सहजपणे तुझे
माझ्या जीवनात येणे,
घेउन आले माझ्या साठी
आनंदाचे लेणे..
वरचेवर आपल्या भेटी
आता नित्य होउ लागल्या,
तुझ्याच आठवणीत
हरएक रात्री जागू लागल्या..
समजुनही उमजत नव्हतं
ह्या नात्याला काय म्हणावं,
सहजचं तू म्हणाली
"ते मैत्रीसारखं असावं.."
तितक्याच सहजपणे मी
ते नातं स्विकारणं
जमणारं नव्हतं मला
तुझ्याशी नातं नाकारणं..
गुलमोहोरासवे आपली
मैत्रीही बहरली,
नकळतपणे तुलाही
माझ्या अंतरीची ओढ लागली..
तुही माझ्या सारखीच
हरएक रात्र जागू लागली,
माझ्याच आठवणीत तू
आता कूस बदलू लागली..
आपले नाते ना 'ते' राहिले
माझी जीवनसाथी बनुन,
"तू एक वर्तुळ पुर्ण केले.."
कवीमित्र: अजय शेरे, पुणे (९८६००००७५४)
(ही कविता
नाते ना 'ते' राहिले
) या ओळीवरुन स्फुरलेली आहे)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2338
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
तोड्लस मित्रा....तोड्लस
तोड्लस मित्रा....तोड्लस
जोड्लस मित्रा....जोड्लस
जोड्लस मित्रा....जोड्लस
...
In reply to जोड्लस मित्रा....जोड्लस by जेनी...
:-)
...
In reply to ... by ह भ प
खोड्लस मित्रा....खोड्लस
कविता आवडली!!
मोड्लस मित्रा....मोड्लस
मोड्लस मित्रा....मोड्लस
:-)
ओढलंस.. सोडलंस.. फोडलंस..
सोडलस मित्रा,(भसाभस) सोडलस
सोडलस मित्रा,(भसाभस) सोडलस =)) :-p
हान तेच्यायला तोडा रे
हान तेच्यायला
तोडा रे
:)
मस्तच...
वा!
छान जमली आहे. आवडली.
आपले नाते ना 'ते' राहिले
आपले नाते ना 'ते' राहिले
"पाहिले न मी तुला,;-)तू मला न पाहिले.."