Skip to main content

वर्तुळ

लेखक ह भ प यांनी शुक्रवार, 16/11/2012 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
सहजपणे तुझे माझ्या जीवनात येणे, घेउन आले माझ्या साठी आनंदाचे लेणे.. वरचेवर आपल्या भेटी आता नित्य होउ लागल्या, तुझ्याच आठवणीत हरएक रात्री जागू लागल्या.. समजुनही उमजत नव्हतं ह्या नात्याला काय म्हणावं, सहजचं तू म्हणाली "ते मैत्रीसारखं असावं.." तितक्याच सहजपणे मी ते नातं स्विकारणं जमणारं नव्हतं मला तुझ्याशी नातं नाकारणं.. गुलमोहोरासवे आपली मैत्रीही बहरली, नकळतपणे तुलाही माझ्या अंतरीची ओढ लागली.. तुही माझ्या सारखीच हरएक रात्र जागू लागली, माझ्याच आठवणीत तू आता कूस बदलू लागली.. आपले नाते ना 'ते' राहिले माझी जीवनसाथी बनुन, "तू एक वर्तुळ पुर्ण केले.." कवीमित्र: अजय शेरे, पुणे (९८६००००७५४) (ही कविता
नाते ना 'ते' राहिले
) या ओळीवरुन स्फुरलेली आहे)

वाचने 2316
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by ह भ प

खोड्लस मित्रा....खोड्लस कविता आवडली!!

ओढलंस.. सोडलंस.. फोडलंस..

मस्तच...

छान जमली आहे. आवडली.