तुम्हाला कोणी सांगीत्ले की मुले व्हाय्ला एकच रुमची गरज होती देवकी वसुदेवाला.अगदी वसुदेवाची.
वसुदेव फॉरीन ला असता तरी झाली असती. आता होतात की.
विनायक प्रभु
"हमार भैय्या है ना गांव में!" का हो भौ??
=))
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)Sun, 08/24/2008 - 18:32नवीन
बोलण्याच्या ओघात, स्ट्रॉंग अर्गुमेंट करण्याच्या नादात आणि विनोद करण्याच्या उत्साहात आपण आपल्याच संस्क्रुतीतील पुजनीय पुरुषांविषयी / देवांविषयी वेडेवाकडे तर बोलत नाही ना ह्याचे भान ठेवा.
बाकी चालू द्या.
(महाभारता कडे बोधकथा म्हणून बघणारा) ऍडी जोशी
आपल्याच संस्क्रुतीतील पुजनीय पुरुषांविषयी / देवांविषयी
:) नक्की कोण ? कारण आज काल कोण कोणाची पुजा करेल काहि सांगता येत नाहि ;)
कालच आता रजनीकांतचे आणखी एक मंदिर उभे राहणार असे वाचले.. ५०० वर्षांनंतर कोणी तो एक आपल्या संस्कृतीतील महान पुरुष / देव होऊन गेला असं नाहि सांगितलं म्हणजे मिळवलं :)
-(महाभारताला केवळ एक उत्तम कथा मानणारा) ऋषिकेश
आज काल कोण कोणाची पुजा करेल काहि सांगता येत नाहि
सहमत आहे
कालच आता रजनीकांतचे आणखी एक मंदिर उभे राहणार असे वाचले.. ५०० वर्षांनंतर कोणी तो एक आपल्या संस्कृतीतील महान पुरुष / देव होऊन गेला असं नाहि सांगितलं म्हणजे मिळवलं
नक्कीच सांगतील.
शेवटी रामायण आणि महाभारत (किंवा सगळ्याच पुराणकथा) तरी काय आहेत? माझ्यामते या कथांचा लोकरंजन(जसे की आज निरनिराळे सुपरहिरो) आणि धर्म- अधर्म शिकवण्याकरिता(इसापनिती, पचतंत्र वगैरे) जन्म झाला असावा. आणि कालांतराने त्यांचाच रोजगार हमी योजनेअंतर्गत देवळे बांधून उपजिवीकेसाठी वापर केला जात असावा.
याचं उत्तम उदारहण म्हणजे महाभारत. आनंद साधले यांचे एक पुस्तक आहे, "हा जय नावाचा इतिहास आहे". त्या बाबत एक परिक्षण मला इथे मिळाले. माझ्याकडे होते पण कोणीतरी घेवून गेला पण परत आणून दिले नाही. हे पुस्तक सध्या मिळत नाही. कोणाकडे असल्यास हवे आहे. मिळाल्यास जरुर वाचा.
... नाटक्या
महाभारत कुणी लिहिले अन् नक्की किती श्लोक होतेत, याबद्दल सर्वसाधारण माहिती येथे मिळेल - दुवा
[उपरोक्त माहिती ही बरीच खरी असावी असे समजण्यास काही हरकत नसावी.]
महाभारत युद्धाचे प्रयोजन स्वत: श्रीकॄष्णांनीच गीतेत सांगीतलेले आहे. नक्की कोठे अन् कसे ते जाणकारच सांगू शकतील. पण
"यदा यदा..." ह्या श्लोकात त्यांनी जे अवतार प्रयोजन सांगीतलेले आहे ते सुद्धा सहजच युद्धाचे कारण सांगते.
द्रौपदीवस्त्रहरणाचा प्रसंग घडण्याच्या अगोदरपासून अनेक अधर्मकृत्य कौरवांकडून घडलेले आहेत. हा प्रसंग म्हणजे "Final nail in the coffin"असे म्हणता येईल. पण माझ्या मते महाभारत युद्धाचे निमित्त जरी कौरव-पांडव असतील तरी त्याची व्याप्ती फार मोठी आहे.
या युद्धाअगोदरही अनेक अधर्मी राज्यकर्ते श्रीकृष्णांनी नामोहरम केलेत -
कंस, कालयवन, पौण्ड्रक, शाल्व, दंतवक्र, जरासंध(पांडवांची मदत घेऊन), बाणासूर हे त्यातले काही. तसेच करून ते कौरवांनादेखील नामोहरम करू शकले असते. मग एवढे सर्वसंहारक युद्ध घडविण्याचे प्रयोजन काय? ते केवळ कौरव-पांडवांची भाऊबंदकीमुळेही घडलेले नाही किंवा द्रौपदीवर झालेल्या अन्यायामुळेही घडलेले नाही. अधर्म उच्चाटनाचे मूळ प्रयोजन साध्य करण्यासाठी झालेले आहे.
या पार्श्वभूमीवर तुमच्या प्रश्नासारखाच माझाही एक प्रश्र:
खांडववन जाळण्याचे प्रयोजन काय असावे? ते जाळणारे, त्यातल्या अगणित प्राणिमात्रांसकट जाळणारे, श्रीकृष्णार्जुन हेही मग अधर्मीच नाहीत काय?
[टिप: जर श्रीकृष्ण नसते तर काय झाले असते याचे उत्तर देण्याची गरज आहे असे वाटत नाही. :) ]
महाभारत हे जय नवाचा इतिहास आहे (.... आणी इतिहास नेहमी जेते लिहीतात ... आपण नाही का गोरया कातडीने लीहलेले सगळे खरे मनतो .....)
हे एकदा ल्क्षात घेतले कि बरेच प्रश्न सुट्तात .. (आणी कही नवीन निर्मण होतात ते जाउ दे )
त्यच्या कडे 'धर्म' म्हणुन पहीले कि अमळ पन्चाइत होते
मजेदार विदुषक
तात्या, माझ्या मते त्या काळी महिलांना पत्नी म्हणूनही काही विशेष स्थान होते असे नाही. (त्या काळी बर्याच बायका करण्याचीही चाल होती) त्यात द्रौपदी पडली पाच भावांची बायको. त्यामुळे ती गेली तर काय दुसरी कुठलीही करता येईल, अशी सोय होती. तशा पांडवांच्या वैयक्तिक इतर बायकाही होत्या. त्यामुळेच तिची वस्त्रफेड सुरू झाल्यानंतरही पांडवांना फारसे काही वाटले नसावे. असो. पण महाभारत ही एक उत्तम लोकरंजनात्मक कथा आहे. कानडी लेखक एस. एल. भैरप्पा यांनी लिहिलेली 'पर्व' ही कादंबरी महाभारताकडे मानवी दृष्टिकोनातून पहाते. त्यामुळे महाभारतात चमत्कार म्हणून जे काही सांगितलं जातं, त्याचं अतिशय तार्किक विश्लेषण त्यात आहे. मला तरी ते बर्यापैकी पटलं आहे. उदा. द्रौपदी ही पाच भावांची बायको असल्याने तिच्या उपभोगाची लालसा पाच भावांमध्येही कशी होती. त्यातच नियम मोडल्याने अर्जुन कसा घरातून बाहेर पडला. बाहेर गेल्यानंतरही त्याने काय दिवे लावले. किती ठिकाणच्या राजकन्यांशी त्याने लग्न केली. अखेरीस अज्ञातवासात तो 'बृहन्नडा' च का झाला. याचेही विश्लेषण त्यात आहे. ते पटते.
थोडे अवान्तर ....
रामायणा वर पण असेच वेगळ्या द्रुष्टिने 'नरेन्द्र कोहली' ह्यानी फार छान लिहिले आहे
अतीशय ओघवत्या आणी शूद्ध हिन्दी मधे ...
सगले चमत्कार टाळुन त्याचे पतेल असे स्पश्टीकरन दीले आहे ..
७ भागान्मधे ही कदम्बरी आहे .. जमल्या नक्की वाचा
मजेदार विदुषक
'युंगांत' नावाच्या पुस्तकात इरावती कर्वेंनी महाभारतातील व्यक्तिरेखांचे व्यवस्थित विश्लेषण केले आहे.
मिळाले तर हे पुस्तक जरुर वाचा.
क्रुष्णाचे वासुदेवत्व, त्याचे आणि अर्जुनाचे एकमेकांवरील प्रेम, युधिष्ठीराचा स्वभाव, कर्णाचा उतावीळपणा, द्रौपदीच्या चुका व इतरही खुप महत्वाची माहिती आहे.
पुस्तक विचार करायला लावते.
प्रतिक्रिया