Skip to main content

रोजचाच प्रवास

लेखक शरद
Published on शुक्रवार, 23/11/2012
रोजचाच प्रवास (आज मात्र विचार करत करत ) डेक्कन क्वीन पुण्याहून मुंबईकडे जात आहे. रोजचाच प्रवास. आता असे सांगा डेक्कन क्वीनचा कोणचा भाग, रुळांच्या हिशेबाने, (relative to railroad track) पुण्याकडे जात आहे ? शरद
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2859
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

डेक्कन क्वीनच्या टेल लाईटचा प्रकाश आणि भोंग्याचा पुण्याच्या दिशेत जाणारा आवाज सोडला तर काहीच नाही! :)

डेक्कन क्वीनचा रुळाच्या दिशेने असलेला खालचा भाग.........

मला शरद यांच्या प्रश्नाचे शास्त्रीय उत्तर माही नाही. पण मी मुंबईला अपरिहार्य असेल तरच जातो . सहज जाण्यासाठी हे शहर आता राहिलेले नाही. म्हणून मी deccan queen ने किंवा इतर कुठल्याही वाहनाने मुंबईकडे प्रवास करत असलो तरी माझे मन पुण्याच्या दिशेनेच जात असते.

श्री. माम्लेदारांचा पंखा यांचे उत्तर बरोबर आहे. रेल्वेच्या चाकाचा भाग,bottom of the protruding Rim of the wheel, हा नेहमीच पुण्याकडेच जात असतो. शरद

In reply to by शरद

bottom of the protruding Rim of the wheel
म्हणजे नक्की काय आहे हे पटकन लक्षात आलं नाही. आणि गूगल मुळे डोक्याला थोडासुद्धा ताणदेण्याची सवय गेलिये. त्यामुळे हे पान मिळालं. अ‍ॅनिमेशन बघून लगेच कळलं पण थोडासा विचार करायला हवा होता असं वाटलं, आय मिस्ड द फन. :(

चाकाचा भाग पुण्याकडे? आणि गाडी मुंबईच्या दिशेने? काय चाल्लय काय हे ?

गाडी मुंबईकडे जात असतांना चाकाचा a येथील भाग क्षणापुरता का होईना पुण्याकडे सरकत असतो. शरद Rail

पन्खा जर पुरेशा वेगानी फिरत असेल तर आणि पंख्याचा अक्ष हा डेक्कन क्वीन च्या प्रवासाच्या दिशेला समांतर नसेल तर पंख्याचा पात्याचा दूर्चा भाग (जो सगळ्यात वेगानी फिरतो) तो विरुद्ध दिशेनी जात असेल. हाच हिशोब इंजिनाशी निगडीत पट्टे, साखळ्या, गिअर इत्यादींना पण लागु होईल.