वाहनमहिमा
बारामासी दु:ख मानसी वाहतुक दाटे चोहिकडे !
क्षणात होते सिग्नल हिरवे क्षणात फिरुनी लाल गडे !!
भवती बघता शतगाड्यांचा गोफ दुहेरी विणलासे !
अरुंद रस्ते काय बांधिले चालक वाटा काढितसे !!
झाला पिवळा लाल वाटतो अहा ! अहा ! हिरवा उघडे !
झणी रस्त्यावर, उंच घरांवर काळा काळा धूर उडे !!
उठती वरती आणि सभोवती प्रदूषणांचे रंग पहा !
सर्व थरांवर हाय रेखिले भीषणतेचे रूप महा !!
वाहनमाला जाता भासे कल्पांताची माळची ते !
उतरूनी येती अवनीवरती कळीकाळची एकमते !!
धडधड खडखड आवाज करोनी वाहनचालक सावरती !
गर्दी होता पदपथांवर निज सामानासह धडपडती !!
वाहने येता आणिक जाता पोलिस शीळ गात फिरे !
कर्कश नाद गाय तयाचा, वाहनमहिमा एकसुरे !!
मीरा सिरसमकर
कर्नाटकच्या सहलीला गेलो असतांना सहप्रवाशी सौ. साठे यांनी त्यांच्या संग्रहातील एक जुने अप्रतीम गीत सांगितले . आज आपल्या मनोरंजनाकरिता ते देत आहे.
शरद
वाचन संख्या
1889
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
मस्त...
खासच!
--^--^--^--
सुंदर महिमा वर्णन.