Skip to main content

वाहनमहिमा

लेखक शरद
Published on गुरुवार, 15/11/2012
वाहनमहिमा बारामासी दु:ख मानसी वाहतुक दाटे चोहिकडे ! क्षणात होते सिग्नल हिरवे क्षणात फिरुनी लाल गडे !! भवती बघता शतगाड्यांचा गोफ दुहेरी विणलासे ! अरुंद रस्ते काय बांधिले चालक वाटा काढितसे !! झाला पिवळा लाल वाटतो अहा ! अहा ! हिरवा उघडे ! झणी रस्त्यावर, उंच घरांवर काळा काळा धूर उडे !! उठती वरती आणि सभोवती प्रदूषणांचे रंग पहा ! सर्व थरांवर हाय रेखिले भीषणतेचे रूप महा !! वाहनमाला जाता भासे कल्पांताची माळची ते ! उतरूनी येती अवनीवरती कळीकाळची एकमते !! धडधड खडखड आवाज करोनी वाहनचालक सावरती ! गर्दी होता पदपथांवर निज सामानासह धडपडती !! वाहने येता आणिक जाता पोलिस शीळ गात फिरे ! कर्कश नाद गाय तयाचा, वाहनमहिमा एकसुरे !! मीरा सिरसमकर कर्नाटकच्या सहलीला गेलो असतांना सहप्रवाशी सौ. साठे यांनी त्यांच्या संग्रहातील एक जुने अप्रतीम गीत सांगितले . आज आपल्या मनोरंजनाकरिता ते देत आहे. शरद
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1889
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

=)) --^--^--^-- =))

एक करेक्शन सुचवु का.. >>धडधड खडखड आवाज करोनी वाहनचालक सावरती ! इथे "आवाज" तले ३ शब्द फार दाटी करताहेत... त्याऐवजी "नाद" कसं वाटेल? अर्धवटराव