✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काय या पुणेकरांचे कौतुक !

न
नर्मदेतला गोटा यांनी
Mon, 12/10/2012 - 00:35  ·  लेख
लेख
पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी वाटते की पुणेकरांचे एवढे काय कौतुक. यांच्या उकडण्याचेही कौतुक, यांच्या थंडीचेही कौतुक. म्हणजे पुणेरी पेपरमधल्या बातम्या वाचल्या की कळेल. कधी सकाळी पावसाचे अजिबात चिन्ह नसते. पुणेकर छत्री न्यायचा कंटाळा करतात. पण संध्याकाळी ऑफीसमधून घरी यायला निघावे तर बेसावध क्षणी पाउस पुणेकरांना गाठतो आणि भिजवतो. दुसर्‍या दिवशीच्या पेपरमधे भिजलेल्या पुणेकरांचे, झाडाखाली थांबलेल्या, स्कार्फ बांधलेल्या तरुणींचे फोटो आणि बातमीचे हेडींग अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ कधी हा पाऊस प्रचंड कोसळतो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागतात. झाडे पडतात. रस्त्यातील वाहतूक अडते. दुसर्‍या दिवशी फोटो आणि बातमी. पुणेकरांना पावसाने झोडपले. कधी हलक्याशा सरी पडत असतात. अशावेळी हिरवागार झालेल्या सिंहगडाचे फोटो, त्यावर पर्यटकांची गर्दी. बातमी असते - पावसाळी वातावरणात पुणेकरांनी केले सिंहगडाचे पर्यटन, पुणेकरांनी सिंहगडावर गरम गरम भजी खाणेच पसंत केले. थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी फिरायला पुणेकर बाहेर पडतात. अशावेळी कमला नेहरु पार्कमधला वॉकींग जॉगिंग करणार्‍या पुणेकरांचे फोटो. यातल्या काही जणांच्या अंगावर शाल. पुण्यातल्या पेपरात बातमी. बातमीत वर्णन असते. पुणेकरांनी स्वतःला शालीत लपेटून घेतले. फोटोवर हेडींग पुण्यात गुलाबी थंडी ! थंडी संपून थोड्याशा उकाड्याला सुरुवात होते, बातमी - पुण्यातील थंडी गायब कधी जूनमधे पाउस पडतो पण जुलैमधे पाऊस अजिबात पडत नाही. बातमी - पावसाचे दोन महीने उलटले पण पुणेकर कोरडेच अशा जरा उकडणार्‍या दिवसात हलकी पावसाची सर येते. तापलेले रस्ते जरा थंड होतात. उकाडा जरा कमी होतो. बातमी - पावसाच्या हलक्या सरीने पुणेकर सुखावले किंवा पुणेकरांवर पावसाचा प्रसन्न शिडकावा ! उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा वाढतो. अशावेळी बातमी पुणेकर उकाड्याने हैराण कधी जरा हीच बातमी बदलून - रसाच्या गुर्‍हाळाचा फोटो, पुणेकर रस पिताहेत. बातमीचे शीर्षक - चहापेक्षा रस बरा ! कधी कधी पुण्यातल्या रस्त्यांवर बरेच खड्डे पडतात. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो. अशावेळी बातमी 'पुणेकर खड्याने त्रस्त.' हेच रस्ते जर कोथरूडमधील असतील तर कौतुक आणखी वाढते. रस्त्यातील खड्ड्यांनी कोथरुडकर हैराण अशीही ओळ पहायला मिळते. पाणीटंचाईची बातमी असेल तर ऐन पावसाळ्यात कोथरुडकरांच्या टँकरसमोर रांगा सवाई गंधर्वचे दिवस असतात. कौशिकीसारखे कलाकार छान गाऊन जातात. मग त्या महोत्सवाचा फोटो. हेडींग-कौशिकीच्या गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध ! असा सारा पुणेकरांच्या कौतुकाचा मामला जो पुणेकर झाल्याशिवाय इतरांना नाही उमगायचा !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध

प्रतिक्रिया द्या
48536 वाचन

💬 प्रतिसाद (192)

प्रतिक्रिया

सलाम.

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/12/2012 - 16:25 नवीन
तुमच्या निरागसतेला सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

पर्‍याला पहिल्यांदा निरागसते

जेनी...
Wed, 12/12/2012 - 21:54 नवीन
=)) पर्‍याला पहिल्यांदा निरागसते ला सलाम ठोकताना पाहुन ..सॉल्लिड गुदगुल्या होतायत मला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सलाम स्वीकारला गेला आहे...

सस्नेह
Wed, 12/12/2012 - 16:30 नवीन
सलाम स्वीकारला गेला आहे...
  • Log in or register to post comments

तर तर.

हारुन शेख
Wed, 12/12/2012 - 16:32 नवीन
तर तर. स्नेहाताई आहेच आमची निरागस. हा प्रतिसादही निरागस आहे.
  • Log in or register to post comments

पुणे तीस

कापूसकोन्ड्या
Wed, 12/12/2012 - 19:50 नवीन
आणखी काही मुद्दे. सवाईचे कौतुक. गणपतीची विसर्जनाची मिरवणुक संपली ती वेळ.आणी चर्चा मानाचे गणपती पुणे महोत्सवातील हेमामालिनीचा डान्स डेक्कन क्विनमधली पॅन्ट्री बंद झाली आणि परत चालू झाली तो दिवस (पुणेकरांचे पॅन्ट्री विना प्रचन्ड हाल आणि नंतर दिलासा), सोबत एखादा फोटो. पॅन्ट्रीची कथा तर खुप गाजली होती. संकष्टी आणी गुरुवारी मिळ्णारी शा.खी आण दाण्याचा लाडू तर खासच. दसर्‍याचा आदल्या दिवशी 'सोने' खरेदी करायला झालेली शनीपाराशी गर्दी लक्ष्मी रोड वरचे नेपाळी स्वेटर वाले सकाळ चित्रकलेच्या परिक्षेत जमिनीवर बसलेले विद्यार्थी दहावी/बारावी परीक्षेचा पहीला (आणि शेवटचा) दिवस बाजारात एकदम आलेली कलिंगडे/ आणि माठ यांच्या ढिगाचे फोटो वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments

-- पुणे आले की भटांचा उल्लेख

नर्मदेतला गोटा
Wed, 12/12/2012 - 20:14 नवीन
-- पुणे आले की भटांचा उल्लेख आलाच पाहिजे?? इथे भट याचा अर्थ 'पक्के पुणेकर' असा घ्यावा (आणि पक्के पुणेकरचा अर्थ काय घ्यावा)
  • Log in or register to post comments

कोजागिरीच्या दुसर्‍या दिवशी

नर्मदेतला गोटा
Wed, 12/12/2012 - 20:15 नवीन
कोजागिरीच्या दुसर्‍या दिवशी बातमी ठरलेली सारसबागेत जमलेली, दुध पिणारी कुटुम्बे .त्यांचे फोटो किंवा शनवारवाड्यावरच्या गाण्याच्या मैफिलीचा फोटो पुणेकरांनी शनिवारवाड्यावर घेतला मसाला दुध आणि भावगीतांचा आस्वाद
  • Log in or register to post comments

ढकलपत्रातून आलेले आहे.....

नावातकायआहे
गुरुवार, 12/13/2012 - 01:51 नवीन
माझे 'पुणे'.... काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण बालके" ) कधी कधी असा इतका फालतू प्रश्न विचारतात की " तुम्हाला पुणे का आवडते ?" आता मग मी विचार केला की एका छोट्या उत्तरात सांगून टाकावे कि बुवा आम्हाला पुणे का आवडते..? आमच्या कडे मुद्दाम मराठीत बोला म्हणून कधी सांगावे लागत नाही, True freedom of thoughts , म्हणून प्रत्येक जण आपले स्वतः चे मत मांडू शकतो, आणि ते सुद्धा सर्वांना पटेल अशा पद्धतीने , पुण्यात काही उणे नाही वगेरे ठीक आहे , पण पुणे आवडायला काहीतरी कारणच हवे असे मला वाटत नाही ! उन्हाळ्यातले काही दिवस ( रात्री नव्हे) सोडले तर उरलेल्या दिवसात असलेले cool पुणे , किरकोळ पानझडीचे दिवस सोडले तर हिरवे असलेले पुणे, पावसासाठी थेट लंडन शी comparison होणारे एकमेव शहर म्हणजे पुणे ( अहो कधी पण येऊ शकतो आणि या चौकात असेल तर पुढच्या चौकात पण असेल याची काही ग्यारंटी नसते म्हणून .;), गिनीज बुकाला सुद्धा नोंद करायला लागली असे आमचे Two Wheelers चे पुणे ( आणि ते चालवणारे आम्ही धन्य पुणेकर ..;) , सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे, जीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे, मालुसर्यांच्या 'सिंव्हा' सारख्या मर्दानगी चे पुणे, पेशव्यांच्या 'सर्व' पराक्रमांचे पुणे , लाल महालात 'तोडलेल्या' बोटांचे पुणे, शनिवार वाड्यात 'सांडलेल्या' रक्ताचे पुणे, अटके पार लावलेल्या झेंड्याचे पुणे, पानिपतात तुटलेल्या स्वप्नाचे पुणे, 'ध' चा 'मा' केलेल्यांचे पुणे , 'न' ला 'न'च आणि 'ण' ला 'ण'च म्हणणारे पुणे , इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे , 'कोटी'सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे , नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे , सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे स्कूल चे पुणे , आब आणि रुबाब वाल्या बिशप्स लॉयलाज मिराज आणि हेलेनाज चे पण पुणे, SP , FC , BVP , SIMBY ,MIT आणि वाडिया चे पुणे , आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून ( की बांधून?) Two Wheeler वाल्या पुणे RTO कडून License to kill इशू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे , Info Tech park चे पुणे, Koregaon Park चे पुणे, कॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे, चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे, वैशाली च्या yummy सांभार चे पुणे, रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे, तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि कधी कधी Shoppers Stop ,Lifestyle आणि Central चे पुणे, college बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे, Office मधून गायब होऊन तिच्या सोबत चे Adlabs आणि R Deccan वाले पुणे , पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे, Nike आणि Reebok वाले पण पुणे , खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे, आणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे, कधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुडलक च्या मस्का पाव विथ cutting चे पुणे , कॅड बी आणि कॅड एम चे पुणे, सोडा शॉप चे पण पुणे, अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे, University मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात 'दिवे लावणार्यांचे' पुणे , कधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे ( तिथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही ..;) , नेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड आणि नालाह पार्क चे पुणे, खवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे, आणि चवी साठी जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे, शनिवार वाड्याने नाकारून सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान दिले त्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार मस्तानीचे पुणे, बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg 'थाळी' वाले पुणे , Friday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपी ज च्या 'नळी' वाले पुणे, सदशिवातल्या बिनधास्त Nonveg वाले पुणे, आणि रमझान मधल्या त्या मोमीनपुर्यातले रात्रीचे लजीज पुणे, मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे, पुण्याच्या ढोलांचा 'आव्वाज' जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय - अतुल चे पुणे , आमच्या डोंगरांवरच्या पर्वती,तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे, आमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे, Synagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे, शिकणाऱ्यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे, 'सरळ' मार्गी प्रेमिकांच्या 'Z' bridge चे पुणे, मुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि... देशाचा defence शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या आमच्या Southern Command चे पुणे, तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे, बेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे, स्पोर्ट्स City पुणे, कधी कधी pot holes वाले पण पुणे, सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे, ताजमहाल पाहून सुद्धा "बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान " अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे, फटकळ , खवचट , उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे , 'इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही' अशी ख्याती मिरवणारे पुणे !, ०२० चे आणि MH "बारा" चे पुणे, आणि कधी कधी जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पुणे , जोशी कुलकर्णी आणि नेन्यांचे पुणे, सणस शिरोळे दाभाडे आणि बहिरटपाटलांचे पुणे, शेख खान आणि D 'souza ,D 'casta चे पण पुणे, पेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे, आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या " फुलराणी ' चे पुणे , भक्ती मार्ग वरून जाताना अजूनही आठवणाऱ्या "त्या फुलराणी' चे पुणे, ज्यांच्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा आमच्या सुधीर गाडगीळांचे पुणे, अक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या चिल्लाळांचे पण पुणे , जादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या प्रवासी जादुगार रघुवीरांचे पुणे , अडीच किलो काचा खाणाऱ्या , १९४ कप चहा पिणाऱ्या , एका पायावर सलग ३५ तास उभे राहणाऱ्या , अखंड ७५ तास टाळ्या वाजवणाऱ्या आणि हे सर्व विक्रम ज्यात छापले त्या ७६० पानी गिनीज बुकालाच खाणाऱ्या अजब विक्रमादित्य धनंजय कुलकर्णींचे पुणे, भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे, पुरुषोत्तम आणि फिरोदिया च्या जल्लोषाचे पुणे, bollywood ला acting ची अक्कल शिकवणाऱ्या wisdom tree चे पुणे, आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणाऱ्या 'NFAI ' चे पुणे , काही गाण्याच्या तर काही निव्वळ खाण्याच्या रसिक "सवाई" चे पुणे , बाळासाहेबांच्या भाव सरगम चे पुणे, नुकत्याच मावळलेल्या स्वर भास्कराचे पुणे, उगवती वरच्या ,वसंतरावांच्या तरुण वारशाचे पुणे , पुरुष ते पुलोत्सावातल्या नाना चे पुणे, घांशिराम कोतवालाचे पुणे आणि घांशिराम मधल्या नाना , डॉक्टर आगाश्यांचे पण पुणे ! , शुद्ध चारित्र्याच्या खलनायक निळू फुल्यांचे पुणे , दादा कोंड्क्यांच्या त्यांच्या सोबतच गेलेल्या चैत्रबनाचे पुणे, कपूर साहेबांच्या विस्मृतीतल्या राज बागेचे पुणे , फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्वा, भानुविलास आणि नटराज चे पुणे, आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे, नवरात्रीतल्या नऊ रात्री देवी पुढे घागरी फुंकणारे पुणे, आणि 31 December आणि गटारी च्या रात्री रेकॉर्ड ब्रेक दारू बरोबर हुक्का अन बिड्या फुंकून फुल्टू Chill होणारे पुणे, रात्री उशिरा सगळ्या रस्त्यांवरच्या मोकाट कुत्र्यांचे पुणे, जगातल्या सगळ्यात "प्रेमळ" आणि "स्वस्त" रिक्षांचे पुणे, गोगलगायीशी स्पर्धा करणाऱ्या PMPML चे पुणे , प्रचंड बडबड करून समोरच्याला दमवणाऱ्यांचे पुणे आणि कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे, लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे, प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे, आमच्या केसरी सकाळ प्रभात आणि आता मटा , Mirror वाल्यांचे पुणे आणि आज का आनंद आणि संध्यानंद चे पुणे, दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे आणि Valentine day ला गुलाबाला दमवत झुलवणारे पुणे, दिवाळीतल्या आतिषबाजी वाले पुणे, Christmas ला MG Road ला हौसे ने केक खाणारे पुणे, भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे, ऐन december च्या थंड रात्री Icecream किंवा Chilled Beer रिचवणारे पुणे, सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे, Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे... पहिला सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे, आणि "आम्हाला कशाला लागतोय mobile ?" असे पण म्हणणारे पुणे, अक्ख्या भारताला हमारा बजाज पुरवणारे पुणे, जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Merc,Volks Wagon आणि Jaguar बनवणारे पुणे, सकाळ संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या थकलेल्या पायांचे पुणे, Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणाऱ्यांचे पुणे, पर्वती वर practise करून everest ला गवसणी घालणारे पण पुणे !! पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे, उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे, Saturday Night ला झिंग आणणाऱ्या pubs चे पुणे, Sunday ला सकाळी प्याटीस,पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणाऱ्यांचे पुणे, कसबा आणि गुरवारातल्या भावड्यांचे पुणे सदाशिव, नारायण, शानिवारातल्या भाऊंचे पुणे घोटाळे बाज खासदारांचे पुणे , नगर सेवक नावाच्या समाज कंटक जमातीचे पुणे , नवीन दादांचे पुणे, जुन्या भाईंचे पुणे, बारा महिने २४ तास online असणारे , पण दुकाने मात्र दुपारी दोन चार तास बंद ठेवणारे , असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेव्द्वितीय पुणे !! आता सांगा पुणं आवडायला हि कारणं सुद्धा खूपच कमी आहेत, आणि काही अजाण बालके एक फालतू प्रश्न विचारतात कि तुम्हाला पुणे का आवडते? पक्का पुणेकर....(कश्यात काय आहे?)
  • Log in or register to post comments

भारी...!!!!!!

मोदक
गुरुवार, 12/13/2012 - 01:57 नवीन
भारी...!!!!!! असेच ढकलपत्रातून आलेलेल दादर आणि कोल्हापूर माहिती होते.. हे मात्र भारी!!! धन्स. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

पूण्यात पाणिपताची लढाई कुठे

जेनी...
गुरुवार, 12/13/2012 - 05:35 नवीन
पूण्यात पाणिपताची लढाई कुठे झालीओ?? ( अजाण बालकातलं एक बालक )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

लईच भारी ढकलपत्र ..!!

सुहास..
गुरुवार, 12/13/2012 - 10:22 नवीन
लईच भारी ढकलपत्र ..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

इथे पुणे हा शब्द कितीवेळा

कवितानागेश
Wed, 12/19/2012 - 02:12 नवीन
इथे पुणे हा शब्द कितीवेळा आलाय कुणी मोजून सांगेल का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

उणे बत्तेचाळीस वेळा.

बॅटमॅन
Wed, 12/19/2012 - 02:24 नवीन
उणे बत्तेचाळीस वेळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

एकदम कल्ला आहे हे ढकलपत्र.

किसन शिंदे
Wed, 12/19/2012 - 19:44 नवीन
एकदम कल्ला आहे हे ढकलपत्र. हे लय आवडलं. :D
पर्वती वर practise करून everest ला गवसणी घालणारे पण पुणे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

पर्वती वर practise करून

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 12/20/2012 - 10:31 नवीन
पर्वती वर practise करून everest ला गवसणी घालणारे पण पुणे !!
आयला, हे वाचलेच नव्हते. पर्वतीवर practice करून एव्हरेस्टला गवसणी घालता येते ?? मी कालच रुईया कट्ट्यावरून उडी मारली. रोज हाच सराव केला तर त्या Felix सारखी अवकाशातून उडी मारू शकेन असे वाटते आहे आता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

@ नावात काय आहे

आनन्दिता
गुरुवार, 12/13/2012 - 03:00 नवीन
@ नावात काय आहे जबरदस्त धकलपत्र .... पुण्यात काय आहे याचं जाम भारी उत्तर दिलत राव !! पुण्याचा सार्थ अभिमान असलेली आनंदिता......
  • Log in or register to post comments

हा घ्या

इरसाल
गुरुवार, 12/13/2012 - 08:45 नवीन
१०० रावा
  • Log in or register to post comments

वा वा आमच्या भविष्याप्रमाणे

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 12/13/2012 - 10:57 नवीन
वा वा आमच्या भविष्याप्रमाणे धाग्याने शंभरी गाठली कि न गो अभिनंदण
  • Log in or register to post comments

??

तिमा
Fri, 12/14/2012 - 19:39 नवीन
दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे आणि Valentine day ला गुलाबाला दमवत झुलवणारे पुणे, अशी वाक्ये लिहू शकणार्‍यांचे पुणे.
  • Log in or register to post comments

विनोदी

राही
Fri, 12/14/2012 - 20:25 नवीन
हे ढकलपत्र विनोदी आहे हे वाक्य पुणेकरांस मान्य होईल काय? जर ह्या ढकलपत्रातल्या कित्येक गोष्टी किरकोळ ह्या सदरात जमा न होता खरोखरच 'अभिमानास्पद' कौतुकास्पद' वगैरे वाटत असतील तर त्यापरता दुसरा विनोद नाही. '
  • Log in or register to post comments

हे ढकलपत्र विनोदी आहे हे

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 12/17/2012 - 01:04 नवीन
हे ढकलपत्र विनोदी आहे हे वाक्य पुणेकरांस मान्य होईल काय?
नाही होणार.
जर ह्या ढकलपत्रातल्या कित्येक गोष्टी किरकोळ ह्या सदरात जमा न होता खरोखरच 'अभिमानास्पद' कौतुकास्पद' वगैरे वाटत असतील तर त्यापरता दुसरा विनोद नाही. '
सदर ढकलपत्र धागाकर्त्याच्या मुद्द्याला बळकटी देते. आणि हो, मला ते ढकलपत्र विनोदीच वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

हे पुण्याचे वर्णन परिणीता

नर्मदेतला गोटा
Sat, 12/15/2012 - 00:04 नवीन
हे पुण्याचे वर्णन परिणीता चित्रपटातल्या कलकत्त्याच्या वर्णनासारखे वाटले
  • Log in or register to post comments

सवाई गंधर्व महोत्सवापूर्वी

नर्मदेतला गोटा
Sun, 12/16/2012 - 19:20 नवीन
सवाई गंधर्व महोत्सवापूर्वी काही एक फोटो हमखास प्रसिद्ध होतो तो म्हणजे सवाईच्या तिकिटासाठी रसिकांनी सकाळपासून रांग लावली खाऊवाले पाटणकरांच्या दुकानात. दुकान उघडण्यापूर्वी फूटपाथवर बसून राहीलेले पुणेकर रसिक.
  • Log in or register to post comments

मग यंदाचा १२ डिसेंबर फ़ारच

नानबा
Sun, 12/16/2012 - 21:11 नवीन
मग यंदाचा १२ डिसेंबर फ़ारच कौतुकाने सेलिब्रेट केला असणार पुणेकरांनी.. १२-१२-१२ ला MH-१२ वाले जामच खुश झाले असणार... असो... पुणे तिकडे काय उणे?
  • Log in or register to post comments

चेपुवर हे पेज बघितले आणि

बॅटमॅन
Sun, 12/16/2012 - 22:53 नवीन
चेपुवर हे पेज बघितले आणि त्याच्या नावाने डोळे पाणावले. "MH-12 Amhi Barache .. ...Amhi Punekar" :P =))
  • Log in or register to post comments

पुणे आणि पुणेकरांचं होणार

आनन्दिता
Sun, 12/16/2012 - 23:24 नवीन
पुणे आणि पुणेकरांचं होणार कौतुक सहन न होऊन स्वत:चे पोट दुखवून घेणारया सर्व जळितग्र्स्तांना … Get Well Soon ...!!!!
  • Log in or register to post comments

उगीच?

अभ्या..
Mon, 12/17/2012 - 01:02 नवीन
उगीच? आधी डिस्चार्ज घ्या मग इतरांना गेट वेल सून करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

गेट इनो सून.

बॅटमॅन
Mon, 12/17/2012 - 01:29 नवीन
गेट इनो सून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

काय राव अभिजीत राव आम्ही

आनन्दिता
Mon, 12/17/2012 - 05:47 नवीन
काय राव अभिजीत राव आम्ही तुम्हाला इतकं चांगलं Get well soon म्हणतोय अन् तुम्ही आम्हालाच उलटं 'उगीच' वैग्रे म्हन्ताय की… This not बरं ब्वॉ !!!! आवांतर: ईनो on :)
  • Log in or register to post comments

ठीक आहे मग.

अभ्या..
Tue, 12/18/2012 - 01:40 नवीन
अहो आनंदितातै या धाग्याच्या दुसर्‍याच प्रतिसादात म्हणलेय की हो. घ्या आता करुन कौतुक म्हणून. मग कौतुक करुन घ्यायचे. इतर लोक काय करतात. ते कशाने ग्रस्त आहेत, त्यांना इनो द्यायचे का कोरडा गेट वेल सून द्यायचा हे नाही बघायचे. आणि तसे केले की त्याचे सुध्दा कौतुक करावे अशी अपेक्षा आहे का? ठीक आहे मग. वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा. धन्यवाद बरे का. खुष आता?
  • Log in or register to post comments

अहो अभिजीत नसलेले दादा...

आनन्दिता
Tue, 12/18/2012 - 10:03 नवीन
अहो अभिजीत नसलेले दादा... कोरडा वैग्रे नाही हा अगदी खर्रा खुर्रा गेट वेल सून दिला होता आम्ही ,,,, आता तुम्हाला नसेल खपत आमच्या बिचारया पुण्याची स्तुती तर राहीलं ब्वॉ… आवांतर : बाकी तुम्ही सोलापुर चे म्हणे … फार पब्लिक असतं हो तुमच्या सोलापुर चं आमच्याकडे college ला… पण असो. .कुठे जाणार तुम्ही तरी पुण्याशिवाय ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कॉलेजलाच कशाला, सकाळच्या

सूड
Tue, 12/18/2012 - 11:39 नवीन
कॉलेजलाच कशाला, सकाळच्या इंद्रायणीला पण ह्यांच्याकडचं बरंच पब्लिक असतं. उतरायचे वांदे करुन ठेवतात. ती गाडी शिंची पुण्याच्या पुढे सोडायलाच नको. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

अस्सल पुणेकर सकाळच्या

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 12/18/2012 - 12:56 नवीन
अस्सल पुणेकर सकाळच्या इंद्रायणीने कशाला जाईल झक मारायला? तुम्ही खरे पुणेकर दिसत नाही. वाघाचे कातडे पांघरून वाघ होता येत नाही, हे लक्षात ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>तुम्ही खरे पुणेकर दिसत नाही

सूड
Tue, 12/18/2012 - 20:08 नवीन
>>तुम्ही खरे पुणेकर दिसत नाही.वाघाचे कातडे पांघरून वाघ होता येत नाही, हे लक्षात ठेवा. मी फक्त सोलापूरच्या लोकांची इंद्रायणीला इतकी गर्दी असते की सकाळी उतरायचे पण वांदे होतात त्यामुळे ती गाडी पुण्यातून पुढे नाही नेली तर बरं होईल इतकंच म्हटलंय. तुम्हाला माझ्या प्रतिसादात मी पुणेकर असल्याचा दावा केल्यासारखं का वाटलं ते वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

म्हणजे तुम्ही पुणेकर नाही हे

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/19/2012 - 02:15 नवीन
म्हणजे तुम्ही पुणेकर नाही हे मान्य करता आहात. लक्षात ठेवेन पुढील पुणे धाग्याच्या वेळेस. (आत्ता आला उंट डोंगराखाली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>म्हणजे तुम्ही पुणेकर नाही

सूड
Wed, 12/19/2012 - 08:48 नवीन
>>म्हणजे तुम्ही पुणेकर नाही हे मान्य करता आहात. नीट वाचा काका, मी पुणेकर आहे/ नाही किंवा मुंबैकर आहे/ नाही असलं काहीही म्हटलेलं नाहीये. रेल्वेतून उतरताना कोणत्याही सर्वसामान्य प्रवाशाला होणार्‍या त्रासाबद्दल म्हटलंय मी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

गाडी फक्त मुम्बै पुणे मुम्बै

अभ्या..
Wed, 12/19/2012 - 02:38 नवीन
च्यायला तुम्ही कोल्हापूरसारखं असं स्टेशन मागून घ्यायचे राव. पुढे कुठेच जाताच येऊ नये. गाडी फक्त मुम्बै पुणे मुम्बै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आवांतर : बाकी तुम्ही सोलापुर

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 12/18/2012 - 12:44 नवीन
आवांतर : बाकी तुम्ही सोलापुर चे म्हणे … फार पब्लिक असतं हो तुमच्या सोलापुर चं आमच्याकडे college ला… पण असो. .कुठे जाणार तुम्ही तरी पुण्याशिवाय ..
म्हणजे नाईलाज म्हणून पब्लिक जाते का पुण्यात ? मला तर वाटत होते की पुणेप्रेमापोटी जात असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

नाही हो विमे. प्रत्येकाला

मृत्युन्जय
Tue, 12/18/2012 - 12:59 नवीन
नाही हो विमे. प्रत्येकाला आपलाच गाव प्रिय असतो. सोलापूर् / कोल्हापूरकरांना पुणे आवडले जरी (समजा) तरी पुण्यात जायचे शिकण्यासाठी किंवा नौकरीसाठी ते गरज म्हणुन. पण आपला गाव तो आपला गाव. गाव हागणदारी असण्याइतके मागासलेले जरी असले तरी त्याच्याबद्दल जे प्रेम असते ते दुसर्‍या कुठल्याही गावाला कसे मिळावे. लोक पुण्यात येतात त्याचे मुख्य कारण म्हणजे उडदामाजी काळे गोरे. घाम, दुर्गंधी, घाण, अस्वच्छता, बकालपणा, अस्थैर्य, ती लोकल तो चिकचिकाट, तो रोजचा १ - १.५ तासाचा गर्दीत लोंबकळत केलेला प्रवास या असल्या गोष्टी टाळण्यासाठी मुंबै पेक्षा पुणे लाखपटीने बरे असे म्हणुन पुण्यात येतात. बाकी शिक्षण आणि नौकरी व्यवसायाच्या संधी सुद्धा पुण्यात खुप. म्हणुन पुणे. पण उद्या याच लोकांना (आणि पुणेकरांना देखील) उदरभरणासाठी मुंबैला यायला लागले तर झक मारत येतीलच की. म्ह्णुन काय मुंबै थोडीच आवडणार आहे. ती एक तडजोड झाली. टाळता न योण्याजोगी अपरिहार्यता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

पश्चिम महाराष्ट्रातल्यांना

बॅटमॅन
Tue, 12/18/2012 - 13:02 नवीन
पश्चिम महाराष्ट्रातल्यांना मुंबैपेक्षा पुणे जवळ आहे त्यामुळे गावाला जवळ म्हणून पुणे प्रेफर करणार्‍यांची संख्या जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

प्रत्येक इमारतीच्या

नर्मदेतला गोटा
Sun, 03/03/2013 - 21:20 नवीन
प्रत्येक इमारतीच्या पार्कींगमधे एक तरी MH 31 वाली गाडी असतेच आजकाल विदर्भवासी वाढलेत पुण्यात. बाकी ... चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पुणं खरं तर पश्चिम

काळा पहाड
Wed, 05/13/2015 - 14:59 नवीन
पुणं खरं तर पश्चिम महाराष्ट्राचीच राजधानी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लोकांनी अनुक्रमे नागपूर आणि औरंगाबादला जायला काय हरकत आहे? पण नाही. तिथे वेगळा विदर्भ पाहिजे म्हणून पेटवापेटवी करतात आणि पुण्यात येवून इथले फ्लॅट महाग करतात. वर आणि 'जावून र्‍ह्यायलो' सारखी अशुद्ध भाषा वापरतात. यातले बरेच जण रिटायर्ड सरकारी नोकर आहेत. तुमच्या आमच्या आजूबाजूला रहाणारे या लोकांनी घेतलेले फ्लॅट खरं तर तिथल्या जनतेला भ्रष्टाचारानं नाडून इथं पुण्यात इन्व्हेस्ट करून घेतले आहेत. शिवाय इथं येवून हेच लोक पुणेकरांवर टीका करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नर्मदेतला गोटा

शी बाबा, काय तुम्ही पण लॉजिकल

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/19/2012 - 02:14 नवीन
शी बाबा, काय तुम्ही पण लॉजिकल उत्तर देऊन टाकले. असे नाही, काहीतरी खरमरीत किंवा अपमानास्पद किंवा टोकाचे लिहा ना. मग भांडता येईल. धागा मस्त द्विशतकी होतो की नाही बघा ;-) अवांतर :- मुद्दा पटला आहे. मुळात हे मान्य होते पण म्हटले आयती आग लावायची संधी का सोडा ? अतिअवांतर :- पुणे मला स्वतःला मनापासून आवडते. म्हणून तर तिथे यायची संधी मिळाली की सोडत नाही. अतिअतिअवांतर :- हे लिहूनही पुढील वेळेस जालीय पुणेकर असेच पेटतील हे माहित असल्याने लिहायला काहीही हरकत नाही :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

विमे काका,

आनन्दिता
Tue, 12/18/2012 - 22:01 नवीन
विमे काका, पुण्यात लोकं येतात कारण पुणं त्यांना पोटापाण्याच्या उद्योगा बरोबर सुसह्य जगणं सुद्धा देतं. उद्योगधंदे,शिक्षण, वाहतुक आणि दळणवळण,सुरक्षा यांचा विचार ़ केला तर इतर शहरांपेक्षा पुणं कितीतरी सरस आहे.. एक metro शहर म्हणून मिरवत असताना सोबत आपली संस्कृती जपणारं दुसरं शहर मला दाखवून द्या... तुम्ही म्हणताय तशी नाईलाजानं आलेली लोकं ही पुण्यात आहेत.. आणि पुण्याची जी थोडीफार दुरवस्था आहे , ती यांच्यामुळेच ! मग त्यात शहराबाहेर झोपडपट्टीत राहणारे परप्रांतिय आणि पुण्याबद्दल आपलेपणा , प्रेम नसणारे मराठी लोक दोन्ही येतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

अभ्यास वाढवा!!!! पुणे तर अजून

बॅटमॅन
Wed, 12/19/2012 - 01:56 नवीन
अभ्यास वाढवा!!!! पुणे तर अजून धड मेट्रो सिटीपण नैये. जिथे मेट्रो प्रकल्प आहे ते किंवा लोकसंख्या या कुठल्याच निकषावर पुणे मेट्रो नै. मेट्रो शहर असूनही आपली संस्कृती हिरिरीने जपण्यात चेन्नै, कोलकाता यांना विसरलात वाट्टं. पुण्याची जी भौतिक संपन्नता आहे, ती बाहेरून आलेल्या उद्योगधंद्यांमुळेच. नैतर पेन्शनरांचे शहर म्हणूनच पुणे माहिती होते. बाकी वाहतूक आणि दळणवळणाबद्दल काय बोलावे तितके कमीच आहे. इतक्या मोठ्या संख्येने दुचाक्या अन्य कुठल्याही मोठ्या शहरात नाहीत-कारण पब्लिक ट्रान्स्पोर्टचा पूर्ण बोर्‍या वाजलेला आहे. शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली, मुंबै, कोलकाता, चेन्नै, बंगळूरू वैग्रेंच्या तुलनेत हाही दिमाख टिकत नै. इतर शहरांपेक्षा म्हणजे सांगली कोल्हापूर वैग्रे म्हणालात तर ठीके, पण त्यापलीकडे जाऊ नका :)
आणि पुण्याची जी थोडीफार दुरवस्था आहे , ती यांच्यामुळेच ! मग त्यात शहराबाहेर झोपडपट्टीत राहणारे परप्रांतिय आणि पुण्याबद्दल आपलेपणा , प्रेम नसणारे मराठी लोक दोन्ही येतात!
बाहेरून आलेल्या उद्योगधंद्यांमुळेच पुण्याचा विकास झालाय हे सत्य नाकारता येतच नै. एक सांस्कृतिक ओळख वगळली तर हे अतिमहत्वाचे भौतिक अंग बाहेरच्यांमुळेच विकसित झालेय . दुरवस्था म्हंजे नक्की काय म्हणायचेय? कैच्याकै बिनबुडाचे अंधाभिमानी लॉजिक आहे झालं. आणि पुण्यात राहून पुण्यावर टीका करू नये वैग्रे बोलणार्‍यांना हे कळत नाही का, पुणे महाराष्ट्रात आणि भारतात येते. एक भारतीय म्हणून मला माझ्या देशातल्या कुठल्याही भागाबद्दल टीका करायचा अधिकार आहे, नैतिथे बाह्या सरसावणारे तुम्ही कवण???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

+१

दादा कोंडके
Wed, 12/19/2012 - 02:11 नवीन
पुण्याची जी थोडीफार दुरवस्था आहे , ती यांच्यामुळेच ! मग त्यात शहराबाहेर झोपडपट्टीत राहणारे परप्रांतिय आणि पुण्याबद्दल आपलेपणा , प्रेम नसणारे मराठी लोक दोन्ही येतात!
आणि पुण्यातली लोकं अमेरिकेत जाउन उलथल्यानंतर या लोकांना आयतच रान मिळालं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दुरवस्था ?

अभ्या..
Wed, 12/19/2012 - 02:46 नवीन
आणि सुव्यवस्था म्हणजे तुम्हाला कुठल्या काळातली अभिप्रेत आहे हो? सुवर्णनांगराच्या आधीची का फार नंतरच्या रमण्याची? पेठातल्या हौदावरची की लष्करातल्या साह्यबाची? पेन्शनरांच्या गावातली की प्लॉटींगच्या आत्ताच्या पैशातली? म्हणजे ठरवता तरी येईल सुव्यवस्था कोणी केल्या अन दुरवस्था कुणामुळे झाली ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

कोंडके दादा...

आनन्दिता
Wed, 12/19/2012 - 03:10 नवीन
कोंडके दादा... हा टोला मात्र जोरात लागला बरका आम्हाला... आम्ही इथे अमेरिकेत उलथलोय हे खरंच आहे....कधी एकदा पुण्यात परततोय असं झालंय बघा,,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

एकदम सहमत आनन्दिता . पण आपण

लौंगी मिरची
Sun, 03/03/2013 - 21:32 नवीन
एकदम सहमत आनन्दिता . पण आपण पुण्यात परत जाईपर्यंत पुण्याची कितपत वाट लागली किंवा लावली असेल यालोकांनी .. याची कल्पनाहि करवत नाहि . तरिहि पुण्यावर अत्यंत प्रेम आहे हे बाकि तितकच कठोर सत्य आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

टाळ्या

अभ्या..
Wed, 12/19/2012 - 02:57 नवीन
टाळ्या, अगदी मनापासून टाळ्या बॅट्या. आयला आमच्या गावात आम्ही नुसते महाराष्ट्रातलेच नव्हे तर शेजारील राज्यातले पण सामावून घेतले. त्यांची संस्कॄती आमची संस्कृती असले झेंडे नाचविण्यापे़क्षा त्यांच्या मानाच्या काठया रोवल्या. आज जी संस्कृती संस्कृती म्हणतो ती अशीच मेल्टिंग पॉट्प्रमाणे बनत असते. स्वतःचे वेगळेच अस्तित्व राखणे कदाचित आज अभिमानास्पद वाटत असेल. ते नंतर हास्यास्पद (सध्यापण) आणि शेवटी टाकून देणे नाहीतर विरघळून जाणे एवढेच शिल्लक राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा