Skip to main content

वाहनमहिमा

लेखक शरद यांनी गुरुवार, 15/11/2012 11:27 या दिवशी प्रकाशित केले.

वाहनमहिमा

बारामासी दु:ख मानसी वाहतुक दाटे चोहिकडे !
क्षणात होते सिग्नल हिरवे क्षणात फिरुनी लाल गडे !!

भवती बघता शतगाड्यांचा गोफ दुहेरी विणलासे !
अरुंद रस्ते काय बांधिले चालक वाटा काढितसे !!

झाला पिवळा लाल वाटतो अहा ! अहा ! हिरवा उघडे !
झणी रस्त्यावर, उंच घरांवर काळा काळा धूर उडे !!

उठती वरती आणि सभोवती प्रदूषणांचे रंग पहा !
सर्व थरांवर हाय रेखिले भीषणतेचे रूप महा !!

वाहनमाला जाता भासे कल्पांताची माळची ते !
उतरूनी येती अवनीवरती कळीकाळची एकमते !!

धडधड खडखड आवाज करोनी वाहनचालक सावरती !
गर्दी होता पदपथांवर निज सामानासह धडपडती !!

वाहने येता आणिक जाता पोलिस शीळ गात फिरे !
कर्कश नाद गाय तयाचा, वाहनमहिमा एकसुरे !!

मीरा सिरसमकर

कर्नाटकच्या सहलीला गेलो असतांना सहप्रवाशी सौ. साठे यांनी त्यांच्या संग्रहातील एक जुने अप्रतीम गीत सांगितले . आज आपल्या मनोरंजनाकरिता ते देत आहे.

शरद

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1903
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

एक करेक्शन सुचवु का..
>>धडधड खडखड आवाज करोनी वाहनचालक सावरती !
इथे "आवाज" तले ३ शब्द फार दाटी करताहेत... त्याऐवजी "नाद" कसं वाटेल?

अर्धवटराव