कचेरीत आलो की, सुरुवातीला कामाच्या मेल्स पहायच्या, जरूर त्यांना उत्तरे द्यायची. काही पेंडींग कामे उरकायची आणि मग काही मीटींग वगैरे नसेल तर, एक कडक कॉफीचा कप घेऊन थोडा वेळ इंटरनेट-इंटरनेट खेळायचे. हा नेहेमीचा शिरस्ता!
आजही तसेच झाले.
काहीतरी हुडकण्यासाठी गूगलवर गेलो. गूगलची मुखपृष्ठे नेहेमीच कल्पक असतात. निरनिराळ्या गॅजेट्सचे मुखपृष्ठ पाहून उत्सुकता चाळवली. पाहतो तर, अॅडा लवलेसचा १९७ वा जन्मदिवस!
चार्ल्स बॅबेज ह्या इंग्रजाने १८३७ साली अॅनालिटिकल इंजिनची संकल्पना मांडली. नेमून दिलेली कामे करणारी इंजिने त्यापूर्वीदेखिल बनवली जायची. पण ह्या मशिनचे वैशिष्ठ्य असे की, हे मशिन प्रोगामेबल असणार होते. काय करायचे याच्या सुचना मिळाल्यावर, त्याबरहुकुम काम करणार होते. थोडक्यात म्हणजे, आजच्या आमच्या पीसी/लॅपटॉपचा पणजोबा!
बॅबेजची ही संकल्पना बरीचशी कागदोपत्रीच राहिली. प्रत्यक्षात मशिन अवतरले ते १९४० साली!
ह्या अॅनालिटिकल इंजिनचला द्यावयाच्या सुचनांचा संच कसा असावा, याचा तपशिलवार आराखडा तयार केला होता तो ह्याच अॅडा लवलेसने.
म्हणूनच बॅबेजला आधुनिक काँप्युटरचा पितामह तर अॅडाला जगातील पहिली प्रोग्रामर मानले जाते.
आता अॅडाची आठवण आली तर, तिच्या वडिलांची, लॉर्ड बायरनची आठवण आली नाही, असे कसे होईल?
अॅडा हे बायरनचे एकमेव औरस अपत्य! (अनौरस अपत्यांची संख्या बायरनलादेखिल सांगता आली नसती!!) प्रतिभावान कवी अन् रंगेल गडी.
वारुणी-तरुणींच्या संगतीत दिवस्-रात्र घालविणारा हा माणूस एक दिवस उठतो आणि इंग्लंडला कायमचा रामराम ठोकून ग्रीसमध्ये येतो. तुर्की (ऑटोमन) साम्राज्यातील परतंत्र ग्रीस पाहून कळवळ्तो. त्याच्याकडे शस्त्र असते ते फक्त लेखणीचे.
The isles of Greece, the isles of Greece!
Where burning Sappho loved and sung,
Where grew the arts of war and peace,
Where Delos rose, and Phoebus sprung!
Eternal summer gilds them yet,
But all, except their sun, is set...
ही आणि यासारख्या असंख्य कविता रचतो. ग्रीक तरुणांना स्फुर्ती देतो. स्वतंत्र ग्रीस बायरनचे ऋण विसरत नाही. जागोजागी त्याची स्मारके उभारली जातात.
मायदेशाने नाकारलेला एक रंगेल कवी, दुसर्या देशाच्या गळ्यातील ताईत बनतो!
सगळेच विलक्षण.
वाचन संख्या
2665
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय ' विलक्षणच सारं ! '
कृतज्ञता.
छान
धन्यवाद विकास .
In reply to छान by विकास
विनम्र अभिवादन
सुन्दर लिहिलय...
छान
+१
In reply to छान by चित्रा
मस्त ओ,काल मला नक्की संदर्भ
+ १ टु ५० फक्त
असेच
माहितीपुर्ण लेख.
आज इथं ज्याच्या मुळं लिहीतोय
थोडक्यात पण चपखल आणि समयोचीत लिखाण !
अॅडाबद्दल अंधुक वाचल्याचं