तंबाखू
०===तंबाखू===०
ओठ बरेचदा बदलतो
पण तंबाखू सुटत नाही
डावीकडचा फाटलाय
हे,उजवीकडच्याला पटत नाही
तोंडही जुन्या चाळीसारखं
तंबाखू म्हणजे बिह्राडकरु
ओठांसारख्या मोकळ्या खोल्या
ईकडे भरु का तिकडे भरु?
भाडेकरुंचं प्रेमही अजीब..
रहायला चालते कुठचीही खोली
एकीकडचा उडाला चुना..
की लगेच दुसरीकडे रहायची बोली
दारुवाल्यांना म्हणतात तळिराम
त्यांचा सगळा साजच मोठा..
आंम्हालाही म्हणावं मळिराम
आमचा तर फक्त कार्यक्रमच छोटा
आंम्हा दोघांची एकच गल्ली
त्यांना झाकुन आंम्हाला काढा
त्यांचा आहे एक्सप्रेस हायवे
आंम्ही पितो लोणावळ्यात सोडा
रस्ता वेगवेगळा असला तरी
वाट आमची एक आहे
त्यांचा अंड्याचा.....तर
आमचा साधा केक आहे
तरी आंम्हाला सगळे म्हणतात
अहो घाण असतं ते...सोडा..
च्यायला...यांना काय माहित
हे गाढव आहे..की..घोडा?
व्यसन ही एक व्रुत्ती आहे
तीला बांध घालता येत नाही
ते म्हाताय्रा सारखं आहे हो,
काठीशिवाय चालता येत नाही
हा वेढा सुटत नाही..पण,
लवकरच मी फोडणार आहे
खरचं सांगतो...उद्या पासून...
मी तंबाखू सोडणार आहे.
पराग दिवेकर...
मळिराम
मळिराम.... लै आवडले.... पहिली
बिऱ्हाडकरू, मळिराम, चुना उडणं
घासकडवी,अंबोळी यांना
छान
थेंक्यु अंकल
प्रत्येक ओळीला टाळ्या.
झक्कास क्लासिक. तंबाखूची रसाळ
'पिंक' प्रतिभेला __/\__ !
पुलंच्या 'पानवाला ' मधुन
तंबाखू ???
'तमाखू' च
वांदो नथी.
ओळीओळीतून ती चुन्याची आग, तो
@आत्मूदा तू असंच लिहीरे नेहमी
'चैतन्यचूर्ण'
कोण हे महाशय
मांज्यालाआपलं धाग्याला पून्हा एकदा चूना लावून वर काढलेन? अरे आत्मा होरपळला असेल की जरा विचार करा की त्याचा काहीतरी :-Pबुवांची हि कविता नजरेखालून
मग तंबाखू सोडली का नाही शेवटी
इथे बुवांनी वल्लीला नेहमीचा
@मग तंबाखू सोडली का नाही
>>> गवि मोड
@>>> गवि मोड>>> गवि मोडचा
अलेलेलेलेलेले....
अ.आ. ने विचारलेल्या प्रश्नाला
गवि.. एक शंका..
माझ्यामते दोन्ही लेव्हल्सवर.
@वन डे अॅट अ टाईम,- आजचा
काय नसते हो
तंबाखू भली की बुरी यावर चर्चाच चालली आहे तर
छान काव्य.
अत्रुप्त आत्मा साहेब, तुमच त्रिवार अभिनंदन तंम्बाखु सोडल्याबद्दल
निश साहेब
शांत गदाधारी भीम शांत....!
छान मस्त जमलीये गझल
अ. प्र. ति. म
तंबाखु सोडल्या बद्दल गुरुजींचे अभिनंदन.
नका सोडू !!!!
ह्म्म्म्म्म
@स्वतःवरती संयम असला की सगळे
नक्कीच
!@पण मिळाली तरी छान छान आणि
कविता आवडली !