सध्या ह्या मांजरांनी फार धुमाकूळ घातलाय रावं. चेपुवर, मेल मधून आणि आता इथेही.
तमाम मांजर प्रेमींची नाराजी ओढवत म्हणतो या सगळ्यांना* गोणपाटात टाकून पार उत्तर नायतर दक्षिण ध्रुवावर नेऊन सोडलं पाहिजे.
* मांजरांना (मांजर प्रेमींना नेण्यासही आमची हरकत नाही.)
श्री, संपादकांपासून सगळ्यांना बस बस झालीत मांजरं.
आणि तू अगदी प्रेमाने लिंका द्यायलास. :(
१५-२० खरीखुर्री मांजरे धरुन त्यांना तुझ्या घराची लिंक देईन. ;)
फोटो आवडले. प्राण्यांच्या फोटोंमधेही डोळ्यांच्या प्रतलातून काढलेले फोटो जिवंत होतात.
मांजराची पिल्लं कॅमेर्याकडे बघताना साधारणतः भेदरलेली किंवा भेदरून हल्ला करण्याच्या तयारीत दिसतात. त्यांचे फोटो आईच्या शेपटाशी किंवा आपसांत खेळताना त्यांचं लक्ष जाणार नाही अशा पद्धतीने काढलेले छान वाटतात.बहुतांशी मोठी मांजरं पक्की डांबिस, माजुर्डी आणि मालकीभाव दाखवणारी असतात. ती ओळखीच्या आणि लळा लावू पहाणार्या माणसांकडे दुर्लक्षच करतात. त्यामुळे मोठ्या मांजरांचे फोटो मस्तच येतात. तुमच्या शेवटच्या फोटोतली मांजर आणि पिल्लं पहा, मांजर कशी "हा काय क्षुद्र प्रकार आहे!" अशा माजुर्ड्या नजरेने बघते आहे आणि तिची पिल्लं मात्र भेदरलेली आहेत.
जमलं तर एखाद्या मांजराला पोटभर खायला घाला. मग ती स्वतःचं ग्रूमिंग करेल, तेव्हा तिचे डोळे फोटोत मिळतात का पहा. असे फोटो बघायला मज्जा येते. आमच्या घरावर मांजराने हक्क सांगितला होता तेव्हा फोटोग्राफी मला परवडण्यातली नव्हती.
तसंच माणसांचंही. कॅमेरा कॉशस (नर्व्हस होणारे आणि पोझ घेणारे दोन्ही) लोकांचे फोटो त्यांचं लक्ष नसताना काढले तर अधिक चांगले दिसतात.
(माजुर्ड्या मांजराची मैत्री लाभलेली) अदिती
प्रतिसादात मांडलेल्या मुद्द्याशी पूर्णपणे सहमत.
छायाचित्रणातले हे तत्वज्ञान स्व.गौतम राजाध्यक्षांनी आपल्या अप्रतिम कलाकृतींद्वारे एका नव्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.
गणपा वेताळाने जरा धागे थांबत थांबत टाका असे सांगूनही हुमी एक्याने आपला हट्ट सोडला नाही. आठवड्याला रोज एक धागा तो सुद्धा फोटोचाच व ५२ आठवड्यानंतर त्याच सर्व फोटोचा एक धागा करून ५३ चा आठवड्यात उद्यापन करावे
असे हुक्का ला कोणीतरी अघोरी शक्तीने सांगितले असावे. तो पुन्हा मिपा ची वाट चालू लागला. मांजरे, मग कुत्री, मग ससे मग खारूताई असे धागे टाकायचे मनात पक्के करून त्याने गणपा वेताळात परत उचकाविण्यासाठी........
तुमचे धागे म्हणजे एक पर्वणीच असते. तुमच्यामुळे कळलं की मांजर असं दिसतं, नाहीतर आम्हाला कुठे मिळणार मांजर बघायला !! धाग्यात क्रमशः न दिसल्यामुळे अंमळ निराशा झाली. उद्याचा धाग्यात कोणता प्राणी टाकणार ते सांगत चला. तेवढीच उत्सुकता वाढेल. बाकी पुढील धाग्याच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
@घुशींचे आणि उंदरांचे फोटो असे काढुन दाखवु शकता काय ??>>> =)) ते काढलेले आहेतच,फक्त ते त्याच मांजरांच्या पोटांमधे आहेत, ;-) एक्स-रे काढला तर(च) दिसतील. हुक्कू एक्स-रे टाका हो =))
मी वैयक्तिक कुठे होतोय . . . इथे बरेच सदस्य खोडकर आहेत तर मी पण खोडकर बनतोय . . . आपले ते प्रेम दुसर्याचे ते पाप....असे कसे चालेल....माझी चेष्टा केल्यावर जर मी पण कोणाची चेष्टा केली तर त्याला डोक्यात राख घालणे म्हणत नाहीत...
खोड्या करतांना काही संकेत पाळा एवढेच म्हणायचे होते बाकी आपली इच्छा. शिवाय तुम्ही हे फोटो दुबार इथे टाकल्यामुळे backfoot वर आहात हे लक्षात घ्या. मग असे चिडून दिलेले प्रतिसाद येणार नाहीत.
असतील देखील बहुदा. पण काम धंदे असल्याने असल्या भिकार शोधांकरता आणि त्यांचे फटू काढून गौतम राजाध्यक्षांच्या थाटात डकवत बसायला आपल्याला वेळा नाय. त्यामुळे काय कल्पना नाय.
अर्थात "तुमच्यासारखा" राजकुमार असल्यावर त्यांचे जगणे मुश्किल झाले असेल नाही ??
आता ते मी कसे सांगणार ? राजकुमाराच्या राज्यात जगणे अवघड आहे, का एखाद्या टिनपाट फोटोग्राफरच्या ते मांजरांनाच माहिती असेल ना.
४ थ्या फोटुतला पिल्लु म्हणजे नवरा लग्नाच्या / बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी (तो आहे हे विसरुन) हापिसातुन पार्टी करुन आलाय आणि बायकोचं लेक्चर ऐकतोय अशा पोज मध्ये उभा आहे.
कुठुन शिकलं असेल ते पिल्लु. :D
पिल्लांच्या चेहर्यावरील भाव छानच टिपले आहेत. मी एकदा एका पाळलेल्या मांजराचे फोटो काढायचा प्रयत्न केला तर जमतील तेवढे मख्ख भाव त्याने चेहर्यावर आणले होते.
बाकी एखाद्या चित्रलेखाला शब्दांची जोड कशी द्यावी याचे सुगम मार्गदर्शन येथे मिळेल.
>>आंधळ्यांच्या बाजारात 'आरसा' विकणे मूर्खपणाचे आहे . . .
अगदी अगदी !! बा द वे पुढला आरसा....आपलं ते पुढला धागा कोणत्या प्राण्यावर म्हणे ? घोरपडींचे फोटो टाका, ते पाह्यल्याचं आठवत नाहीये.
प्रतिक्रिया
सध्या ह्या मांजरांनी फार
शेवटच्या फोटूतला तो मोठा
हेच फोटो मी मिपावर या आधी
येस! दुसर्या फोटोतली मांजर तुझ्यासारखी दिसते असं तू म्हणाली
अरारारा
हो ना संजय काका ??
तू त्यांना ताव देऊ नकोस, पुन्हा नवं फोटोसेशन करतील
:-).
तुझ्या घराची लिंक
-१
ते फोटो मीच टाकले होते . .
पण परत परत का?
फोटो आवडले. प्राण्यांच्या
+१
तरी ...हुमी एक्क्याने
तुम्ही त्यांना घेऊन जाताय वेगवेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढायला
आमची मल्लीनाथी
पर्वणीच !!
हुक्कु , सुंदर गोष्टिंचे
पूजा, तुम्हारे सोचनेका ढंग मस्त है!
@घुशींचे आणि उंदरांचे फोटो
मायला, ते `एक्सरेचे फोटो' काढतील आणि पुन्हा इथे टाकतील
आताच फोन आला
स्वसंपादन सुरु झालं काय हो ?
हेहेहे
हुकुमीएक्काराव तुम्ही
:)
खोड्या करतांना काही संकेत
:)
:)
कायहो म्याव..?
झक्कास.....
सुरेख !
'धन्यवाद 'हुकुपिडिया' ' हे
धन्यवाद 'हुकुपिडिया'.......(c
सॉरी !
बरोबर
कल्पना नाय बॉ !
(No subject)
पूसी कॅट!
४ थ्या फोटुतला पिल्लु म्हणजे
अगदी आगदी
हाहाहा!
हुकुमी एक्का साहेब अशा
फोटोज आवडले
सर्व प्रतिक्रिया वाचून एकच समजले . . .
प्रतिक्रिया वाचून फक्त एवढेच समजले...
आंधळं असणं परवडलं
डोळे उघडे ठेवा!
>>आंधळ्यांच्या बाजारात 'आरसा'