दारू फुकट झालीच पाहिजे...
दारूच्या या गुत्त्यावरचा,
गुंता काही सुटत नाही..
किती उधारी दिली तरी ही,
हिशेब काही मिटत नाही..
चकन्यामधले शेंगदाणे,
मी बारीक्क नजरेनं मोजतो आहे,
रोज एक्केक दाणा कसा,
कमी कमी भरतो आहे..
एक दिवस एकच शेंग,
पाहून आमचा सरकला..
'म्हागाई माजली न् भौ',
संप्या वेटर चिरकला ..
आधीच साला बायको आमची,
पगार आमचा करीत नाई..
शेट्टी उधारी ठेवीत नाई,
अन् आता संप्या चकनापण देत नाई..
डोक्याला हात लावून,
बाटलीकडं बघत बघत..
टेबलावर उभा राहून बोलला बाब्या मोडक..
'सरकारनं आता तरी,
गरिबांकडं पाह्यल पायजे..
बीपीयल(BPL) जनतेला, दारू फुकट झालीच पायजे..
बीपीयल(BPL) जनतेला, दारू फुकट झालीच पायजे..'
येकदम मनातल बोलला भावा..
'भावा' हाक ऐकून लय बर वाटलं .
:)
आवडली
जर..
शर्वरी बै दूध फुकट असून तरी
दारु फुकट होवो नको होवो, चखना
कॉम्प्लिमेंटरी
पिणार्याला दिडशे काय अन दोनशे
बारीक निरीक्षण... मस्तच
एक्कच नंबर!!
अशे कशे ब्याटम्यानराव.. जगात
(तरीबी दारू महांग झालीच पाहिजे!!)