणि मोदी हाच नारा दिसतो आहे हे मात्र नक्की. अवांतर :- निवडणूकांच्या आधी सर्वच सोसायटींमधील रहिवासी रोज रात्री एकत्र येऊन चर्चा करताना इथे बघायला मिळत होते. मतदानाच्या आधी 'आमच्या इकडे तुमच्या सारखेच सुशिक्षीतांच्यात मतदन न करण्याचे कौतुक आहे' असे सतत कानावर पडत होते. प्रत्यक्षात मात्र मोठ्या प्रमाणावरती मतदान झालेले दिसले.

अस्थिरता पसरवत राहणे हा काही न्यूज चेनेलचा मुख्य उद्देश असतो. जर अस्थिरता , भांडणे , कलह , विद्रोह , नसेल तर कोण पाहणार ही न्यूज चेनेल ! चांगल्या बातम्या दुसऱ्या पानावर / शेवटी आणि खून बलात्कार मारामारी भ्रष्टाचार यांचे अग्रस्थान ! मोदी आणि भारत २०२० ला पोहीच्तील पण पंढरी दाढी , टक्कल , कोट ,जाकिटे आणि स्लीवलेस ब्लाउज २००२ सालच्या दंगलीची हाडके चघळत बसतील.

मतमोजणी ८ वाजता सुरू झाली आहे.पहिले कल लवकरच येतील.

पहिले कल: ढोलका: भाजप पुढे मांगरोल : भाजप पुढे सानंद: कॉंग्रेस पुढे अमरेली: कॉंग्रेस पुढे

आणखी काही: (कंसात माझे अंदाज) राजकोट पश्चिम: भाजप (भाजप) जुनागढ: भाजप (भाजप) ध्रांगध्रा: भाजप (कॉंग्रेस) एलीस ब्रीज: भाजप (भाजप) वाव: भाजप (भाजप) खंबालिया: भाजप (भाजप) कांकरेज: कॉंग्रेस (कॉंग्रेस) बायड: कॉंग्रेस (कॉंग्रेस)

(कोणीही विचारले नसताना, अगदी प्राथमिक पातळीचा अ‍ॅनालिसिसवर आधारीत) माझे अंदाज देतो: (कालच देणार होतो पण कनेक्शन गेले) भाजपा: ११५ ते १२० काँग्रेसः ५८ ते ६० गु.प.प: ४ ते १ इतरः: ५ ते १

In reply to by ऋषिकेश

कोणीही विचारले नसताना, अगदी प्राथमिक पातळीचा अ‍ॅनालिसिसवर आधारीत
अहो मला तरी कोणी विचारले होते अंदाज द्यायला :) आपण आपले हातपाय मारायचे.

In reply to by ऋषिकेश

बसप एका जागेवर पुढे आहे असे दिसते.पण तो पक्ष ती जागा जिंकतो का हे बघायचे.बसप मते घेईल पण गुजरातमध्ये जागा जिंकेल असे माझ्या विश्लेषणात वाटले नाही. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस ची युती असल्याने त्या पक्षाला कॉंग्रेस बरोबर कंसिडर केले होते.

आणखी काही कल: (कंसात माझे अंदाज) कांकरेज: कॉंग्रेस (कॉंग्रेस) गांधीनगर उत्तर: कॉंग्रेस (कॉंग्रेस) मेहमदाबाद: कॉंग्रेस (भाजप) कालावाड: कॉंग्रेस (कॉंग्रेस) पारडी: भाजप (भाजप) एलीस ब्रीज: कॉंग्रेस आता पुढे (भाजप) हा कल माझ्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित आहे.माझ्या मते एलीस ब्रीज ही भाजपसाठी मणीनगर सारखीच सुरक्षित जागा आहे. नवसारी: भाजप (भाजप) कुटियाना: राष्ट्रवादी (भाजप) जमजोधपूर: भाजप (भाजप)

In reply to by क्लिंटन

एलीस ब्रीज +१ मात्र तुर्तास कोणत्या मतदान केंद्राचा विदा घेणे चालु आहे हे बघणे रोचक ठरेल.. काही भाग ख्रिस्तीबहुल आहे असे समज्ते

आणखी काही कल: (कंसात माझे अंदाज) उना: कॉंग्रेस (कॉंग्रेस) राजकोट पूर्व: कॉंग्रेस (भाजप) केशोद: भाजप (कॉंग्रेस) ओलपाड: कॉंग्रेस (भाजप) कोडिनार: कॉंग्रेस (भाजप) जामनगर उत्तर: कॉंग्रेस (भाजप) राजकोट पश्चिम: भाजप (भाजप) जसदान: भाजप (कॉंग्रेस) असारवा: भाजप (कॉंग्रेस) जामनगर ग्रामीण: कॉंग्रेस (कॉंग्रेस) बारडोली: भाजप (भाजप) विसनगर: भाजप (कॉंग्रेस) चोटीला: भाजप (भाजप) विरामगाव: कॉंग्रेस (कॉंग्रेस) गोंडाल: भाजप (गुपप) मानवदार: कॉंग्रेस (गुपप) लाठी: भाजप (भाजप) काडी: भाजप (कॉंग्रेस) डांग: भाजप (भाजप) वलसाड: भाजप (भाजप)

आणखी काही कल: (कंसात माझे अंदाज) चनासमा: भाजप (भाजप) नांदोद: भाजप (भाजप) उधना: भाजप (भाजप) देडियापाडा: भाजप (कॉंग्रेस) वारच्छा रोड: भाजप (भाजप) सोजीत्रा: कॉंग्रेस (भाजप) माजुरा: भाजप (भाजप) लिंबायत: भाजप (भाजप) झालोड: कॉंग्रेस (कॉंग्रेस) नरोडा: भाजप (भाजप) सोमनाथ: भाजप (कॉंग्रेस) नारणपुरा: भाजप (भाजप) मणीनगर: भाजप (भाजप)

आणखी काही कल: (कंसात माझे अंदाज) सावरकुंडला: भाजप (भाजप) राजुला: भाजप (भाजप) पालनपूर: भाजप (कॉंग्रेस) मोडासा: कॉंग्रेस (भाजप) उना: कॉंग्रेस (कॉंग्रेस) दासकरोई: भाजप (कॉंग्रेस) सावरकुंडला: भाजप (भाजप) माटर: भाजप (भाजप) मोरबी: कॉंग्रेस (भाजप) दसादा: भाजप (कॉंग्रेस) गांधीधाम: कॉंग्रेस (भाजप) चोटिला: भाजप (भाजप) आणंद: कॉंग्रेस (कॉंग्रेस) भिलोडा: कॉंग्रेस (कॉंग्रेस) गोंडाल: भाजप (गुपप) गोवर्धन झाडपिया पिछाडीवर दांता: कॉंग्रेस (कॉंग्रेस) उंबरगाव: भाजप (भाजप) धारी: गुपप (भाजप) देवदार: कॉंग्रेस (भाजप) मंजालपूर: कॉंग्रेस (भाजप) वांकानेर: कॉंग्रेस (कॉंग्रेस) द्वारका: भाजप (भाजप) सोमनाथ: भाजप (कॉंग्रेस) ओलपाड; कॉंग्रेस (भाजप) टनकारा: भाजप (भाजप) राजुला: भाजप (भाजप) व्यारा: भाजप (कॉंग्रेस) बोटाड: कॉंग्रेस (कॉंग्रेस) भरूच: भाजप (भाजप)

स्त्युत्य उपक्रम. खालच्या तक्त्यामध्ये आत्तापर्यंतचे निकाल येवूदेत... निकाल जाहीर झालेल्या एकूण जागा: भाजप: कॉंग्रेस: गु.प.प: इतर: इतर १:

In reply to by मोदक

हो असा तक्ता करायला हवा.पण एकाच वेळी निकाल बघणे आणि मिपावर प्रसिध्द करणे शक्य होत नाही आहे.हे इतर कोणी मिपाकराने केल्यास चांगले होईल.

आणखी काही कल: (कंसात माझे अंदाज) सोमनाथ: भाजप (कॉंग्रेस) गोध्रा: कॉंग्रेस (कॉंग्रेस) दांता: कॉंग्रेस (कॉंग्रेस) डांग: कॉंग्रेस (भाजप) गरबाडा: कॉंग्रेस (कॉंग्रेस) देहगाम: भाजप (कॉंग्रेस) लिमखेडा: कॉंग्रेस (भाजप) टनकारा: कॉंग्रेस (भाजप) उमरेठ: कॉंग्रेस (कॉंग्रेस) भरूच: कॉंग्रेस (भाजप) जमालपूर खाडिया: भाजप (कॉंग्रेस) सयाजीगंज: भाजप (भाजप) माटर: कॉंग्रेस (भाजप) मंजालपूर: भाजप (भाजप) मानवदार: गुपप (गुपप) लिमखेडा: भाजप (भाजप) भिलोडा: कॉंग्रेस (कॉंग्रेस) नरोडा: भाजप (भाजप) कांकरेज: कॉंग्रेस (कॉंग्रेस) फतेपुरा: भाजप (कॉंग्रेस) इदार: भाजप (भाजप) सानंद: भाजप (कॉंग्रेस) मेहमदाबाद: कॉंग्रेस (भाजप) प्रांतिज: भाजप (कॉंग्रेस) दर्यापूर: भाजप (भाजप) अमराईवाडी: भाजप (भाजप) उना: भाजप (कॉंग्रेस) आणंद: भाजप (कॉंग्रेस) पेटलाड: भाजप (कॉंग्रेस) वारच्छा रोड: भाजप (भाजप) देवदार: कॉंग्रेस (भाजप) मंजालपूर: भाजप (भाजप) सोजीत्रा: बसप (भाजप) जंबुसार: भाजप (भाजप) माटर: कॉंग्रेस (भाजप) बालासिनोर: कॉंग्रेस (कॉंग्रेस) वाग्रा: भाजप (कॉंग्रेस) ओलपाड: कॉंग्रेस (भाजप) निझार: भाजप (कॉंग्रेस) ध्रांगध्रा: आता कॉंग्रेस (कॉंग्रेस) बेचाराजी: भाजप (भाजप) गधडा: भाजप (भाजप) दांता: कॉंग्रेस (कॉंग्रेस) हलोल: भाजप (भाजप) मेहमदाबाद: कॉंग्रेस (भाजप) मेहसाणा: भाजप (कॉंग्रेस)

क्लिंटन आणि इतर उत्साहींचे अभिनंदन! एनडीटिव्हीच्या अंदाजाप्रमाणे भाजपाला ७-८ जागा (गेल्या वेळ पेक्षा) कमी तर काँग्रेसला २-३ जास्त मिळतील...

BJP १०५ CON ६१ GPP ४ OTHERS २ झी न्युज

क्लिंटनराव.. निकाल भाजपच्या बाबतीत तुमच्या ओव्हरऑल अंदाजाच्या जवळ असेल से दिसते आहे :) अभिनंदन! तुमचा काँग्रेसबद्द्लचा अंदाजही जरा जवळ असेल पण तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा असतील असे वाटते.. इतर पक्ष, गु.प.प. यांनी भाजप बरोबर काँग्रेसलाही धक्का दिलेला दिसतोय

In reply to by ऋषिकेश

थोडे अधिक विश्लेषण करत होतो. काँग्रेसला गु.प.प. पेक्षा JDU ने अधिक नुकसान पोचवले आहे असे वाटते. JDU ने काही मुस्लिम मते नक्कीच खेचली आहेत

आयबीएन वर केतकरांचा त्रागा बघण्यासारखा आहे. पार्टीपेक्षा मोदींना प्रोजेक्ट केले गेले म्हणताना, काँग्रेस (आत्ता) सोनीया-राहूलला प्रोजेक्ट करत असते हे विसरूनच गेले... :-)

BJP १११ CONG ६६ GPP ३ OTHERS १ झी न्युज

आणखी काही कल: (कंसात माझे अंदाज) निकोल: भाजप (भाजप) राजकोट पूर्व: भाजप (भाजप) सुरत पूर्व: कॉंग्रेस (कॉंग्रेस) धनेरा: कॉंग्रेस (भाजप) संतरामपूर: कॉंग्रेस (कॉंग्रेस) कपराडा:कॉंग्रेस (कॉंग्रेस) देवगढ बारिया: भाजप (भाजप) वाव: भाजप (भाजप) काडी: कॉंग्रेस (कॉंग्रेस) जामनगर दक्षिण: भाजप (कॉंग्रेस) दासकरोई: भाजप (भाजप) विसावदार: भाजप (गुपप). केशुभाई पटेल पिछाडीवर जमजोधपूर: भाजप (भाजप) पारडी: भाजप (भाजप) लिमखेडा: भाजप (भाजप) अबाडासा: भाजप (भाजप) बालासिनोर: कॉंग्रेस (कॉंग्रेस) ढोलका: भाजप (भाजप) सुरत उत्तर: भाजप (भाजप) नवसारी: भाजप (भाजप) बापुनगर: भाजप (कॉंग्रेस) द्वारका: भाजप (भाजप) बेचाराजी: कॉंग्रेस (भाजप) चोरयासी: भाजप (भाजप) सानंद: भाजप (कॉंग्रेस) ओलपाड: भाजप (भाजप) अमरेली: कॉंग्रेस (कॉंग्रेस) डांग: कॉंग्रेस (भाजप) धरमपूर: कॉंग्रेस (कॉंग्रेस) झालोड: कॉंग्रेस (कॉंग्रेस) द्वारका: भाजप (भाजप) उंबरगाव: भाजप (भाजप) माजुरा: भाजप (भाजप) नरोडा: भाजप (भाजप) अंकलाव: भाजप (कॉंग्रेस) करंज: भाजप (भाजप) बडोदा शहर: भाजप (भाजप) अमराईवाडी: भाजप (भाजप) सोजीत्रा: कॉंग्रेस (भाजप) निझार: भाजप (कॉंग्रेस) असे वाटते की १८२ पैकी किमान १५० पॉईंट मला मिळायला हवेत :)

आणखी काही कल: (कंसात माझे अंदाज) कपडवंज: कॉंग्रेस (कॉंग्रेस) शंकरसिंह वाघेला आघाडीवर लिमखेडा: भाजप (भाजप) सुरत उत्तर: भाजप (भाजप) पादरा: कॉंग्रेस (भाजप) नडियाद: कॉंग्रेस (कॉंग्रेस) नांदोद: भाजप (भाजप) जमालपूर-खाडिया: कॉंग्रेस (कॉंग्रेस) कटारगाम: कॉंग्रेस (भाजप) राधनपूर: कॉंग्रेस (भाजप) मानवदार: भाजप (भाजप) पारडी: भाजप (भाजप) निझार: भाजप (कॉंग्रेस) नरोडा: भाजप (भाजप) जामनगर दक्षिण: भाजप (कॉंग्रेस) जसदान: कॉंग्रेस (कॉंग्रेस) वलसाड: भाजप (भाजप) गांधीनगर दक्षिण: कॉंग्रेस (भाजप) अमरेली: कॉंग्रेस (कॉंग्रेस) व्यारा: भाजप (कॉंग्रेस) जमजोधपूर: भाजप (भाजप) चनासमा: भाजप (भाजप) मनसा: कॉंग्रेस (कॉंग्रेस) सानंद: कॉंग्रेस (कॉंग्रेस) मणीनगर: भाजप (भाजप) नरेंद्र मोदी विजयी करंज: भाजप (भाजप) लेटेस्टः भाजप ११५, काँग्रेसः ६४ माझ्या मतदारसंघनिहाय अंदाजाप्रमाणे साधारण १५ जागांवरील अंदाज चुकत आहेत असे दिसते.

In reply to by क्लिंटन

आज रजा मिळाली का तुम्हाला ?

In reply to by कपिलमुनी

हो रजा मिळाली ना आज :). माझ्या बॉसलाही माहित होते की आज हा काही ऑफिसात काम करणार नाही.त्यापेक्षा त्याला रजा दिलेलीच चांगली :)

कोंन्ग्रेसी मोगलाई ला वैतागलेल्या लोकान्ची कोन्ग्रेस्स ला चपराक (अनपेक्शीत नक्कीच नव्हत हे म्हणा.). आनंदी आनंद गडे. :) त्या म्याडम मोठ्या टेचात गुजरात मधे म्हणुन गेल्या होत्या की 'गुजरात चा विकास झालेला नाही म्हणुन'. :). २०१४ ला देशभराची चपराक बसणार आहे, त्याचा हा डेमो होता अस म्ह्णायला हरकत नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

२०१४ ला देशभराची चपराक बसणार आहे, त्याचा हा डेमो होता अस म्ह्णायला हरकत नाही.
दोन राज्यांपैकी एक अक्खे राज्य गमावले आहे भाजपाने. गुजरातेत गेल्यावेळीपेक्षा २ जागा कमी झाल्या. म्हणजे स्टेटस-क्वो (Status Quo) म्हणू या. नक्की कोणती चपराक म्हणताहात तुम्ही?

अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी.चिदंबरम म्हणतात की गुजरातमध्ये कॉंग्रेसचा विजय झाला आहे कारण मोदींना ११७ पेक्षा खाली तोखण्यात कॉंग्रेस पक्षाला यश येत आहे :)

In reply to by क्लिंटन

गुजरात मधे ढोकळाच चालतो अजुनही. पिझ्झा आणि ईड्ली साम्बार चे दिवस यायची काही शक्यता नाहीये. :)

आता यापुढे कल न लिहिता घोषित झालेले निकाल लिहिणार आहे. हिंमतनगर: कॉंग्रेस (भाजप) राजकोट दक्षिण: भाजप (भाजप) मणीनगर: भाजप (भाजप) नरेंद्र मोदी विजयी आतापर्यंत ३ पैकी २ बरोबर आणि १ चूक म्हणजे आतापर्यंत ३ पैकी १ पॉईंट.

क्लिंटन एकूण निकाल तू दिलेल्या आकड्यांप्रमाणे बरेच जवळ आहेत. अभिनंदन!

In reply to by बॅटमॅन

बरोबर बोललात BTMAN भाऊ, आम्हाला साधे महाराष्ट्रातले अंदाज SANGTA येत नाही, क्लिंटन भौनी तर गुजरात पर्यंत मजल मारली. मनपूर्वक अभिनंदन क्लिंटन भाऊ.

१००-१०५ वरून पुन्ह मुसंडी मारून ११७ चा आकडा मागे टाकला

सध्याचा लेटेस्ट आकडा आहे भाजपः १२१, काँग्रेसः ५८ आणि इतरः३. नक्की किती मतदारसंघांमधले अंदाज बरोबर आहे हे आता संध्याकाळीच जाहिर करेन.तरी वरकरणी असे वाटत आहे की १८२ पैकी किमान १५५ मतदारसंघांमध्ये अंदाज बरोबर आले असावेत.या निवडणुकीत एकूण १,६६६ उमेदवार होते.एकट्याला १,६६६ उमेदवारांविषयी माहिती काढणे आणि त्यावरून ते मागच्या वेळेपेक्षा नक्की किती मते फिरवू शकतील याचा कॉल घेणे ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती.तरीही १८२ पैकी १५५ म्हणजे या उपक्रमाला बरेच यश मिळाले असे म्हणायला हरकत नसावी. मी १९८९ च्या लोकसभा निवडणुकांपासून राजकारण फॉलो करत आहे. १९९४ मध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा १९९६ च्या लोकसभा निवडणुकांचे अंदाज व्यक्त केले होते हे आठवते.तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत माझे अंदाज व्यक्त करणे हा माझा आवडता प्रकार आहे. यापुढील निवडणुकांमध्ये अधिक अचूक अंदाज व्यक्त करायला जर कोणी मिपाकर इच्छित असतील तर आपण सगळे मिळून हे काम पुढे नेऊ शकू.२०१४ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत सगळ्या राज्यांचा अभ्यास करणे आणि त्यावरून कॉल घेणे हे खूपच मोठे काम आहे.एकट्या गुजरातमध्ये माझी दमछाक झाली होती तेव्हा हे काम एकट्या माणसाचे नक्कीच नाही.असे काम करायला कोणाला आवडेल का?असल्यास जरूर कळवा म्हणजे आपण सगळे मिळून हे काम करू शकू.

In reply to by क्लिंटन

राजकारण, नागरिकशास्त्र या विषयात बिलकूल रुची नाही आणि त्यामुळे गती तर बिलकूलच नाही. पण तुमच्या अभ्यासाचं कौतुक वाटतं.

In reply to by क्लिंटन

"यापुढील निवडणुकांमध्ये अधिक अचूक अंदाज व्यक्त करायला जर कोणी मिपाकर इच्छित असतील तर आपण सगळे मिळून हे काम पुढे नेऊ शकू.२०१४ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत सगळ्या राज्यांचा अभ्यास करणे आणि त्यावरून कॉल घेणे हे खूपच मोठे काम आहे.एकट्या गुजरातमध्ये माझी दमछाक झाली होती तेव्हा हे काम एकट्या माणसाचे नक्कीच नाही.असे काम करायला कोणाला आवडेल का?असल्यास जरूर कळवा म्हणजे आपण सगळे मिळून हे काम करू शकू." मला नक्कीच यात सहभागी व्हायला आवडेल. निवडणुक निकालांचे विश्लेषण, मतदाता चाचणी निकाल इ. मी उत्सुकतेने वाचतो. 'इंडिया टुडे' हे साप्ताहिक दर ६ महिन्यांनी देशभर मतदाता चाचणी घेऊन त्याचे निकाल जाहीर करते. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे निकाल ते जाहीर करतात. ते मी उत्सुकतेने वाचतो. ते आता जानेवारी २०१३ मध्ये ओपिनियन पोल घेऊन त्याचे निकाल लगेचच जाहीर करतील.

नरेंद्र मोदींचं भाषण आवडलं,४६५ मि. हिंदीतून भाषण. संजय निरूपम हिंदीतच का बोलले आणि त्यामुळे ६ कोटी गुजराथ्यांचा कसा अपमान झालाय इ. इ. तारे तोडतोय :)

नमस्कार मंडळी, गुजरात निवडणुकांचे सगळे निकाल उपलब्ध झाले आहेत.निकाल पुढीलप्रमाणे: भाजप: ११५ कॉंग्रेस: ६१ राष्ट्रवादी कॉंग्रेस: २ गुपप: २ जनता दल (यु): १ अपक्ष: १ माझ्या अंदाजांपैकी १३३ जागांचे अंदाज बरोबर आले तर ४९ ठिकाणचे अंदाज चुकले.हा आकडा किमान १५० असता तर माझे समाधान झाले असते.काहीही असले तरी या उपक्रमाचे यश आणि अपयश दोन्ही माझेच. या प्रक्रियेत नक्की कुठे चूक झाली हे शोधायला हवे. म्हणजे भविष्यात समजा हा उपक्रम इतर कोणत्या राज्यासाठी करायचा असेल तर तशी सुधारणा करता येईल.पण एक गोष्ट आताच सांगतो आणि ती म्हणजे शेवटी या उपक्रमासाठी जेवढा वेळ देणे गरजेचे होते तितका देता आला नाही. असो. सर्वांच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे.

मागच्या तुलनेत मोदी यांनी दोन जागा गमावल्याचे दिसते आहे, जे काही फार विशेष म्हणण्यासारखे अपयश वगैरे नाही. जवळजवळ ७०% मतदान झाल्याचे दिसले. जो एक प्रकारचा रेकॉर्ड आहे. (म्हणजे ६ करोड गुजरातींपैकी ४.२ कोटी लोकांनी मतदान केले म्हणायचे) यापैकी पक्षनिहाय अ‍ॅक्चुअल किती % लोकांनी कोणत्या पक्षाला मते दिलीत याचा काही विदा उपलब्ध आहे काय? तो जाणून घ्यायला आवडेल. (मोदीविरोधी मतदान पटेल व काँग्रेसमधे विभागले गेले असे म्हटल्याचे ऐकू आले.)

In reply to by आनंदी गोपाळ

यापैकी पक्षनिहाय अ‍ॅक्चुअल किती % लोकांनी कोणत्या पक्षाला मते दिलीत याचा काही विदा उपलब्ध आहे काय?
अशा प्रकारचे विश्लेषण लवकरच करणार आहे.पण ते आज नाही.माझी फर्स्ट इन्स्टिन्क्ट अशी आहे की केशुभाईंच्या पक्षाने काँग्रेसचे जास्त नुकसान केले आहे.कारण लेवा पटेल समाजापैकी भाजपला मत न देणारे लोक (जे पूर्वी काँग्रेसला मत देत असत) त्यांनी या पक्षाला मते दिली असावीत आणि या प्रक्रियेत केशुभाईंच्या पक्षाने भाजपपेक्षा काँग्रेसची मते जास्त खाल्ली असावीत.अर्थात हा अंदाज आहे. १९९८ मध्ये वाघेलांच्या पक्षाने नेमका हाच प्रकार केला होता आणि भाजपपेक्षा काँग्रेसचे जास्त नुकसान केले होते.२०१२ मध्ये मनप्रित बादल यांच्या पक्षानेही अकाली दल-भाजप युतीपेक्षा काँग्रेस पक्षाचे जास्त नुकसान केले.

In reply to by क्लिंटन

पटेल लॉबी ही संख्येने प्रचण्ड नसली, तरीही संघटीत आहे, पैशाने मजबूत आहे, व मतदानावार मोठा परिणाम करू शकण्याच्या परिस्थितीत आहे असे ऐकून आहे. याचमुळे तिरंगी लढतीत बीजेपीचा फायदा होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपानेही सुमारे ४० एक जागांवर पटेल उमेदवार दिले होते असे ऐकतो.

माझ्या प्राथमिक विदा वापरून केलेला अंदाज आणि श्री क्लिंटन यांचा अभ्यास याची तुलना होऊच शकत नाही. मात्र काही अंदाज, माझी विचारपद्धती मांडतो ज्यामुळे कुठे तृटी राहिली असल्यास त्यावर विचाराला दिशा मिळू शकेल. खात्री आहे यावर जाहिर चर्चेला हरकत नसेल १. जेडीयु चा प्रभाव काँग्रेसची मते खातील असा माझा अंदाज होता तो बराच बरोबर ठरलेला दिसत आहे. त्यांना एक जागाही मिळाली आहे. महाराष्ट्रात जसे कॉ व रा कॉ वेगळे खेळल्यावर अधिक जागा जिंकतात तसेच काहिसे फक्त जेडीयु अगदी छोटा पक्ष असल्याने तितक्या परिणामकरकारक रित्या नव्हे. २. गु.प.प. हा भाजप इतकाच काँग्रेसला हानी पोचवेल असा अंदाज होता. तो काही प्रमाणात बरोबर वाटतो आहे. ३. बसपा एक जागा जिंकु शकेल असे मला वाटले होते. ते सपशेल चुकले. किती ते मतांची टक्केवारी बघुन विश्लेषण करावे लागेल

मोदींना पुन्हा एकदा बहुमताने निवडून दिल्याबद्दल गुजराती जनतेचे अभिनंदन! भाजपचा हा सलग ५ वा विजय व काँग्रेसची ही सलग ६ वी हार आहे. १९९० मध्ये जनता दलाला ७०, भाजप ६७ व काँग्रेस ३३ अशी स्थिती होती. १९९५ मध्ये भाजप १२३ व काँग्रेस ६०, १९९८ मध्ये भाजप ११७ व काँग्रेस ६३, २००२ मध्ये भाजप १२७ व काँग्रेस ५०, २००७ मध्ये भाजप ११७ व काँग्रेस ५९ आणि २०१२ मध्ये भाजप ११७ व काँग्रेस ६१ अशी स्थिती आहे. यावेळी मोदींना निवडणुक बरीच जड गेली. सलग ११ वर्षे सत्तेत असल्याने प्रस्थापितविरोधी होणारी जनभावना, पक्षपाती माध्यमे, केशूभाई पटेलांनी वेगळा पक्ष काढून दिलेले आव्हान व २०१२ मध्ये सौराष्ट्रात पडलेला दुष्काळ यामुळे निवडणुक अवघड गेली. केशूभाई पटेलांच्या पक्षाने २ जागा जिंकून भाजपाचे इतर १०-१२ जागांवर तरी नुकसान केले असावे. अन्यथा भाजप १३० च्या पुढे गेला असता.

काँग्रेसवाल्यांची गंमत वाटते. चिदंबरम आज म्हणाले की "गुजरात मध्ये काँग्रेसचाच खरा विजय झाला आहे". काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी प्रचारसभेत म्हणाल्या की गुजरातचा विकास काँग्रेसमुळेच झाला आहे. काँग्रेस गेली २३ वर्षे गुजरातमध्ये सत्तेत नाही. बहुतेक रिमोट कंट्रोल वापरून त्यांनी गुजरातचा विकास केलेला दिसतोय. मागे कपिल सिब्बल म्हणाले होते की, "२ जी घोटाळ्यात शून्य तोटा झाला. खरं तर त्या व्यवहारात खूप नफा झाला होता.". आज पुन्हा एकदा सिब्बल म्हणाले की "भाजपाने ३-डी प्रचार केला, पण मते २-डी मिळाली." २-३ दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंद्यांनी हफीज सईद चा उल्लेख श्री. हफीज सईद असा केला होता. त्यापूर्वी आधुनिक विदूषक दिग्विजय सिंग यांनी लादेनचा "ओसामाजी" असा गौरवपूर्वक उल्लेख केला होता.

In reply to by श्रीगुरुजी

आजपर्यंत बकवास करायचा मक्ता फक्त दिग्गीचा आहे असे वाटायचे, पण चिदंबरम सुद्धा बकवास करताना पाहून मज्जा वाटली.

केशूभाई पटेलांच्या "गुजरात परिवर्तन पक्षाने" भाजप सुमारे ८ जागांचे नुकसान केले आहे. २ जागा गुपपने जिंकल्या व सौराष्ट्रातल्या काँग्रेस निवडून आलेल्या ६ जागांवर गुपप व भाजपच्या मतांची बेरीज काँग्रेसपेक्षा अधिक आहे. जर गुपप हा पक्ष निवडणुकीत नसता तर भाजपला किमान ८ जागा अधिक मिळून १२३ जागा मिळाल्या असत्या व काँग्रेस ५५ वरच थांबली असती.

हिमाचल प्रदेशात भाजपला ३८.४७ टक्के व काँग्रेसला फक्त १.०७ टक्के अधिक म्हणजे ३९.५४ टक्के मते मिळाली. पण या फरकामुळे काँग्रेसला ३६ म्हणजे भाजपपेक्षा तब्बल १० जागा अधिक मिळाल्या. १९९८ मध्ये राजस्थानमध्ये भाजपला ३८.८ टक्के व काँग्रेसला ३८.४ टक्के मते होती. पण काँग्रेसच्या जागा होत्या ७६ तर भाजपच्या होत्या ९५.

In reply to by आनंदी गोपाळ

गुजरातमध्ये २००७ मध्ये भाजपला ४९ टक्के (११७ जागा) व काँग्रेसला ३८ टक्के (५९ जागा) मते होती. २०१२ मध्ये भाजपला ४८ टक्के (११५ जागा) व काँग्रेसला ३९ टक्के (६१ जागा) मते मिळाली. पण गुजरात परिवर्तन पक्षाला एकूण १.७८ टक्के मते मिळून २ जागा मिळाल्या. ही सर्व भाजपचीच मते होती. ही मते जर भाजपच्या मतांमध्ये मिळविली तर भाजपला एकूण ४९.७८ टक्के मते व अंदाजे १२५-१२७ जागा मिळाल्या असत्या व काँग्रेस फार तर ५० पर्यंत पोचली असती.

भारताचे कीर्तीवान, गुणवान, शक्तीवान युवराज, भावी पंतप्रधान श्री राहुलजी गुजराथमधे मोठ्या प्रमाणात प्रचार करत होते. त्यांच्या कुण्या खाशा चमच्याने आय मीन निष्ठावान सेवकाने असे विधान केले की ह्या थोर विभूतीने जिथे जिथे प्रचार केला तिथे तिथे काँग्रेसला दणकून विजय मिळाला आणि मोदीला धूळ खावी लागली. हे खरे आहे का? का शीला दीक्षितच्या ६०० रुपड्यात पाच लोकांच्या महिनाभराच्या उदरनिर्वाहाप्रमाणे वस्तूस्थितीशी फटकून आहे?

In reply to by हुप्प्या

भारताचे कीर्तीवान, गुणवान, शक्तीवान युवराज, भावी पंतप्रधान श्री राहुलजी गुजराथमधे मोठ्या प्रमाणात प्रचार करत होते. त्यांच्या कुण्या खाशा चमच्याने आय मीन निष्ठावान सेवकाने असे विधान केले की ह्या थोर विभूतीने जिथे जिथे प्रचार केला
राहुल गांधी किर्तीवान, गुणवान इत्यादी आहेत का नाही हे मला माहित नाही आणि त्यात मला इंटरेस्टही नाही. पण काँग्रेस नेत्यांनी असे म्ह्टले की राहुल गांधींनी ज्या ७ मतदारसंघात प्रचार केला तिथे काँग्रेस उमेदवार जिंकले.१८२ पैकी ७ मतदारसंघात प्रचार केला असेल तर तो मोठ्या प्रमाणातला प्रचार नक्कीच नव्हे.आणि हे ७ मतदारसंघ नक्की कोणते होते याची मला कल्पना नाही.म्हणजे अदरवाईजही काँग्रेससाठी सुरक्षित असलेल्या जागीच त्यांनी प्रचार केला होता की काय हे नक्की मला माहित नाही.तेव्हा बाकी काही लिहित नाही.

In reply to by क्लिंटन

युवराज राहुलजींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी, त्या विभूतीच्या ओघवत्या, मर्मभेदक वक्तृत्वाने न्हालेली धरती त्या उन्मत्त दैत्याच्या नाकी दम आणेल असा एक कयास होता. पण नव्याने कळपात सामील झालेले काँग्रेसचे खंदे अनुयायीही आपल्या आकडेमोडीत युवराजांच्या प्रचाराचा समावेश न करताना बघून तीव्र खेद झाला. असो.

"काँग्रेससाठी सुरक्षित असलेल्या जागीच त्यांनी प्रचार केला होता"
अगदी हेच केलय ...आणि वर शहाजोगपणाचा आव आणतायत्...काहीही कर्तृत्व नसलेल ते बेण राहुल कशाला आपल अज्ञान पाजळत १८२ मतदारसंघात प्रचार करुन हात दाखवून अवल़़क्षण करुन घेईल..?काँग्रेसपक्षाला देश म्हणजे गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता व पंतप्रधानपद म्हणजे खिरापत वाटतेय...