Skip to main content

<तुम्ही मंगळवादी आहात का?>

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 09/12/2012 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही मंगळ वादी आहात का? ब्रांडेड जन्मपत्रीका...महागडे ज्योतिषी ..अंगठ्या, खडे व अक्सेअसरिज .. उंची नवग्रह शांती ..मंगळ शांती ... लग्न न जमणे , कडक मंगळाच्या मुलीचे मौ मंगळाच्या मुलाशी लग्न इत्यादी..इत्यादी .. मंगळ वाद पूर्वी आमच्या लहान पणी पण होता पण स्वरूप निराळे होते .. पत्रीकेत मंगळ असलेल्या मुलीचे लग्न साध्या मुलाशी लागले तर मुलगा मरतो मात्र मंगळाच्या मुलाचे लग्न साध्या मुलीशी झाले तर शाअंत कली तर काही होत नाही. हल्ली नजर सुरक्षा कवच , स्वर्ग चे ज्योतिषाचार्य वगैरे नव्या टेक्नॉलॉजीज आल्या आहेत....... त्यांचा लोक उपयोग करतात. नजर सुरक्षा कवचातील प्रारणे म्हणे ग्रहांच्या लागलेल्या नजरा काढून टाकतात. तुमचे काय म्हणणे आहे....... तुम्ही मंगळ वादी आहात का? अवांतरः नाडी आणि वादी हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. लेंग्यात नाडी टाकतो आणि मशीनला वादी बसवतो हाच काय तो फरक.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4380
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

काही लोकांना 'कडक चहा' लागतो तसा काहींच्या पत्रिके 'कडक मंगळ' असतो. आमची थोडी 'शांती' केली कि आमी तो मंगळ 'सौम्य' वा 'नाहिसा' करतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

@आमची थोडी 'शांती' केली कि आमी तो मंगळ 'सौम्य' वा 'नाहिसा' करतो.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मला पण शिकवा ना ही शांती... ;-) जरा चेंज मिळेल मलाही,त्या पारंपारिक शांती पासून http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif

मी टंगळ मंगळ वादी आहे व मी " तुम्ही टंगळ मंगळ वादी आहात काय ? " या धाग्याचे जागतिक हक्क माझ्याकडे आहेत हे जाहीर करीत आहे. हा धागा चोरणार्‍या वर मिपावरील सॅटायर कुमार सोडला जाईल याची नोंद घ्यावी हो !!!

इजुभौ निदान 'तुम्ही संघवादी आहात का? असा धागा काढायचा होतात. १०० धावा तरी फिक्सच होत्या.

आम्ही तर कोणत्यावेळी कोणता पाय आधी घराबाहेर टाकायचा याबद्दल इजुभौंचा सल्ला घेतो.

In reply to by पैसा

तरीही संपादक व्हायचं प्राक्तन चुकलं नाही! ;) काय उपेग इजुभौंच्या सल्ल्याचा? ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ती खुर्ची इजुभौंच्याच सल्ल्यापरमानं आंगावर घेतल्यालं हाय.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पावरफुल गोष्टींची चेष्टा करू नका, एवढी मंगळाची दशा उलटू द्या मग बघा!

झकास विडंबन. मी मंगळवादी आहे. तेव्हडं बघून जरासं एखादं लॉटरीचं तिकिट द्या कि लाऊन म्हणजे चंगळवादीपण होता येईल.

बाकीच्यांचं म्हैती नै पण विजुभौ तुम्ही खरे मंगळवादी आहात ;) केप्लर खुर्दात मुक्काम तुमचा, नजरेतून सुटेल वाटलं काय ;)

In reply to by बॅटमॅन

>>> केप्लर खुर्दात मुक्काम तुमचा, नजरेतून सुटेल वाटलं काय तो त्यांचा पूर्व-ग्रह असू शकेल ;)

माझ्या माहीतीत एक कडक्क मंगळाचे स्थळ आहे. त्यांच्या मते मंगळा ला मंगळच उतारा म्ह्णून योग्य ठरु शकतो. सौम्य मंगळ असला तर नवर्‍याला पडते घ्यावे लागते. मंगळाच्या मुलीचे अमंगळीय मुलाशी अथवा व्हाईस अ व्हर्सा लग्न झाले तर अमंगळीय व्यक्ती हमखास मरण पावते म्हणे. माझी शंका: मंगळीय मुलाचे मंगळीय मुलीशी लग्न झाले तर दोघेही गचकतील का ? माझ्या मातोश्रींची / अमंगळीय पत्नीची प्रतीक्रिया : तू म्हणजे ना.... शुभ बोल नार्‍या.... आहेस. असो.आमच्याअसल्या शंकाना अशा तर्‍हेने वाटाण्याच्या अक्षता लहानपणासूनच मिळत आल्या आहेत त्यामुळे ज्ञानात भर पडली नाही. पैसा तै. बिपीनदादा र रा यानी शंका समाधान केल्यास निदान थोडेतरी ज्ञान वाढेल

जीथे फलज्योतिष चिकित्सा मंडळ काकानी वाटाण्याच्या अक्शदा लावल्या तेव्हा उत्तराची प्रतिक्षा करणेच योग्य,या बाबतीत तुमचा मन्गळ एकदमच कडक दिसतो.