Skip to main content

काय या पुणेकरांचे कौतुक !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 10/12/2012 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी वाटते की पुणेकरांचे एवढे काय कौतुक. यांच्या उकडण्याचेही कौतुक, यांच्या थंडीचेही कौतुक. म्हणजे पुणेरी पेपरमधल्या बातम्या वाचल्या की कळेल. कधी सकाळी पावसाचे अजिबात चिन्ह नसते. पुणेकर छत्री न्यायचा कंटाळा करतात. पण संध्याकाळी ऑफीसमधून घरी यायला निघावे तर बेसावध क्षणी पाउस पुणेकरांना गाठतो आणि भिजवतो. दुसर्‍या दिवशीच्या पेपरमधे भिजलेल्या पुणेकरांचे, झाडाखाली थांबलेल्या, स्कार्फ बांधलेल्या तरुणींचे फोटो आणि बातमीचे हेडींग अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ कधी हा पाऊस प्रचंड कोसळतो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागतात. झाडे पडतात. रस्त्यातील वाहतूक अडते. दुसर्‍या दिवशी फोटो आणि बातमी. पुणेकरांना पावसाने झोडपले. कधी हलक्याशा सरी पडत असतात. अशावेळी हिरवागार झालेल्या सिंहगडाचे फोटो, त्यावर पर्यटकांची गर्दी. बातमी असते - पावसाळी वातावरणात पुणेकरांनी केले सिंहगडाचे पर्यटन, पुणेकरांनी सिंहगडावर गरम गरम भजी खाणेच पसंत केले. थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी फिरायला पुणेकर बाहेर पडतात. अशावेळी कमला नेहरु पार्कमधला वॉकींग जॉगिंग करणार्‍या पुणेकरांचे फोटो. यातल्या काही जणांच्या अंगावर शाल. पुण्यातल्या पेपरात बातमी. बातमीत वर्णन असते. पुणेकरांनी स्वतःला शालीत लपेटून घेतले. फोटोवर हेडींग पुण्यात गुलाबी थंडी ! थंडी संपून थोड्याशा उकाड्याला सुरुवात होते, बातमी - पुण्यातील थंडी गायब कधी जूनमधे पाउस पडतो पण जुलैमधे पाऊस अजिबात पडत नाही. बातमी - पावसाचे दोन महीने उलटले पण पुणेकर कोरडेच अशा जरा उकडणार्‍या दिवसात हलकी पावसाची सर येते. तापलेले रस्ते जरा थंड होतात. उकाडा जरा कमी होतो. बातमी - पावसाच्या हलक्या सरीने पुणेकर सुखावले किंवा पुणेकरांवर पावसाचा प्रसन्न शिडकावा ! उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा वाढतो. अशावेळी बातमी पुणेकर उकाड्याने हैराण कधी जरा हीच बातमी बदलून - रसाच्या गुर्‍हाळाचा फोटो, पुणेकर रस पिताहेत. बातमीचे शीर्षक - चहापेक्षा रस बरा ! कधी कधी पुण्यातल्या रस्त्यांवर बरेच खड्डे पडतात. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो. अशावेळी बातमी 'पुणेकर खड्याने त्रस्त.' हेच रस्ते जर कोथरूडमधील असतील तर कौतुक आणखी वाढते. रस्त्यातील खड्ड्यांनी कोथरुडकर हैराण अशीही ओळ पहायला मिळते. पाणीटंचाईची बातमी असेल तर ऐन पावसाळ्यात कोथरुडकरांच्या टँकरसमोर रांगा सवाई गंधर्वचे दिवस असतात. कौशिकीसारखे कलाकार छान गाऊन जातात. मग त्या महोत्सवाचा फोटो. हेडींग-कौशिकीच्या गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध ! असा सारा पुणेकरांच्या कौतुकाचा मामला जो पुणेकर झाल्याशिवाय इतरांना नाही उमगायचा !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 48656
प्रतिक्रिया 192

प्रतिक्रिया

In reply to by रुस्तम

नको हो.. काही मंडळींनी स्मायल्या टाकून ईतका उच्छाद मांडलाय की आता अजीर्ण झालय. इनोही संपलय. ;) तेव्हा स्मायल्या रहीत प्रतिसाद चालतील आम्हाला. :) : ) = स्मीत हास्य स्मायली. ; ) = डोळा मारणारी स्मायली. = )) लोळणारी स्मायली. : D = दात काढणारी स्मायली : ( = रडकी स्मायली. आम्ही शक्यतो येवढ्याच वापरतो. (वर दिलेल्या स्मायल्यां मधली रिकामी जागा (स्पेस) काढून टाका )

In reply to by गणपा

होना! प्रतिसाद नको पण स्मायल्या आवर... ;) - (गणपाशी बाडीस असलेला) सोकाजी

In reply to by सूड

गणपा, सोत्री, सुडशी हज्जारदा सहमत. उठावणीला आणलय ह्या लोकांनी बर इतके वेळा किती लोकांच बोलुन झालय पण काडीमात्र फरक नाही (मराठीत याला काहीतरी विशिष्ट शब्द आहे म्हणे )

In reply to by इरसाल

मी असे प्रतिसाद वाचतच नाही. माउसवर छान स्क्रोल बटण आहे. (आणि चांगल्या प्रतीचा माउस घेतल्याने ते एखाददोन धागे वाचून मोडलेले नाही). ते वापरून पुढे जातो.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हो माउसचं स्र्कोल बटणं वापरणं हा उपाय आहेच. पण आम्हा थर्डवल्ड मध्ये रहाणार्‍या लोकांकडे नेट स्पीड भारत/युरोप/उसगाव आदी पुढरलेल्या देशांपेक्षा भलताच कमी असतो. त्यात हे असले नाका पेक्षा मोती जड असलेले स्मायल्यांनी बरबटलेले प्रतिसाद असले की धागा लोड व्हायला वेळ लागतो. वरुन आमचे बाईट्स फुकट जातात ते वायलं. परवडत नाय हो. :) :( =)) :P :D या व अश्या लहान-सहान स्मायलींना आमची ना नाही.

In reply to by गणपा

थांबा, एखादे क्रोम किंवा अग्नीकोल्हा प्लग-इन लिहिता येते का ते बघतो. असे प्रतिसाद फिल्टर करणारे ;-)

In reply to by गणपा

आम्हा थर्डवल्ड मध्ये रहाणार्‍या लोकांचे बाईट्स वाचवण्यासाठी तरी या लोकांनी नमतं घ्यावं अशी माफक इच्छा आहे. ;)

In reply to by गणपा

वा रे वा गंपादादा तुझ्या पाकृ च्या इमेज बघता बघता आमचे बाईटस आणि लाळ वाया जाते ते काय नाही का? ;) तुझ्या एका पाकृ प्रेसेंटेशन च्या साईजमध्ये कितीतरी लाख स्मायल्या बसतील की. (उगी आम्ही तुझ्यासाठी परवडण्याचा न परवडण्याचा हिसाब ठेवत नाही म्हणून ;) )

In reply to by गणपा

अन्याव करु नकोस बाबा. ते प्राण्यांच्या फोटोपेक्षा तुझ्या वरिजिनल पाकृ तरी बघु दे. मग जाउ दे बाईट्स कितीपण. :) यू टू वरी णॉट. ;)

बऱ्याच वर्षापूर्वी पुण्याच्या इंग्लिशमध्ये वापरात असलेल्या poona या नावाचा पुणे या सध्याच्या सरकारमान्य नावात बदल करण्यात आला. हा बदल बहुधा जून महिन्यात झाला असावा. कारण टाईम्स ऑफ इंडीआ मध्ये या नावावर कोटी करणारा pune in june या शीर्षकाचा अग्रलेख वाचल्याचे स्मरणात आहे.

आपल्या राज्याच्या सर्वच मोठ्या शहरांत राज्याच्या इतर भागांतून लोक पोटापाण्यासाठी स्थलांतरित होतात. यासाठी बहुतांश लोकांची पहिली (कधी कधी पहिली अन शेवटची दोन्हीही) पसंती पुण्यालाच असते. कारण पुणे जसे सहजपणे नव्या स्थलांतरीतांना सामावून घेतं, पोटापाण्याची सोय झाल्यावर ज्ञानाची, कलेची भूक शमवण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देतं. पोटापाण्यासाठी नाईलाजाने स्वतःचं गाव सोडून येणाऱ्यांना आणखी काय हवं असतं? हे शहर महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक संस्कृतीचं प्रतिनिधित्व सशक्तपणे करतं यात शंकाच नाही. पण या योगदानाचे पाहिजे तसे कौतुक होते नाही. एखाद्या लोभसवाण्या गोष्टीला दृष्ट लागू नये म्हणून काही खटकणारेही असावेच लागते. त्यामुळे 'हुकुमावरून', 'कायमचा इलाज केला जाईल' 'अपमान करण्यात येईल' या प्रकारच्या सरंजामी (+/-) प्रवृत्तींचाही समावेश असतो. पण एवढ्या चांगल्या गोष्टीस दृष्ट लागू नये म्हणून जर कुणी स्वतः वाईटपणा घेत असेल तर त्यांच्या या त्यागासाठी त्यांचे आभार मानायलाच हवे. धागाकर्त्याची निरीक्षणशक्ती जोरदार दिसत आहे. इतर महाराष्ट्राविषयीपण लिहा...

In reply to by श्रीरंग_जोशी

बाकी महाराष्ट्रात आता उरलंयच काय? पुणे, मुंबई आणि फार फार तर नाशिक/औरंगाबाद/नागपूर्/कोल्हापूर (इथले लोक सुद्धा पुण्याकडेच यायला उत्सुक असतात). आघाडी सरकारनं ही शहरं सोडली तर बाकी सगळा महाराष्ट्र उजाड, भकास, रखरखीत आणि भटक्या टोळ्यांचा प्रदेश करून ठेवला आहे. जलसंधारणात इतके प्रचंड पैसे खाल्लेत की शेतीवर जगणं सामान्य शेतकर्‍याला शक्यच नाही. आणि आता त्यात सुधारणा करण्यासाठी सरकारकडं पैसे सुद्धा शिल्लक नसतील. सगळं प्रदूषित करून ठेवलंय. वीज, पाणी आणि रस्त्यासारख्या सामान्य सुविधांपासून ग्रामीण महाराष्ट्र आजही वंचित आहे आणि कदाचित आता कायमच वंचित राहील. गावं म्हणजे टग्या लोकांच्या राहण्याची आणि जनतेला त्रास देण्याची जहागिरीची स्थानं बनलियेत. काँग्रेस तशीही गावपातळीवर संपली होती. आता युवराजांच्या दिव्य नेतृत्वामुळं काय स्थिती असेल कुणास ठावूक. राष्ट्रवादीनं ज्या प्रकारे महाराष्ट्राची हानी केलिये त्याला तोड नाही. जनतेला असं कदाचित फक्त मोगलांनीच लुटलं असेल. नवीन सरकार कडे ना अनुभव आहे, ना नोकरशाहीवर जरब बसवण्याची क्षमता आहे. सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेनं पाय ओढणे एवढा एकचकलमी कार्यक्रम राबवलेला आहे. गाव पातळीवर राष्ट्रवादीचे गुंड आणि शिवसेनेचे वळू यांच्यात फारसा फरक नसावा. जनतेचं असं शोषण तर इंग्रजांनीही केलं नसेल.

बदली निमित्त पुण्याला दोन वर्षे राहिले (हो, हो, खरंच) होते तेव्हाची गोष्ट. रोज हापिसात डब्याला दहा पाच सहकारी (बहुतांश भटें ) असत. भाजीचे समान वाटप होई. मग पंगत सुरु होई. एक दिवशी भाजी आणायचं राहिलं म्हणून अंडा बुर्जी डब्यात नेली होती. लंचटाईमला सगळे गोळा झाले. मी काही डबा वर काढला नाही. तशीच बसून राहिले. सगळे म्हणाले 'मॅडम आज उपास का ?' मी म्हटलं ‘उपास नाही, तुमचं झाल्यावर डबा खाणार आहे.’ ‘का हो ?’ ‘आज पांढरी वांगी आहेत....’ ‘मग आधी डबा द्या इकडे अन आमचा घ्या हा तुम्हाला.’ अन माझा डबा सगळ्या भटांनी फस्त केला. शेवटी म्हणाले, ‘लक्षात ठेवा, आम्हाला माणूस सोडून सगळं चालतं !’ अलीकडे पुण्यात जाणे फारसे होत नाही. पण ऐकायला मिळते की आता तर पुणेकर काहीच सोडत नाहीत....

In reply to by तिमा

पण 'पांढर्‍या वांग्या'ची मजा वाटत नाही हाडकं पनीरात. :) पण नशीब 'लाल सुरण' वगैरे म्हणत नाहीत.

In reply to by सस्नेह

हा किस्सा नक्की पुणेरी म्हणून खपवण्याचा प्रयत्न आहे, का एका विशिष्ठ समाजाला टार्गेट करण्याचा ? काये, अंडी, मटण वैग्रे महाग केले म्हणून एका विशिष्ठ समाजाला नावे ठेवणारे खूप बघितले आहेत. पण शिक्षण महाग करणार्‍यांच्या नावाने गळे काढणारे कोणी बघितले नाहीत म्हणून आपले विचारतोय. :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

पुण्यातील काही ब्राह्मण घरात अंडे असे म्हणत नाहीत पण खातात. आज पांढर्या लिंबाची भाजी केली होती असा उल्लेख करून, असे मला काही पिढ्या पुण्यात गेलेल्या एका पुणेकर मित्राने सांगितले होते. ऐकून मला आश्चर्य वाटले तेव्हा म्हणाला की बनवलेला किस्सा नाही, असे खरेच होते. काही शंका असेल तर व्यनी करा, त्या मित्राचे सदस्यनाम कळवतो. पुढे तुम्ही आणि तो काय तो सोक्षमोक्ष लावा.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मला उद्देश्यून आहे काय ? असल्यास :- आपल्या मदतीबद्दल धन्यवाद. पण आपण आणि आपल्या मित्राची काय चर्चा झाली, अथवा कुठली रहस्ये उलगडली गेली ह्यात मला काही इंट्रेस्ट नाही. इथे सार्वजनीक पटलावरती जे काही लिहिले गेले आहे त्याला अनुसरुन एक प्रश्न मी प्रतिसादकास विचारला आहे. 'पुण्यात पांढरी लिंबे म्हणतात, मुंबईत चुन्याचे दगड म्हणतात, इचलकरंजीत कापसाचे बोळे म्हणतात' असल्यात मला रस नाही. धन्यावाद.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हा किस्सा नक्की पुणेरी म्हणून खपवण्याचा प्रयत्न आहे, का एका विशिष्ठ समाजाला टार्गेट करण्याचा ?
हे तुमचे ओरिजिनल विधान. या विधानात तुम्ही किश्श्याच्या पुणेरी असण्यावर शंका घेत आहात. त्यावर उत्तर म्हणून असा किस्सा मला एका पुणेकरानेच सांगितला हे मला सांगायचे होते. परत माझ्यावरच कुणी पुणेकर मित्राच्या नावावर किस्सा खपवतो आहेस असा आरोप करू नये म्हणून "पाहिजे असेल तर खात्री करा" असे लिहिले. बाकी, यात कुठला समाज कसा "टार्गेट" झाला हे मला शष्प कळले नाही. अवांतर :- इचलकरंजीचे माहित नाही, पण मुंबईत अंड्याला अन्डेच म्हणतात.

In reply to by सस्नेह

नक्की काय सांगायचा आहे ? पुण्यामधलेच भटं खातात ?? क्कि पुणे आले की भटांचा उल्लेख आलाच पाहिजे?? बाकी भट म्हणजे नक्की कोण ??

In reply to by सस्नेह

'भटे' हा सहकार्‍यांचाच शब्द. तोपर्यंत तरी मला अज्ञात असलेला. आणि त्यानंतरही मी आताच वापरला. कोणत्याही समाजाच्य भावनांना धक्का पोचवण्याचा इरादा नसून घडले ते फक्त सांगितले आहे.

In reply to by सस्नेह

पण हा किस्सा कुठल्या सदरात मोडतो ते पण सांगा की जरा. का असे काही घडलेले तुम्ही त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवलेत ?

तर तर. स्नेहाताई आहेच आमची निरागस. हा प्रतिसादही निरागस आहे.

आणखी काही मुद्दे. सवाईचे कौतुक. गणपतीची विसर्जनाची मिरवणुक संपली ती वेळ.आणी चर्चा मानाचे गणपती पुणे महोत्सवातील हेमामालिनीचा डान्स डेक्कन क्विनमधली पॅन्ट्री बंद झाली आणि परत चालू झाली तो दिवस (पुणेकरांचे पॅन्ट्री विना प्रचन्ड हाल आणि नंतर दिलासा), सोबत एखादा फोटो. पॅन्ट्रीची कथा तर खुप गाजली होती. संकष्टी आणी गुरुवारी मिळ्णारी शा.खी आण दाण्याचा लाडू तर खासच. दसर्‍याचा आदल्या दिवशी 'सोने' खरेदी करायला झालेली शनीपाराशी गर्दी लक्ष्मी रोड वरचे नेपाळी स्वेटर वाले सकाळ चित्रकलेच्या परिक्षेत जमिनीवर बसलेले विद्यार्थी दहावी/बारावी परीक्षेचा पहीला (आणि शेवटचा) दिवस बाजारात एकदम आलेली कलिंगडे/ आणि माठ यांच्या ढिगाचे फोटो वगैरे वगैरे.

-- पुणे आले की भटांचा उल्लेख आलाच पाहिजे?? इथे भट याचा अर्थ 'पक्के पुणेकर' असा घ्यावा (आणि पक्के पुणेकरचा अर्थ काय घ्यावा)

कोजागिरीच्या दुसर्‍या दिवशी बातमी ठरलेली सारसबागेत जमलेली, दुध पिणारी कुटुम्बे .त्यांचे फोटो किंवा शनवारवाड्यावरच्या गाण्याच्या मैफिलीचा फोटो पुणेकरांनी शनिवारवाड्यावर घेतला मसाला दुध आणि भावगीतांचा आस्वाद

माझे 'पुणे'.... काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण बालके" ) कधी कधी असा इतका फालतू प्रश्न विचारतात की " तुम्हाला पुणे का आवडते ?" आता मग मी विचार केला की एका छोट्या उत्तरात सांगून टाकावे कि बुवा आम्हाला पुणे का आवडते..? आमच्या कडे मुद्दाम मराठीत बोला म्हणून कधी सांगावे लागत नाही, True freedom of thoughts , म्हणून प्रत्येक जण आपले स्वतः चे मत मांडू शकतो, आणि ते सुद्धा सर्वांना पटेल अशा पद्धतीने , पुण्यात काही उणे नाही वगेरे ठीक आहे , पण पुणे आवडायला काहीतरी कारणच हवे असे मला वाटत नाही ! उन्हाळ्यातले काही दिवस ( रात्री नव्हे) सोडले तर उरलेल्या दिवसात असलेले cool पुणे , किरकोळ पानझडीचे दिवस सोडले तर हिरवे असलेले पुणे, पावसासाठी थेट लंडन शी comparison होणारे एकमेव शहर म्हणजे पुणे ( अहो कधी पण येऊ शकतो आणि या चौकात असेल तर पुढच्या चौकात पण असेल याची काही ग्यारंटी नसते म्हणून .;), गिनीज बुकाला सुद्धा नोंद करायला लागली असे आमचे Two Wheelers चे पुणे ( आणि ते चालवणारे आम्ही धन्य पुणेकर ..;) , सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे, जीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे, मालुसर्यांच्या 'सिंव्हा' सारख्या मर्दानगी चे पुणे, पेशव्यांच्या 'सर्व' पराक्रमांचे पुणे , लाल महालात 'तोडलेल्या' बोटांचे पुणे, शनिवार वाड्यात 'सांडलेल्या' रक्ताचे पुणे, अटके पार लावलेल्या झेंड्याचे पुणे, पानिपतात तुटलेल्या स्वप्नाचे पुणे, 'ध' चा 'मा' केलेल्यांचे पुणे , 'न' ला 'न'च आणि 'ण' ला 'ण'च म्हणणारे पुणे , इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे , 'कोटी'सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे , नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे , सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे स्कूल चे पुणे , आब आणि रुबाब वाल्या बिशप्स लॉयलाज मिराज आणि हेलेनाज चे पण पुणे, SP , FC , BVP , SIMBY ,MIT आणि वाडिया चे पुणे , आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून ( की बांधून?) Two Wheeler वाल्या पुणे RTO कडून License to kill इशू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे , Info Tech park चे पुणे, Koregaon Park चे पुणे, कॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे, चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे, वैशाली च्या yummy सांभार चे पुणे, रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे, तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि कधी कधी Shoppers Stop ,Lifestyle आणि Central चे पुणे, college बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे, Office मधून गायब होऊन तिच्या सोबत चे Adlabs आणि R Deccan वाले पुणे , पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे, Nike आणि Reebok वाले पण पुणे , खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे, आणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे, कधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुडलक च्या मस्का पाव विथ cutting चे पुणे , कॅड बी आणि कॅड एम चे पुणे, सोडा शॉप चे पण पुणे, अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे, University मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात 'दिवे लावणार्यांचे' पुणे , कधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे ( तिथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही ..;) , नेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड आणि नालाह पार्क चे पुणे, खवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे, आणि चवी साठी जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे, शनिवार वाड्याने नाकारून सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान दिले त्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार मस्तानीचे पुणे, बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg 'थाळी' वाले पुणे , Friday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपी ज च्या 'नळी' वाले पुणे, सदशिवातल्या बिनधास्त Nonveg वाले पुणे, आणि रमझान मधल्या त्या मोमीनपुर्यातले रात्रीचे लजीज पुणे, मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे, पुण्याच्या ढोलांचा 'आव्वाज' जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय - अतुल चे पुणे , आमच्या डोंगरांवरच्या पर्वती,तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे, आमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे, Synagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे, शिकणाऱ्यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे, 'सरळ' मार्गी प्रेमिकांच्या 'Z' bridge चे पुणे, मुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि... देशाचा defence शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या आमच्या Southern Command चे पुणे, तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे, बेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे, स्पोर्ट्स City पुणे, कधी कधी pot holes वाले पण पुणे, सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे, ताजमहाल पाहून सुद्धा "बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान " अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे, फटकळ , खवचट , उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे , 'इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही' अशी ख्याती मिरवणारे पुणे !, ०२० चे आणि MH "बारा" चे पुणे, आणि कधी कधी जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पुणे , जोशी कुलकर्णी आणि नेन्यांचे पुणे, सणस शिरोळे दाभाडे आणि बहिरटपाटलांचे पुणे, शेख खान आणि D 'souza ,D 'casta चे पण पुणे, पेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे, आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या " फुलराणी ' चे पुणे , भक्ती मार्ग वरून जाताना अजूनही आठवणाऱ्या "त्या फुलराणी' चे पुणे, ज्यांच्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा आमच्या सुधीर गाडगीळांचे पुणे, अक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या चिल्लाळांचे पण पुणे , जादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या प्रवासी जादुगार रघुवीरांचे पुणे , अडीच किलो काचा खाणाऱ्या , १९४ कप चहा पिणाऱ्या , एका पायावर सलग ३५ तास उभे राहणाऱ्या , अखंड ७५ तास टाळ्या वाजवणाऱ्या आणि हे सर्व विक्रम ज्यात छापले त्या ७६० पानी गिनीज बुकालाच खाणाऱ्या अजब विक्रमादित्य धनंजय कुलकर्णींचे पुणे, भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे, पुरुषोत्तम आणि फिरोदिया च्या जल्लोषाचे पुणे, bollywood ला acting ची अक्कल शिकवणाऱ्या wisdom tree चे पुणे, आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणाऱ्या 'NFAI ' चे पुणे , काही गाण्याच्या तर काही निव्वळ खाण्याच्या रसिक "सवाई" चे पुणे , बाळासाहेबांच्या भाव सरगम चे पुणे, नुकत्याच मावळलेल्या स्वर भास्कराचे पुणे, उगवती वरच्या ,वसंतरावांच्या तरुण वारशाचे पुणे , पुरुष ते पुलोत्सावातल्या नाना चे पुणे, घांशिराम कोतवालाचे पुणे आणि घांशिराम मधल्या नाना , डॉक्टर आगाश्यांचे पण पुणे ! , शुद्ध चारित्र्याच्या खलनायक निळू फुल्यांचे पुणे , दादा कोंड्क्यांच्या त्यांच्या सोबतच गेलेल्या चैत्रबनाचे पुणे, कपूर साहेबांच्या विस्मृतीतल्या राज बागेचे पुणे , फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्वा, भानुविलास आणि नटराज चे पुणे, आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे, नवरात्रीतल्या नऊ रात्री देवी पुढे घागरी फुंकणारे पुणे, आणि 31 December आणि गटारी च्या रात्री रेकॉर्ड ब्रेक दारू बरोबर हुक्का अन बिड्या फुंकून फुल्टू Chill होणारे पुणे, रात्री उशिरा सगळ्या रस्त्यांवरच्या मोकाट कुत्र्यांचे पुणे, जगातल्या सगळ्यात "प्रेमळ" आणि "स्वस्त" रिक्षांचे पुणे, गोगलगायीशी स्पर्धा करणाऱ्या PMPML चे पुणे , प्रचंड बडबड करून समोरच्याला दमवणाऱ्यांचे पुणे आणि कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे, लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे, प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे, आमच्या केसरी सकाळ प्रभात आणि आता मटा , Mirror वाल्यांचे पुणे आणि आज का आनंद आणि संध्यानंद चे पुणे, दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे आणि Valentine day ला गुलाबाला दमवत झुलवणारे पुणे, दिवाळीतल्या आतिषबाजी वाले पुणे, Christmas ला MG Road ला हौसे ने केक खाणारे पुणे, भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे, ऐन december च्या थंड रात्री Icecream किंवा Chilled Beer रिचवणारे पुणे, सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे, Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे... पहिला सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे, आणि "आम्हाला कशाला लागतोय mobile ?" असे पण म्हणणारे पुणे, अक्ख्या भारताला हमारा बजाज पुरवणारे पुणे, जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Merc,Volks Wagon आणि Jaguar बनवणारे पुणे, सकाळ संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या थकलेल्या पायांचे पुणे, Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणाऱ्यांचे पुणे, पर्वती वर practise करून everest ला गवसणी घालणारे पण पुणे !! पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे, उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे, Saturday Night ला झिंग आणणाऱ्या pubs चे पुणे, Sunday ला सकाळी प्याटीस,पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणाऱ्यांचे पुणे, कसबा आणि गुरवारातल्या भावड्यांचे पुणे सदाशिव, नारायण, शानिवारातल्या भाऊंचे पुणे घोटाळे बाज खासदारांचे पुणे , नगर सेवक नावाच्या समाज कंटक जमातीचे पुणे , नवीन दादांचे पुणे, जुन्या भाईंचे पुणे, बारा महिने २४ तास online असणारे , पण दुकाने मात्र दुपारी दोन चार तास बंद ठेवणारे , असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेव्द्वितीय पुणे !! आता सांगा पुणं आवडायला हि कारणं सुद्धा खूपच कमी आहेत, आणि काही अजाण बालके एक फालतू प्रश्न विचारतात कि तुम्हाला पुणे का आवडते? पक्का पुणेकर....(कश्यात काय आहे?)

In reply to by नावातकायआहे

एकदम कल्ला आहे हे ढकलपत्र. हे लय आवडलं. :D
पर्वती वर practise करून everest ला गवसणी घालणारे पण पुणे !!

In reply to by किसन शिंदे

पर्वती वर practise करून everest ला गवसणी घालणारे पण पुणे !!
आयला, हे वाचलेच नव्हते. पर्वतीवर practice करून एव्हरेस्टला गवसणी घालता येते ?? मी कालच रुईया कट्ट्यावरून उडी मारली. रोज हाच सराव केला तर त्या Felix सारखी अवकाशातून उडी मारू शकेन असे वाटते आहे आता...

@ नावात काय आहे जबरदस्त धकलपत्र .... पुण्यात काय आहे याचं जाम भारी उत्तर दिलत राव !! पुण्याचा सार्थ अभिमान असलेली आनंदिता......

दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे आणि Valentine day ला गुलाबाला दमवत झुलवणारे पुणे, अशी वाक्ये लिहू शकणार्‍यांचे पुणे.

हे ढकलपत्र विनोदी आहे हे वाक्य पुणेकरांस मान्य होईल काय? जर ह्या ढकलपत्रातल्या कित्येक गोष्टी किरकोळ ह्या सदरात जमा न होता खरोखरच 'अभिमानास्पद' कौतुकास्पद' वगैरे वाटत असतील तर त्यापरता दुसरा विनोद नाही. '

In reply to by राही

हे ढकलपत्र विनोदी आहे हे वाक्य पुणेकरांस मान्य होईल काय?
नाही होणार.
जर ह्या ढकलपत्रातल्या कित्येक गोष्टी किरकोळ ह्या सदरात जमा न होता खरोखरच 'अभिमानास्पद' कौतुकास्पद' वगैरे वाटत असतील तर त्यापरता दुसरा विनोद नाही. '
सदर ढकलपत्र धागाकर्त्याच्या मुद्द्याला बळकटी देते. आणि हो, मला ते ढकलपत्र विनोदीच वाटले.

सवाई गंधर्व महोत्सवापूर्वी काही एक फोटो हमखास प्रसिद्ध होतो तो म्हणजे सवाईच्या तिकिटासाठी रसिकांनी सकाळपासून रांग लावली खाऊवाले पाटणकरांच्या दुकानात. दुकान उघडण्यापूर्वी फूटपाथवर बसून राहीलेले पुणेकर रसिक.

मग यंदाचा १२ डिसेंबर फ़ारच कौतुकाने सेलिब्रेट केला असणार पुणेकरांनी.. १२-१२-१२ ला MH-१२ वाले जामच खुश झाले असणार... असो... पुणे तिकडे काय उणे?

पुणे आणि पुणेकरांचं होणार कौतुक सहन न होऊन स्वत:चे पोट दुखवून घेणारया सर्व जळितग्र्स्तांना … Get Well Soon ...!!!!

काय राव अभिजीत राव आम्ही तुम्हाला इतकं चांगलं Get well soon म्हणतोय अन् तुम्ही आम्हालाच उलटं 'उगीच' वैग्रे म्हन्ताय की… This not बरं ब्वॉ !!!! आवांतर: ईनो on :)

अहो आनंदितातै या धाग्याच्या दुसर्‍याच प्रतिसादात म्हणलेय की हो. घ्या आता करुन कौतुक म्हणून. मग कौतुक करुन घ्यायचे. इतर लोक काय करतात. ते कशाने ग्रस्त आहेत, त्यांना इनो द्यायचे का कोरडा गेट वेल सून द्यायचा हे नाही बघायचे. आणि तसे केले की त्याचे सुध्दा कौतुक करावे अशी अपेक्षा आहे का? ठीक आहे मग. वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा. धन्यवाद बरे का. खुष आता?

In reply to by अभ्या..

अहो अभिजीत नसलेले दादा... कोरडा वैग्रे नाही हा अगदी खर्रा खुर्रा गेट वेल सून दिला होता आम्ही ,,,, आता तुम्हाला नसेल खपत आमच्या बिचारया पुण्याची स्तुती तर राहीलं ब्वॉ… आवांतर : बाकी तुम्ही सोलापुर चे म्हणे … फार पब्लिक असतं हो तुमच्या सोलापुर चं आमच्याकडे college ला… पण असो. .कुठे जाणार तुम्ही तरी पुण्याशिवाय ..

In reply to by आनन्दिता

कॉलेजलाच कशाला, सकाळच्या इंद्रायणीला पण ह्यांच्याकडचं बरंच पब्लिक असतं. उतरायचे वांदे करुन ठेवतात. ती गाडी शिंची पुण्याच्या पुढे सोडायलाच नको. ;)

In reply to by सूड

अस्सल पुणेकर सकाळच्या इंद्रायणीने कशाला जाईल झक मारायला? तुम्ही खरे पुणेकर दिसत नाही. वाघाचे कातडे पांघरून वाघ होता येत नाही, हे लक्षात ठेवा.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>तुम्ही खरे पुणेकर दिसत नाही.वाघाचे कातडे पांघरून वाघ होता येत नाही, हे लक्षात ठेवा. मी फक्त सोलापूरच्या लोकांची इंद्रायणीला इतकी गर्दी असते की सकाळी उतरायचे पण वांदे होतात त्यामुळे ती गाडी पुण्यातून पुढे नाही नेली तर बरं होईल इतकंच म्हटलंय. तुम्हाला माझ्या प्रतिसादात मी पुणेकर असल्याचा दावा केल्यासारखं का वाटलं ते वाचायला आवडेल.

In reply to by सूड

म्हणजे तुम्ही पुणेकर नाही हे मान्य करता आहात. लक्षात ठेवेन पुढील पुणे धाग्याच्या वेळेस. (आत्ता आला उंट डोंगराखाली)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>म्हणजे तुम्ही पुणेकर नाही हे मान्य करता आहात. नीट वाचा काका, मी पुणेकर आहे/ नाही किंवा मुंबैकर आहे/ नाही असलं काहीही म्हटलेलं नाहीये. रेल्वेतून उतरताना कोणत्याही सर्वसामान्य प्रवाशाला होणार्‍या त्रासाबद्दल म्हटलंय मी. ;)

In reply to by सूड

च्यायला तुम्ही कोल्हापूरसारखं असं स्टेशन मागून घ्यायचे राव. पुढे कुठेच जाताच येऊ नये. गाडी फक्त मुम्बै पुणे मुम्बै.

In reply to by आनन्दिता

आवांतर : बाकी तुम्ही सोलापुर चे म्हणे … फार पब्लिक असतं हो तुमच्या सोलापुर चं आमच्याकडे college ला… पण असो. .कुठे जाणार तुम्ही तरी पुण्याशिवाय ..
म्हणजे नाईलाज म्हणून पब्लिक जाते का पुण्यात ? मला तर वाटत होते की पुणेप्रेमापोटी जात असेल.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

नाही हो विमे. प्रत्येकाला आपलाच गाव प्रिय असतो. सोलापूर् / कोल्हापूरकरांना पुणे आवडले जरी (समजा) तरी पुण्यात जायचे शिकण्यासाठी किंवा नौकरीसाठी ते गरज म्हणुन. पण आपला गाव तो आपला गाव. गाव हागणदारी असण्याइतके मागासलेले जरी असले तरी त्याच्याबद्दल जे प्रेम असते ते दुसर्‍या कुठल्याही गावाला कसे मिळावे. लोक पुण्यात येतात त्याचे मुख्य कारण म्हणजे उडदामाजी काळे गोरे. घाम, दुर्गंधी, घाण, अस्वच्छता, बकालपणा, अस्थैर्य, ती लोकल तो चिकचिकाट, तो रोजचा १ - १.५ तासाचा गर्दीत लोंबकळत केलेला प्रवास या असल्या गोष्टी टाळण्यासाठी मुंबै पेक्षा पुणे लाखपटीने बरे असे म्हणुन पुण्यात येतात. बाकी शिक्षण आणि नौकरी व्यवसायाच्या संधी सुद्धा पुण्यात खुप. म्हणुन पुणे. पण उद्या याच लोकांना (आणि पुणेकरांना देखील) उदरभरणासाठी मुंबैला यायला लागले तर झक मारत येतीलच की. म्ह्णुन काय मुंबै थोडीच आवडणार आहे. ती एक तडजोड झाली. टाळता न योण्याजोगी अपरिहार्यता.

In reply to by मृत्युन्जय

पश्चिम महाराष्ट्रातल्यांना मुंबैपेक्षा पुणे जवळ आहे त्यामुळे गावाला जवळ म्हणून पुणे प्रेफर करणार्‍यांची संख्या जास्त आहे.